संक्रांति चेक्कुलु

Submitted by अश्विनीमामी on 5 June, 2024 - 09:24
Sankranthi Chekkulu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पीठ दोन वाटी, घरचे पांढरे किंवा नसल्यास अमुल बटर एक मोठा चमचा, चवी नुसार मीठ, एक इंच आले व चार पाच तिखट मिरच्या ह्यांचे वाटण , एक चमचा जिरे, दोन चमचे तीळ, बारिक चिरलेली कोथिंबीर , कढिपत्ता पाने सात आठ कापून, ह्या सर्वा च्या आधी एक /दीड मोठा चमचा भिजवलेला साबुदाणा व पिवळी मूग डाळ प्रत्येकी. कमीत कमी दीड दोन तास भिजवून घ्या. माझ्याकडे साबुदाणा नव्हता म्हणून मी उडिद डाळ व हरबरा डाळ घातलेली भिजवून. भिजवायचा दीड तास पूर्व तया रीत घेतलेला नाही.

तळायला तेल व एक दीड चमचा तेल पिठात घातले तरी बरे.

क्रमवार पाककृती: 

परातीत तांदळाचे पीठ चाळून घ्या. शक्यतो ताजे पीठच घ्या. माझे जरा जुने झालेले होते. पण चवीत फारसा फरक नाही पडला. मला एकल किचन मुळे अर्धा किलो ग्रोसरी, पावकिलो भाजी पण जास्तच होते. अधून मधून रिव्यु घेउन खराब झालेली ग्रोसरी टाकून द्यावी लागते.

त्यात लोणी, जिरे, तीळ, आले मिरची वाट ण, कोथिंबीर, कढिपत्ता , भिजवलेला साबुदाणा व मूग डाळ घालून एकदा कोर डे मिसळून घ्या. लोणी सर्वत्र लागले पाहिजे. एक चमचा तेल घाला. मग कोमट पाण्याने भिजवून घ्या. फार घटट किंवा पातळ भिजवू नका. जस्ट राइट भिजले पाहिजे. थालिपीठ साठी भाजणी भिजवून घेतू त्या टाइप. दहा मिनिटे ठेवा.
IMG_20240605_203300.jpg

तळणी साठी तेल गरम करायला ठेवा. मध्यम आच, मंद गॅस हे लक्षात असू द्या. हाय हीट नाही.

आता थोडा कौशल्याचा भाग आहे.
IMG_20240605_203538.jpg

पिठाचे बारके गोळे करून घ्या. एक झिप लॉक टाइप प्लास्टिकची पिशवी पोळ पाटावर किंवा फ्लॅट सरफेस वर ठेवा त्यावर एक गोळा ठेवा.
वर दुसरी पिशवी ठेवा. मग एखादी फ्लॅट सरफेस वाली वाटी / बारके पातेले घ्या व त्याने वरच्या पिशवीवर दाब द्या. गोळा फ्लॅट झाला पाहिजे.
IMG_20240605_203743.jpg
मग पातेले व वरील पिशवी दूर ठेवा . खालची पिशवी उचलुन चेक्कलु अलगद तेलात सोडा. असेच सर्व करायचे.

अगदी बदामी रंगावर तळून घ्यायचे आहे. जास्त लाल झाले की जरा कडक होईल. तळले पूर्ण गेले पाहिजे पण लाल नाही होता कामा.
काही थोडे फुगतात.

परडीत टिशू घालून त्यावर काढा. गार झाले की एअर टाइट डब्यात ठेवा . गार झाले की लगेच खाता येइल. तीन चार दिवस नक्की टिकेल.

मी काही गोळ्यांची छोटी, छोटी बोरे हातानेच वळली व बदामी रंगावर तळली. चेक्कलु पेक्षा एक कणी जास्त तळली.

एक वेगळ्या प्रकारचा स्नॅक तयार आहे.
IMG_20240605_204030.jpg

हैद्राबादेत ज्युबिली हिल्स च्या आधी फिल्म नगर मध्ये अपोलो हॉस्पिटल आहे. तिथे मागे एका बारक्या टेकडीवर वेंकटेशाचे देउळ आहे. तिथे आम्ही बरेचदा जात असू दर्शनाला. तिथे हे चेक्कलू बनवत असत. मंदिराच्या बेसला मागे गोठा, यज्ञ वेदी, असा सर्व आश्रम टाइप सेट अप होता. जाउन जाउन पंडित ओळखीचा झाला होता. प्रसाद असल्याने फार मागून खाता आले नाही तेव्हा पासून रेसीपी शोधत होते.

संक्रांती साठी खास बनवले जाणारे पदार्थ - आपल्या पारंपारिक दिवाळी फराळ सारखे - आहेत त्यातील हा एक आहे. मिक्षचर, रिबन पकोडा, शेव, गोड पदार्थ दोन तीन प्रकारचे, मुरुक्कु असा पूर्ण सेट आहे. मुंबईत रिबन पकोडा मिळ तो पण त्याच्या शुद्धतेची काही शाश्वती नाही. झोपड पट्टीत बनवलेला असू शकतो. पण डेस्परेशन मध्ये हा पण एक दोन दा घेतलेला आहे. दुधाची तहान ताकावर. एकदा हा पण उरलेल्या तांदुळपिठाचा बनवून बघते, सोपी रेसीपी आहे.

तांदळाच्या पिठाची बोरे १९९१ मध्ये चेन्नईत ट्रेनिन्ग ला गेले होते तेव्हा बारके पाकीट आणून हॉटेलात रुम मध्ये बसून खाल्ली होती. तेव्हा पासून एकदा बनवायची होती. ती कोकोनट ऑइल मध्ये तळलेली होती.

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणात ३० - ३५ होतील. मी अर्धे पीठ फ्रिज मध्ये ठेवले आहे. वीकांताला लेक येइल तेव्हा फ्रेश तळेन. म उ पडतात का ते उद्या कळेल.
अधिक टिपा: 

इथे चहा बरोबर काय पदार्थ द्यावेत असा बेत काय करावा मध्ये प्रश्न येतो . हा एक हलका चविष्ट स्नॅक आहे. रुणमेश ला कोणी करुन घातले तर तो चहात बुडवून नक्की खाईल. कडाम कुडूम स्नॅक आहे.

मुलांना डब्यात द्यायला छान आहे. बस मधील स्नॅक मध्ये किंवा बारक्या सुट्टीत. उकडीचे मोदक करुन झाल्यावर पिठी उरल्यास हे करोन संपवता येइल. जास्तीचे पाणी उरलेल्या चेक्कुलु पिठात घालून धिरडी पण बरी होतील असे मला वाटते. तळणी नकू असल्यास.

आल्सो विल मेक गुड चकणा आय फील .

माहितीचा स्रोत: 
विस्मई फूड च्यानेल यु ट्युब वर/ आंध्रा/ तेलंगणातील पारंपारिक पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो काढलेत फोन वरुन लोड करेन.

तेलंगणा/ आंध्रा/ दाक्षिणात्य हे क्लासिफिकेशन मध्ये उपलब्ध नाही आहे. दयचेसि कोंचम रेफरन्स इवंडी अ‍ॅडमिन गारु.

फोटो आणि रेसिपी ला दहा पैकी शंभर Happy करेन ह्या weekend la. साबुदाणा आणि डाळ मिक्सर मधून काढायची की तशीच पिठात घालायची?

मस्त लिहिली आहे रेसिपी आणि वर्णनं पण...
फोटो तर एक नंबर..
हे चेक्कुलू आणि बोरं खाल्ली आहेत..बाहेर मिळतात स्नैक्स दुकानात... चांगले लागतात.

Wow wow.

खूप छान
Tasty treat!
फोटोबद्दल क्या केहने.. डोळ्यात बदाम

फारच यम्मी वाटते आहे. इतक्यात नाही पण लवकरच कधी तरी बनवुन खाऊन बघेन. मी बहुतेक साबुदाणा आणि डाळ घुर्घुर करुन घेईन कारण बाबांना दाढा नाहीत.

रुणमेश ला कोणी करुन घातले तर तो चहात बुडवून नक्की खाईल >>> Happy बुडवून की तोंडी लाऊन हे माहीत नाही, पण चहासोबत खाईन हे नक्की. अगदी फोटोतलेच खावेसे वाटत आहेत. आणि भडक मसालेदार नसल्याने हे पुन्हा पुन्हा आणि जास्त प्रमाणात सुद्धा खाऊ शकतो असे वाटते.

छान पाककृती ..
तुमचा फोटो देखील छान आहे..

इन्टरेस्टिंग रेसिपी - माहीत नव्हता हा प्रकार.
तांदुळाची भाकरी मीट्स साबुदाण्याचं थालीपीठ! Happy
त्यामुळे हे कदाचित थालिपिठासारखं थोडं मोठं थापून शॅलो फ्रायही करता येईल असं वाटतंय. मग फार कडक होणार नाही.

लुकिंग गुड, अमा! Happy

कशा आहात अमा? फोटू बघून मस्त वाटलं.
रेस्पी छान आहे. तळणाचे सगळे प्रकार आवडतात. करून पहायचा विचार आहे. Happy