चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”
साहजिकच तो खूप ट्रोल झाला पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण बहुतेक वेळा पाकिस्तानला जिंकताना पाहिले. 2004 पूर्वी भारत पाकिस्तानमध्ये एक सिरीजच काय एक कसोटी सामनाही जिंकू शकला नव्हता. गावस्कर आणि अझरुद्दीनचा संघही अपयशी ठरला. भारतानेही त्यांना सहजासहजी जिंकू दिले नाही. वीसपैकी पंधरा टेस्ट ड्रॉ झाल्या. दोन्ही बाजूंनी खेळ बरोबरीचा राहिला. ते आपापसात बदला घेत असत. 2004 मध्ये पराभूत झाल्यानंतर पुढच्या वर्षी पाकिस्तान संघ भारतात आला तेव्हा त्यांनी कसोटीत बरोबरी साधली पुढच्या वर्षी भारत पाकिस्तानकडून पराभूत होऊन परतला. त्यानंतर संघ पुन्हा कधीच गेला नाही. इथे क्रिकेट या करता आणतोय की 1965 चे युद्ध कोणी जिंकले याचे उत्तर देणे कठीण आहे. हा सामना भारत जिंकला की हरला की अनिर्णित राहिला? हे युद्ध दोन्ही देशांमध्ये साजरे केले जाते. पाकिस्तान दरवर्षी 6 सप्टेंबर रोजी संरक्षण दिन साजरा करतो तर भारत हाजी पीर खिंडीचा विजय साजरा करतो. 1965 च्या युद्धात कच्छला पहिली टेस्ट मानली तर तिथे पाकिस्तानने चांगली ताकद दाखवली. पण, काश्मीरमध्ये ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले. भारताला घुसखोरीची माहिती मिळताच तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. शेख अब्दुल्ला यांना तीन वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भारतीय लष्कर घुसखोरांचा शोध घेत होते आणि त्यांना अटक करत होते किंवा त्यांना ठार मारत होते. एवढेच नाही तर भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त सेक्टरमध्ये प्रवेश केला आणि 28 ऑगस्ट रोजी हाजी पीर खिंडीवर ध्वज फडकवला. अशाप्रकारे पाकिस्तानची भूमी भारतानेच प्रथम काबीज केली.
त्याबदल्यात पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँडस्लॅमची तयारी केली होती. काश्मीरमधील अखनूर पूल तोडून भारताला काश्मीरपासून पूर्णपणे तोडण्याची त्यांची योजना होती. चिनाब नदीवरील हा पूल जुना होता आणि तो तोडण्यास सोपा होता. हा पूल तुटताच काश्मीर भारतापासून वेगळे होणार असल्याची चुकीची माहिती अयुब खान यांना देण्यात आली होती. हा पूल महत्त्वाचा होता, पण हा एकमेव मार्ग नव्हता ज्यातून लष्कर काश्मीरमध्ये पोहोचू शकत होते.
पण, अखनूरची लढाई हरण्याची भारताची स्थिती होती. भारतीय सैन्याच्या तेथे चार लहान बटालियन होत्या, ज्या पाकिस्तानच्या रणगाडा आणि शस्त्रास्त्रांशी लढू शकत नव्हत्या. अखनूरमध्ये पाकिस्तानी लष्कराची तुकडी भारतीय तुकडीपेक्षा सहापट मोठी होती. त्यांचा हल्ला पहिल्या सप्टेंबरलाच झाला होता आणि भारताकडे वेळ कमी होता. मग काही अज्ञात कारणास्तव पाकिस्तानने कमान बदलली आणि युद्ध दोन दिवस टळले. आता जनरल याह्या खान स्वतः कमांड घेणार होते. ते येई पर्यंत भारतीय सैन्याने आपले सैन्यबळ वाढवले. तरीही हा पूल वाचवणे अवघड झाले होते. ते त्यांना थोडा वेळच थांबवू शकत होते. नियंत्रण रेषा ओलांडण्याचे प्रकार यापूर्वीही काश्मीरमध्ये होत असत. दोन्ही बाजूंनी. पण, अशी परिस्थिती क्वचितच उद्भवली की युद्ध घोषित करावे लागेल. आता भारताकडे संपूर्ण युद्धाशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर भारतीय लष्कराने एक आघाडी उघडली ज्याने पाकिस्तान हादरला. 5 सप्टेंबरच्या रात्री, सैन्य लाहोरच्या दिशेने जाऊ लागले आणि सकाळी ते लाहोरच्या बाहेर उभे राहिले.
आता काश्मीर महत्त्वाचे की लाहोर हे पाकिस्तानला ठरवायचे होते.
(क्रमश:)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/
फारच रंजक माहिती आहे.
फारच रंजक माहिती आहे. आपल्याकडे ६५चे युद्ध जिंकले हे माहिती असते पण हे बारकावे पहिल्यांदाच वाचतो आहे.
ह्या विषयावरचे मराठी किंवा
ह्या विषयावरचे मराठी किंवा इंग्लिश पुस्तक माहित आहे का ?
त्यांनी त्यांच्या लेखताच
त्यांनी त्यांच्या लेखताच पुस्तकाची लिंक दिलेली आहे असे वाटते. कदाचित त्यात अजून संदर्भ सापडतील
ते पुस्तक हिंदी आहे. म्हणून
ते पुस्तक हिंदी आहे. म्हणून इंग्लिश किंवा मराठी माहित आहे का असं विचारलं. शिवाय ह्या लेखातली पुस्तकाची लिंक चालत नाहीये.
ह्या विषयावरचे मराठी किंवा
ह्या विषयावरचे मराठी किंवा इंग्लिश पुस्तक माहित आहे का >>>>
पाकिस्तानशी झालेल्या सगळ्या लढायांचे वर्णन करणारे पुस्तक ‘डोमेल ते कारगिल’ (निवृत्त) मेजर शशिकांत पित्रे यांनी लिहिले आहे.
धन्यवाद !! पाकिस्तानच्या
धन्यवाद !! पाकिस्तानच्या इतिहासाबद्दलचही सुचवा..
खूप रंजक माहिती आहे.
खूप रंजक माहिती आहे.
पूर्वी शोध खुप सोपा होता,
पूर्वी शोध खुप सोपा होता, तुमचे आधी पाकिस्तानवरील ९ लेख शोध शोधून् देखिल सापडत नाहीयेत...... तुमच्या आयडी वर क्लिक करतोय, ग्रुपमधे क्लिक करतोय.... अरे हा काय वेडेपणा आहे? अरे जरा तरी युजर फ्रेन्डली व्हा....
अजूनही सोपाच आहे शोध. हे घ्या
अजूनही सोपाच आहे शोध. हे घ्या.
https://www.maayboli.com/user/68563/created
ओके भरत, धन्यवाद, बघतो, आम्ही
ओके भरत, धन्यवाद, बघतो, आम्ही "जुनीपुराणी माणसे," नाही सापडत बरेच काही, नेटवर अन प्रत्यक्ष आयुष्यातही!
झापडं काढली की दिसेल.
झापडं काढली की दिसेल.
>>>>> झापडं काढली की दिसेल.
>>>>> झापडं काढली की दिसेल.
ती "झापडं" कोन्गीची देणगी आहे महाशय!
हेही झापडच.
शाखेत काँग्रेसने पाठवलं होय तुम्हांला?
छान मालिका
छान मालिका