बे एरियातील खादाडी

Submitted by Admin-team on 12 June, 2009 - 00:28

बे एरियातील खादाडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरावणा भवन-सर्व, कायमा इडली
पॅसेज टु इन्डिया-बेकरी आणि रेस्टॉरन्ट-बफे
अम्बर कॅफे मध्ये पावभाजी

थोडे उत्तरेला गेलात तर बर्केली मध्ये
चीजबोर्ड पिझ्झा-रोज एका प्रकारचा वेज पिझ्झा बनवतात, त्यातला पेस्टो सिलॅन्ट्रो आणि बेसिल पेस्टो अप्रतिम Happy
चा-आम थाई

अ‍ॅडमीन थँक्यु, हा धागा सुरु करुन दिलात त्याबद्दल Happy

सगळ्यात झकास फलाफल मिळणारं ठिकाण म्हणजे सॅन होजे डाउनटाऊन जवळचे, स्टीवन्स क्रीक रस्त्यावरचे 'फलाफल ड्राईव्ह ईन'. छोटसं आहे पण तिकडे प्रचंड गर्दी असते कधिही गेलं तरी, फलाफल आणी तिथला बनाना मिल्क शेक टेस्ट एकदम छान.

माय थाई मधे मिळाणारे बरेच पदार्थ
बर्कलीमधे - ब्रेड्स ऑफ इंडिया
बर्कलीमधे - विक्स चॅट
माऊंटन व्हियु मधे - चॅट पॅराडाईजची स्प्राऊट भेळ
रियल आईसक्रीम्चा वडा पाव, राज कचोरी
रज्जोत स्वीटचा हराभरा पराठा - सनिवेल
बनाना लिफ मधे फ्रेश रोल्स (स्प्रिंग रोल न तळलेले)
मिंट रेस्टॉरंट - कँप्बेल - गोव्याकडचे पदार्थ असतात अ ला कार्ट मधे
यान कॅन कूक चे मिलपिटस मधले रेस्टॉरंट ३-४ वर्षापूर्वी बरे होते अलिकडे गेले नाहिये
डिश-डॅश - सनिवेल डाउनटाउन - मिडल इस्ट्र्न पदार्थ
चेलो कबाबी मधे पण मस्त कबाब मिळतात (असे ऐकलेय मी खात नाही)
चॅट कॅफे (वुल्फ-एल कमिनो ) - चहा मस्त असतो.
टेस्ट ऑफ इंडीयाची जिलेबी

सर्वाणा भवनची क्वालीटी जरा बिघडत चालली आहे हे माझे प्रामाणीक मत. त्यापेक्षा मद्रास कॅफे ची कॉफी आणि ईडली मस्त.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

खरयं मिनोती, सर्वाणा भवन चा दर्जा खूप घसरलाय. म्हणुनच गर्दी पण कमी झालिये तिथली. मागच्या आठवड्यात तिकडे गेलो तर निम्मा हॉल रिकामा होता. एकेकाळी तासभर वेटिंग असायचे.

बाकी रज्जोत चे पराठे एकंदर चांगले असतात. मला तिथला मेथी, गोभी पराठा अवडतो. हराभरा ट्राय करेन एकदा.

बाकी स्वाती टिफिन्स (लॉरेन्स आणी सेंट्रल )चा ईडली वडा, गोभि मन्चुरिअन, आणी मस्त आटीव दुधाची कॉफी Happy

ह्या लाम्ब वीकन्ताला सन फ्रान्सिस्को ठरतेय..सासु-सासरे बरोबर असल्याने भारतीय जेवण कुथे चान्गले असेल ते कळवा...धन्यवाद.

शालिमार आणि पक्वान्न कबाब आणि नॉन व्हेज साठी बेस्ट !

शालिमार आणि पक्वान्न कबाब >> फक्त स्वच्छता , पदार्थांमधील तेल ह्या कडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करावे. तसेच वरील ठिकाणी गेल्यास खिश्यावर फारसा ताण येत नाही पण आजुबाजुचा परिसर तितसा चांगला नाही. तसेच फक्त शाकाहारी असाल तर शालिमार, पक्वान्न, चटणी (शालीमारच्या समोर असलेले), नान अँड करी असल्या ठिकाणी जाण्यात फारसा अर्थ नाही.
ओफेरेल वर नान-करी च्या बाजुला सुलतान नावाचे नविन रेस्टॉरंट उघडले आहे. ते बरेच चांगले आहे.
वरील ठिकाणांचा एक फायदा आहे. ही सर्व ठिकाणे रात्री उशीरा पर्यंत / २४ तास उघडी असणारी आहेत. एखाद्या वेळी उशीर झाल्यास वरील ठिकाणी जेवायची सोय होउ शकते.

अजुन काही मी अनुभवलेल्या भारतीय रेस्टॉरंट्स ची नावे लवकरच लिहतो.

ते घिराडेली स्क्वेअर ला एक आहे ना वरती? नाव विसरलो. पण जरा 'फाईन' टाईप आहे.

घिराडेली स्क्वेअर च्या वर गेलॉर्डस् होते. आता बहुतेक ते तिथे नाहिये. त्यांनी मरीन सिटी ला स्थलांतर केले असे ऐकले. फाईन टाईप वगैरे होते, sea front असल्याने गोर्‍या लोकांना आवडत असावे पण मला इतके काही खास वाटले नाही.
दुसरे एक गेलॉर्डस् नावाचे रेस्टॉरंट 'one embarcadero' मधे आहे. ते पण जरा बकवासच आहे. जागेचा फायदा आणि गोर्‍या लोकांना काही कळत नाही ह्याचा फायदा घेउन लुटतात. पदार्थांची गुणवत्ता यथातथाच.

महागुरु,
अनुमोदन.. शालिमार्-पक्वान्न 'टु गो' साठीच , तिथे बसून खाणं जवळपास अशक्य च !

त्यांनी मरीन सिटी ला स्थलांतर केले असे ऐकले. >>> recently, Sausalito ला गेलो होतो तेव्हा तिकडे बोर्ड बघितला पण तिकडेही बंद झाले असावे .. फक्त बोर्ड च दिसला, रेस्टॉरंट काही दिसलं नाही कुठे ..

Sausalito च असावे, मला नक्की आठवत नव्हते म्हणुन मरीन सिटी असे लिहले.
Gaylord India , 201 Bridgeway ,Sausalito, CA 94965-2449 (415) 339-0172

हेच असेल पण तेही बंद झालंय किंवा किमान मे च्या लाँग वीकेंड ला तरी बंद होतं ..

धन्यवाद !!! << ही सर्व ठिकाणे रात्री उशीरा पर्यंत / २४ तास उघडी असणारी आहेत >> धन्यवाद महागुरु!

काल बरेच दिवसांनी चविष्ट गुजराथी बफे बे एरियात मिळाला.
'दीदीज' माऊंटन व्ह्यु मधे होते तेव्हा २,३ दा गेलेलो, पण ते नविन ठिकाणी 'सांता क्लारा' मधे मुव्ह झाल्यावर पहिल्यांदाच गेलो. गुजराथी कढी, ढोकळे, उन्धियो, श्रीखंड पुरी अप्रतीम.
ही त्यांची साईट
http://www.mydeedees.com/index.html

बे एरियातलं फिश मार्केट हे रेस्त्रां अजूनही स्मरतं....
काय सामन होता तिथला... आहा आहा

The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.

परवाच सनीवेल येथील 'टेस्टी इंडियन पिझ्झा ' मधला बराच वाजागाजा झालेला सागर आणि वीर झारा( इथे शोले, बेताब, वगैरे नावाचे पण पिझ्झे मिळतात Happy ) पिझ्झा खाल्ला. अजिबात आवड्ला नाही. पिझ्झा बेस हा नान सारखा होता (वात्तड). आणि वर देशी भाज्या. चीझ चा पत्ता नाही. म्हणजे भाजी पोळीच खायची तर नॉर्मल रेस्टॉरट मधे जावे. त्यापेक्शा आपला बे एरिया पिझ्झा ( पेस्ट्रो) कधीही बेस्ट.

प्रविणने लिहिलेल्या अन्जप्परची मिलपिटासलासुद्धा एक शाखा आहे. चव नविन आणि वेगळी वाटली ईतर देशी रेस्टॉरंट पेक्षा. तेथिल चिकन दम बिर्याणि म्हणजे अगदि must try. पण तिखट झेपत नसेल तर तिथे खाण्याचे धाडस करू नये.

पियुबोले , ते अंजप्पर मिलपिटासचेच आहे. मी थोडा कन्फुस झालो होतो. हो, तिखट झेपत नसेल तर तिकडे पाय सुद्धा ठेवू नये. तिकडे एकच स्पायसी लेवेल आहे... वेरि वेरि स्पायसी ओनली.... नो मिडियम स्पायसी Happy

फ्रीमाँटमधे एक अफगाणी रेस्टॉरंट आहे सालांग पास म्हणून अप्रेतीम होते. तिथे फिरनी मिळते Happy
माऊंटन व्ह्यु मधील सकुन मधे जेवण अप्रतीम, सर्वीस बेक्कार एक्दम
कँप्बेल मधे मिंट (Mynt) मस्त आहे
कँप्बेलमधेच सायप्रस म्हणून एक मिडल इस्टर्न रेस्टॉरंत आहे ते देखील मस्त

सलांग आम्हाला पण खूप आवडतं. चिकन कबाब, दोख्/घ (लस्सि कम मठ्ठा विथ काकडी आणि पुदिना), बोलानी हे पण मझे तिथले आवडते पदार्थ

मिल्पिटासच्या अन्जप्पर या हाटेलातून कालच चिकन बिर्याणी आणली होती...पण अगदीच मुळमुळीत...भाज्या तर नाहीच...spicy पण नाही..चव फारशी नाही....परत जाणार नाही.

आम्हाला पण इतके आवडले नाही. लोक खुप तारीफ करत असतात.
परवाच (६ जुन ला) Newark मधे मुंबई चौक नावाचे नवीन रेस्टॉरंट चालु झाले आहे. नावावरुन महाराष्ट्रीयन वाटते (विशेषत: मुंबई ह्या शब्दप्रयोगा मुळे)

Mumbai Chowk
Rosemont Square Shopping Center
35144 Newark Blvd,
Newark, CA 94560

मिल्पिटासमध्ये "वेदाज" नावाचे नवीन restaurant सुरू झाले आहे. आम्ही मागच्या विकांताला त्यांचा buffet ला गेलो होतो. आवडला.. नेहेमीच्या देसी buffet हून एकदम हटके. तेल, तिखट प्रमाणात. Ambiance छान, Interior वर बराच खर्च केला आहे. dishes च्या किंमती mid-range मध्ये आहेत. अमेरिकन जनतेला target केलेले जाणवते. आम्ही गेलो तेंव्हा गर्दी बरीच होती, देसी/विदेशी जनता ५०%-५०%.

अजून एक hidden gem, hole-in-the-wall etc etc restaurant म्हणजे "नान-n-मसाला". हे सुध्दा मिल्पिटासमध्येच आहे. भ्रारतातील देशी ढाब्याची चव हवी असेल तर इकडे एकदा नक्की भेट द्या. तेल, तिखट जास्ती वाटले तर पुढच्या वेळी सांगीतले तर कमी करतात. Wink आमच्याकडे आठवड्यातून एकदा यांचे to-go असतेच. सापडायला थोडे अवघड आहे, ambiance/neighborhood साधारण शालीमारसारखे आहे. बरेच दिवस इथे गर्दी कमी असे, परंतू हल्ली word-of-mouth publicity मुळे नेहेमी भरलेले दिसते. Bay area मध्ये कुठल्याही देसी restaurant मधील "largest number of Asian जनता" मी इथे बघीतली. Happy

आज Belmont येथील http://www.yelp.com/biz/koriander-indian-cuisine-belmont इकडे जायचा योग आला. त्यांची गुजराथी ($१०) आणि काठीयावाडी ($१४) अश्या unlimited थाळ्या आहेत. केवळ अप्रतिम! इकडे bay area मध्ये अशा प्रकारचे पहिलेच restaurant पाहीले. परत नक्की जाणार. Happy

आम्हालाही पहिल्यांदा चांगला अनुभव आला पण परत परत गेल्यावर अनुभव तितका चांगला नाही .. पहिल्यांदा ते येऊन परत परत विचारत होते प्रत्येक पदार्थ पण नंतर त्यांची service तितकी चांगली नव्हती .. तसंच चाट आणि indian Chinese तर अगदीच काहितरी होतं मागच्या वेळेला .. इतकं की परत जाऊ नये असं वाटलं ..

Pages