देशा-विदेशात येणारे अफरा तफरी चे अनुभव

Submitted by aashu29 on 23 January, 2024 - 01:38

विश्वास संपादन करून फसवणुक झालेल्या केसेस आपण इथे पाहिल्यात-
https://www.maayboli.com/node/65613

ह्या धाग्यात तशी कुठली ही विश्वासाची जमवणुक नाही, पण धमकी/घायकुती ला येऊन किंवा कन्फ्युज करून केल्या गेलेल्या काही स्कॅम्स बद्दल लिहायचा विचार आहे. माझ्या मित्र/नातेवाईक मंडळींचे काही अनुभव सिंगापुरातले तर काही भारतातले आहेत.

१) सिंगापुरात माझ्या मैत्रिणीचे एकूण ३.५ हजार $ लुटले गेले. युओबी मधून कुणीतरी जायरो (म्हणजे दर महा/वर्षी एखादी रक्कम आपोआप खात्यातून दुसर्या खात्यात जाते, ज्याने इन्शुरन्स बिल, शाळा फी असे भरता येते) सेट करून ७ महिने ही रक्कम थोडी थोडी करून लुटत होते. दर महिन्याला ७००/९०० असे कमी जास्त जात होते. माझ्या मैत्रिणीचे हे सेकंडरी अकऊंट होते, पगारा चे नाही त्यामुळे रेग्युलर चेक करणे व्हायचे नाही.
सहज चेक करताना हा प्रकार लक्षात आला. युओबी ने सरळ काना वर हात ठेऊन म्हंटले की पुर्ण परतावा मिळणे शक्य होणार नाही आम्ही सिस्टेम एरर असला तरच काय ते पाहू. ३ महिन्यांचे मिळतिल. मग मैत्रीणीने पोलिस कंप्लेंट केली, जी करू नका असे बँक वाले विनवत होते. ह्या प्रकारात तर मैत्रिणीला कुणाचा ही कॉल , मेसेज, ओटीपी शेयर किंवा फ्रॉड लिंक क्लिक हा प्रकार झालाच नव्हता. जायरो सेट करण्यासाठी २ फॅक्टर ऑथेंटिकेशन असते ते ही तिने केलेले नव्हते त्यामुळे बँकेच्या अधिकार्‍याचा हात असू शकतो असा दाट संशय आला. तिचे डेबिट कार्ड क्लोन केल्याचा तिला संशय होता, एका मसाज ठिकाणी ते वापरले गेले होते, सहसा वापरातच नसते सेकंडरी असल्याने.
शेवटी ३ महिन्यांनी बँकेने पुर्ण रक्कम दिली.
तात्पर्यः आपले सर्व बँक अकाउंट्स रेग्युलर चेक करत रहा, पासवर्ड बदलत रहा.

२) भारतात माझ्या कझिन ला १ कॉल आला. माणसाने सांगितले तुमच्या नवर्या कडून मी १० हजार देणे लागतो तर तसे मी तुमच्या अकाऊंट वर ते पाठवत आहे. बहिण म्हणत राहिली की थांबा मी नवर्या ला कॉल करून खातरजमा करते, पण त्याला धीर नव्हता. मग तो म्हणाला आधि हजार रुपये पाठवतो आणि बहिणी ला बँक सारखा मेसेज आला, तुमच्या xxxxx78567 ह्या अकाऊंट वर १००० रुपये जमा झालेत. मग १ मिन नंतर ५५ हजार जमा झाल्याचा सेम मेसेज त्याच स्क्रीन वर खाली आला.
बहिण अवाक. सहसा पैसे जमा झाल्याचा मेसेज आला की लक्ष सर्व प्रथम आकड्या कडे जाते मग अकाऊंट नंबर कडे. तसेच झाले. मग तो गयावया करू लागला की प्लीज १० हजार कापून माझे बाकीचे परत पाठवा. बहिणी ने कॉल कट करून नवर्याला लावला. नीट पाहता असे कळाले की दोन्ही पैसे जमा वाले मेसेज जे डीट्टो बॅंक कडून आल्या सारखे वाटत होते ते एका रँडम नंबर वरून लिहून पाठवलेले होते Sad
तिने खाते चेक केले असता काहीही रक्कम जमा नव्हती.. बहिणीच्या नवर्याच्या लक्षात हे आल्याने (नवरे जात्याच हुषार असे शायनींग मारून Wink ) पैसे वाचले.
तात्पर्यः एसेमेस जरी आला आणि बँक कडून आल्या सारखा मेसेज असला तरी नक्की बँक कडून आहे का हे पहावे & खाते पण चेक करावे. जर खरच खात्यात चुकून कुणाचे पैसे आले असतिल तर रितसर बँकेत तक्रार नोंदवून मग बँके थ्रू त्या व्यक्तिला मिळू देत.

३)सिंगापुरात १ मैत्रिणी ला सीआयडी ( Lol ) Wink नंबर वरून व्हाट्स अ‍ॅप व्हिडीओ कॉल आला. त्यावर २ पोलिस युनिफॉर्म घातलेले मास्क लावलेले पुरूष होते. त्यांनी तिला कुठल्या तरी व्यवसायिक गोष्टी वरून ब्लॅक मेल करून ओटीपी मागून, २ मार्गांनी लुटले.
एक म्हणजे सेविंग अकाऊंट मधून पेयी अ‍ॅड करून, दुसरे म्हणजे पेलाह (जसे भारतात जीपे तसे) वरून असे टोटल ५ हजारा ला लुटले.
ह्या केस मधे सिस्टम चा दोष नसल्याने पैसे बुडाले.
तात्पर्यः घायकुती ला आलेल्या ब्लॅकमेल करणार्या कॉल वरच्या माणसा वर विश्वास न ठेवलेलाच बरा. जे करायचे ते कर सांगून कॉल कट करावा, इंट. लॉगिन करून पासवर्ड बदलावा, पोलिसात तक्रार द्यावी, डेली लिमिट कमित कमी ठेवावी, २ फॅ.ऑ. ऑन ठेवावे.

४)सिंगापुरात गव्हरमेंट एखादी नोटिस बिल्डींग च्या खाली चावि वाले बोर्ड असतात त्या वर लावते, कधितरी त्यात लोकांना फ्री कोव्हिड टेस्ट कीट, किंवा एखाद्या कार्यक्रमा बद्दल माहिती असे असते. तर एकदा घरात पँपलेट्स टाकून गेलेलं कुणी तरी की फ्री बीपी मशिन मिळणार आहे, ह्या लोगो वर स्कॅन करा. तसे करता पैसे वजा होतात कसे ते माहित नाही, बहुधा पेनाव ला जोडले असावे.
ह मेसेज व्हट्सॅप वर आला. असे कुठे ही काहिही स्कॅन करू नये फुकट पैसे मिळत असले तरी..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या एका नातेवाईकाला अशा फसवाफसवीचा अनुभव आला. प्रत्यक्षात सुदैवाने पैशाचं काही नुकसान झालं नाही. त्याला फोन आला की तुमचं एक कुरिअर आलं आहे आणि डिलिव्हरी बॉयला पत्ता सापडत नाहीये. तर तुम्ही त्याला अमुक नंबरवर फोन करून पत्ता नीट सांगा. त्यांनी त्या विशिष्ट नंबरवर फोन केल्यावर त्यांचं WhatsApp अकाउंट/ फोन हॅक झाला. त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधे असलेल्या लोकांना त्यांच्या नावाने पैसे मागण्याचे मेसेजेस गेले. त्यांच्या मुलालाही हा मेसेज गेल्यावर त्याने वडिलांना फोन केला तर तो त्या दुसऱ्या माणसाने घेतला आणि अमुक नंबरवर फोन कर असं सांगितलं. तसं न करता त्याने आईला फोन केला आणि त्यामुळे हा सगळा प्रकार समजला. त्यानंतर अर्धाएक तास त्यांना केलेला फोन त्या दुसऱ्या माणसाकडे जात होता. यांनी लगेच बँकेत वगैरे (दुसऱ्या फोनवरून) फोन करून कुठल्या अकाऊंटमधून पैसे जाऊ नयेत अशी व्यवस्था केली. थोड्या वेळाने मग यांना स्वतःचा फोनही वापरता यायला लागला. एकंदरीत थोडक्यात निभावलं. इतर कुणीही त्या मेसेजला फसून पैसे पाठवले नाहीत.

नुसता फोन करुन कसा अकाऊंट हॅक/ फोन फॉरवर्ड झाला? फोन एलटीई वापरुन केलेला होता का आयपी?
आयपी (व्हॉट्सअ‍ॅप) वरुन केलेला कॉल, व्हॉअ‍ॅ नंबर (आयपी वरुन केलेले फोन) असं हॅक झालं का?

ज्या नंबरवर फोन केला होता तो नंबर *401 ने सुरू होत होता. 401 च्या पुढे मोबाईल नंबर. असा नंबर डायल केला की आपले कॉल्स त्या दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड होतात. ( हे नंतर गूगल करून मिळालेलं ज्ञान आहे) याचा उपयोग करून whatsapp अकाऊंटचा access मिळवला असेल.

ओह्ह!
कॉल फॉरवर्डिंग बंद करुन टाकलं पाहिजे फोन मध्ये.

ओहह! *401# याने सुरू होणारा नंबर असेल तो. नंबरची स्टार (*) किंवा हॅश (#) इत्यादी ने सुरवात म्हणजे सर्विस रिक्वेस्ट असते. पण हे त्यांच्या लक्षात आले नसावे, अनेकांच्या येत नाही. याबाबत सतर्क रहायला हवे.

https://timesofindia.indiatimes.com/gadgets-news/explained-what-is-401-c...

आज मला एक unknown mobile number वरुन SMS आला. Electricity बिल भरले नाही आज रात्री ९.३०वाजता मिटर cut करायला येणार आहेत आणि call officer contact number होता. मी त्या number वर call केला. त्याला message बद्दल विचारले तर त्याने माझे नाव consumer number बरोबर सांगितले. माणूस हिंदीतुन बोलत होता. तिथेच थोडी शंका आली. म्हंटले MSEB मध्ये हिंदी भाषिक कधीपासून आले? Bill payment तर कधीच केले होते. पण म्हणे ते update करण्यासाठी play store मधुन app install करायला सान्गितले. मी म्हंटले MSEB online portal open आहे त्यातूनच कसे update करायचे ते सांगा.
तर म्हणे नाही तुम्हाला ते प्लेस्टोर मधूनच अपडेट करावे लागेल. मला ऑनलाईन करायचे ऑनलाइन पोर्टलवरून सांगा तर त्यानी फोनच ठेवून दिला.
ट्रू कॉलर वर त्यांचा नंबर spam म्हणून पण नव्हता पण नंतर थोड्या वेळाने चेक केल्यानंतर फ्रॉड असल्याचे समजले
Online fraud ती ही नवीन पद्धत आहे

विद्या, प्ले स्टोर मधून भलतेच अ‍ॅप टाकायला लावणे ही स्कॅम ची च एक पायरी आहे Sad
त्यातून स्क्रीन मिररींग, फोन हॅक, वगैरे काय काय होते.

अजून १ अनुभव म्हणजे तुमची पॉलिसी मॅचुअर झालेली आहे, पैसे क्लेम करण्या साठी हे अ‍ॅप टाका किंवा क्लेम सक्सेस साठी १ अजून पॉलिसी घ्या Wink आणि मुळात अशा नावाची पॉलिसीच अस्तित्वात नसते पण एखादा माणुस लोभा ला बळी पडू शकतो.

कस्टम्स कडून फोन येतो. तो अधिकारी तुमच्या नावाचे असलेले अमली पदार्थाचे (नाव काही तरी भयानक असते) पार्सल पकडले गेले आहे अशी बातमी देतो. अटक होण्याची दात शक्यता आहे कारण या नावाचा अगदी ५ ग्रॅम अमली पदार्थ बाळगणे हा गंभिर गुन्हा असतो. आधार कार्ड नंबर बरोबर असतो, आरोपी बिचारा घाबरुन जातो.

मग चौकशीच्या पुढच्या टप्प्यात CBI Officer कडे तपासणी जाते ( हा CBI Officer जवळच बसलेला असतो Happy ), तो ऑफिसर घरातील सर्व ५० हजारापेक्षा जास्त किंमती असलेल्या वस्तूंची यादी मागवतो... घाबरलेल्या आरोपीला या कथित अमली पदार्थाच्या तस्करी संबंधांत गुप्तता ठेवण्याबद्दल सांगितले जाते. WA (?) कम्युनिकेशन मधे पाठिमागचा (CBI / कस्टम्स) logo हुबेहुब असतो. अधिकारी खरा /खरे आहे याची खात्री पटते.

https://www.indiatoday.in/cities/delhi/story/fake-cbi-scam-delhi-police-...

हो हा फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. आत्ता इतक्यातच बातमी वाचली की तेरा-चौदा जणांना पोलिसांनी अटक केली या संदर्भात. पण पोलिसांचं म्हणणं आहे की अजून असंख्य लोक यात सामील असतात. तेरा-चौदा लोकांना पकडून एकूण नेटवर्कवर खूप मोठा परिणाम झाला असेल असं नाही. ते सगळे एकमेकांना ओळखत असतील असं नाही आणि आपण किती मोठ्या प्रमाणावरच्या स्कीममधे सामील आहोत हे त्यांना माहिती असेल असंही नाही. अटक केलेल्यांपैकी एक केरळमध्ये राहणारा कॉलेज विद्यार्थी आहे.