WE ARE HAPPY TO BLEED

Submitted by sarika choudhari on 12 January, 2024 - 07:25

आज सकाळी whatsaap वर पॅडमॅन सिनेमा विषयी msg आला. चांगला वाटला म्हणून forward केला. मैत्रिणीचा लगेच reply आला. " दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान , स्व:ता मात्र कोरडे पाषाण, सांगा कोण ? " whatsaap वरील तिचा हा reply माझ्या साठीच होता. आणि खरंही आहे म्हणा . मासीक पाळीत आमच्या कडे खूप सोवळ ओवळ पाळतात. आणि मीचं हे सोवळं ओवळं पाळू नका असा msg पाठवत आहे. म्हणजे वागायचं एक आणि बोलायचं दुसरं. पण मी तरी करणार काय. वर्षानुवर्ष जमलेली विचाराची जळमट एका दिवसात कशी बरं निघणार.
मला आजही आठवतो तो दिवस मी नऊ महीन्याची असेल माझी आई वारली. मग मी मामा कडे चौथी पर्यंत शिकले. मग मावशीने शहरात नेले. मुलं -मुली एकत्र असणाऱ्या शाळेत मला टाकले. सुरवातीला भिती वाटायची. पण नंतर सवय झाली. एक दिवस असेच शाळेत असताना पोटात दुखत होते आणि थोडा थोडा रक्त स्त्राव पण होत होता. कोणाला सांगावे कळेना. बाई ला कसे सांगायचे, रागवल्या तर आणि मैत्रिणींना सांगायच तर त्या हसल्या तर या विचाराने कोणालाच सांगायची हिमंत झाली नाही. शेवटी जास्त त्रास व्हायला लागला. बाईना विचाराल घरी जाऊ का. उठले तर ड्रेसला डाग पडलेला. आता घरी कसं जायच. मैत्रिणींना दिसलं त्यांनी न हसता मला समजुन घेतलं ओढणी पाठीमागुन घ्यायला सांगीतली. मी तसेच बाहेर पडले. आणि कसेतरी घरी पोहचले. घरी मावशी भांडे घासत होती. तीला भीत भीतच सांगितले. तर ती चिडुन म्हणाली " आली का तुझी पाळी, आता सर्व कामं मीच करायची.” " चल, बाजुला उभी राहा. इकडे तिकडे हात लावायचा नाही. जुन्या कापडाची घडी दिली. व एका खोलीत एका कोपऱ्यात बसायला सांगितले. पण हे असं का होतं. मी अशी वेगळी का बसु. मला नेमक काय झाल आहे हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते. पण डोक्यात हे पक्क झालं होतं की या विषयावर उघडपणे बोलायचं नाही. तसंही आपल्या समाजात स्त्रीला पडलेल्या प्रश्चाची उत्तर नसतातच.
आता वेगळ बसायची सवय झाली होती.पुढे मोठी झाली. लग्न झाले. सासरी पण तीच परीस्थीती होती. अवघे चार दिवस झाले नसेल तर माझी पाळी आली. सासुनी वेगळ्या खोलीत बसवले. घरी सर्व पाहुण्याची वर्दळ आणि मी कोपऱ्यात बसलेले. खुप लाज वाटायची. पाण्याला देखील स्पर्श केलेला चालायचा नाही. सर्व गोष्टी मग मागाव्या लागायच्या. कधी तहान लागली, भुक लागली तरी तसचं बसुन राहायचं. पुढे या सर्व गोष्टीची सवयच झाली. मग पुढे आम्ही नौकरी निमित्त दोघचं राहायचो तरीही मी हे सर्व पाळाची. कारण मनावर लहानपणीपासून असणारा संस्काराचा पगडा. सारखी भिती सोवळं ओवळं पाळल नाही तर देवाचा कोप होईल. त्यात घरी गणपती असातात. त्यामुळे कडक सोवळ ओवळं पाळायचं. दर्शनाला आलेले एखादा तरी विचारतो दोघचं करता गणपतीचं कसं जमत हो११ दिवस .तुमच्या घरी चालत का ? या खेाचक प्रश्नावर काय बोलायचं. पण परिणाम मात्र व्हायचा की पुजा आहे म्हणजे आपण नेहमीच सगळं पाळायला हवं. कधी प्रश्नच पडला नाही आपण हे का पाळतो.
पुर्वी शाळेत असताना वाचलं होतं की पुर्वी स्त्रीयांना अंग मेहनतीची काम करावी लागत त्यामुळे चार दिवस आराम म्हणून त्यांना बाजुला बसवायचे. शिवाय त्याकाळी सॅनीअरी पॅड वैगरे सारख्या सुविधा नव्हत्या म्हणून अतिश्रमामुळे जास्त स्त्राव व्हायला नको म्हणून ही पध्दत पडली. आणि आपण आजही परंपरेच्या नावाखाली ही पध्दत पाळतो आहे.खरं पाहील तर आताच्या धावपळीच्या युगात नौकरी व घर सांभाळुन सोवळं ओवळं पाळण , आणि तेही लहानश्या घरात वेगळ बसणं शक्य तरी आहे का? पण हे विचार फक्त तिथ पर्यंतच मर्यादित राहीले कारण मी बदलायचा प्रयत्न केला तरीही माझ्याच आया-बहीणी हा बदल सहज स्वीकारतील का ? हा प्रश्न सदैव माझ्या विचार परीवर्तनात अडथळा आणायचा.
आता हेच पहा ना महालक्ष्मीच्या गुरूवराची यथासांग पुजा केली.सकाळी छान पुजा करून ऑफीसला गेली. लवकर घरी येऊन हळदी कुंकवाची तयारी केली. पण वेळेवर व्हायचं तेच झालं. मला जमत नसल्यामुळे मी शेजारच्या मुलीला हळदीकुंकु द्यायला बोलविले. पहीली मैत्रिण आली तिला कळल्याबरोबर ती म्हणाली, " तुम्ही बाजुलाचं बसा हं, देवीच खुप कडक असत. हातबोट चालत नाही”. मी पण म्हटलं बरोबरच आहे तुमचं म्हणुनच या मुलीच्या हातून हळदी कुंकु देत आहे. ही मैत्रिण गेली आणि दुसऱ्या चार मैत्रिणी आल्या, काय ग हे ? आम्हाला बोलावलस आणि तु अशी दुर का बसली , हे सगळं तू आजही पाळतेस. तू आज जिची पुजा केली ती देवी पण एक स्त्रीचं आहेना?हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सर्वानाचं लागु आहे. तु आज आम्हाला हळदी कुंकु देऊन सन्मानच कराणार आहे. तुच हळदी कुंकु लाव. पण मन मानायला तयारच होईना. खरंच बदलायचं ठरवलं तर पहीले स्वत: च मन बदलाव लागेल मग चारचौघींना व मग समाजाला. पण सुरवात करणार कोण हा खरा प्रश्न आहे. पॅडमॅन सिनेमाच्या निमित्ताने एक पुरुषाने हा विषय मांडला त्या कलाकराला त्याच्या कामाचे पैसे मिळतीलही हा भाग वेगळा पण समाजाला एक नवी दृष्टी दिली विचार करायची ती महत्वाची आहे. सुरवात तर कुठेतरी झाली. कारण हा विषय चार भिंतीत बोलला जात नाही. आई मुली सोबत मैत्रिण मैत्रिणी सोबत या विषयावर मोकळेपणाणे बोलत नाही. आपण एवढं शिकलो पण अजुनही त्या दिवसात लग्न, मुंज ...हळदी कुंकु असल्या कार्यक्रमाला जायचं नाही. असे मागसलेले विचार आपले आहेत.बरं देवापरत्वे विचारही बदलतात महानुभाव पंथाच्या देवाला अश्या दिवसातही पुजा चालते. देव तर एकच आहे. मग हा फरक कसा. तर त्याला कारण या प्रथा आपण माणसांनी तयार केल्या आहेत.बरं या प्रथेला पुरुषच जबाबदार नाही तर स्त्री स्वत: जबाबादार आहे कारण वर्षानुवर्ष चालत आलेला हा प्रकार स्वत: स्त्री ने चालवुन घेतला आहे आणि अजुनही चालवुन घेत आहे. कारण काय तर मागच्या पिढीनी केलं म्हणून मी करणार.असा आपला हट्ट आहे. पण कधी तरी हा विचार केला का की स्त्रीत्वाला पुर्णत्व देते ती मासीक पाळी. ज्या स्त्रीला मासीक पाळी नाही तीला मुलं होऊ शकत नाही. म्हणजे मातृत्वाचं सुख प्रदान करणारी मासीक पाळी ही नैसर्गीक देणगी आहे. मैत्रिणीनों विटाळ मनात असतो , विचारात असतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात " नाही निर्मळ जीवन काय करील साबण , तैसे चित्त शुध्दी नाही, तेथे बोध करील काई”. तेव्हा प्रथम मनातील विचार बदलायला हवे .मग समाज आपोआपच बदलेल.
उर्मिला हिरवे यांनी सांगीतल्याप्रमाणे “मैत्रिणींनो आपण विटाळाच्या , स्पृश्य अस्पृश्यतेच्या अनुभवातून गेलोय, त्यातून आपल्या मुलींना जावे लागणार नाही.यासाठी तरी आता प्रयत्न करुया आपल्या मनावरील जळमंट स्वच्छ करून मासीक पाळी कडे नितळ शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहुया.”
महीला दिनानिमित्त सर्वजण स्त्रीच्या कतृत्वा वर , पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करण्‍यावर बोलतील, तीने घेतलेल्या यशाच्या भरारी बद्धल बोलतील पण कधी विचार केला का? मोठी लढाई जिकंताना आपण आपल्या घरातील ही छोटी लढाई मात्र हरलो आहे. तेव्हा या महीला दिनानिमित्त आपण सर्व मैत्रिणींनी हा संकल्प करुया की, " मासीक पाळी विषयी असणारे विटाळात्मक विचार मनातून काढुन , स्त्रीत्वाला पुर्णत्व देणाऱ्या या नैसर्गीक देणगीचा सन्मान करून, समाजाला विचारांची एक नवीन दिशा देऊ या. या समाजाला न लाजता सांगू या WE ARE HAPPY TO BLEED.”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सारीका, तुमचा लेख खूप आवडला. याविषयावरचा अन्य संस्थळावरचा लेख - परंपरा आणि नव्या जाणीवा ("पेड्डामानिषी"च्या निमित्ताने ) आपण जरुर वाचावा. त्या संस्थळावरती पेड्डामानिषी हा लेख मी लिहीलेला होता ज्यावर नंतर प्रगल्भ चर्चा झडलेली आहे.

मला अजुनही पाळीमध्ये, देवाला जाता येते पण गुरुद्वारात जाऊ नये असे मनातून वाटते. गुरु नानकांनी कुठेही लिहील्याचे मला स्मरत नाही की स्त्रियांनी पाळीत येऊ नये. आणि तरीही हे मानसिक लोढ्ण मला झुगारता येत नाही. यावरुन मैत्रिणीचे व माझे खटके, वादविवादही झालेले आहेत. कळते पण वळत नाही. गुरुद्वारात एकंदर कर्मठपणा पाहून छाती होत नाही.

अजुन एक - पेड्डामानिषी किंवा हाफ सारी किंवा पुष्पवती हे समारंभ पूर्वी म्हणजे बालविवाहाच्या काळात, कदाचित मुलगी वयात आली हा डांगोरा पिटायला होत असत की काय? - नकळे. तसे म्हणावे तर मग स्त्रियांना लग्न वगैरे झाल्यानंतरही मज्जाव कशाकरता? बाजूला बसविणे हे कशाकरता असावे? तुम्ही लिहील्याप्रमाणे 'कामाचा बोजा पडू नये" अशी काही धारणा असावी का? पण आजकाल तर टँपोन व पॅड लावुन ऑलिंपिकही खेळतात - तर तो मुद्दा नसावा असे वाटते. एकंदर स्त्रीशक्तीचे दमन!! कारण काय माहीत नाही.

>>>>>>बरं या प्रथेला पुरुषच जबाबदार नाही तर स्त्री स्वत: जबाबादार आहे कारण वर्षानुवर्ष चालत आलेला हा प्रकार स्वत: स्त्री ने चालवुन घेतला आहे आणि अजुनही चालवुन घेत आहे.
१००% पटले. म्हणुनच म्हटले कळतय पण वळत नाही.

"WE ARE HAPPY TO BLEED.”
हे काही अंशी खरे आहे. कारण कितीही रुक्ष, शास्त्रशुद्ध कारण त्यामागे असले तरी, स्त्रीकडे मातृत्व येण्याची ती नांदी असते. याचा अर्थ मूल व्हावेच, मूल नसेल तर जीवनास अर्थ नाही वगैरे मला अजिबात सुचवायचे किंवा म्हणायचे नाही हे आधीच क्लिअर करते.
मेनॉपॉझनंतर पाळी बंद झाल्यानंतरही बरेचदा पुरुषी हार्मॉन्स वाढतात, त्रास होतो. त्यामुळे (बहुतेक) HRT (हार्मॉन्स रिप्लेसमेन्ट थेरपी) करतात. तेव्हा पाळी न येणे ही एक किंचित दु:खमय घटना असू शकते , निदान काही स्त्रियांकरता यावरती लिहीलेला - लाल परी हा माझा लेख जरुर वाचावा. हा लेख टु माय लास्ट पिरिअड या माझ्या फार आवडत्या कवि ल्युसिल क्लिफ्टन यांच्या कवितेवरती आधारीत आहे.

येव्हा "WE ARE HAPPY TO BLEED.” ला होय नक्कीच असेच म्हणेन.

या WE ARE HAPPY TO BLEED.”...... ... तुम्ही वयाने लहान आहात.त्यामुळे ही छोटीशी बंडखोरी चांगली आहेच.

माझ्यामते जशी सर्दी,मूत्र हे नैसर्गिक स्त्राव तशी मासिक पाळी आहे.

लेख बराच पटला.गावाकडे किंवा खूप कर्मठ घरात शक्य नसतं, पण शहरात, रुटीन मध्ये सणावाराला अचानक वेळ आल्यास सॉरी बाप्पा म्हणून करावे विधी असं वाटतं.

मी जेव्हा 14 - 15 वर्षाची होते तेव्हा शॉर्ट्स , टीशर्ट वगैरे घालण्याची मुभा आमच्या घरात तरी नव्हती , बऱ्यापैकी लिबरल असून .. आमच्या घरात पाळीत दूर बसणं , न शिवणं वगैरे कधीच काही नव्हतं .. पण आता 10 - 15 वर्षानंतर 18 - 20 वर्षांच्या मुली , शॉर्ट्स , केप्री वगैरे घालून घरात , घराबाहेर सहज वावरताना दिसतात .. गावाकडचा भाग आहे म्हणून विशेष , नाहीतर शहरात कदाचित 20 वर्षांपूर्वीच हे कपडे वापरात असतील . त्यांच्या घरी पाळीच्या काळात कोपऱ्यात बसवणं , पाणी सुद्धा मागावं लागणं इतपत कठोर बंधनं असतील असं निदान वाटत तरी नाही .

जसं धोतर , जानवं , नऊवारी लुगडं हे आपोआप बाद होत गेलं , त्यासाठी कुठलं वेगळं प्रबोधन करावं लागलं नाही .. सुटसुटीत, सोयीचं ते लोकांनी आपण स्वतःहून अंगिकारलं तसा हळूहळू शहाणपणा येत जाईल आपोआपच..

माझ्या आजोळी हे शिवाशिव , लांब बसणं वगैरे पाळत फार . एका वर्षी गणपतीच्या दिवसात माझी पाळी आली म्हणून दुसऱ्या घरात , ज्याचा वापर साधारण कोठीघर टाईप म्हणून होत होता तिकडे जेवण वगैरे दिलं आणि झोपायला पाठवलं .. आणि मोठ्याने बोलायचं नाही , हळू बोलायचं , काय तर म्हणे पाळी आलेल्या मुलीचा / बाईचा आवाज गणपतीच्या कानावर पडता नये ( कपाळावर हात मारण्याची इमोजी ) ... बहुधा 1 --2 दिवसात गणपती गेले किंवा मी चिडचिड करून आमच्या घरी परत आले असं काहीतरी झालं असावं , नीट आठवत नाही . आमच्या घरी तसं काहीच पाळत नसल्याने मला तो अनुभव जरा धक्कादायक आणि अपमानास्पद , दुखावणारा वाटला होता . फारशी काही समज नव्हती , त्यांची भीती , समज , श्रद्धा समजून घेण्याची कुवत नव्हती .

नंतर स्वयंपाक करायला एकटी मामीच उरली तेव्हा बहुतेक गुंडाळून ठेवलं असावं .. आणि आता खूप उशीरा झालेली लेक आहे लाडाची Happy तिच्यासाठी तर सगळंच गुंडाळून ठेवलं आहे . ( माझी आजोळची आजी फार गरीब स्वभावाची बाई होती त्यामुळे ती सुनांवर हे सगळं लादत होती असा काही प्रकार नव्हता . ) एवढा बदल फक्त 10 - 15 वर्षात झाला .. तेव्हा भविष्याचं चित्र आशादायी आहे असं वाटतं .

कुठल्यातरी जमातीत किलो किलो वजनाचे चांदीचे तोडे पायात घालतात , मानेत घालतात , आणखी कुठल्यातरी जमातीत केसाची वजनदार जट असलेल्या बाईला देवीची कृपा म्हणून मानबिन मिळतो , ती कितीही त्रास झाला तरी जट कापायला तयार होत नाही ... सुखाने जगणं सोडून स्वतःचं आयुष्य स्वतः विविध प्रकारे त्रासदायक करून घेण्याची खोड मानवजातीत अनेक ठिकाणी आढळून येते , बरेचदा स्वतःसोबत इतरांचंही .. कधीतरी हे ओळखून आपण स्वतः आपलं आयुष्य क्लिष्ट , त्रासदायक करून घेतो आहोत का , तसं असेल तर त्या गोष्टी आयुष्यातून वजा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरे आपल्यावर लादत असतील तर अलगद त्यातून निसटण्याचा प्रयत्न केला पाहिजे .. आता प्रत्येकजण जीवापाड व्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा काळ आहे , कुटुंबं छोटी छोटी होत चालली आहेत .. इंटरनेटने जग हाताच्या बोटांच्या टप्प्यात आणलं आहे , माहितीचा महापूर रोज अंगावर ओसंडून वाहतो आहे .... पाळी बिळी , शिवाशिव पाळण्यातला फोलपणा लोकांच्या ध्यानात येत जाईल आणि 40 - 50 वर्षात तरी बंद पडेल अशी आशा आहे . सणासुदीच्या काळात पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणं हा जो प्रॉब्लेम आहे तोही 40 - 50 वर्षात बराचसा कमी होईल अशी आशा आहे ...

स्वतःचे (लादल्या गेलेले/कंडिशनिंग मुळे झालेले) विचार, त्यात होत गेलेले बदल आणि तेव्हा तेव्हाच्या भावना हे प्रामाणिकपणे मांडले आहे.

ह्या विषयावरचा टॅबू आता कालबाह्य व्हावा ही मनोमन इच्छा.>> + १

आपण स्वतः आपलं आयुष्य क्लिष्ट , त्रासदायक करून घेतो आहोत का , तसं असेल तर त्या गोष्टी आयुष्यातून वजा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरे आपल्यावर लादत असतील तर अलगद त्यातून निसटण्याचा प्रयत्न केला पाहिजे
>>>> पटलं. अलगदच का प्रसंगी वाईटपणा घेऊनही ते झुगारून दिलं पाहिजे.

या निमित्ताने एक व्हॉटस्ॲप फॉरवर्ड आवडला तो लिहिते.
बर्याच अनुभवी बायकानांही हे सहज सुचेल असं नाही कारण सामाजिक कंडीशनिंगच तसं असतं.
विषय भरकटवला असेल तर क्षमस्व

fwded msg: RUN THE DISHWASHER TWICE.

When I was at one of my lowest (mental) points in life, I couldn’t get out of bed some days. I had no energy or motivation and was barely getting by.

I had therapy once per week, and on this particular week I didn’t have much to ‘bring’ to the session. He asked how my week was and I really had nothing to say.

“What are you struggling with?” he asked.

I gestured around me and said “I dunno man. Life.”

Not satisfied with my answer, he said “No, what exactly are you worried about right now? What feels overwhelming? When you go home after this session, what issue will be staring at you?”

I knew the answer, but it was so ridiculous that I didn’t want to say it. I wanted to have something more substantial. Something more profound. But I didn’t. So I told him,

“Honestly? The dishes. It’s stupid, I know, but the more I look at them the more I CAN’T do them because I’ll have to scrub them before I put them in the dishwasher, because the dishwasher sucks, and I just can’t stand and scrub the dishes.”

I felt like an idiot even saying it. What kind of grown woman is undone by a stack of dishes? There are people out there with actual problems, and I’m whining to my therapist about dishes? But my therapist nodded in understanding and then said:
“RUN THE DISHWASHER TWICE.”

I began to tell him that you’re not supposed to, but he stopped me.

“Why the hell aren’t you supposed to? If you don’t want to scrub the dishes and your dishwasher sucks, run it twice. Run it three times, who cares? Rules do not exist, so stop giving yourself rules.”

It blew my mind in a way that I don’t think I can properly express.

That day, I went home and tossed my smelly dishes haphazardly into the dishwasher and ran it three times. I felt like I had conquered a dragon. The next day, I took a shower lying down. A few days later. I folded my laundry and put them wherever they fit. There were no longer arbitrary rules I had to follow, and it gave me the freedom to make accomplishments again.

Now that I’m in a healthier place, I rinse off my dishes and put them in the dishwasher properly. I shower standing up. I sort my laundry. But at a time when living was a struggle instead of a blessing, I learned an incredibly important lesson:

THERE ARE NO RULES. RUN THE DISHWASHER TWICE!

Credit ~ Kate Scott

सामो आपण लिहिलेला “लाल परी “लेख आवडला.
देवकी तुम्ही म्हटल्याप्रमाणे “....ही नैसर्गिक प्रक्रीया आहे “हे तुमचे मत मलरही पटले.
mi- anu गावाकडे ही प्रथा अजुनही चालू आहे.शहरात बऱ्यापैकी हा प्रकार कमी झाला आहे.
राधानिशा “ही प्रथा 40-50वर्षानंतर बंद पडेल” हा आपला आशावादी विचार आवडला.
हरचंद पालव , कॉमी, मानव पृथ्वीकर, अनिंद्य “ ह्या विषयावरचा टॅबू आता कालबाह्य व्हावा ”ही आपली ईच्छा पूर्ण व्हावी.
mazaman छान . “Three are no rule” हे खरचं आहे. हे सर्व नियम आपणच तयार केले आहे आणि स्वत:वर लादून घेतले आहे.
तुम्हा सर्वाच्या प्रतिक्रीया आवडल्या. आपण सर्व या प्रथेच्या विरोधात आहात हे ऐकून बरे वाटले. बदल एका दिवसात होणार नाही,पंरतु आपण सर्व आपल्या विचारात बदल करून पुढच्या पिढीला या प्रथेचा त्रास होऊ देणार नाही हे निश्चित. प्रतिक्रीयेसाठी आपल्या सर्वाचे खूप खूप आभार. परमेश्वर आपणासर्वाचे भले करो.