तर मिरची ठेचा उर्फ तोंपासू फॅन क्लब आणि ठेचिले अनंते - मिरच्यांच्या ठेच्याचे प्रकार या बाफांवर बरेच ठेच्यांचे प्रकार इनक्लूडिंग हा सुद्धा आहेत. पण बायजवार कृती कुठे मला तरी दिसली नाही.
या मिरच्या भारतातल्या हिवाळ्यात शक्यतो मिळतात तेव्हा करायचा प्रकार आहे. जहाल-अतीजहाल प्रकरण होऊ शकतं/असतं (मिरच्यांवर अवलंबून) पण तितकंच टेस्टीही. जरूर करून पाहा.
- एक पाव ओल्या लाल मिरच्या; धूवून, कोरड्या करून, डेखं काढून घेतलेल्या
- मिरच्यांच्या निम्मा लसूण, सोलून
- मिरच्या वाटायला लागेल तसा ताज्या लिंबांचा रस; तरी प्रमाण म्हणून पाव ते अर्धी वाटी लागतो शक्यतो
- मीठ चवीनुसार
- चमचाभर जिरे
- चमचाभर मोहोरी
- पाव चमचा चांगला हिंग
- अर्धी- पाऊण वाटी तेल
कृती तशी सोपी आहे. मिरच्या, लसूण, जिरे, मीठ एकत्र करून वाटायचं. लागेल तसा लिंबाचा रस वापरायचा.
नंतर तेल मोहोरी हिंगाची फोडणी करून त्यात ठेचा परतायचा.
रंग अजून जरा डार्क होतो अन कडेनी तेल सुटतं शिजल्यावर असं झालं की गार करून घ्यायचा.
आता जरा चाखून पाहून मीठ आणि लिंबाचा रस हवा असेल तर असं करून हवाबंद बरणीत फ्रिजात ठेवायचा. १५-२० दिवस ते महिनाभर सहज टिकतो.
भाकरी, भरीत, पातीचा कांदा, हा ठेचा अन वर शेंगदाण्याच्या तेलाची धार म्हणजे स्वर्ग! नंतर ताक आणि तासभर झोप!
मिरच्यांच्या तिखटपणानुसार झणझणीत पणा अवलंबून आहे. बायडीनं केलेला जहाल झालेला आहे.
लोखंडी कढईत करण्याचा हा प्रकार नाही. तसंच तेलात सगळं प्रकरण नीट खरपूस तळल्या जाणं ही आवश्यक आहे, चव वाढते अन टिकाऊपणाही अर्थात.
या प्रकारात मीठ जरा कणीभर चढं असेल तर चव अजून चांगली लागते.
आज फटू भी है! देताय जराश्यानं.
कसला तोंपासू फोटो आहे..मला
कसला तोंपासू फोटो आहे..मला फार आवडतो असला ठेचा..बनवणार नक्की..रेसिपी मस्त..
माझा लांबूनच नमस्कार या
माझा लांबूनच नमस्कार या पाकृला.. रंग एकदम मस्त ..
मस्त.. माझी आजी ह्याला मिर्चू
मस्त.. माझी आजी ह्याला मिर्चू म्हणते.
कसला मोहमयी प्रकार आहे! फोटो
कसला मोहमयी प्रकार आहे! फोटो मस्त.नक्की करून बघणार.
खास वर्हाडी ठेचा!
खास वर्हाडी ठेचा!
वा मस्तं काय कलर आलाय. मी
वा मस्तं काय कलर आलाय. मी नेहमीच करते पण लिंबा चा रस वजा होता, तो अॅड करेन आता
लिंबाचा रस घातल्यावर परतणे
लिंबाचा रस घातल्यावर परतणे जरा बरोबर वाटत नाहीये... आंबट असल्याने कळंकेल असे वाटते.
लिंबूरस नंतर घातला तर?
आं गो, कळकत तर नाही शक्यतो
आं गो, कळकत तर नाही शक्यतो कारण हा प्रकार नेहमी होतो. अर्थात नंतर आंबट घातल तरी चालेल.
भारी दिसतोय, पण करणं किंवा
भारी दिसतोय, पण करणं किंवा खाणं अशक्य ...
कसला झ्याक प्रकार आहे. पण
कसला झ्याक प्रकार आहे. पण आपला लांबूनच रामराम.
आई करत असे. छान लागतो ठेचा.
आई करत असे. छान लागतो ठेचा. कॄती विसरलेच होते. बरी सांगीतलीत. करुन पाहीन.
फोटो मस्त आहे. शेजवान चटणी
फोटो मस्त आहे. शेजवान चटणी आठवली.
मस्त दिसतोय. कमी तिखट
मस्त दिसतोय. कमी तिखट मिरच्यांचा करुन बघायला हरकत नाही.
मध्यंतरी हिरव्या शिशितो पेपरचा केला होता. तो जहाल हिरव्या मिरच्यांपेक्षा जास्त आवडला.
काय भारी दिसतोय ठेचा!
काय भारी दिसतोय ठेचा!
तोंपासु!! पाठवून द्या थोडा!
तोंपासु!!
पाठवून द्या थोडा!
इथे अमेरीकेत असा पण कमी तिखट
इथे अमेरीकेत असा पण कमी तिखट ठेचा करायला कुठल्या मिरच्या वापरता येतील?
शिशितो!
सायोने लिहिल्या आहेत त्या शिशितो!
सही.
सही.
ईंडियन दुकानात पोपटी रंगाच्या
ईंडियन दुकानात पोपटी रंगाच्या लांब मिरच्या मिळतात त्या कमी तिखट असतात, भरल्या/ठेचा करता येईल. असा लाल चुटूक रंग नसेल पण सहन होईल
wow !! कस्सलं भारी दिसतंय !!
wow !! कस्सलं भारी दिसतंय !! करून बघीन कधी लाल मिरच्या आणल्या तर ..
तेलात परतत असताना खकाणा उडून फटाफट शिंका येत नाहीत का ?
तेलात परतत असताना खकाणा उडून
तेलात परतत असताना खकाणा उडून फटाफट शिंका येत नाहीत का ? >>> णो णो, तसलं काही होत नाही.