![MILLET PULAV](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2023/09/22/IMG_20230922_093557.jpg)
मिश्र मिलेट्स एक वाटी.
कापलेल्या भाज्या आवडी प्रमाणे प्रत्येकी दोन तीन चमचे किंवा सर्व मिळून एक मोठी वाटी. गाजर बीन्स पुलावला करतो तसे तुकडे, फ्लावरचे बारके तुकडे, ब्रोकोली तुकडा, मशरूम तुकडा, मटार , उकडलेले फ्रोझन स्वीट कॉर्न एक बारका कांदा. केप्सिकम बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर वरुन घालायला, दोन हिरव्या मिरच्या. मी जास्त तिखट वाल्या म्हणून दोन घेतल्या, कढिपत्ता असल्यास माझ्याकडे आज नव्हता. आवडत नसल्यास घालू नका. पुलावात शक्यतो नसतो.
धणे-जिरे भाजून केलेली पूड एक चमचा, हिंग, हळद, एक तेजपत्ता. चवी पुरते मीठ. एक छोटा चमचा आले लसूण पेस्ट
साजूक तूप एक मोठा चमचा. भाज्या परतायला तेल.
मी जन्मभर व्हाइट राइस, गरम पोळी गृप मध्ये जेवत आलेले आहे. त्यामुळे मिलेट्स माझ्यासाठी नवीनच. इतका स्वयंपाक केला त्यात बिर्याण्या पुलाव बासमती वापरून, नाहीतर आंबेमोहोरचा वरण भात, उकड व गरम भाजलेली गव्हाची पोळी, पराठे हे नित्य खाणे. मिश्र मिलेट्स चे पाकीट आणून बरेच दिवस झालेले आज ह्या स्पर्धे मुळे मुहूर्त मिळाला. अँड आय वॉज इन फॉर अ प्लेझंट सरप्राइज.
मी पहिले मिलेट्स भाजून लगेच शिजवणार होते. पण जालावर सर्च केल्या वर ही सर्व धान्ये किमान आठ ते दहा तास भिजत घालून मगच वापरावीत असे कळले. मग एक वाटी भिजत घातले. हे पाण्यात घातल्यावर थोडा कचरा, थोडी हळद असे यलो पाणी निघाले ते फेकून दिले व स्वच्छ पाण्यात भिजत ठेवले.
सकाळी उठून मटार व कॉर्न थॉ करायला ठेवले, बाकी भाज्या कापल्या. घरी आज फ्लॉवर, कांदापात, सिमला मिर्ची होते तेच घेतले.
आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात मोरया:
कढईत तेल गरम करून त्यात तेजपत्ता टाकला. मग आले लसूण पेस्ट, भाज्यांचे तुकडे टाकले मध्यम आचे वर परतायचे. त्यातच हळद हिंग व धणे जिरे पाव्डर टाकली. भाज्या स्टर फ्राय करायच्या झाकण नाही ठेवायचे व पाणी नाही घालायचे. चवीला थोडे कमी मीठ घाला. मग हा पॅन उचलून बाजूला ठेवायचा.माझ्याकडे इंडक्षन कुक्टॉप आहे त्यामुळे एका नंतर एक प्रोसेस करावी लागते. नाहीतर साइडला दुस र्या गॅस वर पण मिलेट्स शिजवता येतात.
आता दुसरे भांडे गरम करत ठेवा व त्यात भिजवलेल्या मिलेट्स घाला, ज्यात भिजवले तेच पाणी घालायचे असते पण मी ते टाकून फ्रेश घातले.
भिजवलेल्या मिलेट्स वर किंचित फेस आलेला दिसला. ते सर्व पाणी फेकून दिले - उगीच वास लागायला नको. एक वाटी मिलेट्स ला दीड
वाटी प्रमाण परफेक्ट आहे. मी दोन वाटी पेक्षा थोडे कमी घातले पण ते ही जरा जास्तच वाटले मला. मंद आचेवर मिलेट्स शिजवून घ्यायच्या.
जसे आपण वर्याचे तांदूळ शिजवतो तसे. माझा हा पहिलाच अनुभव असल्याने मी सिमिलॅरिटी शोधत होते . मंद आच हे महत्वाचे आहे.
शिजवताना त्यात एक चमचा तूप घाला हे नक्की करा मस्त स्वाद येतो. व किंचीत मीठ. मंद आचे वर सात तेदहा मिनि टात मिलेट्स शिजते
व्यवस्थित.
मग त्यात वरील स्टर फ्राय भाज्या घालून हलक्या हाताने मिसळून घ्या. व मंद आचेवर झाकण ठेवून परत तीन ते पाच मिनिटे ठेवा.
गरम गरम सर्व्ह करा. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला. आवडत असल्यास तूप, लिंबाची / लिंबू लोणच्याची फोड द्या. पापड द्या.
माझ्याकडे हिरव्या टॉमाटोची चटणी होती तीच मी घेतली.
फ्रेश व वेगळी चव आहे. मी केलेल्यातला एक तृतियांश ब्रेफा मध्ये खाल्ला व बाकी चा डब्यात आणला. दुपारी एक दीड वाजे परेन्त भुकेची जाणीव पण झालेली नाही. आत्ता लंच केले त्यात गारही मस्त लागला. मावे करायला वेळ झाला नाही. माबोकृपेने नवी रेसीपी हातातून घडली.
मला मधुमेह असल्याने खरेतर भाता ऐवजी मिलेट् खायला आहे. पण इतके दिवस डेअरिन्ग होत नव्हते. धन्यवाद संयोजक.
बरोबर एखादे क्रंची सालाड, ताक टोमाटो सार सोल कढी छान लागेल.
ज्येना मंडळींना आव्डेल अशी डिश आहे.
फोटो अपलोड करते आहे.
फोटो अपलोड करते आहे.
मस्त च अमा !! घरात दोन
मस्त च अमा !! घरात दोन मधुमेही ज्येष्ठ आहेत . त्यांच्या साठी उपयोगी आहे डिश . भाता ऐवजी पर्याय शोधत होते . कोणत्या कंपनीचे मिलेट्स चे पाकीट होते ? Rather असे मिळते हे नवीन आहे माझ्यासाठी .
छान दिसतोय पुलाव.
छान दिसतोय पुलाव.
छान दिसतोय पुलाव.
छान दिसतोय पुलाव.
लिटिल मिलेट गार झाल्यावर चिकट होतो असा अनुभव आहे.
पण भाताला रिप्लेसमेंट साठी हा मिलेट मला सगळ्यात चांगला वाटला. भाता सारखा साधा करून पातळ भाजी, आमटी, सांबार, दही फोडणी सोबत सुद्धा चांगला लागतो.
नंतर पोर्सो.
कोडो जरा मोकळा होतो पण कोरडा पडतो आणि चव खास नाही वाटली मला.
ब्राऊन टॉप, बानयार्ड, फॉक्सटेल सो सो वाटले.
आता तुम्ही मिलेट्स मध्ये रस घेतलाय तर चांगल्या पाकृ व टिप्स येतील.
छान आहे. एकदम सकस.
छान आहे. एकदम सकस.
एकादा इकडे मिश्र millets मिळतात का बघायला पाहिजे.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मानव, मला कुठेतरी फॉक्स्टेल मिलेट्स (राळे ?) च्या कुकीज आणि पोहे मिळाले होते. कुकीजची चव छान होती. पोह्याची चव नेहमीच्या तांदळाच्या पोह्यांसारखीच लागली होती..
बाजरीचा सुद्धा खिचडा करतात.
अच्छा, मी पोहे नाही आणले कधी
अच्छा, मी पोहे नाही आणले कधी वर नमूद केलेल्या मिलेट्सचे, नाचणीचे आणत असतो यांचा पातळ पोह्यांचा चिवडा करतात तसा करतो.. आता फॉक्सटेलचे आणुन बघेन.
मिलेट्स मध्ये आमचा प्रवास एकदा जमल्यावर छान लागतात की ते काही काळाने सगळेच छान नाहीत असा झाला, त्यानुसार वरील अनुभव. हे कदाचित बनवण्याची योग्य पद्धत काय यावर अबलंबुन असेल. यात पूर्व तयारी - कोणते किती वेळ भिजवावे, कोणते आधी भाजून घ्यावे (की भाजून भिजवतही ठेवावे?) - आणि शिजवण्याची पद्धत दोन्ही असेल.
आम्ही किमान दोन तास भिजवणे एवढेच केले सगळ्यांच्या बाबतीत.
विकतच्या कुकीज खाऊन पहिल्या काही, चांगल्या वाटल्या.
तसेच पुलाव केला तर बहुतेक सगळेच चालुन जातात, पण भाताला सब्स्टिट्युट म्हणुन नियमित खाल्ले (आठववाड्यातून तीन चार दिवस) तर नेहमी पुलाव कंटाळा येतो, भाता सारखे साधे करून सोबत तोंडी लावणे बरे वाटते.
आम्ही किमान दोन तास भिजवणे
आम्ही किमान दोन तास भिजवणे एवढेच केले सगळ्यांच्या बाबतीत.>> आठ तास भिजवावे लागते. ईट इज मोअर ऑफ अ लाइफस्टाइल चेंज
तूप-मीठाची चव छान असावी.
तूप-मीठाची चव छान असावी.
छान आहे पाककृती. आजारपणात असे कंफर्ट फुड चालेल बहुतेक. चावायची गरज नाही. फक्त पोटाला जड अथवा हलके माहीत नाही. जड असेल तर नको.
छान आहे पौष्टीक रेसिपी..
छान आहे पौष्टीक रेसिपी..
फोटोही छान..
छान, कधी केले नाही. करून खाईन
छान, कधी केले नाही. करून खाईन.
छान दिसतेय.. अगदी पौष्टीक
छान दिसतेय.. अगदी पौष्टीक वगैरे.. आजारपणात खायला अजून मजा येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती मस्त, फोटोही मस्त.
कित्ती मस्त, फोटोही मस्त. छान हेल्दी वन मिल डीश आहे.
आजारपणात खायला अजून मजा येईल>
आजारपणात खायला अजून मजा येईल>> तुला थोडेसे त्यात उकडलेले चिकन किंवा बारके प्रॉन्स/ आमलेटचे तुकडे घालून खाता येइल. शक्ती येइल प्रोटीन्स मुळे.
पाककृती आवडली. ही माझी:
पाककृती आवडली. ही माझी: वनडईशमईल
![img-20230623-wa00212.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33485/img-20230623-wa00212.jpg)
कोडो, मसूर पुलाव
छान पाककृती.. फायनल पुलाव
छान पाककृती.. फायनल पुलाव फोटो तोंपासू...
अरे वा छानच मंजुताई.
अरे वा छानच मंजुताई.
हे शिजवलेले मिलेट्स त्यातील पाणी कमी करून एका ठिकाणी टिक्की पण बनवलेली बघितली. कांदा मिरची कोतिबिर घालून टिक्की शेप देउन तव्यावर भाजलेनी. इतके उपद्व्याप कोण करणार. माझे तर एका चीज सँडविच मध्ये पोट भरते कधी कधी.
पुलावाचे मिश्रण पळी वाढे केले तर गरम तूप घालून मस्त गृएल कन्सि स्टनसी. हिवाळ्यात बोल भर मस्त पोटभरी चे होईल.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
मस्त दिसतोय पुलाव, मंजूताई.
अभिनंदन अश्विनीमामी !
अभिनंदन अश्विनीमामी !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अभिनंदन अमा .
अभिनंदन अमा .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमा, अभिनंदन.
अमा, अभिनंदन.