उपक्रम २ - तेरी लत लग गई

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 September, 2023 - 09:39

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

त्याच्या खांद्यावर मागुन माान टेकवून विसावली होती. तो स्तब्ध झाला. मग त्याने नजर हटवली.
भावना उचंबळुन आल्या, आठवणीही दाटुन आल्या ....
तिन महिने झाले, तिच्या सोबतची ती शेवटली संध्याकाळ... आश्रमात जाण्यापूर्वीची..

एवढ्यात उद्घोषणा झाली. गाडी पंधरा मिनिटात येणार. त्याने परत पाहिले तिकडे.. दुसरेच कुणी तिथे बसलेले.

अचानक त्याचा निर्धार सुटला. स्थानका बाहेर येउन दोन्ही बाजूंनी पहात चालु लागला.
अरे सापडले! .. दूर नव्हते फार.
तडक त्या दुकानात गेला, म्हणाला " एक स्मिर्नॉफ क्वार्टर आणि पाण्याची बाटली.”
मग आश्रमाच्या दिशेने हात जोडुन म्हणाला “आज खरंच खरंच शेवटली.”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिच्चारा!!
'एकच प्याला' ही त्याच्या आयुष्याची कहाणी होती असे त्याच्या एपिटाफवरती लिहा.

जबरी!