खेळ-२ - कोडे द्या- गाणे ओळखा

Submitted by संयोजक on 20 September, 2023 - 02:43

मायबोलीकरांनो, या खेळात संयोजक टीम तुम्हाला पहिले कोडे देतील त्यावरून तुम्हाला गाणे कोणते आहे ते ओळखून त्याची एक ओळ किंवा दोन ओळी लिहायच्या आहेत. मराठी किंवा हिंदी कोणतीही गाणी चालतील. कोड्याच्या सुरुवातीला फक्त तसे नमूद करावे. जो गाणे ओळखेल त्याने पुढचे कोडे द्यायचे आहे. जर त्या आयडीला कोडे सुचत नसेल तर दुसऱ्या कोणीतरी कोडे द्यावे.
उदा. "हिंदी गाणे- एका माणसाने प्लेटमधील पाव उचलला तर त्याखाली लिहिलेले असते जन्नत आणि त्याच्या डोक्यावर सावली असते,."
उत्तर " जिसके सर हो इश्ककी छांव, पाँव के नीचे जन्नत होगी."

तुमच्यासाठी पहिले कोडे खालीलप्रमाणे

"मराठी गाणे - मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठीची पाककृती बनवण्यासाठी ओल्या वेळेला फोडणी द्यावी. "

सांगा पाहू कोणते गाणे आहे ते आणि खेळ चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सोपे.. पहिलेच आपल्या सईचे गाणे Happy
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी...... आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले.. कांदेपोहे Happy

कोडं -

एका शेतकर्‍याकडे एक पाहुणा येतो. शेतात शेपूचं वारेमाप पीक आलेलं असतं. पाहुणा विचारतो की इतक्या शेपूचं तुम्ही करता काय? शेतकरी दादा म्हणतो की ते काय, इथे एक दिवाणखाना बनतोय तो शेपू वापरून करतोय आणि तिकडे अजून एक असाच बांधतोय.
शेतकरी हिंदी-इंग्रजी जाणणारा आहे.

जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है
(Hall, dill)

पुढले कोडे:

विमानतळावरील एका रेस्टॉरंटमध्ये एक तरुणी व्हिस्की पीत असते. थोड्यावेळाने इटलीतील शहराकडे जाणारे विमान उड्डाणास तयार असल्याची उद्घोषणा होते. ती लगबगीने बिल पे करून हँड बॅग घेऊन प्रस्थान द्वारा कडे रवाना होते.

तिच्या कडे पाहुन वेटर गाणे गुणगुणतो.

चली गोरी पी के milan को चली....

पुढले कोडे कुणीही दिले तरी चालेल, कारण लगेच काही कोडे सुचत नाहीये.

इटलीची राजधानी जळत होती.
राणी मात्र गवाक्षात उभी राहून त्याला प्यायला बोलवत होती.

rmd - bang on

जुळ्या शहरांना त्यांनी शहर-अ आणि शहर-ब अशी नावे (कोड वर्ड्स) दिली असतात. ब मध्ये जायचं नाही असे बॉस ने सांगितले असते, पण तो हेर, हेर बॉसला चकमा देऊन जात असतो हे तिला माहीत असते.
एकदा त्यांच्या अड्ड्याचा पत्ता लागुन एक पोलीस खिडकीतून प्रवेश करत असतो. ही त्याला एकाच झटक्यात खलास करते, त्याचे प्रेत खिडकीत लटकु लागते.
एवढ्यात दार उघडल्याचा आवाज येतो, तो ब मध्ये उंडारून परत आलेला असतो.
ती एक नापसंती दर्शक उद्गार काढून त्याला ते प्रेत आणायला आणि तिकडे उंडारणे बंद करायला सांगते. ---- हिंदी गाणे.

गाणे हिंदी असले तरी हिंदी शब्दांची फोड होऊन/शब्द एकत्र होऊन दोन मराठी शब्द तयार होतात तिच्या गाण्यात.

हा जुनाच आहे.

हिंदी गाणे. दोघे प्रेमिक डोळ्यात डोळे घालून जिन्याच्या पायर्‍यावर बसलेले असतात नि अचानक वाळवटांत जाऊन पडतात.

शा! मढं ले. खिडकीतले >> हे भन्नाट होतं >>> +१

एक सोपं कोडं देते -
ती रस्त्याने चाललेली असते. मग तिच्या लक्षात येतं की बर्‍याच वेळापासून एक दगड तिचा पाठलाग करतोय. ती वैतागून हे गाणं म्हणते --- हिंदी गाणं

प्रेम चोप्रा हा खोदकाम ठेकेदार असतो. त्याच्याकडे दगडू कामाला असतो. त्याचे केस नेहमी किंचित ओलसर असायचे.
त्याला नायक खोदण्याचे काम देतो. पण तो ते चुकवतो. नायक दगडूला बोल लावणार तर प्रेम चोप्रा म्हणतो,
जे बोलायचं ते गाण्यात...

नायक लगेच दगडूला काम देऊन कशी चूक झाली हे गाण्यात सांगतो.
ते गाणं कोणतं ?

नाही. उत्तर देऊन टाकतो.

पत्थर (दगडू ) केस_नम (ओलसर, दमट), तुझे हमने मुहब्बत (प्रेम) का "खुदा" जाना
बडी भूल हुई, अरे हमने, ये क्या समझा, ये क्या जाना

Pages