मनमोहक ते रूप || अर्पितो तुज मनोभावे नैवैद्य ||

Submitted by संयोजक on 19 September, 2023 - 05:06

भक्तगणांनो, गणेशोत्सव तर सुरु झालाय. मन प्रसन्न करणाऱ्या गणेशमूर्ती घराघरात आणि सार्वजनिक मंडपात स्थानापन्न झाल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीकडे बघूनच मन आनंदित होते आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच बाप्पाला अर्पण करणारा प्रसाद आणि नैवैद्य यामुळे वातावरणातील गोडवा द्विगुणित झाला आहे. इतर मायबोलीकरांनासुद्धा तुमच्या घरातील बाप्पाचे दर्शन व्हावे आणि त्यांनासुद्धा नैवैद्याचा गोडवा अनुभवता यावा म्हणून या धाग्यावर तुम्ही तुमच्या घरातील बाप्पाचे फोटो तसेच बाप्पाला अर्पण करणाऱ्या प्रसादाचे आणि नैवैद्याचे फोटो द्यायचे आहेत. लवकरात लवकर फोटो टाका. आम्ही सर्वजण बाप्पाच्या मुखदर्शनाची आणि नैवैद्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोकहो.

सामो - तो हंसच आहे Happy पण स्टायरोफोमवर आमच्या कारागिरीच्या मर्यादांमुळे ते नक्की कळत नसावे Happy पंख रंगीत असणे वगैरे डेकोरेशनचा भाग.

>>>>>तो हंसच आहे
मान व एकंदर कमनिय सिलहाऊटी हंसाचीच आहे खरी
>>>>कळत नसावे
नाही नाही नीट कळतय. Happy

मस्त फोटो सगळे , जाई छान दिसतेय गौर.
सामो - तो हंसच आहे >> फा मला हंस सोडून दुसरं काही असेल असं पुसट ही वाटल नव्हत . मोर म्हटल्यावर मी नीट बघितलं तरी हंस च दिसला.

सर्वच बाप्पा मस्त !
हा धागा मला दिसत का नव्हता..
आता अचानक आठवले म्हणून शोधला..

अच्छा.. नावामुळे कळत नव्हता.. माझ्या घरचा बाप्पा असे नाव माझ्या डोक्यात होते

आमच्या घरचा बाप्पा ....

IMG_20230923_202413.jpg

गणपती साठी केलेली क्रेप पेपर ची जास्वंद फुले .

IMG_20230923_215925.jpg

विसर्जनाच्या रांगेत बसलेला आमचा बाप्पा Sad
IMG_20230924_133710.jpg

आगमनाचा नैवेद्य --
IMG_20230924_133608.jpg

विसर्जनाचा नैवेद्य
IMG_20230924_141447.jpg

सगळेच फोटो छान आहेत.

अश्विनी, सुंदर झाली आहेत फुलं.

स्वस्ति, मोदक फार छान दिसतायत.

सर्वांना धन्यवाद !! अजून सोनचाफा आणि गुलाबाची पण केलीत . गणपतीच्या कृपेने बऱ्याच जणांना ऑर्डर ची करून दिली . मनिमोहर यांचा क्रेप फुलांचा धागा बघून कल्पना सुचली.

सगळे बाप्पा मस्त मस्त

अश्विनी फुले फारच सुंदर ...
स्वस्ति मोदक सुबक एकदम!

सगळे बाप्पा मस्त मस्त

अश्विनी फुले फारच सुंदर ...
स्वस्ति मोदक सुबक एकदम!

मनिमोहर यांचा क्रेप फुलांचा धागा बघून कल्पना सुचली. >> अश्विनी धन्यवाद ... आणि ऑर्डर ही मिळाल्या आणि पुऱ्या ही केल्यास म्हणून खुप म्हणजे खुप बरं वाटलं. बाकीची फुल ही योग्य धाग्यवर बघायला उत्सुक.

कोणती ही कला चार भिंतीत वाढत नाही. ऑर्डर मिळाल्या तरच नवनवीन प्रयोग करावेसे वाटतात. त्यातून खुप सुधारणा होते. मला ही म्हणतात कित्येक जण तुम्ही विकत का नाही ? पण एवढे वर्ष नोकरीची बांधिलकी खुप होती , आता कोणती ही कमिटमेंट घेणं आता नको वाटतय.
तुला खूप शुभेच्छा
अवांतरा बद्दल क्षमस्व.

फा मला हंस सोडून दुसरं काही असेल असं पुसट ही वाटल नव्हत . मोर म्हटल्यावर मी नीट बघितलं तरी हंस च दिसला. >>> Happy

धन्यवाद लोकहो.

अश्विनी११ - क्रेपची फुले सुंदर आहेत. निधी - तुमच्या फोटोत गणपतीच्या मागे आहेत ती कसली फुले आहेत?

मागच्या पानावर आमच्याकडचा फोटो आहे त्यात ती कागदी/फोमची आहेत. ती विकत मिळाली ऑनलाइन.

आरास सुंदर आहे Dumboo! गणपती, गौरी, किल्ला, "श्रीमंत योगी", मागची (बहुधा राजा शिवछत्रपती मधली) चित्रे -आणि पुढची सजावट सगळे अप्रतिम!

ॐ गं गणपतयेनघमनुविग्रहदेव
सकलपापविनाशकमङ्गलमतिपूत ।
दोषघ्न पापघ्न शापघ्न विभव
विघ्नाम्बुधिशोषणकरमद्भुतमुखकमल ॥

Pages