लोकहो, देशभक्तीची धुंदी आपल्या देशातील लोकांमध्ये जशी आहे तशी क्वचितच दुसऱ्या देशामध्ये पाहायला मिळते. जेव्हा आपल्या देशामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक अशी गोष्ट घडणार असते तेव्हा सगळे भारतवासीय आपल्यातले मतभेद विसरून एकजूट होतात. अशीच अलौकिक अभिमानास्पद घडलेली गोष्ट म्हणजे आपल्या देशाने राबविलेली आणि यशस्वी केलेली चंद्रयान-३ मोहीम. दुसरा कोणताही देश अजून चंद्रावरील ज्या भागात गेला नाही तिथे सर्वप्रथम भारताने आपले चांद्रयान उतरवले आणि हा क्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी अनुभवला. इस्रोची हि मोहीम आणि तेथील शास्त्रज्ञांना बघून बालगोपाळांच्या मनात आपणसुद्धा असे शास्त्रज्ञ व्हावे अशी इच्छा नक्कीच आली असेल. त्या इच्छेला प्रोत्साहन देण्यासाठी संयोजक टीम यावेळेला मायबोलीकरांच्या छोट्यांसाठी घेऊन आली आहे 'चांद्रयान' हा चित्रकलेचा उपक्रम. यात मुलांना चांद्रयान या विषयाशी संबंधित कोणतेही चित्र काढायचे आहे आणि रंगवायचे आहे. चंद्रावरील उतरलेले यान किंवा आपल्या कल्पनेतील अंतराळ यान, अंतराळात झेपवणारे यान किंवा अंतराळातील प्रवास असे कोणतेही विषय चालतील.
तर बाळगोपाळांनो, चालू करा आपल्या कल्पनेतील चित्र कागदावर उतरवायला.
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
उपक्रमाचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान - मायबोली आयडी - बाळगोपाळांचे नाव.
३. हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४. वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
५. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
६.. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||
वाह!! समयोचित सुंदर विषय आहे.
वाह!! समयोचित सुंदर विषय आहे. बघू ना चिमुकले चिमुकले हात कोणती कशी कशी चांद्रयान काढ्तायत, रंगवतायत.
चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट -
छान !!
छान आहे चंद्रयान...
छान आहे चंद्रयान...
नाव सुद्ध छान आहे .. रुषिक .. माझ्या जवळपास जाणारे
नवीन धागा काढा आणि त्यात टाका हे.. त्यावर आलेले प्रतिसाद मुलाला वाचायला देता येतील.
'चांद्रयान' हे नाव जास्त
'चांद्रयान' हे नाव जास्त समर्पक असल्यामुळे उपक्रमाचे नाव 'चंद्रयान' ऐवजी 'चांद्रयान' केले आहे, ज्यांनी प्रवेशिका दिल्या आहेत त्यांना चित्रामध्ये ;बदल करण्याची आवश्यकता नाही. धाग्याच्या नावामध्ये जर शक्य असेल तर 'चंद्रयान' ऐवजी 'चांद्रयान' करावे.