शिवाजी महाराज की जय!!! (बालपोवाडा)

Submitted by सत्यजित on 9 June, 2009 - 02:38

टप, टप, टप, टप चाले
घोडा शिवाजी राजांचा
शिवबांनी पार उडविला
धुव्वा रे मुघलांचा

बाळकडु स्वभिमानाचे
जिजा बाळ शिवाला पाजे
आईच्या गर्भात नसते
कुणीच कुठले राजे

स्वराज्य स्थापना करीन म्हणाला...
धरिली रायेश्वरावर रक्ताची धार
वय कोवळे ते हुंदडण्याचे
चौदा,पंधरा फार तर फार

मावळ्यांची फौज बनवली
हे वंशज प्रभू रामाचे
देश, देव, धर्म रक्षिण्या
ठाकले उभे शिवाजी राजे

ते वाघांचे बछडे होते
अन एक सिंहाचा छावा
बलाढ्य शत्रूला नमविण्या
रचिला गनिमी कावा

दिन दुबळ्यांचे रक्षण
वर्तन माणुसकीला साजे
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
सांगती शिवाजी राजे

क्रमश:

सत्यजित.

क्रमशः इतक्या साठीच की शिवाजी राजांच चरित्र बालसुलभ भाषेत आणि शैलीत शद्बबद्ध करण्याचा मानस आहे, त्यातले हे पहिल पान. तुम्हा सगळ्यांच्या सुचना आणि सुधारण स्वागतार्ह्य आहेत.

हर हर महादेव!!!

गुलमोहर: 

जय भवानी , जय शिवाजी.......
सुचना करण्याची माझी योग्यता नाही पण बछाडे कदाचीत चुकलय का ?
----------------------------------
मर्द मराठा भडकला......
तेव्हां भगवा झेंडा फडकला......

हर हर महादेव !!

शुभेच्छा पुढे लिहायला.

मस्त रे सत्या !!! तुझी आयडीया पण छाने. लवकर पुर्ण कर Happy
हर हर महादेव !!

जय भवानी , जय शिवाजी.......
शुभेच्छा पुढे लिहायला.

छान आयडिया. लवकर पूर्ण करा.
--------------
नंदिनी
--------------

एकदम छान!!!!!
हर हर महादेव !!
हर हर महादेव !!
हर हर महादेव !!
----------------------------------------------------------------------
कोणाचे देने कोणास पुरते, कितीही द्यावे सदा अपुरते !
माजे सरकार जे देवू करते, न सरते ते कल्पान्ती !!

मस्तच. खरंच तुमचे शब्द अगदी लहान मुलांना समजतील असे सोपे असतात. पाठ करवून घ्यायला हरकत नाही. लवकर पूर्ण करा. Happy

सत्या, मस्त रे पोवाडा... Happy

सत्या, मस्त रे. वाहव्वा.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

छान लिहिलाय बालपोवाडा... आवडला.. Happy

सत्यजित, उपक्रम स्तुत्य आहे. अनेकानेक शुभेच्छा. Happy

फक्त वरील रचनेला 'पोवाडा' म्हणता येईल का याबाबत मी साशंक आहे. माझ्या माहितीनुसार पोवाड्याचा एक विशिष्ट फॉर्म असतो, आणि तो विशिष्ट चालीत गायला जातो. इथे एक उदाहरण आहे बघ.

स्वाती हो अगदी मान्य.. तो विशिष्ट फॉर्म मध्ये गायला जातो, ज्या त्वेष असतो एक विरगित असते, तो फॉर्म बाळगोपाळाना तेव्हढा अपिलींग होईल? पोवाड ही पण कविताच असते फक्त ती कशी गायली जाते, डफच्या तालावर आणि तुणतुण्याच्या तालावर गायली जाणारी विरगाथा म्हणजे पोवाडा. आता चाल बांधल्यावर जी रं जी.. कुठे जोडायच हे ठवरता येईल, नाही जोडलं तरी हरकत नाही ... असं माझ मत.

म्हणुन मी मुद्दामच बालपोवाडा म्हंटल, कारण अगदी पोवड्याला जसा हवा तसा हा फॉर्म नाही. माझ्या कानत जे वाजत आहे ते तुम्हाला मला सांगता येणं अवघड आहे.

स्मिताने चाल लवली आहे असं ती म्हणाली , चालीत गाता याव म्हणुन तीने काही सुधारणाही सुचवल्या आहेत, ती चाल कशी आहे मला सुद्धा माहीत नाही. मी काही वेगवेगळ्या चालीत म्हणुन पाहीलं, जमतय असं मला वाटलं. पण मा़झी चाल प्रत्येकवेळी वेगळी होते Sad

तरी पण "अभी दिल्ली बोहत दुर है.."
म्हणुनच कदाचीत ही विज धरणं माझ्या एकट्याच काम नाही, म्हणुनच तुम्हां सर्वांच मदत मागितली आहे.

सत्या डफाच्या किंवा खंजीरीच्या चाली वर म्हणतायेते
टप, टप, टप, टप चाले
घोडा शिवाजी राजांचा हो घोडा शिवाजी राजांचा
शिवबांनी पार उडविला
धुव्वा रे मुघलांचा रं जी जी र जी र जी जी ,
अस म्हंटल तर ते बसत चालीत, तसही तु म्हणतोस तस मुलांना झेपेल अशी चाल लावावी लागते,

स्वराज्य स्थापना करीन म्हणाला...
धरिली रायेश्वरावर रक्ताची धार
वय कोवळे ते हुंदडण्याचे
चौदा,पंधरा फार तर फार
हे गद्य म्हणायचं

म्हणजे ह्याप्रमाणे मी करुन बघितल, तुला जमल्यास चालीत म्हंटलेल पाठविन

सत्या मस्त रे. भवानी तुज यश देवो. Happy
ठाकले उभे शिवाजी राजे
हे चालीत म्हणायाला थोडे अवघड जातेय.

उभे ठाकले
हो SSS
उभे ठाकले शिवाजी राजे असे बरे वाटतेय.

ते वाघांचे बछडे होते
अन एक सिंहाचा छावा ह्यालाही चालीत म्हणताना थोडी गडबड वाटतीये.

लै आवडला रे हा प्रयोग. Happy