स्मोकी मलाई चिकन

Submitted by maitreyee on 17 August, 2023 - 12:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ पाउंड बोनलेस चिकन, पाउण वाटी हेवी क्रीम ( किंवा साय), पाउण वाटी दही ( फार आंबट किंवा पातळ नको) , बिर्याणी साठी मिळतो तो( रेडीमेड ) तळलेल्या कांद्याचा चुरा, आले, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या २-३, वेलदोडे ४-५, काळी मिरी ७-८ दाणे,रेड चिली फ्लेक्स (ऑप्शनल) , गरम मसाला, कसुरी मेथी. स्मोक देण्याकरता कोळसा, तूप.

क्रमवार पाककृती: 

ही रेसिपी मी इन्स्टा रील्स वगैरे वर दिसलेल्या रेसिपीज चे मिश्रण होऊन बनली आहे. जिन्नस बरेच आहेत असे वाटत असले तरी कमी कष्टात पण अगदी रेस्टॉरन्ट सारखी मस्त चवीची र्रेसिपी आहे. हवी तेवढी माइल्ड किंवा स्पायसी पण बनवता येते. पार्टीला वगैरे न्यायला बेस्ट आयटेम आहे.
चिकन चे पीसेस धुवून (फार मोठे नकोत) कट करून घ्या. मी थाय पीसेस घेतले. ब्रेस्ट पीस पण चालतील.
मलाई वाटण - २-३ हिरव्या मिरच्या, २-३ काड्या कोथिंबीर वाटून घ्या. एकाबोल मधेही हिरवी चटणी, क्रीम , दही हे नीट मिक्स करून घ्या. फार लाड करायचे असल्यास काजू पावडर घाला १-२ चमचे.
आता एक जाड बुडाची कढई गॅस वर मिडियम हाय वर ठेवून त्यात बटर किंवा तेल घालून गरम करा. मी दोन्ही अर्धे अर्धे घेते.
तेलात चमचाभर आले लसुणाची पेस्ट घालून किंचित परता, मग त्यात चिकन, मीठ, तळलेल्या कांद्याचा चुरा, २ चिमूट मिरे पूड, २-३ वेलदोडे कुटून , गरम मसाला, चिली फ्लेक्स ( चवीला माइल्ड हवे असेल तर हे नाही घातले तरीचालतील) घालून चिकन परतून घ्या. चिकन परततानाच आपल्याला पूर्णपणे शिजवायचे आहे. गरज लागल्यास गॅस जरा कमी करा.
malai0.jpg
चिकन शिजल्यावर आधी केलेली मलाई पेस्ट त्यात घाला. कन्सिस्टन्सी किती घट्ट आवडते त्यानुसार थोडे पाणी घाला आणि झाकण ठेवून उकळी येऊ द्या. १-२ मिनिटात साइड ने तेल सुटायला लागले की वरून थोडि वेल्दोडा पावडर आणि कसुरी मेथी चुरून घाला आणि गॅस बंद करा.
आता बेस्ट पार्ट! म्हणजे स्मोक देणे. बर्‍याच जणांना महित असेल ही प्रोसेस. एक अम्ध्यम आकाराचा कोळसा चिमट्यात धरून गॅस वर धरा. तो नीट सरसरून पेटला की फुंकर घालून एका डावात किंवा स्टील वाटीत किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉइल च्या द्रोणात ठेवून वरून चमचाभर तूप घाला. लगेच धूर यायला सुरुवात होईल., की ताबडतोब ते कोळश्याचे भांडे. डाव आपल्या रश्श्याच्या कढईत अलगद वरून ठेवा किंवा नुसता धरा आणि झाकण बंद करा. (कोळसा ग्रेवीत बुडवायचा नाहीये)
malai01.jpg
३-४ मिनिट तो धूर कढईत कोंडला गेला पाहिजे. त्यानंतर तो डाव/ भांडे बाहेर काढा आणि कढईवर झाकण ठेवून ५ मिनिटे रस्सा थोडा मुरु द्या.
या स्मोक चा अतिशय मस्त फ्लेवर रश्श्याला येतो. तर असे स्वादिष्ट स्मोकी, मुलायम मलाई चिकन तयार! नान/ तंदुरी रोटी सोबत खायला घ्या.
malai01_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात ३ जणांना व्यवस्थित झाले.
अधिक टिपा: 

- कोळसा पेटवणे जरा ट्रिकी असू शकते. लवकर पेटत नाही, पेटला तरी फुंकर घातल्यावर तो निखारा न होता विझूनच जातो वगैरे. पेशन्स ठेवा!
- ही रेसिपी पनीर, मश्रूम वापरुन पण चांगली होईल Happy

माहितीचा स्रोत: 
इन्स्टा रील्स वर वेळोवेळी पाहिलेल्या रेसिपीज आठवून केलेले माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे. स्मोकसाठी कोळशाऐवजी दालचिनीचा तुकडा पेटवून विझवून त्यावर तूप टाकायचा प्रकार रणवीर ब्रारने दाखवला होता. त्यानेही चांगली चव येत असावी.

मस्त! करुन बघणार.
चारकोल ग्रिलवाल्या मित्राकडून एक कोळशाचा तुकडा आणतो. नाहीतर ते पोतं घ्यायला लागेल.

मस्त आहे. इतरांसाठी करून बघेन.
माझ्याकडे एक छोटं पोतं कोळसा आहे आणि बार्बेक्यू मोडून पडलाय, कुणाला हवं असल्यास कळवा... मिळून काळं करू. Lol

ओह दालचिनीचा तुकडा ट्राय करायला पाहिजे. पण त्या काडीचा विझल्यावर कितपत धूर येत असेल असे वाटले.
अमित, कुठून का असेना, १ तरी कोळसा आणा म्हणजे झालं! माझ्याकडेही चारकोल ग्रिल असल्यामुळे कोळसे असतातच घरात.
स्मोक करणे हा महत्त्वाचा पार्ट आहे त्यामुळे स्किप करुन चालणार नाही! Happy ( हो नैतर "बिना स्मोक ची आज ही रेसिपी केली, छान झाली " असल्या पोस्टींना फटके मिळतील!!)

मस्त रेसिपी. आजकाल नुसते जिन्नस वाचूनच कृतीचा अंदाज येण्या इतपत स्वैपाकीय प्रगती झालेली आहे Wink
कोळसा नाहिये, दालचिनी पिस वापरून बघेन..

मस्त. ते मलाई चिकन appetizer असतं ना, ते असेल असं वाटलें..असं रस्सेदार प्रकरण फार पाहिल्याचे आठवत नाही.

मस्त आहे ही रेस्पीपण. Happy
मी आपली ती ही आणि ते वर लिहिलेल्यांपैकी एक घालून करून पाहीन म्हणतो. आधी जरा खर्पूस भाजून घेतले तर जास्त चांगलं लगेल असं वाटतंय.

<<<.. मिळून काळं करू. Lol

नवीन Submitted by अस्मिता. >>>

हा खासच.

पाकृ वाचून छान वाटले. ..

मलाई चिकन appetizer असतं ना >>>> अगं हो Happy मी म्हटले ना की रेस्प्या मिक्स करून तयार झालेली रेसिपी आहे, त्यातली एक त्या अ‍ॅपेटायजरचीच होती. त्यात मॅरिनेशन साठी वापरलेले जिन्नस बरेचसे या क्रीमी ग्रेवीसारखे आहेत.