कोकम मॉक /कॉकटेल

Submitted by सायो on 16 August, 2023 - 10:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोकम सिरप (आगळ नव्हे), हालापिनो किंवा आपल्या नॉर्मल मिरच्या, आलं, लिंबू, पुदिन्याची पानं, मीठ, बर्फ, कॉकटेल करणार असाल तर व्होडका किंवा जीन आणि मॉकटेल करणार असाल तर स्प्राईट, फ्रेस्का जिंजरएल वगैरे.
ग्लासच्या रिमला लावायला थोडं मीठ, लाल तिखट, चाट मसाला वगैरे

क्रमवार पाककृती: 

आलं आणि मिरची, पुदिन्याची पानं एकत्र कुटून घेऊन २ लिंबाच्या रसात मिक्स करायचं.
जिंजरएल साधारण ३/४ ग्लास घेऊन त्यात १/४ ग्लास कोकम सिरप मिक्स करायचं. शेकर ग्लासमध्ये आईस घालून हे सगळं मिश्रण त्यावर घालून शेक करायचं साधारण २० सेकंद. गाळून लगेच लिंबाची चकती घालून सर्व करायचं.

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसायला भारी.
चव पण घेता आली असती तर..

हे अमेझिंग लागतं!
आगळसुद्धा साखर घालून वापरता येतं.
मी चाट मसालासुद्धा घातला होता वरून.

अमित, होय.

सायोकडेच हे मॉ़कटेल ट्राय केले आणि ज ब र द स्त होते चवीला. रेसिपीवरून आधी कितीही इमॅजिन केले असले तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा फार भारी होते Happy याला अजून काहीतरी ग्लॅमरस नाव देण्याची गरज आहे!

का रे अरुण, तुझा उपास होता का? >>>>> नाय. आमाला फक्त मॉकटेलच ऑफर केलं गेलं ... Lol

पण मॉकटेल सुद्धा मस्त जमलं होतं. कॉकटेल घरी ट्राय करणार .... Happy

मॉकटेलच केलं होतं आणि नंतर कुणाला कॉकटेल हवंय का हे विचारलं होतं पण शनिवार असल्यामुळे मंडळींनी सात्विक पेयं घेतलं असावं.

>>> >>> याला अजून काहीतरी ग्लॅमरस नाव देण्याची गरज आहे!
कोकण / कोकम म्यूल!

ब्लडी तेरी! Lol

(सायो चिडेल आता... पळा पळा... Proud )

फारच छान झालं होतं हे मॉकटेल. मी आणि मैत्रेयीनं ‘अर्धा ग्लास घे, अर्धा तरी घे, अगं घे अर्धा ग्लास, देऊ का अर्धा तरी‘ असं एकमेकींना आग्रह करून करून प्यायलं Biggrin

स्वाती२, तुमच्याकडे इंग्रोमध्ये कोकम सिरप मिळतं का? आमच्याकडेच मिळत नाही म्हणून विचारलं.

मस्त आहे.
कोकम सरबत करताना सिरपमधे पाण्याऐवजी किंवा थोडंसंच पाणी घालून बाकी प्लेन सोडा घातला तरी मस्त लागतं.

येस्स भारी प्रकरण होतं हे! फार आवडलं.
कॉकटेल नक्कीच ट्राय करणार आहे. बेस रेसिपीकरता धन्यवाद सायो!

>>स्वाती२, तुमच्याकडे इंग्रोमध्ये कोकम सिरप मिळतं का? आमच्याकडेच मिळत नाही म्हणून विचारलं.>>
आमच्या इथेही मिळत नसावे पण मी त्यांना विचारणार आहे मागवाल का म्हणून.