शाळा

Submitted by स्मितागद्रे on 8 June, 2009 - 12:50

आई! काल स्वप्नात माझ्या माझी शाळा आली
दोन महिने एकट राहुन जाम बोर होती झाली

मग मला म्हणाली तुझी खूप आठवण आली
तुम्हा सगळ्यांना भेटायची खूप घाई झाली

मग म्हणुन म्हंटल जरा स्वप्नात तुझ्या यावं
थोडा वेळ गप्पा मारुन मगच परत जावं

हं, निकालाच्या दिवशी मात्र सारीजण भेटली
मग मात्र सगळी जण सुट्टीला पळाली

वर्ग झाले सुने आणि मुका झाला फळा
घंटा झाली अबोल, मग सुनी झाली शाळा

मग आई माझ्याही डोळ्यात पाणी आल
एकटी पडली शाळा म्हणून खूप वाईट वाटलं

चला मग पटपट करुया शाळेची तयारी
मला ही तीला भेटायची घाई झालीय भारी.

गुलमोहर: 

स्मिताजी, छान आहे.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

सो स्वीट.:) मनीला पण घाई झालीये.. Happy छोटीची सुरू झाली का? Happy

अले, कित्ती क्युट Happy
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

एकदम गोड Happy
स्मिते, कामं पण कर थोडी हापिसात Proud

मस्त कविता हो Happy
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

वाह, लय भारी...
गेल्या विकातांला जाऊन दप्तर, वॉटरबॅग इ.इ ची खरेदी झालेली दिसतेय Happy

दक्षे घरी केलीय कविता आणी रात्री ११ वा.पोस्टली

हो रे खरेदी झाली सगळी जोरदार Happy

स्मिताजी,

छानच हो कविता!

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

सर्वांनी आवर्जुन प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद !

स्मि मस्त Happy खरच पण असच होतं सुट्टी संपायची वाट बघतात मुलं

वेगळीच श्टाइल... शाळा सुखावेल आता Happy

छानय ,छानय ,छानय , बरका .......................