मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मणिपुरातील इंटरनेट बंद ठेवण्याचा कठोर निर्णय यापूर्वीच अमलात आलेला असून, खालील बातमीनुसार पोलिसी कारवाई सुरू असल्याची बातमी देखिल आश्वासक आहे. पुन्हा एकदा धन्यवाद!

https://indianexpress.com/article/india/tension-manipur-hills-areas-may-4-video-two-women-paraded-naked-surfaces-8849063/
ssls.jpg

एव्हढे दिवस काय झोपा काढल्या होत्या का सरकारने? घटना भयंकर चिड आणणारी आहे.

बिल्किस बानूच्या " संस्कारी " गुन्हेगारांना तुरुंगातून सोडविल्यावर त्यांचे बाहेर जंगी सत्कार झाले. ते हार पुष्पांच्या ओझ्याने वाकले होते जणू काही चीन सिमेवर लढून परतलेले योद्धे होते. एक नाही, लाखो लोक स्वागत करणार्‍यांत होते.

आपली वाटचाल अराजकाकडे सुरु आहे.

आता एखाद्या अब्दुलने कुठल्यातरी मदरशामधे कधीतरी केलेल्या वर्तनाची बातमी घेऊन फुरोगामी धावत येईल आणि त्या मागोमाग स्माईली घेऊन खरा पुणेकर!

Manipur Viral Video पर बोले PM Modi- 'मेरा हृदय पीड़ा और क्रोध से भरा हुआ है'

+१ उदय.
तब्बल एका महिन्याने FIR फाईल केली आहे. महिला बालकल्याण मंत्री इराणी बाईंना आत्ता खडबडून जाग आली.

Unacceptable: Supreme Court Takes Suo Motu Cognizance of Manipur Video Showing Woman Paraded Naked

यु ट्युब वर ह्या बातमी खाली भक्तांच्या प्रतिक्रिया आहेत की हे फक्त अ-हिंदूंच्या बबतीत कोर्ट करागः Sad अरे महिला आहेत त्या, काहीतरी लाज बाळगा रे भxxxxx X-(

अक्षरशः लाज वाटतं आहे तो व्हिडिओ बगून .
इतकी मोठी घटना होवून पण केंद्र सरकार शांत असेल तर.
असल्या सरकार नी लगेच राजीनामा दिला पाहिजे.
किंवा rashtrpati नी कसलाच बाकी राजकीय विचार न करता सरकार बरखास्त केले पाहिजे.
त्यांना तो अधिकार राज्य घटनेने दिला आहे.
त्यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे.
हिंदुत्व वादी सरकार च्या काळात एका स्त्री वर इतका अत्याचार होत असेल आणि हे जनतेचे राजे शिव छत्रपती न चे नाव घेवून सत्ता उपभोगत असतील .
तर मला हिंदू असण्याची पण लाज वाटत आहे.
शिव छत्रपती असते तर.
मान उडवली असती ह्या नराधम लोकांची
ज्यांनी त्या स्त्री वर असा अत्याचार केला आहे

मणिपूरचा पुरुषी उन्माद पाहून काही काळ अस्वस्थ व्हायला झालं. पण बिल्कीस बानो आठवताच, डबल इंजिन असलेल्या राज्यात असे प्रकार घडले नसते तर मात्र नवल वाटले असते. अशी मनाची समजूत काढली.
ज्या देशात दुधाचे दात न पडलेल्या चिमुरड्या लेकराला हिंदू मंदिरांत डांबून आळीपाळीने कुस्करले गेले. त्या नराधम बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपा या राजकीय पक्षाच्या समर्थकांनी हातात देशाचे तिरंगे घेऊन मोर्चा काढला. आणि देशातील सुजाण नागरिक षंढासारखे शांत बसले. त्या देशात अजून दुसरे काय होणार?
डबल इंजिन असलेल्या गुजरात राज्यातील बिल्कीस बानो या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार केला गेला. तिच्या डोळ्यादेखत लेकराला ठार केले. न्यायालयाने नराधम गुन्हेगारांना शिक्षा सुनावली. तरीही आरोपी हिंदू संस्कारी ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची शिक्षा राजकीय सत्तेने रद्द केली. आणि उर्वरित देश षंढासारखा गप्प बसला. त्या देशात अजून दुसरे काय होणार?
देशभरातील अशी उदाहरणे द्यायची झाली तर किमान एक पुस्तक प्रसिध्द करता येईल. नपुंसक पुरुष आपले शौर्य सिध्द करण्यासाठी नेहमी असहाय स्त्रीयांवर सामूहिक अत्याचाराचाच मार्ग का निवडतात? हा प्रश्न म्हणजे आजवर न सुटलेलं कोडं आहे.
शत्रूच्या स्त्रियांचा आदर 'परस्त्री मातेसमान' मानून करणारा राजा आमच्या भूमीवर घडून गेला. त्या राजाच्या स्त्रीदाक्षिण्याला सद्गुण विकृती म्हणत शत्रुच्या स्त्रीयांवर अत्याचार करा. अशी शिकवण देणाऱ्या सावरकरही याच मातीतले. पण सत्ताधारी राज्यकर्ते जेव्हा अशा सावरकरांचा पुरस्कार करतात. तेव्हा तरुण युवकांच्याकडून स्त्री सन्मानाची अपेक्षा ठेवता येईल का?
याच देशात गुजरातच्या भूमीत जन्म घेतलेला गांधी बाबा घडून गेला. ज्या देशात स्त्रीयांना अंगभर वस्त्र मिळत नाही त्या देशात सुटाबुटात वावरणे योग्य नाही. म्हणत वितभर पंचा घेऊन आयुष्यभर वावरला. त्याची हत्या करणाऱ्या आद्यदहशतवाद्याच्या नावाने महाराष्ट्रातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी मतदान करत पारंपरिक कर्मचारी संघटनांचा पराभव केला. अशांकडून काय अपेक्षा ठेवायच्या?
लोकांची चव बदललीय हे अर्धसत्य आहे. लोकांना राजकीय वरदहस्त आहे हे पूर्णसत्य आहे. मणिपूरमध्ये इंटरनेट बंद असल्याने तिकडील अमानुष अत्याचाराच्या घटना आता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. मणिपूर मधील जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ४ मे २०२३ रोजीची आहे.
व्हिडिओ मध्ये अत्याचारी स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. का? कारण राजकारण!
देशाचे पंतप्रधान नवीन संसदेत सेंगोल घेऊन व्हिडिओ चित्रीकरणासाठी 'पालथे' झोपले होते. तेव्हा मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड निघत होती. तिकडील कायदा सुव्यवस्था पालथी करण्याचे पापही पंतप्रधानांचेच! तर दिल्लीत राष्ट्रीय महिला खेळाडू रस्त्यावर तिरंग्यासोबत तुडवल्या जात होत्या. हा इतिहास लिहिला गेला आहे. हा कसली पुरुषी अहंकाराचा दर्प? हे कसले हिंदुत्व?
महिला सन्मान आणि महिला अत्याचार यावर आभाळ हेप्पलणाऱ्या बायांनी राजकीय पक्ष बदललेत. आता त्यांना फक्त महिलांचा विकास दिसतो. कारण रस्त्यावर नागवी करुन धिंड काढली जाणारी महिला त्यांच्यालेखी महिलाच नसते. कालचा खूनी, बलात्कारी आज त्यांच्यासाठी मंत्री भाऊराया असतो. त्याच्या सतरंज्या त्यांना उचलायच्या असतात. हाच त्यांचा स्त्रीवाद असतो.
जन्माने हिंदू आणि भारतीय नसलेल्या सोनिया गांधी यांनी स्वकर्तृत्वाने या देशाचे नागरिकत्व, धर्म, परंपरा स्विकारल्या. स्वकर्तृत्वाने राजकीय सत्ता खेचून आणली. १० वर्षे देशात सत्ता राबवली. पण आजच्या सत्ताधाऱ्यांसारखे स्त्रीयांवर अत्याचार होवू दिले नाहीत! देशाच्या वाट्टोळ्याला जितके सत्ताधारी जबाबदार आहेत. तितकेच भाजपाला बहुमत देणारे मतदार जबाबदार आहेत!!
By Tushar Gaikwad

तब्बल एका महिन्याने FIR फाईल केली आहे. महिला बालकल्याण मंत्री इराणी बाईंना आत्ता खडबडून जाग आली.>>>>>>>
निषेधार्ह घटना !
फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून आरोपींना कठोर शिक्षा दिल्या गेल्या पाहिजेत.
घटना एक महिन्यापूर्वीची आहे , आता उघडकीस आली .
सगळे आरोपी आणि घटनेचे शूटिंग करणारा देखील मैतई असतील म्हणून उघडकीस येण्यास इतका कालावधी लागला असेल.

भयंकर उद्विग्न करणारी घटना! दूर कुठेतरी मणिपुरात होतेय सगळं
महाराष्ट्र किती दूर आहे मणिपुरापासून? कुणाला काही कल्पना?
मला वाटतं फार नसावा. :'(

महाराष्ट्र किती दूर आहे मणिपुरापासून?मला वाटतं फार नसावा. :'(>>>हो हळू हळू आपण मणीपूरच्या जवळ जात आहोत.

सगळे आरोपी आणि घटनेचे शूटिंग करणारा देखील मैतई असतील म्हणून उघडकीस येण्यास इतका कालावधी लागला असेल. >>> म्हणजे सोशिअल मिडियावर आली नसती तर घटना दबुन गेली असती ?? ह्यात मैतेई- कुकी हा प्रश्न नाही आहे हे कळतं का? तीन महिने लगले का पीडा आणि क्रोध मनात भरुन यायला?? आणि ही घटना घडली नसती तर शहा-मृग असाच बसला असता का? घटना निषेधार्ह आहेच पण त्यापेक्षा मोदीची निष्क्रियता अधिक निषेधार्ह आहे.

व्हिडीओ व्हायरल झाला आणि लगेच एकाला अटक झाली दोन महिन्यांनंतर. एवढी तत्परता मेरी कोम वगैरे आव्हान करत होत्या तेव्हा दाखवली असती तर हे सगळं तेव्हाच आटोक्यात आणता आलं असतं.

तीन महिन्यांतून जास्त काळ देशातल्या एका राज्यात प्रचंड हिंसाचार पेटला आहे आणि देशाच्या पंतप्रधानाला सोशल मीडियामुळे फार उशीरा याची कल्पना येते हे खरे असेल का?
असले तर त्या पदासाठीच ते अधिक लाजिरवाणे आहे! भयंकर.

नेमकं काय चालू आहे हे माहिती नाही. कुणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही. व्हायरल व्हिडीओ माझ्यापर्यंत आलेला नाही.
एक शंका आहे - या घटनांमागे चीन असेल का ?

>>> नेमकं काय चालू आहे हे माहिती नाही. कुणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही. व्हायरल व्हिडीओ माझ्यापर्यंत आलेला नाही.
खरं आहे.

किंवा काय होईल? माझा अंदाज
कडक पाऊल.
त्या दोन तरुणींना अटक!
त्यांचा कबुली जबाब, xxxx च्या दबावाखाली आम्ही हे कृत्य केले.
नेहमीचेच यशस्वी टेकनिक.

व्हिडिओ पाहिला नाही हेच बरे. मी पाहिला, खूप व्यथित करणारा, भीतीदायक आहे. मणिपूर पोलिसांनी acknowledge केला आहे, म्हणजे खरा आहे.

व्हायरल व्हिडीओ माझ्यापर्यंत आलेला नाही.
<<
तो येऊ नये म्हणून तर खरी कठोर पावलं उचलली आहेत आदरणीय मोदिजींनी. मेडिया गॅग, इंटरनेट बॅन.

तुम्ही खरं आहे करत बसा.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, पक्ष राज्यातील घटनेचा "निंदा" करतो आणि या प्रकरणात राज्य सरकारकडून कठोर कारवाई केली जात आहे.

तथापि, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अवघ्या एक दिवस अगोदर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणे हे “अनेक गूढतेने वेढलेले” असल्याचे त्यांनी सांगितले.

पहा मी आधीच सांगितले होतो. तवाधरून पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. ह्याला कोणीतरी चावी दिली आहे. ती संपेपर्यंत हा बोलत राहणार.

Pages