Submitted by प्रविणपा on 19 June, 2023 - 22:31
आम्हाला कोकणात वाळू चाळून गोण्यात भरण्यासाठी साधारण 30-40 मजूरांची गरज आहे. राहण्याची सोय केली जाईल आणि मेहनताना प्रत्येक टन वाळू मागे दर आठवड्याला दिला जाईल.
जे लेबर कॉंट्रॅक्टर असे मजूर पुरवू शकतील अशा लेबर कॉंट्रॅक्टरची माहिती कुणाला असेल तर द्यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या अवघड आहे
सध्या अवघड आहे
भातलावणी चालू झाली / होईल कोकणात, शेतीची कामे सुरू होतात
कोकणी माणसं अंग मेहनतीची कामे
कोकणी माणसं अंग मेहनतीची कामे करायला मागत नाहित. आमचे सध्याचे कामगार युपी बिहार चे आहेत. आमच्या सध्याच्या मुकादमा कडे अजून माणसे नाहीत. आम्हाला ८-१० तास काम करणारी माणसे पावसाचे २-३ महिने सोडले तर वर्षभर लागतात. हे नवीन कामगार आम्हाला सप्टेंबर पासून लागतील.
>>Even simple local made trolleys can reduce your workload by 10x
तुम्हाला कामाचे स्वरूप माहित नाही. 10x productivity च्या मशिन मध्ये करोडो ची इन्वेस्ट्मेंट आहे आणि जागा मोठी लागते. ते हळू हळू मार्गी लावतोय पण त्यासाठी पुढची ३-४ वर्षे जातील. सध्या चाळण्यासाठी सेमी ऑटोमॅटिक मशीन आहेत. ज्यावर काम करण्यासाठी माणसे हवी आहेत.
युपी-बिहार-आसामी ह्याखेरीज
युपी-बिहार-आसामी ह्याखेरीज कोणी मिळणार नाही. कोकणात नक्की कुठे ते संगु शकलात तर प्रयत्न करेन
>> युपी-बिहार-आसामी ह्याखेरीज
>> युपी-बिहार-आसामी ह्याखेरीज कोणी मिळणार नाही. कोकणात नक्की कुठे ते संगु शकलात तर प्रयत्न करेन
धन्यवाद भ्रमर. आम्हाला तळेरे (कणकवली पासून साधारण २२ किमी) येथे कामगार हवे आहेत. वाळू मशीन वर चाळून गोण्यात भरणे आणि त्या गोण्या गोडाऊन मध्ये रचून ठेवणे असे कामाचे स्वरूप आहे.
>>यूपी,बिहार सारख्या अती
>>यूपी,बिहार सारख्या अती मागास राज्यातून च मिळणार.
>>असे किती रोज देणार आहेत हे.
>>त्या पेक्षा जास्त कोकणात कोकणी लोक दुसरे कमी कष्टाचे काम करून कमवू शकतील.
>>नाहीतर मुंबई,पुणे अशी शहर महाराष्ट्र मध्ये आहेत च.
जर का मजूराने आठ ते दहा तास उन्हाळ्य्यात काम केले तर एक मजूर सहज ३०-३५ हजार कमवू शकेल एका महिन्यात. हिवाळ्यात तेच प्रमाण २०-२५ हजारापर्यन्त जाते. कामगारांची राहण्याची सोय आम्ही करतो त्यामुळे तो खर्च देखील नाही. दहा तासाच्या वर काम केले तर याही पेक्षा जास्त कमावता येइल. एवढ्या पैशात काम करायला तयार असणारे भारतातल्या कोणत्याही भागातले लोक चालतील.
विपु पाहा
विपु पाहा