द साउंड ऑफ मॅजिक : संगीतिका परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 21 May, 2023 - 08:45

द साउंड ऑफ म्युझिक ही संगीतिका जगभर तिच्या उत्तम संगीतासाठी व साध्या पण हेलावुन टाकणार्‍र्‍या देश प्रेमी कथे साठी प्रसिद्ध आहे.
आपल्या पैकी अनेकांच्या लहान पणाचा ह्या संगीतिके तील लोकप्रिय गाणी भाग असू शकतील. गरवारे प्रशालेत शिकताना आम्ही दहावीत असताना १९८० मध्ये ९ वी अ च्या मुलींनी गॅदरिंग मध्ये डो रे मी गाणे शेवटच्या अवघड तुकड्या सहित सादर केले होते. त्यानंतर ह्या गाण्यांची लाँग प्लेइंग तबकडी मैत्रीणीच्या घरी मोठ्या स्टीरीओ सिस्टिम वर ऐकायचा योग आला होता. तेव्हाच त्यांचा एकत्रि त गोडवा मोहवून गेला होता. पण आमच्या घरी शुद्ध उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचे वातावरण आबा व बोनि एम पण चोरुन ऐकावे लागे त्यातल्या त्यात ट्रान्झिस्टर वर हिंदी गाणी ऐकायची परवानगी होती पण ह्या प्रकारच्या संगीताचे काहीच एक्स्पोझर नव्हते.

पुढे हैद्राबाद ला आल्यावर शोधून शोधून कॅसेट मिळवली व मनसोक्त गाणी ऐकली व गायली सुद्धा. साधी अवख ळ व उत्साही खेळकर मारिया कोणालाही आव्डण्या सारखीच होती. तिच्यासारखेच बारके मोठे अपराध हातुन होत व सासूकडून ओरडा खावा लागे. पण तरीही गाणी पाठ झाली व लक्षात राहिली. जगण्याच्या धावपळीत व इतर संगीत ऐकण्याच्या रेट्यात हे संगीत मागे पडले. अधून मधून मूड आला की योडलेइ योडलेइ योउ ओ! करत असे.

परवाच( हैद्राबादचा परसों) मुंबईत एन मॅकचे उद्घाटन झाले. त्याचे मेटगाला सदृश्य व्हिडीओज आपण बघितलेच असतील. तर इथे जायचे खूप डोक्यात होते. द साउंड ऑफ म्युझिक ह्या रॉजर्स अँड हॅमरस्टीन्स कंपनीने प्रोड्युस केलेल्या संगीतिकेचे शोज लागले आहेत असे कळले. आमचा खरे तर मदर्स डे ला जायचा प्लान होता पण त्या वीकां ताची तिकिटे बुक झालेली कधीच मग ह्या वीकेंडचे तिकीट बुक करुन टाकले.

काल सकाळी डॉक्टर व्हिजिट तिथे दोन तास बसून पाच मिनिटाची भेट झाली, जेवायच्या प्लान चा बोजवारा उडाला समोसा पाव/ वडापाव ने आधार दिला. पण जायच्या आधी एक तास तरी झोपले पाहिजे म्हणून टाकोटाक घरी आलो. ह्या प्रयोगाला जायचे म्हणून मी उत्सा( अ टाटा एंटर प्राइज) मधून नवा सेपरेट्स चा सेट व नवे लिप स्टिक घेतले होते. कपडे - लाली लिपस्टिक पर्फ्युम असा जामानिमा करुन उबर ने निघालो. चाळीस मिनिटाचा रस्ता आहे. ड्रायवर म्हणे तिथे काय आहे. मला दोन ट्रिपा मिळाल्या व तिथूनच परत मुलुंडची पण त्रिप मिळत आहे. मग त्याचे शिक्षण केले. व एन मॅक ला पोहोचलो. ह्या जागेचा वेगळा रिव्यु लिहि णार आहे कारण इथे गर्दी होईल.

जागा पटकावुन प्रोग्राम हातात घेउन बसलो. अपेक्षेने अगदी उचंबळून येत होते. माझा ब्रोडवे संगीतिका बघायचा पहिलाच योग. मस्त वाटत होते.
लिंडसे आणि क्रुझ ह्यांनी ह्या संगी तिकेचे संगीत बुक लिहिले आहे. लाइव्ह ऑर्केस्ट्रा खाली बसला होता व कंड क्टर तयारीत होते. संगीति केची सुरुवात चर्च च्या सेटने होते. सर्व सेट्स एकदम स्मूथली हलणारे आत बाहेर करणारे आहेत. व वरुन खाली येणा रे पडदे, मागे कंप्युटर वरुन प्रक्षेपित केलेल्या इमेजेस असा खूपच हाय टेक पण सामान्य प्रेक्षकाला सुखवणारा मामला आहे.

त्या आधी सुरुवातीला गुट न टाग आय अँम युअर मदर सुपिरीअ र स्पीकिन्ग, कृपया मोबाइल फोन व कोणतीही इलेक्ट्रोनिक रेकॉर्डिन्ग यंत्रे बंद करा रेकॉर्डिन्ग करायला परवानगी नाही असा स्टर्न टंग इन चीक मेसेज आला. व लगेच पडदा वर!! १) मदर सुपिरीअरच्या लॅटिन मधील प्रार्थनेने व आलेलुया ने आहे सुरुवात होते. मग ती मारिआ ची आठवण काढते. तर ही बाई परवानगी घेउन तिच्या लाडक्या पर्वत राजीत गाणे गात बसलेली आहे. २) द हिल्स आर अलाइव्ह. जिल क्रिस्तीन रैनर ह्या नटी- गायिकेने मारियाचा मध्यवर्ती रोल केला आहे व पूर्ण संगीतिका तिच्या नाजूक खांद्यावरच अवलंबून आहे. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

गाण्यां ची ऑर्डर सिनेमा पेक्षा थोडी वेगळी केलेली आहे किंवा कदाचित हेच मूळ स्क्रिप्ट असेल व सिनेमात बदल केलेले आहेत.
३) हाउ टु सॉल्व्ह अ प्रॉब्लेम लाइक मरिया हे नन्स चे गाणे आहे. बाकीच्या ज्युनिअर नन्स पण छान गातात व अ‍ॅ क्टिन्ग एकदम सहज सहज आहे.

मारिया परत येते. तिचा अपराध काय तर ती शांत अ‍ॅबीत गाणी गात असते. म. सु. रागवायचा प्रयत्न करते पण तीही आल्प्स कन्या असल्याने दोघीही मिळून ४) दीज आर अ फ्यु ऑफ माय फेवरिट थिंग्ज गाणे म्हणतात. हे दोनदा आहे. एकदा मारिया व एकदा मदर सुपिरीअर व परत एकदा दोन तीन ओळी मारियाच्या आवाजात आहेत. मग मदर सु. तिला क्यापटन च्या घरी पाठवते.

अधून मधून थोडे व सोपे संवाद आहेत. आनश्लुस जस्ट व्हायच्या आधी चा काळ आहे क्यापटन टेन्स आहे.व मुले एकदम त्याच्या शिस्तीत. मारियाला पळवून लावायचे त्यांच्या डोक्यात असते कारण गवर्नेस पळून गेली की बाबा आपल्या बरोबर येउन राहतात असे त्या बिचार्‍यांना वाटत असते. एक बारकी ब्याग व गिटार घेउन मारिया येते व मला मुलांना शिस्त लावायला शिट्टी ची गरज नाही म्हणते. बाबा गेल्यावर तिची व मुलांची ओळख होते. व ती मला गवर्नेस म्ह णजे काय ते आज्जिबात माहीत नाही पण मला गाता येते मी तुम्हाला तेच शिकवते.
मग लगेच ५) डो रे मी गाणे आहे. ह्यात मुलांनी सुरेख गायन आवाज लावले आहेत व मारिया तर हॅटस ऑ फ. ह्यात टी अ ड्रिंक विथ जॅम अँ ड ब्रेड आहे त्याचे पुढे जर्मन ब्रेड करतात. हे मला माहीत नव्हते. मी पहिल्यापासून जर्मन ब्रेड म्हणत होते Happy ह्याला पण टाळ्यांचा कडकडा ट.

मग मारिया मुलांना कपडे शिवायला कापड मागते पण क्यापटन नाही म्हणतो. तिला मात्र तुझे हे टाकावु ड्रेस नक्की बदल म्हणून छानसे ड्रेसचे कापड तागाच पाठवतो. मारियाची अ‍ॅटिक मधली खोली व बाहेर मोठे वादळ चालू आहे. विजांचा कडकडाट. एक बेड एक कपाट व एक खिडकी असा सीन आहे.

ह्या आधी ल लीझल व तिच्या पोस्टमन मित्राचा सीन व गाणे आहे. ते घरासमोरील बागेत आहे.६) यु आर सिक्स्टीन गोइन्ग ऑन सेवंटीन व क्युट्सा नाच व एक लाजराबुजरा किस पण आहे. ते मारियाला माहीत पडते. पण लीझल ला सांभाळून नेते. ही खालुन खिडकीतुन आत घरात उडी मारते. ( आईविना पोर फील्स!!! मी थोडी टिपे गाळली) विजांचा कडकडाट वाढतो तसे एक एक पोर आत येते व मारि या ला मिठी मारते. दोन मुलगे तर तिच्या बेडखालीच लपून बसलेले असतत. काहीतरी खोडीचा बेत असतो पण भीतीने दातखी ळ बसते.

इथे७) हाय ऑन द हिल्स लोन्लि गोटहर्ड गाणे घेतले आहे. पोरे पण फार फर्स्ट क्लास गातात. एक सूर आउट ऑफ प्लेस नाही.

पुढे नटवी बॅरोनेस व मॅक्स येतात. तिच्या समोरच मुलांची कळकट मळकट व मेनली कर्टनचे ड्रेस घातलेली एंट्री झालेली आहे. मुले कोलां टी उडी पण मारतात त्यांची खुशी बघून क्यापटन आनंदित होतो पण ये उसके शान के खिलाफ है. बॅरोनेस चे काम करणारी नटी पण फार सुरेख दिसते. गोरे गोरे पाय ( गुड घ्यापरेन्तच) व खाली हाय हील्स एकदम जबरदस्त. हिचे व मॅक्स चे एक गाणे आहे. क्यापटन शी लग्न कसे गरजेचे आहे ते एकमेकांत चर्चा करतात. हे सिनेमात नाही. व फारसे लक्षणीय पण नाही. त्यांना फुटेज. व कास्ट ला कपडे वगैरे बदलायचे काही कॅलक्युलेशन असावे. हिला पण टाळ्या मिळाल्या. व्हेरी पोलाइ ट आडयन्स.

क्यापटन उखडून मारियाला हाकलून देतो पण मग मुलांच्या आवाजातले. ८) द हिलस आर अलाइव्ह गाणे आहे व शेवटी न राहवुन तो ही गातो. नाझी आक्रमण झाले आहे. व जनता नाराज आहे. पण एक पार्टी आहे इथे मुलांचे सुप्रसिद्ध ९) सो लाँग फेअर्वेल. गाणे आहे. हे इथे जास्त छान घेतले आहे सिनेमापेक्षा. सर्व मुले एकत्र येउन कक्कू क्लॉक बनवतात व एक एक बाय करुन जातात. हे प्रत्यक्ष्च बघावे. मै बोलना बोलके नै. मुलग्यांनी पण वरचे सूर परफेक्ट लावले आहे.

मग अजून एक बॅरोनेस व मॅक्स चे गाणे आहे. पुढे पार्टीत मारिया व क्यापटन चा नाच ( वॉल्ट् झ ने सुरु होतो व स्टेप्स थोड्या लोकल नाचाच्या पण आहेत.) मग हे प्रेमात पडतात पण हे लक्षात आल्यावर मारिया हे चूक आहे म्हणून अ‍ॅबीत निघून येते. पण मदर सुपिरीअर तिला जीवन जग सर्व चॅलेंजेस अ‍ॅक्सेप्ट कर असे मोटिव्हेशन देते. इथे १०) क्लाइंब एव्हरी माउंटन गाणे आहे.

ती परत येते व एक किस आणि ११) आय मस्ट हॅव डन समथिंग गूड गाणे आहे. हे सर्व बागेत. क्यापटन जरा साइड कॅरेक्टर वाटतो पण त्याने मारिया समोर ताकदीने काम केले आहे. सिनेमातल्या हिरोपेक्षा जरा डावा वाटतो दिसायला पण खरा कलाकार - गायक आहे. मला तर हे गायन प्लस अ‍ॅक्टिन्ग एकदमच कराय चे हे फार भारी वाटले दोघांचे. व मुलांचे पण.

मग लग्ना चा मेजर सीन आहे. एबीतल्या म्हातार्‍या मदर सुपिरीअर, इतर नन्स ह्यांच्यातलीच एक जण आता संसारी होणार म्हणून नन्स तिची छान तयारी करतात. मोठे पाद्री साहेब् येतात. पोप सारखाच ड्रेस आहे. मागे अ‍ॅबीची बॅक ग्राउंड बदलते. परत एकदा १२) आलेलुया आहे सर्व नन्स व मदर सुपिरीअर च्या आवाजात. इथे मध्यंतर होते.

१५ मिनिटांचे मध्यंतर आहे. व लगेच सुरू आता कथेचा टोन बदलला आहे व राजकीय रंग जास्त गडद झाले आहेत. हे हाइल म्हण तात पण हाइल हिटलर म्हणत नाहीत. व नाझी / हिटलर चा अगदी शब्दाने ही उल्लेख नाही. मुलांचे स्पर्धेत गाण्यासाठी सिलेक्षन होते. व वडिलांना
जर्मन शिपवर जायची तडक ऑर्डर येते. फॅमिली सेपरेशन ! फिर कब मिलते क्याकी. मग एक प्लान शिजतो. घरी ऑर्डर द्यायला नाझी ओफिसरस येतात. तेव्हा मनावरून एक काळा साप फिरतो.

मुले गायला उभी राहतात व स्पर्धेत एकदम मागे चार मोठे नाझी पडदे - लाल व मध्ये मोठे काळे स्वस्तिक असे सळसळत खाली येतात. हे फार शॉकिन्ग आहे सीन मध्ये. मी गेली पाच सहा वर्शे द्वितीय महायुद्धाचा सर्वांगाने अभ्यास केला आहे. पण जुलमी व फाशिस्ट राजवटीचे प्रतीक एकदम डोळ्यासमोर आल्याने अगदी अस्वस्थ होते. भावनात्मक रिस्पॉन्स एकदम मन भारी करून टाकतो.

स्पर्धेत मुले परत एकदा डोरेमी म्हणतात. आता टी अ ड्रिं क विथ जर्मन ब्रेड!! अगदी ठासून लागेल से म्हणतात. मुलांनी व मारियाने ऑस्ट्रिया चे राष्ट्रिय कपडे घालून येतात. व बाबा आर्मीचा पोषाख. मग क्यापटन एडल वाइज ऑस्ट्रियाचे नॅश नल फूल चे गाणे म्हण तो. तेव्हा तो जरा जरा झेलेन्स्की सारखापण वाटला. सर्वांचा लढा सारखाच आहे. मग वडिलांना आत्ताच निघावे लागेल असे फर्मान येते व मुले सो लाँग फेअर्वेल गाणे म्हणत पलायन करतात. स्टेज वर अंधार होतो व ती अशूभ चिन्हे व मिलिटरीचे टॉर्च!! काळे दृश्य.

हे पळून अ‍ॅबीत येतात व नन्स त्यांना मागे बागेत लपवतात पण लिझल चा बॉय फ्रेंड जो आता आर्मित शिपाई झाला आहे तो त्यांना वाचवतो. मग
म सु व इतर नन्स चा निरोप घेउन क्यापटन मारिया व मुले चालत डोंगर पार करुन स्विस बॉर्डर परेन्त जायचे ठरवतात. पर्वत रांगा आपल्या पालकच आहेत व त्या धोका देणार नाहीत. मुलांना थकतील पण घेउ संभाळून म्हणून ते कूच करतात. इथे नाटक संपते.

मग पडदा वर गेल्यावर आं कोर व सर्वांना स्टँडिंग ओव्हेशन!! १०.२१ ला संपला पर्फॉरमनस.

ही लिंक
https://nmacc.com/performing-arts/the-sound-of-music

पुढील धाग्यात एन मॅक बद्दल अधिक माहिती.

लहान मुलांना अगदी दाखवण्या जोगा प्रयोग आहे. क्रिएट ब्युटिफुल मेमरीज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण. लहानपणी बघितलेल्या सिनेमातील ज्युली अँड्र्यूज आणि क्रिस्तोफर प्लमर डोळ्यासमोर आले.

आय हॅव कॉन्फिडन्स इन मी हे गाणे संगीतिकेत नाही. मरिआ अ‍ॅबी सोडून क्यापटन च्या घरी जाते तेव्हा हे गाणे आहे.