Submitted by नितीनचंद्र on 18 May, 2023 - 09:28
हा गृप मला फार आवडला. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या पध्दतीने नुकसान टळेल.
जर सेव्हिंग अकाऊंट वर पैसे ठेवण्या ऐवजी मुदत ठेव करुन ठेवले तर इंटरनेट बँकिग व्यवस्थेतला त्रुटी किंवा आपण केलेल्या चुकीमुळे होणार्या अफरतफरी पासून बचाव होणे शक्य आहे का ?
समजा पैसे लागलेच तरी मुदतठेव मोडायला आजकाल बॅकेत न जाता सुध्दा हे काम करता येते.
प्रश्न मुर्खपणाचा वाटेल पण बँकिग मधल्या अनुभवी लोकांनी उत्तरे द्यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
यावरच एक लेख लिहायला घेतला
यावरच एक लेख लिहायला घेतला होता पण इथेच थोडक्यात लिहितो -
एक वेगळे अकाउंट काढून त्यात ओनलाइन पेमेंट साठी लागणारी रक्कम ठेवायची. या अकाउंटला नेट बँकिंग ठेवायचे. (हे OUT.ACC म्हणू) या अकाउंटला रजिस्टर केलेला नंबर वाला फोन आणि एटीएम कार्ड एकत्र हरवल्यास धोका असतो.
दुसरे एक अकाउंट ज्यामध्ये दुसरीकडून पेन्शन,पगार,कंपनी डिपोझिटसचे व्याज ,भाडे जमा होते त्यास एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग घ्यायचे नाही. (यास IN.ACC म्हणू. ) इथून साध्या चेकने कामापुरती रक्कम OUT.ACC मध्ये जमा करत राहायची.
नॉर्मली ऑनलाइन (नेट) बँकिंग
नॉर्मली ऑनलाइन (नेट) बँकिंग बॅंकेशी निगडित असते, बॅंकेच्या एका पर्टिकुलर अकाउंटशी नाहि. इन आणि आउट अकाउंट दोन वेगवेगळ्या बँकेत असतील (आणि लिंक केलेली नसतील) तरंच वरचा सल्ला उपयोगी ठरेल. एकाच बँकेत असतील तर उपयोग नाहि; हॅकर्सना ऑनलाइन अॅक्सेस मिळाला कि त्याबॅकेतली सगळी अकाउंट्स एक्स्पोज होत असल्याने त्यांवर डल्ला मारायला कष्ट पडणार नाहित...
क्रेडिट कार्डची सोय असताना या
क्रेडिट कार्डची सोय असताना या नेट बँकिंग, डायरेक्ट डेबिट, ATM कार्डच्या फंदात पडावेच कशाला?
क्रेडिट कार्डे किती सुरक्षित
क्रेडिट कार्डे किती सुरक्षित असतात? हरवली आणि ती माहीत पडेपर्यंत काय होऊ शकते?
हे वाचा.
हे वाचा. भारतातील नियमपण जवळपास असेच असणार.
With credit card fraud, the card issuer's money is at stake. With debit card fraud, your money has been stolen.
नॉर्मली ऑनलाइन (नेट) बँकिंग
नॉर्मली ऑनलाइन (नेट) बँकिंग बॅंकेशी निगडित असते, बॅंकेच्या एका पर्टिकुलर अकाउंटशी नाहि>>>> असं कसं? नेटबँकींग एका बँकेचं त्याच बँकेतल्या अकाउंट शी निगडीत असणार ना. माझं दुसर्या एखाद्या बँकेत अका. असेल तर ते खातं कसं एक्सपोज होईल?
नॉर्मली ऑनलाइन (नेट) बँकिंग
ड.पो.
>>क्रेडिट कार्डची सोय असताना
>>क्रेडिट कार्डची सोय असताना या नेट बँकिंग, डायरेक्ट डेबिट, ATM कार्डच्या फंदात पडावेच कशाला?<<
तुम्हि एका क्रेडिट कार्डचं बील दुसर्या क्रेडिट कार्डने देता का? कि सगळी बिलं अजुनहि चेक/कॅशने फेडता??.
भारतात मुख्यत: fraud होतो तो
भारतात मुख्यत: fraud होतो तो Whatsapp ची लिंक वापरून किंवा QR code वरून फसवणूक होते तेव्हा आणि ते सुद्धा का, तर पैसे थेट बँकेतून डेबिट होतात म्हणून.
मी असले काही प्रकार करत नाही. जिथे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, ATM card असा पर्याय असेल तेव्हा फक्त क्रेडिट कार्डच वापरतो.
Always remember, if YOU yourself initiate any transaction, then it is likely to be safer.
सर्वांना धन्यवाद ! मुळ
सर्वांना धन्यवाद ! मुळ प्रश्नाची पुर्ण उत्तरे मिळतील या अपेक्षेसह वाट पहात आहे.
>>मुळ प्रश्नाची पुर्ण उत्तरे
>>मुळ प्रश्नाची पुर्ण उत्तरे मिळतील या अपेक्षेसह वाट पहात आहे.<<
अहो, उत्तर आलंय वरती. एकाच बँकेत चेकिंग, सेविंग, फिक्स्ड डिपॉझिट इ. असले तर हॅकर्सना अॅक्सेस मिळतो. चेकिंग्/सेविंग अकांउटमधले पैसे ताबडतोब जातील, पण फिक्स्ड डिपॉझिटमधले बँकेच्या पॉलिसिनुसार चेकिंग अकाउंट मधे येतील. तोवर तुम्हि अलर्ट झाला नाहि तर तेहि जातील...
बँकेची apps निघाली आहेत आणि
बँकेची apps निघाली आहेत आणि त्यातून e - deposits बँकेत न जाता करता आणि मोडता येतात हे मान्य.
म्हणजे
सेविंग्ज अकाउंटला अगदी कमी पैसे ठेवायचे.,
बाकीचे पैसे महिन्याला खर्चाला लागतात तसे छोट्या छोट्या इ -डिपॉझिटस मध्ये ठेवायचे आणि लागेल तसे दर महिना एकेक डिपॉझिट मोडून सेविंग्जला पैसे टाकून एटीएम मशिनमधून काढून घ्यायचे.
सेविंग्जमध्ये पैसे फारच थोडे असल्याने अफरातफर झालीच तर तेवढेच जातील. एफडीतले जाणार नाहीत. युपीआइ पेमेंटस एटीएम कार्डावर आधारित असल्यास धोका झाल्यास शिल्लक balance उडू शकतो.
मात्र क्रेडिट कार्ड आहे आणि ते कुणी ढापले (hack) तर सेविंग्जमध्ये पैसे शिल्लक असो नसो अधिक उडू शकतात./चोरले जाऊ शकतात. ते तुम्हाला बँकेला परत द्यावे लागतील.
थोडक्यात बँक अकाऊंटला क्रेडिट कार्ड घ्यायचे नाही आणि शिल्लक रक्कम फार न ठेवता इ - डिपॉझिट्स करणे आणि मोडणे या पद्धतीने संभाव्य ओनलाइन
अफरातफरीच्या धोक्यापासून दूर राहता येईल.