नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.
काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.
आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.
मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:
" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".
यावर अधिक बोलणे न लगे.
खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.
गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.
आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.
प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.
मी पाहिलेली (चित्रित) नाटके:
* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला
*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर
*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय
* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार
* आचार्य अत्रे
तो मी नव्हेच
* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम
* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट
* मधुसूदन कालेलकर
शिकार
* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }
* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू
* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)
* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले
* डॉ. शिरीष आठवले
मित्र
* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात
* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली
* मनोहर सोमण
द गेम
* विजय निकम
रघुपती राघव राजाराम
*सुरेश जयराम
डबल गेम
* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख
* शिवराज गोर्ले
बुलंद
* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)
*सुरेश खरे
ती वेळच तशी होती
* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..
मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.
कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************
छान बाफ. मी आवर्जुन मराठी
छान बाफ. मी आवर्जुन मराठी नाटके यु ट्युब वर बघते. पूर्वी बालगंधर्व ला बघितली आहेत. माझी फेवरिट खालील प्रमाणे.
१) मोरुची मावशी
२) दिनुच्या सासुबाई राधाबाई. एकेकाळी पुपुकरांचे फेवरिट होते हे नाटक.
३) तरुण तुर्क म्हातारे अर्क.
४) ते नाटक ज्यात गोड गोजिरी लाज लाजरी ताई तु होणार नवरी नाच आहे. : नाव विसरले.
५) लक्ष्याचे विनोदी नाटक. नाव विसरले माया साने नावाची काल्पनिक बाई. रुही पण आहे. त्यात. आई खास्ट असते. ह्याचा मूळ प्रयोग पण पाहिला आहे बालगंधर्वला.
६) सुंदर मी होणार ज्यात वंदना आहे.
बाकी ओरिजिनल १९८० मधले एका रविवारची कहाणी बरेच दा रविवारी लावते. जवळ जव्ळ पाठ आहेत संवाद. बिगरी ते म्या ट्रिक चाळ व इतर एक पात्री ओरिजिनल प्रयोग.
अजून लिहा मी शोधून बघेन.
प्रशांत दामलेची पण एक दोन
प्रशांत दामलेची पण एक दोन आहेत ती बघितली पण फारच बडबड ऐकून फार वैताग आला. पण बघितली नेटाने.
अमा
अमा
पडदा उघडल्याबद्दल धन्यवाद
प्रशांत दामलेची पण एक दोन आहेत ती बघितली पण >>>
गेला माधव कुणीकडे ?
गेला माधव कुणीकडे ?>> हो हो
गेला माधव कुणीकडे ?>> हो हो दोन संसार असतात. त्या बायका फार म्हणजे फार बोलतात. मूळ संकल्पना छान आहे.
घाशिराम पण आहे मला वाट्ते. नव्या नट संचात बघवत नाहीत ही नाटके पण संवादा साठी बघायची.
गेला माधव कुणीकडे ?>> हो हो
गेला माधव कुणीकडे ?>> हो हो दोन संसार असतात. त्या बायका फार म्हणजे फार बोलतात. मूळ संकल्पना छान आहे.
घाशिराम पण आहे मला वाट्ते. नव्या नट संचात बघवत नाहीत ही नाटके पण संवादा साठी बघायची.
यूट्यूबवर 'उणे पुरे शहर एक'
यूट्यूबवर 'उणे पुरे शहर एक' नावाचं एक नाटक दोन तीन वर्षांपूर्वी बघितलं होतं. आवडलं होतं. मूळ कन्नड नाटक गिरीश कारनाड यांचं आहे. त्याचं नाव बेंडे काळु ऊरु. बेंडे काळु ऊरु हे बंगळूरूचं मूळ नाव. त्याचा अर्थ उकडलेल्या शेंगांचं गाव. त्यामागे एक कथा आहे. ते असो, पण नाटकाचं मराठीकरण करताना नावाचं मराठीकरण 'उणे पुरे शहर एक' हेही मस्त जमलं आहे, तेही आवडलं.
दिग्दर्शक मोहित टाकळकर.
राधिका आपटे, अश्विनी गिरी, विभावरी देशपांडे, ज्योती सुभाष, अनिता दाते असे अनेक चांगले कलाकार आहेत.
ही नाटकाची लिंक
https://youtu.be/6wg5Zn5rdls
बॅरिस्टरhttps://youtu.be
बॅरिस्टर
https://youtu.be/ZW73zW21eXQ
लक्ष्याचे विनोदी नाटक. नाव
लक्ष्याचे विनोदी नाटक. नाव विसरले माया साने नावाची काल्पनिक बाई. >> शांतेचं कार्टं चालू आहे.
लक्ष्याचे विनोदी नाटक. नाव
लक्ष्याचे विनोदी नाटक. नाव विसरले माया साने नावाची काल्पनिक बाई. रुही पण आहे. त्यात. आई खास्ट असते. ह्याचा मूळ प्रयोग पण पाहिला आहे बालगंधर्वला. >>> शांतेचं कार्ट (सुधीर जोशी वडील आहेत लक्ष्याचे)....
ते नाटक ज्यात गोड गोजिरी लाज लाजरी ताई तु होणार नवरी नाच आहे. >> सही रे सही (भरत जाधव) ???
ते नाटक ज्यात गोड गोजिरी लाज
ते नाटक ज्यात गोड गोजिरी लाज लाजरी ताई तु होणार नवरी नाच आहे >> श्रीमंत दामोदर पंत (सही रे सही युट्युबवर नाही)
व्हय तांच ता. शांतेचं कार्ट
व्हय तांच ता. शांतेचं कार्ट मधले काही जोक्स उच्च कोटीचे आहेत. सही रे सही पुढे बोअर आहे पण सुरुवात छान आहे. मला वाट ले सुर्याची पिल्ले कि काही नाव असावे.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
..
' 'उणे पुरे शहर एक' नव्याने समजले. पाहायला सुरुवात केली आहे व मस्त वाटते आहे !
मी घरी नाटक पाहताना एकदम न पाहता ते पुरवून २-३ टप्प्यात पाहतो.
बॅरिस्टर पाहिले आहे; सचिन खेडेकर यांचा अभिनय सुंदर.
सुर्याची पिल्ले >> जे
सुर्याची पिल्ले >> जे युट्युबवर आहे त्यात मोहन गोखले, दिलीप प्रभावळकर अन सदशिव अमरापुरकर आहेत... चांगले आहे तेही नाटक पण शांतेचं कार्ट/ सही रे सही/ श्रीमंत दामोदर पंत सारखे नॉन स्टॉप हसवणुक नाही... थोडे गंभीर अन तरी विनोदी असा काहीसा प्रकार आहे...
रसिका जोशी अरुण नलावडे
रसिका जोशी अरुण नलावडे
नाटिका
गंमत जंमतं सगळे एपिसोड
जैतुनबाईची खानावळ, स्मशान भटजी खूप करुण आहेत
लेख छान
बाकी मुंशी प्रेमचंद, रविंद्रनाथ काही कथा...
मृच्छकटिक , मालवणी पांडगो ईलो, वस्त्रहरण, घाशीराम कोतवाल, बायंडर, हसवा फसवी
अजून बरेच काही आठवेल तसे पोष्टतो
सखाराम बाईंडर आणि शांतता
सखाराम बाईंडर आणि शांतता कोर्ट
गिरीश कर्नाडांच्या चष्म्यातून
https://youtu.be/VXIDTvt0Za0
डॉक्टर तुम्ही सुद्धा - लेखक -
डॉक्टर तुम्ही सुद्धा - लेखक - प्रा. अजित दळवी, दि. - चंद्रकांत कुलकर्णी
प्रतीक्षा लोणकर, गिरीश ओक
नातीगोती - ले. जयवंत दळवी, दि. - विजय केंकरे
रीमा लागू, दिलिप प्रभावळकर, मोहन जोशी
सर्वांना धन्यवाद ! उत्तम
सर्वांना धन्यवाद ! उत्तम माहिती दिलीत.
..
१. सूर्याची पिल्ले >>>
प्रत्यक्ष व चित्रित दोन्ही पाहिलेले आहे.
२.
घाशीराम कोतवाल</em> >>
हे प्रत्यक्ष नाटक मी आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनात पाहिलेले होते. त्यामधील दोन कलावंत आमच्याच कॉलेजचे होते ! -
मोहन आगाशे : मानसोपचार तज्ञ आणि
नंदू पोळ : कार्यालयीन कर्मचारी.
हे नाटक मला दुसऱ्यांदा पहावे काही वाटलं नाही म्हणून युट्युबवर तिकडे फिरकलो नाही.
सौजन्याची ऐशी तैशी - वसंत
सौजन्याची ऐशी तैशी - वसंत सबनीस
राजा गोसावी, लता थत्ते, जयमाला इनामदार, अविनाश खर्शिकर
श्यामची मम्मी - ले. अशोक पाटोळे, दि. पुरुषोत्तम बेर्डे
निर्मिती सावंत
असा मी असा मी - पु. ल.
मंगेश कदम, सतीश तारे, अमिता खोपकर
घाशीराम मूळ संचात थिएटर
घाशीराम मूळ संचात थिएटर अकादमी प्रथम Air India building च्या बाजूला असलेल्या थिएटर मध्ये पाहिले. नाव विसरले.
YouTube वर नव्या संचात अलूरकर यांचे. त्यांचे रेकॉर्डींग चांगले वाटले.
प्रथम Air India building च्या
प्रथम Air India building च्या बाजूला असलेल्या थिएटर -NCPA?
भरत खूप धन्यवाद
भरत खूप धन्यवाद
NCPA चं होतं...
ती वेळच तशी होती (सुरेश खरे)
ती वेळच तशी होती (सुरेश खरे)
चांगले आहे. आवडले.
दोन जोडपी. त्यातील एका जोडप्यातील स्त्रीचे दुसऱ्या जोडप्यातील पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध. संवाद उत्तम आहेत.
विवाहसंस्था मानणाऱ्या नवऱ्याची भूमिका अविनाश मसुरेकर यांनी उत्तम केली आहे.
आनंद अभ्यंकरही छान.
साधारण 1990 चे दशक. घरांमध्ये फक्त लँडलाईन फोन.
त्यामुळे एखादी व्यक्ती घरात नसताना तिच्यासाठी फोन येणे आणि तिची गुपिते घरातल्या इतरांना कळणे हे भारी !
घाशीरामचे दिवस हा असाच एक
घाशीरामचे दिवस हा असाच एक घाशीराम वर असलेला सुंदर व्हिडिओ YouTube वर आहे.
वर वर सूडकथा पण हातात अनिर्बंध सत्ता असेल तर काय होते हा ही एक भाग आहे. असं ऐकलय एका व्हिडिओत की काही मराठी सरदार नाना फडणवीसांवर नाराज होते...मग घाशीरामाचा वापर नानाचं वजन कमी व्हावं म्हणून केला. पुण्यात भवानी पेठेत घाशीराम वाडा आहे. पण घाशीराम जरी खरा तरी हे नाटक दुस-या एका कादंबरीवर आधारित आहे. ही दंतकथा ही असावी.
Hamida Bai chi kothi pan aahe
Hamida Bai chi kothi pan aahe
शांतेचं कार्ट मस्त
शांतेचं कार्ट मस्त
लक्ष्या, सुधीर जोशी, रवींद्र बेर्डे छान काम
शांतेचं कार्ट मी पाहिलेले
शांतेचं कार्ट मी पाहिलेले नाही परंतु ते नाटक नवे असतानाचे दिवस आठवतात.
या नाटकानंतर लक्ष्मीकांत बेर्डे मराठी नाट्यसृष्टीच्या चर्चेत एकदम केंद्रस्थानी आल्याचे आठवते.
कॉलेजमध्ये असताना तरुण तुर्क,
कॉलेजमध्ये असताना तरुण तुर्क, रंग्या रंगिला रे, एका लग्नाची गोष्ट वगैरे रिपिट मोडवर बघितली आहेत..... त्यानंतरही अनेकदा म्हणजे Pre-Youtube Era मध्ये नाटकांच्या सीडी डीव्हीडी आणून बघितल्या आहेत पण नाटक हे नाट्यगृहात बसून घेण्याचाच अनुभव आहे हे १००% खरय!!
व्हिडीओमध्ये जर कलाकाराने नाटकासारखाच अभिनय केला असेल (कारण बऱ्याचदा ते ॲडोप्शन सगळ्यांनाच सहजी जमते असे नाही) तर ते लाऊड किंवा अगदी शब्दशः नाटकी वाटू शकते.
फार्सिकल नाटकात ते जास्तच जाणवते!!
छान बाफ.>>>+११ वाचतोय.
छान बाफ.>>>+११
वाचतोय.
*तर ते लाऊड किंवा अगदी शब्दशः
*तर ते लाऊड किंवा अगदी शब्दशः नाटकी वाटू शकते.>> +१. चांगला मुद्दा.
....
'उणे पुरे शहर एक' पाहून संपवले. एक सुंदर नाट्यानुभव !
महानगर... हरतऱ्हेची माणसे... विविध सामाजिक स्तर आणि थर .....
मानवी प्रवृत्ती... भावना... राग, लोभ, आनंद, दुःख,
हव्यास, फसवणूक, नैराश्य...
प्रेम, करुणा ..... या सगळ्यांची एक सुंदर घट्ट वीण बांधलेली आहे !
प्रसंगांमधील नाट्य म्हणजे काय ते छान समजते.
मलाही आवडलं होतं.
मलाही आवडलं होतं.
Pages