कंदवड्या (वाळवणाचा प्रकार)

Submitted by योकु on 14 April, 2023 - 05:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हा एक चंद्रपूरचा प्रकार आहे. सासूबाई अन बायडी च्या हातून घडला आणि मी खाल्लेला आहे. यात कंद वगैरे कुठला वापरत नाहीत पण नाव कसंकाय पडलं माहीत नाही.
तर आमटी-भात, खिचडी इ. प्रकारांना टेकू म्हणून उत्तम आहे. सांडगे प्रकारात मोडता येईल याला. कठिण काहीच नाहीय.
- पाव किलो चण्याची डाळ
- एक गड्डा लसूण सोलून
- किती तिखट हवंय त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या (वड्या वाळून तिखट पणा कमी होतो, आणि जरा तिखट या चांगल्या लागतात सो त्या प्रमाणात मिरच्या घेतल्या तर बरं. तरी प्रमाण म्हणून १०-१२ तरी हव्यात)
- मीठ चवीनुसार
- थोडं जिरं
- दोन तीन चिमटीभरून चांगला हिंग
- २ मोठे चमचे तीळ

क्रमवार पाककृती: 

- डाळ स्वच्छ धूवून भिजत घालावी
- चांगली भिजली की तीळ सोडून इतर सर्व साहित्य घालून जाडसर वाटावी
- ३-४ मिनिटं हातानी चांगली फेसावी अनि मग तीळ घालून जरा चपट्या कॉईन च्या आकारात वड्या घालून उन्हात खडखडीत वाळवाव्यात.
- वाळल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात
- खायच्या वेळी तेलात मंद आचेवर तळून मग गरमच खायला घ्याव्यात. जरा वेगळ्या चवीचा प्रकार म्हणून मस्त लागतात.

वाढणी/प्रमाण: 
तोंडीलावणं म्हणून ;)
अधिक टिपा: 

याच वड्यांची रसभाजीही करता येते. रश्यात तिखट-मीठ मात्र बेतानी घालायचं.

माहितीचा स्रोत: 
सासूबसा, बायडी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चणा डाळीचे सांडगेच हे ..पण मस्त आहे रेसिपी.
योकु बरेच दिवसांनी आलात इथे पण विदाऊट सणसणीत तापलेली लोखंडी कढई (हलके घ्या ).

चणा डाळीचे सांडगेच हे ..पण मस्त आहे रेसिपी.
योकु बरेच दिवसांनी आलात इथे पण विदाऊट सणसणीत तापलेली लोखंडी कढई (हलके घ्या ).>>> हेच मनात तापलेल्या लोखंडी कढईत कडकडीत तळावे Happy

मस्त पाकृ
फोटू पाहिजे, माहितीचा स्रोत सासूबसा लिहिलंय Lol Light 1

योकु बरेच दिवसांनी आलात इथे पण विदाऊट सणसणीत तापलेली लोखंडी कढई >>> मीही तीच शोधली... शेवटी सापडेल असे वाटलेले पण प्रकरण भलतेच सपक निघाले. मंद आचेवर तळणे म्हणजे काय?????? ती लोखंडी कढई आत्महत्याच करेल हे वाचुन.....

हे वाळवणाचे प्रकार मला वाचायलाच आवडतात, करायचा ज्याम कंटाळा (कोणीतरी कुरियर तरी करा रे.....) आयुष्यात प्रथमच करोनाच्या
पहिल्या धाडीत गव्हाच्या कुरडया केलेल्या. पहिल्या व शेवटच्या असा दुहेरी मुकुट बहुतेक त्याच कुरडयांच्या नशीबी आहे असे त्यानंतरच्या तिन वर्षातला उत्साह पाहुन वाटतेय Happy

आयुष्यात प्रथमच करोनाच्या
पहिल्या धाडीत गव्हाच्या कुरडया केलेल्या. पहिल्या व शेवटच्या असा दुहेरी मुकुट ...... +१.
मीही त्याच वेळी पहिल्यांदा केल्या होत्या.आता करणार नाही.

योकुनी लिहिलेल्या कृतीसारखेच,करोना काळात सांडगे केले होते. युट्यूबवर पाहिले होते.

सांडग्याची भाजी आव्डते. लहान पणी खाल्लेली आहे.( देशस्थ) पण इथे कडकडीत उन्हाची मारामार आहे. खाली लोबीत ताट ठेवावे लागेल. उतना पेशन्स नै. आता तु न ळीवर अगदीच स्टेप बाय स्टेप कुरडई रेसीपी आहे. ती चिका करता करून बघीन ही महत्वाकांक्षा आहे. आमच्या सिंधी बाईने एकदा कमलककडी चे तुकडे व सांडगे घातलेली भाजी दिली होती. ओके टाइप्स.

ओव्हन असेल तर त्यात वाळवता येतील ना/का?
कालमानानुसार आच मंद झालेय असं समजा Biggrin
रच्याकने, कुरडया पापड इ. प्रकार बर्‍यापैकी पूर्वतयारी लागणारे आहेत सो ते काही घडत नाहीत. पण उत्तम प्रकारचा लसणीचा पापड कुठे मिळत नाही , तो एकदा घाटून पाहायची विछा आहे, बघू...