आम्ही नवीन घरी पुण्यामध्ये शिफ्ट झालो आहोत. गेली बारा वर्षे आमच्याकडे कपडे धुण्यासाठी मावशी होत्या... पण इकडे या नवीन एरियामध्ये कितीतरी मावशींना आम्ही विचारले कपडे धुण्यासाठी पण तिथे कोणीच कपडे धुण्याचे काम करत नाही तर शेवटी म्हटले की मशीनच आता वापरावी लागणार आहे तर आता माझ्याकडे सतरा वर्षापासून एलजीची सेमी वॉशिंग मशीन आहे पण त्यात कपडे इकडून तिकडे करताना खुप वेळ जातो आणि सकाळच्या धावपळीत ते शक्य होत नाही. म्हणून म्हटलं की fully ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घ्यावी तरी कृपया मला कोणत्या कंपनीची आणि कोणते मॉडेल तसेच टॉप लोड किंवा फ्रंट लोड घ्यावे तेही मार्गदर्शन करा आम्ही तिघेही दिवसभर घराबाहेर असतो सकाळचा वेळ आणि त्या वेळेमध्येच मशीन लावता येईल पण त्याच्यामध्ये कपडे घासून वगैरे टाकण्याचे नसावे डायरेक्ट मशीन मध्ये कपडे टाकता येतील आणि ते स्वच्छ निघतात अशाप्रकारे ते असावे तरी त्याचे कृपया मार्गदर्शन करावे. सर्वांचे मनापासून धन्यवाद
वॉशिंग मशीन कोणती घ्यावी?
Submitted by विद्या१ on 13 April, 2023 - 07:52
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कपडे घासून वगैरे टाकण्याचे
कपडे घासून वगैरे टाकण्याचे नसावे डायरेक्ट मशीन मध्ये कपडे टाकता येतील आणि ते स्वच्छ निघतात अशाप्रकारे ते असावे
हा भ्रम कंपनीने दूर केलेला आहे. एलजीचे फुली ऑटोमॅटिक टॉप लोडींग (२१हजार रु)घेऊन सहा महिने झाले आहेत. डेमोवाला माणूस दहा मिनिटांत त डेमो दाखवून एक विशेष धुलाई पावडरचे पाकीट रु आठशेंचे गळ्यात मारून गेला. मशीनसोबत आलेले छापील पुस्तक वाचले. त्याप्रमाणे - " कपड्यांचा विशेष मळलेला भाग (म्हणजे कॉलर, बाह्या वगैरे) वेगळे डिटर्जंट लावून, धुऊन मग या मशीनमध्ये 'धुण्यासाठी' टाकल्यास बेस्ट रिझल्ट्स मिळतील".
तर भ्रमाचा भोपळा फुटला, बाहेर कपडे धुऊन फक्त मशीनमध्ये स्पीन करतो. पाण्याचा जोडलेला पाईप काढून टाकला आणि चौकोनी डबा पाहुण्यांना दाखवण्यासाठी ठेवला आहे.
या धाग्यावर बरीच चर्चा झाली
या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे विद्या, लिंक देते आहे.
https://www.maayboli.com/node/33876
शर्टची मळलेली कॉलर , डाग
शर्टची मळलेली कॉलर , डाग इत्यादी साबण लावून , घासून मगच मशीनमध्ये टाकावे लागतात