गोष्ट एका परिवर्तनाची. अनाथ मुलगा ते अधिकारी आणि चांगला नागरिक.

Submitted by Deepstambh Foun... on 20 February, 2023 - 03:36

गोष्ट एका परिवर्तनाची.
अनाथ मुलगा ते अधिकारी आणि चांगला नागरिक.
मला आई-वडील, घर-शेती अस काहीही नाही, मी लहान असतांनाच आई-वडील स्वर्गवासी झाले, त्यानंतर माझ्या आजी आजोबांनी माझा संभाळ केला. शालेय शिक्षणानंतर लवकर नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने मी विद्युत अभियांत्रिकी मध्ये पदवी पूर्ण केली. स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि आता यावर्षी एमएसईबी मध्ये सहाय्यक इंजिनियर या पदावर माझी निवड झाली आहे.
मा.पुखराज पगारीया यांनी मला यजुर्वेंद्र मास्तरांकडे जळगाव येथे पाठविले. मास्तरांनी माझी तळमळ बघून मला दीपस्तंभ परिवारात सामावून घेतले आणि माझे शिक्षण व प्रशिक्षणाचे पालकत्व पुखराज पगरियानी स्वीकारले, त्यामुळे मनोबल परिवारात माझे प्रशिक्षण पूर्ण झाले.
दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातून मी शिक्षणासोबत जीवनातील नीतिमूल्ये शिकलो, व्यक्तिमत्व विकासाबरोबरच तारतम्य शिकलो. माझ्या दीपस्तंभ परीवारामुळे माझे मनोबल वाढले.
मनोबल मध्ये माझ्यासारख्या अनाथ मुलांच्या उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुविधा 2017 पासून सुरु केलेली आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सुरक्षित घर, प्रेम आणि मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळेच आम्हाला नवीन जीवन मिळते ही जाणीव मला आहे. माझ्या प्रत्येक चांगल्या कृतीतून मी त्याद्वारे उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. यजूर्वेंद्र मास्तर नेहमी म्हणतात घेणारे नाही देणारे व्हा म्हणून मी माझा पहिला पगार मनोबल मधील माझ्या भावंडांसाठी देणार आहे. येथील सहवास मला अधिक चांगला माणूस बनण्यासाठी नेहमीच प्रेरित करेल .
धन्यवाद.
मयूर चंद्रकांत भावे
सहाय्यक अभियंता ( पारेषण )
एमएसईबी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन
पुढील वाटचालीस शुभेच्छा