पुरूष जास्त आनंदी असतात कि स्त्रिया ?
हा प्रश्न खरं तर पडायलाच नको. आपण नेहमी बघतोच कि पुरूषच जास्त आनंदी असतात. पण एकाने व्हॉट्सअॅपवर एक लेख सोडला होता. त्यात एका सर्व्हेचा उल्लेख केला होता त्यात स्त्रिया आनंदी असतात असे म्हटले होते.
पण आपल्याला माहितीच आहे कि या सर्वे बिर्वे मधे काही दम नसतो. जास्तीत जास्त शंभर एक लोकांना प्रश्न विचारतात आणि काहीही निष्कर्ष काढलेले असतात. त्यामुळे लगेचच दुसर्याने त्या ग्रुपवर त्या पोस्टला टॅग करून खाली दुसरी लिंक सोडली होती, ज्यात पुरूष आनंदी असल्याचे म्हटले होते.
मला तरी खालील कारणांमुळे पुरूष आनंदी राहत असावेत असे वाटते.
१. एकच हेअर स्टाईल लाईफ टाईम - आज वेणी कि मोकळे केस , बॉबकट करायचा कि बॉय कट कि स्टेप कट असलं टेन्शन नसतं.
रोजच्या रोज बिनधास्त साबण लावून खसाखसा केस धुतले तरी चालतात. इतक्या दिवसांनी धुवायचे, शांपू लावायचा, मग ड्रायर आणि काय काय असलं काहीही टेन्शन नसतं,
२. कुठल्याही लग्नाला जातानाही पाच मिनिटात तयार होऊ शकतात. बाहेरून कितीही मळून आले तरी पँट तीच ठेवून हात पाय धुवून फक्त शर्ट बदलून खाली जाऊन पीं पीं पीं करायला मोकळे होतात.
३. दहा मिनिटात शॉपिंग करून मोकळे होतात.
४. जेवायला आज करू असलं टेन्शन नसतं. जवळच्या कुठल्याही हॉटेलात जाऊ शकतात.
५. निमंत्रण. दिलं तरच मैत्री असलं काहीही नसतं. बोलावलं नसलं तरी मित्राकडे जाऊ शकतात. आढे वेढे , इगो आड येत नाही.
६. त्यांना एकमेकांना सॉरी म्हणता येतं,
७. ट्रीपला जाताना फक्त एक शर्ट आणि एक पँटवरच भागतं. ओव्हरनाईट साठी जास्तीत जास्त एकच ड्रेस जास्तीचा असतो आणि तो ही बॅगेत कसाही कोंबून बसतो.
८. प्रत्येक सणाला , समारंभाला कपडे घेण्याचं टेन्शन नसतं.
९. दुसर्या पुरूषाच्या ड्रेस कडे पाहून दु:ख होत नाही.
१०. दागिन्यांची गरज नसते,
११. मेक अप चं टेन्शन नसतं. झोपेतून उठून पण बाहेर जाऊ शकतात. मी कसा दिसतो हे टेन्शन नसतं...
स्त्रियाच जास्त आनंदी असतात असे वाटत असेल तर त्याचीही कारणे लिहा. पण त्याआधी वरचे खोटे आहे का हे मनाला विचारून पहा,
अजूनही बरीच कारणे असू शकतात.तुम्हाला माहिती असतील तर ती पण सांगा
झोपेतून उठून पण बाहेर जाऊ
झोपेतून उठून पण बाहेर जाऊ शकतात. मी कसा दिसतो हे टेन्शन नसतं...
>>>>>
मला तर स्वत:चा झोपेतून ऊठल्यावर विस्कटलेल्या केसांचा लूक फार आवडतो. त्यात मी कधी आंघोळ केल्यावर केस विंचरत नाही. त्यामुळे बरेचदा ऑफिसला बाहेर पडेपर्यंत एकदाही आरसा बघणे होत नाही. कारण ना बाथरूममध्ये आरसा आहे ना वॉशबेसिनवर.. त्यामुळे आरश्यात चेहरा बघतो ते थेट ऑफिसला गेल्यागेल्या चेहऱ्यावर पाणी मारायला म्हणून वॉशरूमला जातो तेव्हाच..
जर हे आनंदी असणे असेल तर होय मी आनंदी आहे
ठाम मत देऊ शकत नाही, कारण
ठाम मत देऊ शकत नाही, कारण सर्व्हे पोल्स वर तुमचा विश्वास नाही असे म्हणता आहात.
पण जनरली असे दिसते की पुरुष स्वतच्या भावना मोकळेपणे मांडत नाहीत, किंबहुना मांडू शकत नाहीत. पुरुषांमध्ये आत्महत्येचा दर स्त्रियांपेक्षा पुष्कळ जास्त असतो.
हे फक्त चर्चेला खाद्य म्हणून.
महिला आनंदी असाव्यात असे
महिला आनंदी असाव्यात असे मानण्याला सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना बायको नसते.
पुरुषांमध्ये आत्महत्येचा दर
पुरुषांमध्ये आत्महत्येचा दर स्त्रियांपेक्षा पुष्कळ जास्त असतो.
>>>>
बायकांचे दुख दूर करायला चार खांदे तत्पर असतात.
पुरुषांना आपले दुख आपणच झेलावे लागते. मग करतात आत्महत्या.
कारण म्हणजे त्यांना बायको
कारण म्हणजे त्यांना बायको नसते.
>>>
गेले ते दिवस
हल्ली तो खूप वेळा लग्नाचा
हल्ली तो खूप वेळा लग्नाचा व्हिडीओ रिव्हर्स मध्ये पाहतो...
बायको अंगठी काढते,
गाडीत बसते आणि माहेरी परत जाते
जबरी आचार्य. आवडलं.
जबरी आचार्य. आवडलं.
बायको प्रत्येक संकटकाळी
बायको प्रत्येक संकटकाळी पतीसोबत खंबीर उभी राहते हे बरोबर आहे पण हे ही ततकेच खरे आहे की ती सगळी संकटे लग्न केल्यामुळेच ओढवलेली असतात.
प्रेमभंग झाला की मुली स्वताला
प्रेमभंग झाला की मुली स्वताला सावरू शकतात. कुठेतरी आपला आनंद शोधून पुन्हा आनंदी होऊ शकतात. पण मुले मात्र कोसळतात...
गेले ते दिवस??? कुणाला?
गेले ते दिवस??? कुणाला?