मित्रांनो, Personality Development साठी खास लेख लिहीत आहे. जरूर वाचा. जर काही शंका असेल तर जरूर विचारा. कौतुक करण्यास अजिबात संकोच बाळगू नका. काही चुकभूल झाल्यास मात्र प्रेमाने कान पिळण्यासही विसरू नका.
मनुष्य कायम अस्वस्थ असतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही. पण जर त्याने नीट विचार केला, आपल्याकडे काय काय आहे तर त्याची गणतीच संपणार नाही.
आता जे पण माझा लेख वाचत आहेत त्यांना off course डोळे आहेत म्हणूनच ते वाचत आहेत. तुमच्याकडे डोळे आहेत, तुमचं शिक्षण झालंय, म्हणून तुम्ही वाचू शकता.
काही लोक म्हणतील, यात काय मोठं?
अहो, वाचक मंडळी आपल्याकडे काय आहे याची जाण माणसाला तेव्हाच होते, जेव्हा तो आजूबाजूला अशी माणसं बघतो, ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाहीत.
एखाद्या आंधळ्याकडे बघितलयंत कधी? प्रत्येक गोष्टीसाठी तो चाचपडत असतो. तो जगातल्या सगळ्याच गोष्टी miss करतो, तो एखाद्या मुलाचं हसू पाहु शकत नाही, तो हे अथांग आभाळ, पाण्याचा झरा, पान, फळं, फुलं,झाडं काहीच नाही.
या गोष्टी सोडा, तो आजूबाजूच्या, टीव्हीवरच्या, मोबाइलच्या screen वर दिसणाऱ्या सुंदर नटयांचं सौंदर्य अनुभवू शकत नाही. दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कियारा आडवाणी, दिशा पटाणी, कीर्ती सेनॉन यांपैकी कोणाचंच सौंदर्य (जर यापैकी कोणालातरी तुम्ही सुंदर मानत असाल अशी कल्पना करुन त्यांची नावं घेतलीत, चूकभूल झाल्यास माफी असावी) अनुभवू शकत नाही.
तुमच्या घरात काम करणाऱ्या अशिक्षित कामवाली कडे पाहीलंय कधी? ती किती गोष्टीं साठी दुसऱ्यांवर अवलंबून असते. अगदी बाजारात भाजी आणण्यापासून ते आपल्याला मिळालेला पगारही तिला धड मोजता येत नाही. तिला जगातला कोणताही व्यवहार करता येत नाही, काही अडचण आली तर तिला google वर, youtube वर आपल्यासारखे search करता येत नाही, मायबोलीवर येऊन तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांसारखे लेख वाचता येत नाही. आणि माझ्यासारख्या नवख्या लेखकाप्रमाणे लेख लिहीताही येत नाहीत .
कोणी चांगलं लिहू शकतो, कोणाचं वाचन खूप चांगलं असतं, कोणी चांगलं बोलू शकतो, तर कोणी चांगलं गाऊ शकतो, कोणाचा आवाज धारदार असतो, कोणी चांगल्या प्रकारे स्वच्छता करु शकतो.
कोणी जगण्यासाठी उत्तम कमवत असतो, कोणी गावाकडे उत्तम आणि शांत वातावरणाचा आस्वाद घेत असतो.
अशीच आपल्याकडे असलेल्या गुणांची , आणि आपण मिळवलेल्या उपलब्धींची यादी करत बसलो, तर कदाचित आपल्याला दिवसही पुरणार नाही. तर मग,मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, आपण का कायम दुःख करत बसतो?
कारण आपल्याला आपल्याकडे असलेल्या गोष्टींची जाणच नसते. मित्रांनों, आपण जाणतेपणी किंवा अजाणतेपणी सतत दुसऱ्यासोबत स्वतःला comparison करत असतो. दुसऱ्यासोबत कधीच Comparison होऊच शकत नाही. कारण प्रत्येक माणसाची लहानपणापासून मानसिक, शारीरिक आणि सामाजिक जडणघडण खूप वेगळ्या प्रकारे होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ति म्हणजे पूर्णपणे वेगळं रसायन असतं.
अगदी जुळ्या बहीणभावांच्या जडणघडणीतही कमालीचं अंतर असतं. त्यामुळे Comparison कोणाचंच कोणाशी होऊ शकत नाही.
त्यामुळेच, मित्रांनो मी तुम्हाला सांगेन, एक दिवस मुद्दामहून वेळ काढा, ठरवून बसा आणि एखादा कागद-पेन किंवा Digital Wordpad घेऊन आपल्याकडे असलेल्या गुणांची आणि उपलब्धींची यादी बनवा. आपल्यालाच कळून चुकेल, की माझ्याकडे काय काय आहे, शिवाय याचा मानसिक, शारीरिक', वैचारिक आणि कार्य स्तरावर फायदा मिळतोच.
यामुळे कायम uncontrolled आणि negative विचार करणाऱ्या मनाला आपण Positive विचार करण्यासाठी प्रेरित करतो आणि जर आपण नियमितपणे उजळणी करत राहिलो, (जर ठरवून, बसून, कागद-पेन घेऊन यादी बनवली तर उत्तमच, पण अगदीच वेळेअभावी किंवा काही कारणाने शक्य नसल्यास मनातल्या मनातही अशी यादी बनवू शकतो.) तर सतत Positive Thinking ची मनाला सवय लागते.
शिवाय अशा Positive thinking मुळे आपल्या मेंदूत Dopamine, Serotonin, Oxytoxin, Endorphins सारखी संप्रेरकं कमी अधिक प्रमाणात स्त्रवतात, ज्यामुळे आपल्याला आरोग्यविषयक फायदे मिळतातच, शिवाय आपल्याला उत्तम कार्य करण्यासाठी ही रसायने उद्युक्त करतात, आपल्या मनात आणि शरीरात उत्साह निर्माण करतात. ज्यामुळे आपण करत असलेले कार्य अजून उत्तम करण्याचा उत्साह वाढतो.
अशी यादी बनवण्याचे फायदे सांगावे तितके कमीच. त्यामुळे अजून काही लिहिण्यापेक्षा एकच सांगेन, वेळ काढून शांतपणे बसा, कागद-पेन किंवा Digital Wordpad घ्या आणि आपल्याकडे असलेल्या गुणांची आणि उपलब्धींची यादी बनवून पहाच, आणि त्याची नियमितपणे उजळणी करा, ज्यामुळे त्याची आपल्याला सवय लागेल. यामुळे आपलं आरोग्य सुधारेल, शिवाय आपल्याला आयुष्यात विविध स्तरांवर याचा फायदा होईल.
शेवटी, समर्थ रामदासांनी म्हटले आहेच ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.’
छान लेख!
छान लेख!
मला तू मिळालीस ना, आता जगातले मला काही नको...
असे चिक्कार वेळा वाटलेय आयुष्यात.
हे तेव्हाच वाटते जेव्हा माणूस प्रेमात असतो.
माणूस प्रेमात केवळ आनंदीच नसतो तर समाधानीही असतो.
त्यामुळे प्रेमात पडा. आयुष्यात सतत कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रेमात राहा. अगदीच कोणी तसे आसपास भेटले नाही तर स्वत:च्याच प्रेमात पडा.
पुढील लेखांच्या प्रतीक्षेत... पुलेशु
छान लेख!
छान लेख!
धन्यवाद ऋन्मेऽऽषजी, माझा लेख
धन्यवाद ऋन्मेऽऽषजी, माझा लेख वाचल्याबद्दल आणि आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेबद्दल.
माझ्या कोरोंना काळात हॉस्पिटल
माझ्या कोरोंना काळात हॉस्पिटल मधे १०/१२ दिवस काढून घरी आले, तेव्हा तर खूप जाणवलं हे.‘घरात एकटीच रहात होते तरी घरी पिठा मिठाने भरलेले डबे होते .. घरपोच सामान देणारे दुकानदार होते.. हॉस्पिटलचं बिल भरण्याइतपत पैसे बँकेत होते आणी मुख्य म्हणजे रोज विचारपूस करणारी लोकं होती. आणखी काय हवं माणसाला?
धन्यवाद डॉक्टर कुमार१, मलाही
धन्यवाद डॉक्टर कुमार१, मलाही आपल्या लेखनातून बरंच काही शिकायला मिळतं.
धन्यवाद SharmilaR, आपण माझा
धन्यवाद SharmilaR, आपण माझा लेख वाचून त्याचे मर्म समजून घेतलेत आणि उदाहरणासहित छान प्रतिक्रियाही दिलीत, धन्यवाद|
>>>>>>त्यामुळेच, मित्रांनो मी
>>>>>>त्यामुळेच, मित्रांनो मी तुम्हाला सांगेन, एक दिवस मुद्दामहून वेळ काढा, ठरवून बसा आणि एखादा कागद-पेन किंवा Digital Wordpad घेऊन आपल्याकडे असलेल्या गुणांची आणि उपलब्धींची यादी बनवा. आपल्यालाच कळून चुकेल, की माझ्याकडे काय काय आहे, शिवाय याचा मानसिक, शारीरिक', वैचारिक आणि कार्य स्तरावर फायदा मिळतोच.
करुन पाहायला हवे. छान लेख.
धन्यवाद सामो, आपल्या अनमोल
धन्यवाद सामो, आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल.
लेख चांगला आहे, पण अशिक्षित
लेख चांगला आहे, पण अशिक्षित कामवालीला बाजारातून भाजी आणणे, पगाराच्या पैशांचा हिशेब करणे अशी अनेक कामं जमत नाहीत हे काही पटलं नाही. अशिक्षित असल्या तरी त्या बायका अज्ञानी नसतात. व्यवहारज्ञान त्यांना असतं. कधीकधी तर नवरा व्यसनी किंवा मृत किंवा सोडून गेलेला असताना हिमतीने संसार करत असतात, मुलांना वाढवत असतात.
धन्यवाद वावे, आपण माझ्या
धन्यवाद वावे, आपण माझ्या लेखाचे फारच चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेत,त्याबद्दल खरंच धन्यवाद.
आपण कामवाल्यांची जी व्यथा मांडलीत, ती खरंचं दखल घेण्यासारखी आहे. कठीण परिस्थितीतही आपले काम करत रहाण्याची त्यांची वृत्ती खरंचं कौतुकास्पदच आहे. मलाही त्यांच्याबद्दल आदरच आहे.
आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबियांचा त्या प्रमुख आधारस्तंभच आहेत. त्या एक दिवस जरी कामावर आल्या नाहीत तरी गडबड होऊन जाते.
आपल्या मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्या संसाराचा गाडा अविरत रेटत असतात, मुलांना शिकवत असतात, बाजरातून भाजी आणणे हे मी केवळ आणि केवळ त्यांची हिशोबात गडबड होते म्हणून मी म्हटले आहे.
आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना व्यवहारज्ञान असतेच. बऱ्याच कामवाल्यांना हिशोबही बऱ्यापैकी कळतात. परंतु शिक्षण कमी झाल्यामुळे त्यांना त्या गोष्टी शिकण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते, सराव करावा लागतो. शिवाय अशी कामे करणाऱ्या बऱ्याच जणींना मी पाहीले आहे, त्यांना दैनंदिन हिशोब नीट समजत नाही, आकडेमोड नीट करता येत नाही. हे मी कोणालाही हिणवण्यासाठी म्हणत नाहीये. तर मी त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे कृपया नीट समजून घ्यावे.
पुनः एकवार धन्यवाद @वावे.
संयोग आपल्या सविस्तर
संयोग आपल्या सविस्तर प्रतिसादांबद्दल धन्यवाद. लिहीत रहा. आवडते आहे.
कुछ लोग जो जूतों को रोते
कुछ लोग जो जूतों को रोते
कुछ लोगों के पांव नही होते
मेरा हाल तो इतना खराब नही
असे आभासकुमार गांगुली म्हणून गेले आहेत.
लेखाबद्दल कौतुक.
अक्षर वळणदार आहे.
धन्यवाद रघू आचार्य, आपल्या
धन्यवाद रघू आचार्य, आपल्या कौतुकाबद्दल आणि आभासकुमार गांगुलींची कविता सादर केल्याबद्दल सुद्धा.
आणि अक्षराचं म्हणालं तर लहानपणापासून हस्ताक्षर सुधार पाटीवर एक एका अक्षरावर खूप मेहनत घेतली आहे आणि अजूनही घेत आहे.
मनापासून धन्यवाद.
आभासकुमार गांगुली म्हणजे गायक
संपादित