
फणसाची कुवरी 1 (पौष महिन्यात झाडावर जे फणस धरतात ज्यामध्ये नुकते गरे तयार व्ह्यायला लागतात त्यात आठळया वैगरे काहीही तयार नसते असा फणस भाजीसाठी घ्यावा. पौष महिन्यातील फणस म्हणून या भाजीला पुसभाजी असदेखील म्हणतात) , ठेचलेला लसूण 7 ते 8 पाकळ्या, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता 5/6 पाने, पाव चमचा हळद, 1 चमचा राई, मालवणी मसाला 1 ते दीड चमचा, तेल 2 चमचे, मीठ आवडीनुसार, किसलेले ओल खोबरे 3 ते 4 चमचे.
प्रथम फणसाच्या कुवरीचे काटेरी साल व मधला चिवट भाग (त्याला फणसाची पाव म्हणतात) काढून घेणे. त्यानंतर फणसाचे तुकडे करून मीठ व थोडे पाणी टाकून कूकरला 3 शिट्ट्या काढून वाफवून घेणे. कूकर थंड झाल्यावर हे तुकडे खलबत्त्यात ठेचून बारीक करून घेणे. कढईत तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण टाकावा लसूण परतून घेतला की त्यात कांदा, राई, कढीपत्ता टाकावा. राई तडतडली की त्यात हळद आणि मालवणी मसाला टाकावा. थोड परतून लगेच ठेचलेला फणस टाकून परतून घ्यावा गरज असल्यास मीठ घालावे व 1 वाफ काढून घ्यावी. नंतर भाजी परतून किसलेले ओल खोबरे टाकावे व परतून घ्यावे. फणसाच्या कुवरीची भाजी खाण्यासाठी तयार आहे.
तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी छान लागते.
नुसत मीठ टाकून वाफवलेले तुकडेही खायला छान लागतात
कुवरीची उपवासाची भाजी करायची असल्यास तेलात जिरे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे परतून त्यात ठेचलेली कुवरी टाकावी व वरून ओले खोबरे टाकावे. उपवासाची भाजी तयार.
छान पाककृती.
छान पाककृती.
लसूण मोहोरीच्या फोडणीवर ठेचलेला फणस घालून थोडासा कांदा,ओले खोबरे,हिरवी मिरची आणि 4 मिरीदाणे एकत्र वाटून भाजीत घालते.
छान पाककृती..
छान पाककृती..
मला आवडते ही भाजी ..
छान पाककृती. करून बघेन
छान पाककृती. करून बघेन
या भाजीत थोडा सुका जवला
या भाजीत थोडा सुका जवला टाकायचा कि अजुन छान लागते भाजी
मस्तच आहे, आमच्यासाठी वेगळा
मस्तच आहे, आमच्यासाठी वेगळा प्रकार. करुन बघायला हवी.
नवरा कोकणात गेलेला, कुयरी घेऊन आलेला. अशी कुयरी आमच्याकडे दोन तीन महीने मिळते. आमच्याकडे तुस भाजी म्हणतात, आतमधे तुसासारखं असतं त्यामुळे. सासरी माहेरी कांदा लसूण विरहीत भाजी करतात त्यामुळे मीही तशीच करते. माहेरी गोडा मसाला आणि सासरी वेसवार नावाचा मसाला वापरुन करतात. वरतून परत लाल मिरच्यांची फोडणी करतात, मी सांडगी मिरच्यांची करते. अजून आहे फणस पण तो पुलाव आणि महाशिवरात्रीला उपासाची भाजी करायला ठेवलाय चिरुन फ्रीजरमधे. त्यातून उरला तर ही रेसिपी करुन बघेन.
छान असते ही भाजी. आमच्याकडे
छान असते ही भाजी. आमच्याकडे फोडणीत काळे लांब तीळ थोडे ठेचून घालतात. सोबत ताक भात. आठवणीनेच तोंंपासू.
आमच्याकडे फोडणीत काळे लांब
आमच्याकडे फोडणीत काळे लांब तीळ.....,. अशी भाजी खाल्ली होती.मस्त लागते.
तुरीची डाळ किंवा काळे वाटाणे घालून ही भाजी मस्त लागते.
अंजू,आम्ही पण कुयरी म्हणतो.मस्त वाटले वाचताना.
पुलावाची रेसीपी टाक की.
माहीत नव्हती ही भाजी.
माहीत नव्हती ही भाजी. नेहमीची फणसाची भाजी खूप आवडते. ही पण खायलाच हवी. माघ संपत आला आता मिळतो का एवढा कच्चा फणस बघायला हवे.
अजूनही मिळेल कुयरी तुम्हाला
अजूनही मिळेल कुयरी तुम्हाला मानव. फणस जून व्हायला अजून थोडा वेळ आहे.
जून फणसाच्या गऱ्यांची भाजी पण अप्रतिम लागते. हिंगाच्या फोडणीची व्हेज आणि त्यापेक्षा भारी सुका कोलीम घालून नॉनव्हेज.
देवकी रेसिपी as such काही
देवकी रेसिपी as such काही नाही माझी, एरवी तवा पुलाव करतात त्या type. कांदा, टोमॅटो घालते फणसासोबत, जास्त पावभाजी मसाला, थोडा गरम मसाला घालते, खडा मसाला नाही घालत, लवंगा 2 आणि मिरपूड घालते.
मी हरबरे घालून करते फणसाची भाजी, उपासाची भिजवलेले शेंगदाणे घालून करते.
कोकणात आमच्याकडे चेच-कुवरीची
कोकणात आमच्याकडे चेच-कुवरीची भाजी म्हणतात...
कोकणात आमच्याकडे चेच-कुवरीची
...