हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
अहो त्यात निलेकणी मेंबर होता.
अहो त्यात निलेकणी मेंबर होता. तोच तो डिसटोपिअन आधार कार्ड वाला. त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची?
Deloitte flags Adani Ports
Deloitte flags Adani Ports transactions
https://news.rediff.com/commentary/2023/may/31/deloitte-flags-adani-port...
Do Little is better than our Do Nothing.
शेखर गुप्तांचा कट द क्लटर
शेखर गुप्तांचा कट द क्लटर पाहायचा प्रयत्न केला होता. इतका पाल्हाळ, नमनाला घडाभर तेल. पेशन्स संपला. आणि याला ते कट द क्लटर म्हणतात !!
Adani Group Stocks: गौतम
Adani Group Stocks: गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्सला पुन्हा एकदा बूस्टर डोस मिळाला आहे. GQG पार्टनर्सने चार महिन्यांत तिसऱ्यांदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.
यूएसस्थित GQG पार्टनर्सने अदानी समूहाचे एक अब्ज डॉलर्सचे शेअर्स खरेदी केले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, GQG भागीदारांसह इतर काही गुंतवणूकदारांनी एक अब्ज डॉलर्सच्या ब्लॉक डीलमध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी केले आहेत.<<<< हिंडेनबर्ग रिपोर्ट मुळे नक्की कोणाचा फायदा झाला
https://www.esakal.com/sakal-money/share-market/another-1-billion-dollar...
एक वर्षानंतर अदानी काय म्हणत
एक वर्षानंतर अदानी काय म्हणत आहेत:
"आम्ही (आरोपांचा) पर्दाफाश कसा केला?:
आमच्यावर हल्ले करणाऱ्यांच्या हेतूंचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही वस्तुस्थिती पारदर्शकपणे मांडण्यावर आणि आमची बाजू कथन करण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे आमच्या समूहाविरुद्धच्या नकारात्मक मोहिमांचा प्रभाव कमी होत गेला."
https://www.lokmat.com/business/news/adani-an-attack-neither-ghost-nor-f...
कोणती पारदर्शकता त्यांनाच ठाऊक.
अडाणीचा शेअर आता पुन्हा
अडाणीचा शेअर आता पुन्हा हिंडेनबर्ग प्रकरण पूर्व किंमतपातळीला गेला!
हुश्श!
हिंडेनबर्ग २.०
हिंडेनबर्ग २.०
अडाणी यांच्या शेल कंपनी मधे सेबीच्या अध्यक्षा ( माधवी बुच ) आणि त्यांचे पती धवा/ धवल बुच यांनी गुंतवणूक केली असल्याचा हिंडेनबर्गचा आरोप.
https://hindenburgresearch.com/sebi-chairperson/
हिडेनबर्ग पुट बाय करुन हे
हिडेनबर्ग पुट बाय करुन हे रिपोर्ट सादर करतो असा रिपोर्ट मी पण सादर करणार आहे.
अमेरिकेत आणखी कोणीतरी अदानीवर
अमेरिकेत आणखी कोणीतरी अदानीवर , आदर्णीय मोदीजींवर आणि भारतावर जळतंय.
https://edition.cnn.com/2024/11/20/business/gautam-adani-indicted/index....
Billionaire Gautam Adani indicted in New York on bribery charges
बातमीच्या बायलाइनम धलं एक नाव भारतीय वंशाचं आहे. दुसरी पी सफुल वाटतेय. दोघी बायका. शिव्या द्यायल्या सोपं.
निफ्टीतले अदाणी ग्रुपमधल्या दोन कंपन्यांचे शेअर्स २० आणि २३ टक्के पडले होते. आता थोडे वर आलेत. आयटी सेलवाल्यांनी आपला पगार वापरला असावा.
Bad news for Adani group
Bad news for Adani group investors.
https://www.bloomberg.com/news/articles/2024-11-21/kenya-s-ruto-scraps-p...
अदानी वर आरोप हे भारताची इमेज
अदानी वर आरोप हे भारताची इमेज खराब करण्याचे षडयंत्र आहे
शेखर गुप्ता आणि शरद राघवन
शेखर गुप्ता आणि शरद राघवन यांनी indictment बद्दल छान माहिती सविस्तर पणे उलगडून सांगितली आहे.
https://youtu.be/ltYUfrgUZog?si=nJufkBuOwEqmwoqC
५४ पानी आरोपपत्रात नक्की काय मांडले आहे?
https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
शेखर गुप्तांचा कट द क्लटर
शेखर गुप्तांचा कट द क्लटर पाहायचा प्रयत्न केला होता. इतका पाल्हाळ, नमनाला घडाभर तेल. पेशन्स संपला. आणि याला ते कट द क्लटर म्हणतात !!>>>अगदी अगदी. पीळ पीळ ,जिलब्य,, काय ते हातवारे! बंद केला.
https://hindenburgresearch
https://hindenburgresearch.com/gratitude/
A Personal Note From Our Founder
मग आरोपांत तथ्य किती हे
मग आरोपांत तथ्य किती हे सेबीला सापडलं का?
सेबीमध्ये किती तथ्य आहे हा
सेबीमध्ये किती तथ्य आहे हा सध्याचा प्रश्न आहे.
Pages