बँकिंग विनोद
→ जर पैसे झाडाला लागत नाहीत तर बँकांच्या “शाखा” का असतात??
**********
→ बँकर्स कधीच कंटाळत नाहीत, त्यांचा फक्त ‘इंटरेस्ट’ कमी होतो.
**********
→ नोटाबंदीचा एक फायदा झाला की आपल्याला विभागातील सर्व ATM चा व त्या निमित्ताने आजूबाजूच्या परिसराचा ठावठिकाणा मुखोद्गत झाला.
**********
→ जेव्हा एखाद्या व्यक्तीवर बँकेचं ‘दहा लाख’ रुपये कर्ज असतं तेव्हा त्याची परतफेड हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम असतो, पण जेव्हा ते कर्ज “दहा हजार कोटी” रुपयांचं असतं तेव्हा तो बँकेचा प्रॉब्लेम असतो.
**********
→ गोलरक्षकांचा (goal keepers) बँक बॅलन्स उत्तम का असतो?
: कारण त्यांना चांगल्या “सेव्हींग” (saving) चा भरपूर सराव असतो.
**********
→ उत्तर ध्रुवावर बँक खाती का उघडली जात नाहीत?
: कारण तेथे खाती लगेच “गोठवली” (freeze) जातात.
**********
→ रमेशची बँकेतली नोकरी पहिल्याच दिवशी तेव्हा गेली, जेव्हा एका वृद्ध स्त्रीने त्याला तिचा ‘बॅलन्स’ चेक करायला सांगितला आणि त्याने त्यासाठी तिला हलकासा धक्का दिला.
**********
→ राहुलला आपल्या बँकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तेव्हा फार चिंता वाटू लागली जेव्हा तो पाच ATM फिरला पण सर्व ठिकाणी आपले एटीएम कार्ड टाकल्यावर त्याला “insufficient funds” चा बोर्ड दिसला.
**********
→ नोटाबंदीच्या काळात असे वाटायचे की आपण भारतीय चलन घेऊन कुठेतरी परदेशात आलोय आणि परकीय चलनाच्या अदलाबदली साठी आटापिटा करतोय.
**********
→ प्रभाकर आपल्या बँक मॅनेजर कडे गेला आणि म्हणाला : मला एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सल्ला द्याल का?
बँक मॅनेजर उत्तरला : एखादा मोठा व्यवसाय चालू कर आणि फक्त सहा महीने वाट पहा!
**********
→ महेश व नरेश हे बँकेतले मित्र गावात नदीकिनारी फिरायला गेले असता अचानक महेशने खिशातून एक दहा रुपयाची नोट काढून नदीच्या प्रवाहात सोडून दिली. यावर नरेशने कारण विचारले असता महेश बोलला : काल माझ्या लोन्स मॅनेजर ने “कॅश फ्लो” (cash flow) चा अभ्यास करून ये म्हणून बजावले आहे!
**********
→ (तीन बंद atm बघून निराश होऊन चौथ्या ठिकाणी आलेली) तरुणी : ते तीन जादुई शब्द ऐकायला मी आतूर झाले आहे,
ATM गार्ड (खूश होऊन) : कोणते?
तरुणी : एटीएममध्ये कॅश आहे!
**********
→ बँक दरोडा टाकून पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला, इतर कर्मचारी घाबरून शांत असताना कॅशियर मात्र बांधलेले हात पाय झाडत आणि तोंडात बोळा असतानाही जीवाच्या आकांताने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. तेव्हा दया येऊन म्होरक्याने तोंडातला बोळा काढला असता कॅशियर विनवणी करू लागला : “भाऊ, तुम्ही येण्याआधी गेला एक तास माझी कॅश पोझिशन टॅलि होत नव्हती आणि दहा हजारचा डिफरन्स मिळत नव्हता. तेव्हा जाताना जरा माझे हे कॅश बुक सुद्धा घेऊन जाता का, म्हणजे माझ्या डोक्याची भुणभूण तरी थांबेल!”
**********
→ बँकेत कॅश काढायच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला अचानक उचक्या सुरू झाल्या. १५ मिनिटांनंतर जेव्हा ती कॅश काउंटरवर पोहोचली तेव्हा तिच्या उचक्या खूपच वाढल्याने ती पार हैराण होऊन गेली होती. तिने चेक कॅशियर कडे दिल्यावर त्याने काही काळ संगणकात बघून तिला चेक परत दिला आणि सांगितले की तिला कॅश मिळू शकत नाही. यावर महिलेने कारण विचारले असता कॅशियरने सांगितले की तिच्या खात्यात पुरेशी रक्कम जमा नाही किंबहुना रु.५०० डेबिट बॅलन्स असल्याने तिलाच खात्यात पैसे भरावे लागतील. या उत्तराने भडका उडून काही काळ कॅशियरवर शाब्दिक भडिमार केल्यावर तिचे शेवटचे वाक्य होते – “तुला इथे मस्करी म्हणून ठेवले आहे वाटते”. यावर तो कॅशियर शांतपणे स्मितहास्य करत म्हणाला – “होय मॅडम, मी तुमची मस्करीच केली, पण गेल्या पाच मिनिटात तुम्हाला एकही उचकी आली नाही हे तुमच्या लक्ष्यात आले का?”
***********
संकलन : गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर,
माहीम, मुंबई.
हाहाहा.
हाहाहा.
जर पैसे झाडाला लागत नाहीत तर
जर पैसे झाडाला लागत नाहीत तर बँकांच्या “शाखा” का असतात??>> माहित नाही. आम्हाला फक्त शाखा सर माहित आहे.