?
भारत सोडल्यास जगातील कोणत्याही प्रगत आणि लोकशाही देशात न्यायमूर्तीन्नीच न्यायामूर्ती नेमण्याची पद्धत नाही. ही पद्धत बदलून न्यायमूर्तींच्या नेमणूकांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन कारण करण्याचा कायदा संसदेने केला पण सर्वोच्च न्यायालयाने तो कायदाच घटनाबाह्य ठरविला, त्यामुळे आपल्याकडे मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निकालानुसार ठरवून दिलेली कॉलेजियम पद्धत सुरू राहिली आहे. मुळात, मावळत्या सत्ताधीशांनी आपले उत्तराधिकारी नेमण्याची जी पद्धत मध्ययुगात प्रचलीत होती तीच पद्धत आज एकविसाव्या शतकात आणि लोकशाहीत न्यायमूर्तीन्च्या बाबतीत चालू ठेवणे काल-सुसंगत वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडेच सेवानिवृत्त झालेले न्यायमूर्ती उदय ललित कॉलेजीयम पद्धत दोषरहित असल्याचा निर्वाळा देत असले तरी कॉलेजीयमची कार्यपद्धती अजिबात पारदर्शक नाही आणि कॉलेजीयमने घेतलेले अनेक निर्णय यापूर्वी वादग्रस्त ठरले आहेत हे विसरून चालणार नाही. दुसरे म्हणजे, कॉलेजीयम-पद्धतीलासुद्धा राज्यघटनेचा आधार कुठे आहे?
घटना-दुरुस्ती करून संसदेचे सार्वभौमत्म प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव नाथ पै यांनी मांडला होता. ते एक अभ्यासू खासदार असल्याने त्यांच्या प्रस्तावाची त्याकाळी भरपूर चर्चा झाल्याचे आठवते. त्यांनी सुचविलेली घटना-दुरुस्ती मान्य झाली असती तरी शक्यता अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने ती दुरूस्तीच घटनाबाह्य ठरवून हाणून पाडली असती कारण त्यामुळे संसदेने केलेला प्रत्येक ठराव न्यायालायांवर बंधनकारक ठरला असता आणि न्यायालयांचे न्यायिक समीक्षेचे (ज्युडीशियल रिव्ह्यू) अधिकार कमी झाले असते. अर्थात तो प्रस्ताव स्वीकारला गेला नसल्याने पुढे तसे काही घडले नाही.
मला तरी २०१४ च्या कायद्यात काही घटनाबाह्य दिसत नाही. मुळात, न्यायमूर्तींची नेमणूक वगैरे आस्थापना विषयक बाबीसंबंधी घटनेत काही ठोस आणि सुस्पष्ट तरतुदी नाहीत. आता ती उणीव भरून काढण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात वावगे काय आहे? बरे, सहा सदस्यांच्या प्रस्तावित आयोगाचे पदसिद्ध अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडेच ठेवले होते आणि सर्वोच्च न्यायालयाचे दोन केंद्राचे ज्येष्ठ न्यायमूर्ती सदस्य असणार होते. कायदा मंत्री फक्त एक सदस्य रहाणार होते. उर्वरीत दोन सदस्य पंतप्रधान, संसदेतील विरोधी पक्ष नेते आणि मुख्य न्यायाधीश यांच्या त्रिसदस्यीय समितीने नेमावयाचे होते. अशा आयोगामुळे न्यायपालीकेच्या अधिकारांची किंवा घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली होण्याचा संभव उद्भवत नव्हता. तरीही सर्वोच्च न्यायालयाने तो कायदाच रद्दबातल ठरविला.
सासुरवास होण्याची शक्यता असल्याने विवाह संस्थाच नको असे कोणी म्हणणार असेल तर त्याचे समर्थन आपण करणार काय?
मी काय वेगळे सांगत होतो.
मी काय वेगळे सांगत होतो.
फक्त शब्द रचना वेगळी होती.
1) जज मधूनच न्यायाधीश बनवा हेच मी पण सांगितले होते.
२) दहा वर्ष वकिली करणाऱ्या व्यक्ती ल न्यायाधीश बनवू नका हे पण मी सांगितले होते.
३) तिसरा पॉइंट विजय कुलकर्णी ह्यांचा ह्या विषयाशी निगडित नाही वेगळा आहे.
किरकोळ गुन्हे दाखल झालेले.
पण त्यांच्या कडे पैसे नाहीत वकील करण्यासाठी, जामीन देण्यासाठी योग्य व्यक्ती नाही .
त्यांचे गुन्हे असे आहेत की दोन महिने पण शिक्षा होणार नाही
ते वीस वीस वर्ष तुरुंगात आहेत.
राष्ट्रपती महोदय नी ह्या वर चिंता व्यक्त केली आहे.
स्पर्धा परीक्षा देवून न्यायाधीश झालेल्या न्यायाधीश लोकांची ही करामत (शिक्षणा ने अक्कल येत नाही,अनुभव नी अक्कल येते,
सत्याची चाड स्वभावात लागते ती गॉड गिफ्ट आहे,शिक्षित,हुषार,लोक च सर्वात जास्त स्वार्थी असतात.)
जामीन कमजोर लोकांचा नाकारला जातो आणि sharp शूटर,बँकेचे lutere ,
भ्रष्ट सरकारी कर्मचारी एका तासात बाहेर येतात
केवढा मोठा दोष आहे न्याय व्यवस्थेत.
जजेस् मधूनच १० वर्षांचा उत्तम
जजेस् मधूनच १० वर्षांचा उत्तम ट्रॅक रेकाॅर्ड असनार्ऱ्यांतून, स्पर्धा परिक्षेद्वारे (परिक्षेचा मोटीव्ह राज्यघटनेच्या संदर्भात नितीमत्ता चाळणी, बदलत्या काळानुसार घटनेचा लोकशाही तत्वाचा गाभा न बदलता अंतर्भूत करता येऊ शकणाऱ्या नवीन कायद्यांच्या व्याप्तीची त्याच्या कंगोऱ्यांची जाण आणि आधी दिलेल्या विशेष निकालांतील निकषांची स्क्रूटनी असावा ..यात लोकशाहीतले न्यायव्यवस्थेच्या तत्वाला बळकटी देण्यात कारणीभूत ठरणारे इतर कोणतेही व्यक्तिविशेष, गुणावगुण, स्वभावविशेष यांच्यां निकषांवर मेरिट ठरवणे हा मु्ख्य मुद्दा असावा ) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडावेत....ज्याच्या पुर्ण नियोजनावर देखरेख सुप्रीम कोर्टाचे सांप्रत सर्वोच्च जजेसची समीती ठेवील....असा काहीतरी उपाय करायला हवा.
>>रिटायर्ड जजेस ना भरपूर पेन्शन असते. त्यांनी पुण्यात बंगला बांधून निवांत रहावे. त्यांना राज्यपाल, लवादाचे अध्यक्ष, खासदार अशी पदे देणे बेकायदा ठरवावे !>>>> या मुद्द्यावर १००% सहमत....हे व्हायलाच हवे.
काही ही पद्धत आणा पण राजकीय
काही ही पद्धत आणा पण राजकीय हसत्क्षेप बिलकुल नको.सरकार चा तर अजिबात नको.
पदा वरून हटवण्यासाठी आता जी पद्धत आहे तीच योग्य आहे.
स्पर्धा परीक्षेतून फक्त सत्र न्यायालय चे च न्यायाधीश निवडणे योग्य आहे आणि ह्या मधून आज जी पद्धत आहे त्या नुसार high court आणि supreme court's चे न्यायाधीश
निवृत्त झाल्या नंतर
निवृत्त झाल्या नंतर
न्यायाधीश, आयपीएस अधिकारी,आयएएस अधिकारी,सैन्य दलातील अधिकारी .
ह्यांना ना कोणते पद मिळणार ना त्यांना निवडणूक लढता येणार आणि त्यांना खासगी नोकरी करता येणार.हवतर निवृत्त वेतन double करा.
कित्येक अब्ज रुपयाची सरकारी संपत्ती आयएएस अधिकारी अधिकारात असताना उद्योग पती ना जवळ जवळ फुकट देतात .
आणि नोकरी सोडून त्या उद्योग पती ची नोकरी करतात किती तरी अशी उदाहरणे देशात सापडतील.
https://youtu.be/T7PrRU56p9s
https://youtu.be/T7PrRU56p9s
Pages