फुटबॉल विश्वचषक २०२२

Submitted by आशुचँप on 12 November, 2022 - 12:39

जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेला येत्या रविवार (२० नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. या महास्पर्धेच्या चर्चेसाठी हा धागा

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादाच कुठल्या अरब देशात ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे नोहेंबर डिसेंबर मध्ये ही स्पर्धा कारण तिथल्या उन्हाळ्यात खेळायची तर बातच नाही. आतासुद्धा कतारमध्ये एसी स्टेडीयम असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

दरवेळी प्रमाणेच ८ ग्रुपमधून १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. असे म्हणले जात आहे की ३२ संघ असलेली ही कदाचित शेवटची स्पर्धा आहे. पुढील विश्वचषकाला संघांची संख्या वाढवली जाईल.

ग्रुप A : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप B : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप E: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
ग्रुप F: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

यावेळी चाहत्यांना धक्का म्हणजे माजी विजेता इटलीचा संघ मुख्य स्पर्धेतच नाही, ते क्वालिफायच झाले नाहीत. अजून दोन नसलेले संघ म्हणजे रशिया आणि युक्रेन. फिफाने रशिया क्वालिफाय झाला असतानाही त्यांच्या आक्रमक युद्धामुळे त्यांना बाद केले आहे तर युक्रेन प्रयत्न करूनही क्वालिफाय होऊ शकली नाही.
दर स्पर्धेत एक तरी ग्रुप ऑफ डेथ असतोच, तो परत एकदा जर्मनीच्या वाट्याला आलाय. ग्रुप E मध्ये स्पेन तर बलाढ्य संघ आहेच पण जपान आणि कोस्टा रिका हे धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड.

ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल.

फिफा वर्ल्ड कप २०२२ चे लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?

Viacom-१८ कडे भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. पण यंदा या महास्पर्धेचा नेहमीसारखा तितकासा गाजावाजा झाला नाहीं.असं कां वाटतं ?

कदाचित
बहुदा युक्रेन रशिया युद्धाचे सावट
आणि कडक नियम असलेल्या देशात स्पर्धा यामुळे झालं असेल

कतार मध्ये दारू प्यायला मनाई, गे लोकांना बंदी, आणि कपडे काढण्याला पण मनाई

काय करावं फुटबॉल फॅन्स नी
त्यांचा सगळा चार्मच गेला असेल Happy

त्या सोबत हि बरेच महत्वाचे फॅक्टर आहेत -

कतार ला वर्ल्ड कप होस्ट चे वोट मिळाले तेव्हा झालेले लाचखोरीचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप.

नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये ठेवलेलं वर्ल्ड कप जे आता पर्यंत कधीच झालेलं नाहीये. ज्या मुले इतर स्पर्धांचे (लीग, कप ) शेड्युल वाईट रित्या इफेक्ट झाले आहेत.

वर्ल्ड कप ची स्टेडियम बांधताना झालेले बिगारी कामगारांचे मृत्यू (मुख्यत्वे भारतीय / नेपाळी / पाकिस्तानी / बांगलादेशी) आणि त्यांना मिळणाऱया फॅसिलिटीज चा अभाव.

ज्या मुले इतर स्पर्धांचे (लीग, कप ) शेड्युल वाईट रित्या इफेक्ट झाले आहेत.>>>
हो ईपीएल, ला लिगा सगळेच ब्रेक घेत आहेत
आणि क्लब मालकांना चिंता आहे की त्यांचे की प्लेअर कप खेळताना इंज्युरी घेऊन येऊ नयेत
नैतर गेलाच सिजन सगळा

कळलं ! म्हणजे, कतारच्या स्टेडियममधे बियर घेतली, आंखूड कपडे घातले, तर ती ' फ्री कीक ' कीं काय ती मिळणार !!!!
20190921_230216_1.jpg

हा हा हा
भाऊ मस्तच
गेल्या वेळी पण तुम्ही धमाल आणलेली Happy

आज शुभारंभ ! HAppy Viewing !!
( कतारच्या वातानूकुलीत स्टेडियममधे5 बसून प्रेक्षकाना सामने बघायचेत, यावरून आठवलं 1983चं दिल्लीचं एशियाड. डिसेंबरची दिल्लीची कडाक्याची थंडी, कडक लष्करी बंदोबस्त व रात्री खुल्या स्टेडियममधे फुटबॉल सामने ! नखशिकांत गरम कपड्यात लपेटून घेवून आम्ही तिघे मुंबैकर कुडकुडत स्टेडियमच्या गेटवर आलो आणि तपासणी करणारया जवानाने खिशातली सिगरेटची पाकिट व माचीसच फेकून द्यायची ऑर्डर दिली. " अरे भाईसाब, कैसे जियेंगे इसके बिना यह ठंडमें? " " बातें नहीं ! चलो , गेटसे बाहर निकलो ", एवढाच कडक शिस्तितला प्रतिसाद. नाईलाजाने सिगारेट पाकिट, माचीस फेकून आंत गेलो. आंतल्या गर्दींमुळे किंवा लक्ष सामन्याकडे असल्याने थंडी जाणवली नसावी. पण बाहेर पडताना थंडीने बडगा उगारलाच व रात्री सिगारेट काय, चहाही मिळणं अशक्य होतं हेही जाणवलं. आणि, नेमका तोच जवान गेटवर उभा. " देखो भाईसाब, क्या हालत करा दी आपने हमारी ", मी हंसण्याचा प्रयत्न करत म्हटलं. " मैने कुछ नही किया. आपने पाकिट फेका, आपही जाके उठा भी सकते हो !" आम्ही चमकलोच. गेटच्या मागच्या बाजुला झुडपं व काळोख होता. किंचित हंसत त्याने आम्हाला तिथे जायची खूण केली. तिथं धीर करुन गेलो तर फेकून दिलेल्या पाकीट व काड्यापेट्याचा मोठ्ठा ढिगच पडलेला. आमच्या ब्रँडची पाकीट खिशात कोंबत, त्या गेटवरच्या जवानाला सलाम ठोकून आम्ही समोरच उभ्या असलेल्या ' एशियाड ' बसकडे धांवलो.
प्रेक्षक वातानूकुलीत स्टेडियममधे व खेळाडू असह्य , रणरणत्या उन्हात, यापेक्षा आमचं दिल्लीचं एशियाडच खरं स्पोर्टस ओरिएंटेड म्हणायला हवं ! Wink )

प्रेक्षक वातानूकुलीत स्टेडियममधे व खेळाडू असह्य , रणरणत्या उन्हात,>>I don't think. These are most pleasent months in Gulf nations (Nov Dec) That's why the world cup is shifted from traditional July Aug schedule.

* I don't think. * - I may be wrong . I am going only by reports in the media.

बऱ्यापैकी फुटबॉल पाहात असल्याने मोठ्या देशांच्या संघाची तोंडओळख देण्याचा प्रयत्न करत आहे.

ब्राझील -
माझ्या मते या वर्ल्ड कप साठीचे सगळ्यात मोठे दावेदार.
वर्ल्ड कप मध्ये येताना त्यांचा फॉर्म हि खूप चांगला आहे आणि दुखापतींमुळे ते कुठलेही महत्वाचे खेळाडू हि मिस करणार नाहीयेत.
ओव्हरऑल, एक सेटल्ड टीम ज्यात फार कमी कच्चे दुवे आहेत.
स्टार प्लेअर - नेमार, त्याच्या वागणुकीबद्दल तुमचे वैयक्तिक मत कसेही असले तरी तो एक वर्ल्ड क्लास फॉरवर्ड आहे या बाबतीत काही दुमत नाही.
यंगस्टर टू वॉच - विनीशस, एक अनप्रेडिक्टबल फॉरवर्ड. खूप चांगला ड्रिब्लर जो कुठल्याही डिफेंडर ला बॅकफूट वर ठेऊ शकतो.
चिंतेची बाजू - त्यांचे फुल बॅकस. राईट बॅक आणि लेफ्ट बॅक ह्या दोन्हीही पोजिशन तुलनेने कमकुवत आहेत.
40 वर्षाच्या डॅनी अल्वेस ला अजूनही राईट बॅक म्हणून खेळवत आहेत यातच सर्व काही समजून जाते.

अर्जेन्टिना -
वर्ल्ड कप साठीचे दुसरे दावेदार.
ब्राझील प्रमाणेच ते या वर्ल्ड कप मध्ये तुफान फॉर्मात येत आहेत. अजून एक टीम जी सगळ्या पोसिशन मध्ये परिपूर्ण आहे.
स्टार प्लेअर - अर्थातच मेस्सी. त्याच्या बद्दल फार काही बोलायची गरजच नाही. हि स्पर्धा त्याच्या साठी शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा ठरणार आहे आणि तो जिंकण्याचा जीवापाड प्रयत्न करेल.
यंगस्टर टू वॉच - एन्झो फर्नांडिस. माझ्या मते हा पोरगा येत्या काही वर्षात एक मधल्या फळीचा सुपरस्टार खेळाडू होईल.
चिंतेची बाजू - त्यांचे सेंटर बॅक. अर्जेन्टिना चे तिन्ही सेंटर बॅक हेडिंग आणि एरियल डिफेंडिंग मध्ये थोडे कमकुवत आहेत आणि कॉर्नर किक / फ्री किक मार्गे टार्गेट केले जाऊ शकतात.

जर्मनी -

जर्मनी वर्ल्ड कप मध्ये नेहमीच चांगले प्रदर्शन करतात आणि या वेळही माझ्या मते काही वेगळे होणार नाही.
ह्या वेळी ते बऱ्या पैकी नव्या फळीची टीम घेऊन येणार आहेत ज्यात काही ठळक कच्चे दुवे आहेत.

स्टार प्लेअर - जोशुआ किमीच. जर्मनी ची सगळ्यात जमेची बाजू आहे त्यांची मधली फळी (MID-FIELD) आणि किमीच तिचा म्होरक्या आहे.

यंगस्टर तू वॉच - युसूफ मुकोकू. जर्मनी ने 17 वर्षाच्या ह्या सेंटर फॉरवर्ड ला फास्ट ट्रॅक केले आहेत आणि त्याच्या कडून फार मोठ्या अपेक्षा असतील.

चिंतेची बाजू - त्यांचे फुल बॅकस. राईट बॅक आणि लेफ्ट बॅक ह्या दोन्हीही पोजिशन कमकुवत आहेत.

सेंटर फॉरवर्ड. क्लोज रिटायर झाल्या पासून जर्मनी साठी हि पोसिशन मोठा प्रॉब्लेम ठरला आहे. ह्या वेळी त्यांची दारोमदार मुकोकू आणि फुलक्रुग सारख्या खूपच अननुभवी खेळाडू वर आहे.

फ्रान्स

गेल्या वर्ल्ड कप चे डिफेंडिंग चॅम्पियन. ह्या वेळीही एक कडक आणि लोडेड टीम घेऊन उतरत आहेत.
बचाव आणि आक्रमण ह्या दोन्ही बाजूं मध्ये त्यांच्या कडे स्टार प्लेयर्स ची रांग आहे.

स्टार प्लेअर - किलियन एम्बापे, बेंझेमा च्या अनुपस्थितीत फ्रान्स च्या आक्रमणाची ची दारोमदार ह्याच्या वर आहे.

यंगस्टर तू वॉच - ऑरेलियन चुअमेनी. एक नव्या दमाचा आणि परिपूर्ण मिडफिल्डर. त्याच्या वर खूप मोठी जबाबदारी असेल.

चिंतेची बाजू - दुखापती. बेंझेमा, पोग्बा आणि कांटे हे तिनंही महत्वाचे खेळाडू दुखापती मुले खेळणार नाहीयेत.
मिडफिल्ड ची धुरा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा खूप कमी अनुभव असलेल्या खेळाडूंवर असेल.
कोच डेशॉम्प यांचा सेफटी फर्स्ट आणि बचावात्मक ऍप्रोच एन वेळी अंगावर उलटू शकतो जसा तो गेल्या वर्षीच्या युरो स्पर्धेत स्वित्झर्लंड विरुद्ध बॅक फायर झाला.

धन्यवाद, अक .
नेमकं काय पहावंच हें कळणं माझ्यासारख्या नियमितपणे फुटबॉल बघूं न शकणार्यासाठी खूप महत्वाचं!

स्पेन -

2008-13 ची गोल्डन जनरेशन आता जवळपास पूर्णपणे संघाबाहेर किंवा रिटायर झाली आहे आणि ह्या वेळी ते एक पूर्णपणे नव्या फळीची टीम घेऊन उतरतील.

ह्या टीम चा सध्या हा प्रॉब्लेम आहे कि ते मोठ्या संघांविरुद्ध चांगले खेळतात आणि कमजोर संघा विरुद्ध अंडर परफॉर्म करतात.

स्टार प्लेअर - पैड्री. एक आक्रमक मधल्या फळीचा वर्ल्ड क्लास खेळाडू. इनीएस्टा चा वारसदार म्हणले तर वावगे ठरणार नाही.

यंगस्टर टू वॉच - आंसू फॅटी. गेले एक दोन वर्ष त्याला फार दुखापती झाल्या आहेत पण ऑन हिस डे तो कुठल्याही डिफेन्स ला सळो कि पळो करू शकतो.

चिंतेची बाजू - सेंटर फॉरवर्ड. टोरेस आणि वीला रिटायर झाल्या पासून हि पोसिशन मोठा प्रॉब्लेम ठरला आहे. ह्या वेळी हि त्यांच्या कडे एक भरोसेलायक सेंटर फॉरवर्ड नाहीये.

नेदरलँडस -

माझ्या मते ह्या स्पर्धेचे डार्क हॉर्स ठरू शकतात. ते या वर्ल्ड कप मध्ये तुफान फॉर्मात येत आहेत.

स्टार प्लेयर्स चा अभाव असला तरी कोच व्हॅन गाल ह्यांचा चक दे इंडिया वाला टीम/टॅक्टिक फर्स्ट, इंडी व्हिजुअल नंतर ऍप्रोच अशाच टीम सोबत चालतो.

स्टार प्लेअर - वर्जिल व्हॅन डायिक. नेदरलँडस ची जमेची बाजू त्यांचा बचाव हि आहे आणि कर्णधार व्हॅन डायिक त्या मुले खूपच महत्वाचा ठरतो.

यंगस्टर टू वॉच - फ्रँकी डे जॉन्ग. एक खूप टॅक्टिकली स्मार्ट मिडफिल्डर. नेदरलँडस टीम चा मेंदू असे म्हणले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

चिंतेची बाजू - अशा प्लेअर चा अभाव जो नौका फसली असताना स्वतःच्या जोरावर टीम ला तारू शकतो.
गोलकीपर. ह्या वेळी हि त्यांच्या कडे एक भरोसेलायक आणि अनुभवी गोलकिपर नाहीये.

पोर्तुगाल -

हा संघ कागदा वर बघितला तर ते हॅन्ड्स डाउन फेवरीट असले पाहिजेत. कुठल्याच पोसिशन मध्ये कच्चे दुवे नाहीयेत.
पण मोठ्या स्पर्धा मध्ये त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि सध्याचा फॉर्म फारसा आशादायक नाहीये.

स्टार प्लेअर - अर्थातच रोनाल्डो. हि स्पर्धा त्याच्या साठी शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा ठरणार आहे आणि तो जिंकण्याचा जीवापाड प्रयत्न करेल.

यंगस्टर टू वॉच - राफाएल लेयाओ. खूप चांगला ड्रिब्लर आणि असा विंगर जो कुठल्याही डिफेंडर ला बॅकफूट वर ठेऊ शकतो.

चिंतेची बाजू - त्यांचा कोच, फर्नांडो सॅण्टोस. अत्यंत बचावात्मक आणि रटाळ टॅक्टिक साठी प्रसिद्ध.
पोर्तुगाल च्या आक्रमक टॅलेंट चा पूर्णपणे वापर करू शकतात का या बाबत खूप मोठे प्रश्न चिन्ह.

इंग्लंड -

भारत आणि क्रिकेट प्रमाणेच खूप अपेक्षा आणि मीडिया हाइप घेऊन हे परत एकदा मोठ्या स्पर्धेत उतरत आहेत.
रीसेन्ट मोठ्या स्पर्धात चान्गला परफॉर्मन्स दाखवला असला तरी या वर्ल्ड कप मध्ये ते खूप वाईट फॉर्मात उतरत आहेत (गेल्या सहा आंतर राष्ट्रीय सामन्यात शून्य विजय).

स्टार प्लेअर - हॅरी केन. एक परिपूर्ण सेंटर फॉरवर्ड. इंग्लंडला या स्पर्धेत लांबवर मजल मारायची असेल तर केन च्या गोल्स वर दारोमदार आहे.

यंगस्टर टू वॉच - जुड बेलिंगहॅम. एक नव्या दमाचा आणि परिपूर्ण मिडफिल्डर. त्याच्या वर खूप मोठी जबाबदारी असेल.

चिंतेची बाजू - बचाव फळीतल्या खेळाडूंचा सध्याचा फॉर्म. इंग्लंड चे महत्वाचे बचाव फळीतले खेळाडू
(मॅकगायर, डायर, अलेक्साण्डर - अरनॉल्ड इत्यादी ) खूपच वाईट फॉर्म घेऊन या स्पर्धेत उतरत आहेत.

जर्मनी
फ्लिक ने मॅट हमेल्स सारख्या खेळाडूला का बाहेर ठेवलं
आणि आता सध्या औतोफ फॉर्म असलेल्या गोइट्सझ ला का घेतलं हे काय कळलं नाही
थॉमस म्युलर आघाडीला म्हणत आहेत पण तो इतकी तडफ दाखवू शकेल का हा प्रश्नच आहे
जमेल मुसईला हाही एक यंगस्टर चांगला आहे
माझ्या बेट्स त्याच्यावरच आहेत

गोलकीपर न्यूईर चा शेवटचा वर्ल्ड कप, पण तो जास्त खेळेल असं वाटत नाही

आशुचॅम्प

गोटझे बद्दल माझा ओपिनियन वेगळा आहे. या सीजन ला तो क्लब फुटबॉल मध्ये चांगल्या फॉर्मात आहे.

हुमेल्स ला डॉर्टमुंड चा वाईट डिफेन्सिव्ह रेकॉर्ड नडला आहे.

न्यूईर माझ्या मते तरी कर्णधार असल्या कारणाने सगळे सामने खेळेल. त्याचं पासिंग हि फ्लिकच्या बिल्डअप शैली साठी खूप महत्वाचं आहे.

माझ्या वतीने शेवटचे दोन प्रीव्यू

क्रोएशिया -

गेल्या वेळचे उपविजेते आणि हा वर्ल्ड कप त्याच्या बरयाच महत्वाच्या खेळाडूंचा शेवटचा असू शकतो.
त्यांचा रेसेन्ट फॉर्म चांगला आहे आणि ऍज अ युनिट ते एकमेकाला चांगले कॉम्पलिमेन्ट करतात.

स्टार प्लेअर - लुका मॉडरिच. एजिंग लाईक अ फाईन वाईन असेच वर्णन करू शकतो. 38 वर्षाचा झाला तरी अजून कडक खेळतो आहे.

यंगस्टर टू वॉच - जॉस्को ग्वारडीओल. नव्या पिढीचा एक सेंट्रल डिफेंडर. अजूनही खेळात थोड्या त्रुटी आहेत पण खूप टॅलेंटेड.

चिंतेची बाजू - वयस्कर खेळाडूंवर ओव्हर रिलायन्स. अजूनही तिशीपुढच्या खेळांडूं वर खूप भिस्त आहे आणि त्या तुलनेत नव्या फळीचा परफॉर्मन्स तेवढा कंसिस्टन्ट नाही.

बेल्जियम -

गेल्या वेळचे कांस्य पदक विजेते पण सध्याचा फॉर्म चिंताजनक आहे.

स्टार प्लेअर - केविन डे ब्रुइन. माझ्या मते जगातला सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर. या स्पर्धेत लांबवर मजल मारायची असेल तर सगळी दारोमदार ह्याच्या वर आहे.

यंगस्टर टू वॉच - चार्ल्स डे केतालेर. अजून खेळात एवढी कॉन्सिस्टन्सी नाहीये पण गुणवत्तेबद्दल शंका नाहीये.

चिंतेची बाजू - क्रोएशिया प्रमाणेच तिशीपुढच्या खेळांडूं वर खूप भिस्त आहे आणि त्या तुलनेत नव्या फळीचा परफॉर्मन्स तेवढा कंसिस्टन्ट नाही.
कर्णधार हझार्ड आणि महत्वाचा सेन्टर फॉरवर्ड लुकाकू या वर्षी फारसे फुटबॉल खेळलेले नाहीत आणि कितपत फिट असतील या बद्दल माझ्या मनात तरी शंका आहे.

मस्त बाफ. ओपनिन्ग सेरीमनी मध्ये आमचा बीटीएस जंगकुक गायला व नाचला. एरवीपेक्षा ५०% एनर्जी लेव्हल होती. बाकीच नाचणारे दिव्यच होते.
बीटीएस बाकी च्या मेंबरांची याद आली.

कतार पहिल्याच मॅच मध्ये हारला. जिओ सिनेमाअ‍ॅप चे प्रक्षेपन वाइट होते असे ट्विट र वर वाचले.

मला नेमार रोनाल्डो मेसी मार्डोना पेले आवडतात. वाका वाका ओ हो.

जिओसिनेमा ने सगळा गोंधळ घातला काल. पिक्चर सतत फ्रीझ होणे , आवाज मागे पुढे होणे असे चमत्कार केले.

वर्ल्ड कप साठी नेहेमीप्रमाणे जर्मनीला पाठिंबा असला तरी मेस्सी साठी अर्जेन्टिना जिंकावे असे वाटते. फ्रान्सचा संघ दमदार आहे. बेंझिमा बाहेर गेला तरी जिरू (Giroud ), एम्बापे अशी तगडी फॉरवर्ड लाईन आहे .

नेदरलँडस ची जमेची बाजू त्यांचा बचाव हि आहे >> आमचा van Persie गेला आणि सगळी मजाच गेली. २०१० चा नेदरलँड्स आणि पोर्तुगालचा सामना मस्त होता . ४ लाल कार्ड्स आणि १६ पिवळी कार्ड्स दिले होते. Deco (पोर्तुगाल)आणि Van Bronckhorst (हॉलंड ) लाल कार्ड घेऊन बाहेर गेल्या नंतर एकत्र बसले होते.

Pages