![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/11/09/WEBINAR%20PHOTO.jpg)
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल तर्फे उच्च शिक्षणातील करिअरच्या संधीवर राष्ट्रीय वेबिनार
दीपस्तंभ फाऊंडेशन आणि अझीम प्रेमजी युनियव्हर्सिटी बंगलोर व एकलव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील दिव्यांग आणि अनाथ तरुणांसाठी सामाजिक कार्य, शिक्षण, विकास , सार्वजनिक धोरण आणि शासन,अपंग अभ्यास आणि कृती , महिला अभ्यास, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक इत्यादी क्षेत्रातील उच्च शिक्षणातील करिअरच्या संधीवर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
वेबिनारला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन उपस्थित होते.भारतातील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी, भारतातील केंद्रीय तथा राज्यातील अनेक स्वायत्त शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया व मुलाखती, रोजगाराच्या नवनवीन संधी, व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वेबिनारला १९ राज्यातील १३० विद्यार्थी उपस्थित होते, त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, असम, तेलंगाणा, काश्मीर, पंजाब, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू इ. राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. आयआयटी मुंबई मध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञाचक्षू सावित्री गुप्ता आणि अझीम प्रेमजी युनियव्हर्सिटीतील शर्वरी शेटे व शुभम उरकुडे यांनीही अनुभव कथन व मार्गदर्शन केले.