Submitted by अतुल. on 31 October, 2022 - 06:39
अनेकदा SMS किंवा व्हाट्सच्या माध्यमातून आपल्याला खोटे संदेश आणि लिंक येतात. खाली क्लिक करून व्यवहार पूर्ण करा इत्यादी. अनेकजणांना ही लिंक संशयास्पद वाटते त्यामुळे ते सावध होतात. पण सर्वच लोकांना ती खोटी साईट आहे हे कळेलच असे नाही. मला एखादी अशी खोटी लिंक आली तर मी माझ्या ग्रुप्स वर सांगतो कि असा एखादा SMS येईल जी खोटी साईट आहे. अशा साइट्स बाबत मायबोलीकरांना सावध करण्यासाठी हा धागा.
बाय द वे अशा खोट्या वेबसाइट्स गुगल ला इथे रिपोर्ट करता येतात (जे मी पट्कन करतो):
https://safebrowsing.google.com/safebrowsing/report_phish/?hl=en
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे युनोहू (स्पॅम वर्जन) ला
इथे युनोहू (स्पॅम वर्जन) ला टाळायला काही दुर्लक्ष करायला सांगतात तर काही विमु सारखे ठेचायला सांगतात. उपयोग कशाचाच नसतो. आपल्याला ज्याने छान वाटेल, त्रास कमी होईल ते करावे. त्रास नको म्हणून लोकं सोडून गेली! त्रास द्यायला नवे बकरे सापडतातच.
ठेचण्याचा उपयोग जेव्हा known
ठेचण्याचा उपयोग जेव्हा known organization स्पॅम करू लागते तेव्हा होऊ शकतो, होतोच असे नाही. फ्रॉड करणारे असेल तर होतच नाही.
छान वाटण्यास मी दोन तीन वेळा फिरकी घेतली आहे त्यांची.
एकाला वाटले सापडला बकरा, तिकडे माझा नंबर घालून जे काय करत असेल मला ओटीपी येत होता,आणि विचारत होता मला ओटीपो सांग. मी साळसूदपणे भलताच ओटीपी सांगत होतो. मग परत पाठवला. तरी होत नाही म्हंटल्या त्याला शंका आली. मी म्हटले फोटो काढून ईमेल करू का, तर म्हणे स्क्रिनशॉट घेऊन WA वर पाठव. म्हटले स्क्रिन शॉट कसा घ्यायचा? त्याने पेशन्स बाळगून सांगितले. पण मला स्क्रिनशॉट घेता येईचना. मग त्याने परत ओटीपी पाठवला. परत मी भलताच सांगितला तेव्हा त्याला खात्री झाली आणि मला शिव्या द्यायला लागला.
या ठगांना धडा शिकवायला मिस्टर
पूर्वी धडा शिकवावा वाटायचं. हल्ली लॉस्ट बॅटल आहे ही हे समजलं आहे. आपला वेळ दवडू नये या कोडग्यांवर.
वरची चर्चा वाचून जामतारा
वरची चर्चा वाचून जामतारा वेबसिरीज आठवते आहे नेटफ्लिक्स वरची .
एअरटेलचा dp/logo असता तर
एअरटेलचा dp/logo असता तर तुम्ही documents पाठवले असते का?
Submitted by मानव पृथ्वीकर on 4 November, 2022 - 08:50
मुळीच नाही सर। कारण मला यापूर्वी असाच इलेक्ट्रिसिटी चा फ्रॉड मेसेज आलेला जो मी योग्य प्रकारे हॅन्डल केला होता। नुसता लोगो न्हवता ना मी पाहिला खाली नाव सुद्धा दिसत होते दीपक कुमार म्हणून मी त्याच्या नंबर वर लॅण्डलाइनने कॉल केला व Āpani yē nambaraṭi ḍāẏāla karēchēna tā bartamānē byasta daẏā karē kichukṣaṇa parē cēṣṭā karuna असे ऐकू आले व संशय अजून वाढला आणि फोन लागल्यावर त्याला ओरडले।
शिवाय असे documents मी whatsapp वर का पाठवू आमच्या बोरिवलीला स्टेशन च्या जवळच एरटेल ग्यालेरी आहे तिथे जाऊन मी documents देईन।
Ai, मानवी बुध्दी मत्ता
Ai, मानवी बुध्दी मत्ता ह्यांच्या सूचना.
सरकारी भ्रष्ट व्यवस्था
माणसांची मानसिकता .
ह्याचा विचार करून मानवी जाती च्या मालकांनी स्वतःचे उघळ पांढरे होण्यासाठी क्रेडिट कार्ड हा प्रकार आणला आहे.
Rules आणि conditions जागतिक कोणतीच आर्थिक संस्था स्पष्ट शब्धात्त कधीच प्रसिद्ध करत नाही ...
कारण हे दरोडे खोर आहेत आज च्य काळातील.
क्रेडिट कार्ड होल्डर नीच अनेक मार्ग वापरून T अँड C ह्यांची माहिती करून घ्यावी.
त्या वर पण हे दरोडेखोर ठाम नसतात.
मध्येच स्वतःच्या मनाने नियम बदलतात.
त्या मुळे नेहमी सावध असावे
Ai, मानवी बुध्दी मत्ता
Ai, मानवी बुध्दी मत्ता ह्यांच्या सूचना.
सरकारी भ्रष्ट व्यवस्था
माणसांची मानसिकता .
ह्याचा विचार करून मानवी जाती च्या मालकांनी स्वतःचे उघळ पांढरे होण्यासाठी क्रेडिट कार्ड हा प्रकार आणला आहे.
Rules आणि conditions जागतिक कोणतीच आर्थिक संस्था स्पष्ट शब्धात्त कधीच प्रसिद्ध करत नाही ...
कारण हे दरोडे खोर आहेत आज च्य काळातील.
क्रेडिट कार्ड होल्डर नीच अनेक मार्ग वापरून T अँड C ह्यांची माहिती करून घ्यावी.
त्या वर पण हे दरोडेखोर ठाम नसतात.
मध्येच स्वतःच्या मनाने नियम बदलतात.
त्या मुळे नेहमी सावध असावे
<< मानवी जाती च्या मालकांनी
<< मानवी जाती च्या मालकांनी स्वतःचे उघळ पांढरे होण्यासाठी क्रेडिट कार्ड हा प्रकार आणला आहे. >>
हेमंत सर, आपले म्हणणे १०० % चूक आहे. ग्राहकासाठी क्रेडिट कार्ड हे अतिशय उपयुक्त आहे. विचार करून वापरल्यास ग्राहकाला त्याने खूप सोईस्कर पडते आणि फायदाच होतो.
ग्राहकासाठी क्रेडिट कार्ड हे
ग्राहकासाठी क्रेडिट कार्ड हे अतिशय उपयुक्त आहे. विचार करून वापरल्यास ग्राहकाला त्याने खूप सोईस्कर पडते आणि फायदाच होतो. >>>>>सहमत .
मी कोणताही फोन अननोन नंबर
मी कोणताही फोन अननोन नंबर वरचा घेत नाही. नुसते आपण उचलून यस म्हट ले ओके म्हटले तरी ते टेप करून कुठे तरी वापरतात. फोन उचलल्याव र एक लाँगिश बीप आले तर रेकॉर्डिनग सुरु झाले समजा. व घेउ नका. काही ही पिडक मेसेज व फोन येतात. परवा पिरामल रिअॅल्टिई मधून फोन आला. लक्षरी अपार्ट मेंट - चार बेडरुम घर. मला व कुत्र्याला काय करायचे. प्लस आमचा इथला तांदूळ संपत आला. मग लगेच तुमचे बजेट काय म्हटले मी का सांगू मला तुझे महाग फ्लँ ट घ्याय्चे नाहीत. श्रीमंत पंजा ब्यांना फोन कर. क्रेडिट कार्ड चे असंख्य फोन. लोन उपलब्ध असल्याचे फोन फार येतात. बजाज फिन सर्व आय सी आय बँकेचे फोन. मी त्यांना लोकेशन व एम्लॉयी आयडी विचारते मग गप्प बसतात. थर्ड पार्टी आहेत म्हणतात. कामाच्या घाईत फोन आले तर खेटरतेच.
Submitted by अश्विनीमामी on
Submitted by अश्विनीमामी on 11 November, 2022 - 16:52>>
अश्विनीमामी, इतके सगळे करताच तर सोबत (तुमच्या सवडीने) या telemarketing वाल्यांची तक्रारही नोंदवत जा. त्यासाठी कुठेही अर्ज वगैरे पाठवायची गरज नाही, केवळ एक sms करायचा, तो सुद्धा आपल्या मोकळ्या वेळेत!
DND violation ची तक्रार नोंदवण्यासाठी:
Messages मध्ये जा, तिथे New Message मध्ये जाऊन आपल्याला आलेल्या कॉल/मेसेजचे वर्णन, तो कॉल/मेसेज कुठून आला तो क्रमांक (किंवा message header e.g. AX-PIRAML) आणि कॉल/sms आल्याची तारीख हे सगळे type करून १९०९ वर पाठवायचे.
उदा. Voice call regarding Real Estate from Piramal Realty, 9876543210, 13/11/2022
महत्वाचे - आपल्याला जाहिरातींचा कॉल/sms आल्यापासून ३ दिवसांच्या आत तक्रार नोंदवावी लागते. उदा. आज दि. १३ नोव्हेंबर रोजी कोणताही कॉल/sms आला असल्यास त्याची तक्रार १३, १४, १५ नोव्हेंबर पर्यंत (१५ नोव्हेंबर रोजी रात्री २३:५९ पर्यंत) करता येईल. एकदा का १६ तारीख लागली की मग १३ तारखेला आलेल्या कॉल/sms ची तक्रार करता येणार नाही.
मग आपल्याला आपल्या service provider (Jio / Airtel / Vi / BSNL) कडून एक sms येतो ज्यात आपला तक्रार क्र. असतो. ७ दिवसानंतर त्या तक्रारीवर नेमकी काय कारवाई झाली ते कळवणारा sms येतो. (कायद्यानुसार DND violation complaint वर ७ दिवसांत कारवाई करणे बंधनकारक असले तरी काही वेळेस जास्त दिवसही लागू शकतात.)
जर तुमच्या फोनमध्ये TRAI DND 3.0(Do Not Disturb) हे app support करत असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता. ते असेल तर DND violation ची तक्रार नोंदवणे एकदम सोपे जाते. केवळ आलेला जाहिरातींचा कॉल/sms select करायचा, पुढील सर्व काम ते app करते!
मलाही अधूनमधून Platinum Corp,
मलाही अधूनमधून Platinum Corp, Chandak Group (मी केलेले नामकरण Chandya Group) इ. कडून कॉल येतात. मग मी त्यांना काहीसे असे झापतो.
मी हा फोन १८००० रुपयाला घेतला आहे, त्यात १८ रुपये तरी तुझ्या कंपनीने दिले आहेत का? तर नाही, म्हणजे १००% investment cost माझी आहे.
हा फोन चालू ठेवायला मला दर महिन्याला रु. २५०/- खर्च करावे लागतात, त्यातले २.५ (अडीच) रुपये तरी तुझी कंपनी देते का? तर नाही, म्हणजे १००% operational cost माझी आहे, म्हणजेच फोनची १००% ownership माझी आहे. मग तुम्ही कोणत्या अधिकाराने / हक्काने 'तुमच्या प्रोजेक्ट, बिझनेसची जाहिरात माझ्या फोनवर करता??? माझा फोन ही माझी संपत्ती आहे, तुमच्या **ची property नाही!
असे मनसोक्त झापून मग वर आणखी त्यांच्याविरुद्ध DND violation ची तक्रारही नोंदवतो!!!
एकतर असे करतो नाहीतर "आता busy आहे, उद्या कॉल कराल का?" असे विचारुन दुसर्या दिवशी कॉल करायला प्रवृत्त करतो आणि मग आजच्या दिवसाची आणि उद्याच्या दिवसाची अशा दोन तक्रारी नोंदवतो, जेणेकरून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.
<< ...कडून कॉल येतात. मग मी
<< ...कडून कॉल येतात. मग मी त्यांना काहीसे असे झापतो. >>
जिवाला इतका त्रास करून घेण्यापेक्षा व्हॉईसमेल का वापरत नाही? जे लोक address book मध्ये आहेत, त्यांचाच फोन घ्यायचा, उरलेले जाऊ द्यायचे व्हॉईसमेलला. आणि मग तक्रार पण करायची.
ते कॉल सेंटरचे नोकर आहेत, त्यांच्याशी वाद घालून काय फायदा? उगीच स्वतः चा बहुमूल्य वेळ का वाया घालवायचा वायफळ बोलण्यात?
अँड्राईड मध्ये फिल्टर स्पॅम
अँड्राईड मध्ये फिल्टर स्पॅम कॉल असे एक सेटिंग आहे, ते ऑन केल्यावर बरेच कॉल ऑटो रिजेक्ट होतात आणि कॉल लॉग मध्ये जंक कॉल असे दिसतात.
काल एक मेसेज आला. सुरवातीला
काल एक मेसेज आला. सुरवातीला खराच वाटला पण नंतर ध्यानात आलं आपण तर सगळी बिलं भरली आहे. मग कळले फेक मेसेज आहे. सावध:
---
Dear consumer your electricity
power will be disconnected
tonight at 9.30pm from electricity
office because your previous
month bill was not updated
please immediately contact
with our electricity officer
89******74 Thank you
---
गुगल केले असता संबंधित बातमी पण मिळाली. म्हणजे हे आजकाल नवीन फ्रॉड आहे:
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/wealth/save/electricity...
काल एक मेसेज आला. सुरवातीला
काल एक मेसेज आला. सुरवातीला खराच वाटला पण नंतर ध्यानात आलं आपण तर सगळी बिलं भरली आहे. मग कळले फेक मेसेज आहे. सावध:
---
Dear consumer your electricity
power will be disconnected
tonight at 9.30pm from electricity
office because your previous
month bill was not updated
please immediately contact
with our electricity officer
89******74 Thank you.
हा फ्रॉड जुना झाला। साधारण ४/५ महिन्यापूर्वी मला असा मेसेज आलेला व दिलेला नंबर हा वेस्ट बंगाल साईडचा आहे कॉल केल्यावर एक अँप डाउनलोड करायला सांगतात व असे करताच आपला फोन मिररिंग होतो त्यांच्याकडे। त्यालाही चांगलेच सुनावले होते व त्या नंबरची तक्रार केली होती .
मला ट्रायचेच अनेकदा मेसेज
मला ट्रायचेच अनेकदा मेसेज येतात तुम्ही अमके ढमके कॉल केलेत तर तुम्हाला टेलिमार्केटर समजून तुमचा नंबर ब्लॉक केला जाईल.
सच्चेका जमाना इ नै है. बैंगन के कंप्लेंटा. और उन्हे पीछे पडेंगे.
Dear consumer your
Dear consumer your electricity
power will be disconnected
tonight at 9.30pm from electricity...
मी याच धाग्यावर एका प्रतिसादात लिहिले आहे की, या रात्री ०९:३०, रात्री ११:३० अशा वेळा मुद्दाम देतात तुम्हाला घाबरवायला की, अरे रात्री लाईट गेली तर पंखा / AC शिवाय झोप कशी येणार???
मुळात एक साधा विचार करा, वीज मंडळाचे कर्मचारी अशा रात्रीच्या वेळी का येतील वीज कापायला??? आले तर दिवसा येतील ना!!!
गुगल केले असता संबंधित बातमी पण मिळाली. म्हणजे हे आजकाल नवीन फ्रॉड आहे:
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/wealth/save/electricity...
या लिंक मध्ये जो screenshot दिला आहे त्यात म्हटले आहे की electricity office मधून सप्लाय बंद होईल. अरे ऑफिसमधून सप्लाय बंद करायला ती काय टेलिफोन लाईन आहे का? विजेच्या बाबतीत एक main common cable येते आपल्या बिल्डींग / चाळीमध्ये आणि तिथे मीटर रूम मधून सगळ्यांना power distribute होते! बिल्डींग / चाळीमध्ये येणारी main cable सुद्धा थेट ऑफिसमधून येत नाही तर जवळच्या transformer / distribution box मधून येते.
जिवाला इतका त्रास करून
जिवाला इतका त्रास करून घेण्यापेक्षा व्हॉईसमेल का वापरत नाही?>>>
बहुदा जिओ मध्ये voicemail सुविधा नाही. शिवाय voicemail वर एखादा कॉल गेला तर त्याची तक्रार नोंदवता येईल का ते माहीत नाही, शिवाय आधी आपली रिंग वाजत असतांना आपण रिजेक्ट केल्यामुळे कॉल voicemail ला जात असतांना caller ला काहीतरी notification जात असेल मग ते voicemail मध्ये मेसेज रेकॉर्ड करतील का? हा प्रश्नच आहे. कारण काही लोनशी संबंधित कॉल मध्ये ते आपल्याला विचारतात 'लोन हवे आहे का?' म्हणजे त्यांना लगेच उत्तर अपेक्षित असते.
फक्त कॉन्टॅक्ट्स मधील कॉल्स
फक्त कॉन्टॅक्ट्स मधील कॉल्स उचलणे बाकी ऑटो रिजेक्ट जे करू शकतात ते खरंच सुखी आहेत.
(No subject)
मुळात SMS किंवा व्हॉट्सॲपच्या
मुळात SMS किंवा व्हॉट्सॲपच्या लिंक्सवर लोक आर्थिक व्यवहार का करतात, हे माझ्या आकलनाबाहेर आहे. फोनपण मी स्वतः केला नसेल तर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात कुठलीच माहिती मी देत नाही, अगदी माझ्या स्वतःच्या बँकेकडून फोन करत आहे असे कुणी म्हटले तरीही.
ह्या सर्व घोटाळ्याची जबाबदारी
ह्या सर्व घोटाळ्याची जबाबदारी कोणाची.
बँका व्यवसाय करतात करोडो रुपये व्यवसाय मधून कमावतात.
त्यांचीच ही जबाबदारी आहे त्यांच्या customer चे पैसे सुरक्षित ठेवणे.
त्यांना सर्व धोक्या पासून वाचवणे.
व्यवसाय पाहिजे, पैसा पाहिजे पण जबाबदारी काहीच नको अशी बँका आणि आर्थिक संस्थांची चामडी बचाव भूमिका असते.
ह्यांच्या पेक्षा बाकी व्यवहार सुरक्षित असतात.
फक्त तींडी विश्वास वर होतात.
अशा fraud ची पूर्ण जबाबदारी ही संबंधित बँकेवर च टाकली पाहिजे.
असा कायदाच हवा.
नसेल जबाबदारी घ्यायची तर व्यवसाय करू नका.
आत्ताच लक्षात आलेला नवीन
आत्ताच लक्षात आलेला नवीन fraud चा प्रकार! (ज्यात त्यांनी मला गोवण्याचा प्रयत्न केला, मला !)
जर तुम्ही twitter वर @paytm किंवा @paytmcare या Paytm च्या अधिकृत handles ला tag करून काही tweet केलेत (मग ती तक्रार असो किंवा compliment, कोणत्याही भाषेत असो) की लगेच तुम्हाला Paytm customer care, paytm help center वा तत्सम account वरून reply येतो. Reply एका ठराविक साच्यातील:
We regret the inconvenience you have . Request you to share your contact number via DM and we shall get in touch with you at the paytm customer support Calling four secondary numbers
7********4.
ते account उघडून पाहाल तर अगदी Paytm चा लोगो वगैरे वापरलेला परंतु अर्थातच unverified account! शिवाय एकजात सगळी accounts या नोव्हेंबर २०२२ मध्ये उघडलेली! (कारण आधीची report झाल्याने बंद पडली असणार!)
मला पण अशा जवळपास ४-५ account वरून मेसेज आला, सगळी account report करूनच keyboard खाली ठेवला!!!
Pages