पेरियार आणी गांधी.
आधी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीपासूनच पेरियारांमध्ये काँग्रेसबद्दल द्वेष नव्हता. ब्राह्मणेतरांचा मुद्दा घेऊन जस्टीस पार्टी सत्तेत असतानाही पेरियार काँग्रेसमध्ये होते, खादीचा प्रचार करत होते. त्यांना काँग्रेसमध्ये आणणारे केशव पिल्लई काँग्रेस सोडून गेले पण पेरियार काँग्रेसमध्येच राहिले. त्यांनी दीड वर्ष सत्याग्रहात भाग घेतला ज्यात ते दोनदा तुरुंगात गेले. ते एकमेव प्रमुख सत्याग्रही होते ज्यांना राजकीय नव्हे तर सामान्य कैदी म्हणून ठेवण्यात आले होते.पेरियार यांना आशा होती की ब्राह्मणेतर लोक हळूहळू काँग्रेसमध्ये सामील होतील. राजाजींनी या प्रकरणी प्रस्ताव आणण्याचे आश्वासन दिले होते पण तसे केले नाही. 1922 मध्ये पेरियार यांनी तिरुपूरमध्ये ब्राह्मणेतरांसाठी electorate ची मागणी केली, परंतु त्यांना धाकदपटशा दाखवून चूप करण्यात आले. 1924 मध्ये त्यांना बातमी मिळाली की चेरणमहादेवी येथे एक गुरुकुल आहे ज्याला देणगी काँग्रेससुद्धा देत आहे. तिथे ब्राह्मण मुलांसाठी भोजन व बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यांनी राजाजींकडे तक्रार केली असता ब्राह्मण पालकांना हे हवे असल्याचे त्यांनी सांगितले. गांधी आल्यावर पेरियार यांनी पुन्हा त्यांच्याशी ह्याविषयावर चर्चा केली. पालकही फी भरतात म्हणून शाळा प्रशासनाला त्यांचं ऐकून घ्यावं लागतं, हे गांधीनी हसत सांगून मुद्दा टाळला.
पेरियार ह्यावर ठाम होते की शाळेने कितीही भेदभावाचे नियम केले तरी त्यांना राष्ट्रवादी संघटनेच्या देणग्या मिळायला नकोत. या शाळेत चालणारा प्रकार त्यांनी त्यांच्या मासिकात सविस्तर लिहिला. शेवटी ब्राह्मण मुलांनीही इतर मुलांबरोबर भोजन करायचे असा नियम शाळेत बनवण्यात आला. रागाच्या भरात राजाजींनी स्वतः गुरुकुल समितीचा राजीनामा दिला. (राजाजी असे ब्राह्मण होते ज्यानी आपल्या मुलीच्या लग्नापूर्वी महात्मा गांधींचे पुत्र देवदास गांधी यांचा उपनयन सोहळा पार पाडला होता.)
पेरियार ह्या विषयावरही हैराण होते की काँग्रेसने दीड वर्ष सत्याग्रह केला. फक्त एकच फलक काढण्याची मागणी करण्यात आली होती. गांधीसुद्धा येऊन पोहोचले पण ब्राह्मणांना ती मागणी मान्य नव्हती. का? उलट समाजात असे उपक्रम राबविणे हे सुशिक्षित ब्राह्मणांचे कर्तव्य आहे. ते स्वतः पुढे जाऊन भेदभावासाठी आवाज का उठवत नाहीत? त्यांचा निष्कर्ष असा होता की, इतके ज्ञानी असूनही ब्राम्हण हे करत नाहीत कारण ते सत्तेत आहेत. इंग्रज आल्यानंतर ते सूट-बूट घालून काँग्रेसमध्ये आले, पण सत्ता त्यांचीच आहे... नोव्हेंबर १९२५ च्या कांचीपुरम अधिवेशनात काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. राजगोपालाचारीही होते. प्रसिद्ध तमिळ कवी तिरुका अध्यक्षस्थानी होते. हे राजकीय संमेलन म्हणजे कपाळावर चंदनाची पेस्ट लावून धोतर परिधान केलेल्या प्रबुद्ध ब्राह्मणांचा मेळावा होता. पेरियार ज्यांना नुकतेच वायकोम वीर अशी पदवी मिळाली होती त्यांचं ह्या सर्वांसामोर काहीच महत्व नव्हत. हे काही वेळातच सिद्ध झाले. पेरियार हातात कागद घेऊन ब्राह्मणेतरांच्या हक्काविषयी बोलू लागताच त्यांना गप्प बसण्यास सांगण्यात आले आणि त्यांच्या हातातून कागद काढून घेण्यात आला. काही वर्षांनी जेव्हा बी.आर.आंबेडकरांनी ब्रिटिश पोशाखात आणि उच्च इंग्रजीत हीच मागणी मांडली होती, तेव्हा त्यांच्याकडून कोणताही कागद हिसकावून घेता आला नाही. उलट त्यांना लंडनला बोलावण्यात आले. पण पेरियार यांच्यासारख्या तळागाळातील नेत्याला गप्प केले गेले. पेरियार थोडावेळ शांत बसले, जणू ज्वालामुखीचा गर्भ फुटण्यापूर्वीच उकळत होता. अचानक ते उभे राहिले आणि म्हणाले, "
"अध्यक्ष महोदय! काँग्रेस पक्ष कधीही ब्राह्मणेतरांना न्याय देऊ शकेल या माझ्या सर्व आशा आज मी गमावल्या आहेत. सध्या मी हे सभागृह आणि हा पक्ष सोडत आहे. आतापासून माझे एक ध्येय आहे.
वर्णाश्रम आणि जातीय भेदभाव पोसणाऱ्या काँग्रेसचा मी या राज्यातून अंत करीन."
...................
पेरियार म्हणाले, हिंदू धर्म संपला पाहिजे.
"का?" गांधींनी विचारले.
"कारण असा कोणताही धर्म नाही."
"असा धर्म आहे."
"हा ब्राह्मणांनी पसरवलेला भ्रम आहे."
"हे सर्व धर्मांना लागू होतं."
"नाही. बाकीच्या धर्मांमध्ये काही आदर्श आणि व्यवस्था आहेत ज्यांना जनता मनापासून स्वीकारते."
"हे हिंदू धर्मात नाही का?"
"काय आहे सांगायला? कोणाला पिढ्यानपिढ्या शूद्र म्हणून जगायला आवडेल? फक्त ब्राह्मण आणि त्यांची वर्णव्यवस्था आहे.
"एक प्रणाली तर आहे."
"अशा प्रणालीचे काय? कोणी उच्च तर कोणी खालची जात.”
"नाही. वर्णाश्रमाचा अर्थ उच्च-नीच जात नाही.
"आता प्रयोगात तेच आहे. उच्च आणि निम्न."
"नाही. समानता आहे."
"हिंदू धर्मात समानता शक्य नाही."
"शक्य आहे."
"तुम्ही मला कुठलाही धार्मिक तर्क शोधून दाखवा, ब्राह्मण आणि शूद्र यांच्यात भेद का केला जावा? यासाठी "
"तुम्ही धर्म मानायला तयार नाही, मग तर्क काय सांगायचा?"
"मी हेच म्हणतोय की ना धर्म आहे ना तर्क."
"जर तुमचा धर्मावर विश्वास असेल तर तर्क आपोआप कळून येईल."
"हे अशक्य आहे. आधी अंधश्रद्धा पाळली तर पुन्हा तर्क विकसित होणार नाहीत .
“तुम्ही इतर धर्मांसाठी हे योग्य सांगत आहात. परंतु हिंदू धर्मात असे स्वातंत्र्य आहे की तुम्ही ते तुमच्या पद्धतीने आचरणात आणू शकता. तुमहाल कोणीही अडवणार नाही."
“तुम्ही तुमच्या मते या धर्मात सुधारणा करू शकता? तुम्हाला थांबवले जात नाही का?"
"मी तुमच्याशी सहमत आहे. हिंदू धर्म हा धर्म नसून ती जीवनपद्धती आहे. कोणताही प्रस्थापित आदर्श नाही. माणूस त्याच्या आदर्शांनी आणि तर्काने धर्माला विकसित करू शकतो. इतर धर्मातील ग्रंथ जसे बायबल आणि कुराणपासून तुम्ही भटकू शकत नाहीत. हिंदूंसाठी कुठलेही पुस्तक नाही. जर हिंदू एखाद्या गोष्टीत मागे असतील तर ते पुढे येऊ शकतात."
"पण स्वार्थी ब्राह्मण त्याला पुढे येऊ देणार नाहीत."
"तुम्हाला असं का वाटतं? अस्पृश्यता निर्मूलनावर काम चालू आहे."
"हा फक्त दिखावा आहे. काही लोक अशा मोहिमेद्वारे लोकप्रियता मिळवत आहेत."
"आणि ते लोक कोण आहेत?" (गांधी हसले)
"ब्राह्मण, अजून कोण?"
"खरंच का? तुम्हाला कोणताही ब्राह्मण आवडत नाही? राजगोपालाचारी?"
“तो एक चांगला, आदर्शवादी व्यक्ती आहे. त्यांच्या समाजाला समर्पित. पण तो इतर समुदायांसाठी काहीही करत नाही. ”
"मला तुझ्या बोलण्यावर शंका आहे. मला एक आदर्शवादी आणि प्रामाणिक ब्राह्मण भेटला आहे. त्यांचं नाव होतं गोपाळकृष्ण गोखले."
"तुम्ही महात्मा आहात. तुम्हाला चांगले लोक भेटत असतील. आम्ही सामान्य लोक आहोत, आम्हाला फक्त सामान्य लोकं भेटतात."
"(हसून) रामास्वामी! जग बुद्धिजीवींच्या ताब्यात आहे. जर आपल्याला नियंत्रित करायचे असेल तर बुद्धिमत्ता त्यांच्या पातळीवर आणावी लागेल."
“हे इतर कोणत्याही धर्मात नाही. हिंदूंमध्येच ब्राह्मण बुद्धिमान मानले जातात. बाकी नव्वद टक्के गरीब लोक निरक्षर राहिले तरी काही फरक पडत नाही. समाजात फक्त दहा टक्केच हुशार राहिले तर ते समाजासाठी योग्य आहे का?
"तुला काय वाटत? तुम्हाला हिंदू आणि ब्राह्मणांचा नाश करायचा आहे असे मी मानू का?
"मला हा छद्म हिंदू धर्म संपवायचा आहे जो ब्राह्मणांच्या हातात आहे."
"हे बरोबर नाही. ते माझे ऐकतात. आपण सर्वांनी मिळून यावर तोडगा काढला पाहिजे."
“हे शक्य नाही असा मी नम्रपणे सांगतो. तुम्ही दुरुस्त्या केल्या तरी दुसरे कोणी महात्मा त्या पुन्हा तिथेच आणतील.
"सुधारणा परत बदलणे सोपे असणार नाही."
"मला माफ करा. तुम्ही हिंदू धर्मात कोणताही मूर्त बदल करू शकणार नाही. ब्राह्मण तुम्हाला ते करू देणार नाहीत. इतिहास उचलून पहा कि केव्हा ब्राह्मणांनी सुधारकांना स्वेच्छेने काही करू दिले आहे."
“तुमच्या मनात ब्राह्मणांबद्दल द्वेष आहे. त्याचा तुमच्या विचारावर परिणाम होतो. मला वाटत नाही की आतापर्यंत आमच्यात एकमत झाले आहे. पण, आपण भविष्यातही भेटत राहू. वारंवार."
1927 मध्ये बंगळुरूमध्ये दोघांमधील ही शेवटची मोठी भेट होती. त्यानंतर डेव्हिड-गोलियाथप्रमाणे ते राष्ट्रीय पटलावर दोन ध्रुव बनले.
दोघेही ब्राह्मण किंवा दलित नव्हते. दोघेही एकाच मेकचे चष्मे घालत. दोघेही खूप लिहित आणि बोलत. एकाचे अनुयायी पांढरे कपडे घालत तर दुसऱ्याचे काळे. एकाने रामाचा महिमा गायला, तर दुसऱ्याने रामावर टीका करण्यात आयुष्य घालवले. येणारा काळ ठरवनार होता कि कोणाला किती यश मिळाले, त्यांना किती यश मिळाले ज्यांचे भविष्य हे दोघे ठरवत होते.
(प्रथम मालिका समाप्त) द्वितीय मालिका पुढे "मद्रास कथा" या नावाने.
मूळ लेखक :- प्रविण झा.
'तामिळनाडूतील पेरियार यांची
'तामिळनाडूतील पेरियार यांची कारकीर्द ' असा खरा विषय आहे.
असो.
'तामिळनाडूतील पेरियार यांची
'तामिळनाडूतील पेरियार यांची कारकीर्द ' असा खरा विषय आहे.
असो.>>>
तमिळनाडूच्या जडणघडणीत पेरीयार यांचा महत्वपुर्ण वाटा आहे. जर वेगळा द्रविडनाडू तयार झाला असता तर ते त्या देशाचे राष्ट्रपिता असते. पेरीयार यांना वगळून तमिळनाडू लिहीलं जाऊ शकत नाही. जसं गांधींना वगळून भारत.
छान. पुढील मालिका वाचायला
छान. पुढील मालिका वाचायला उत्सुक आहे.
आज प्रथमच या धाग्यावर
आज प्रथमच या धाग्यावर प्रतिसाद देत आहे. . वर म्हटलं तसं पेरियार कारकीर्द हा मुख्य विषय हे मला पण जाणवले. पण एकंदरीत अभ्यासपूर्ण लेखन. दक्षिण भारताबद्दल आणखीन जाणून घ्यायला आवडेल. पुढील लेखनास शुभेच्छा
इतिहास म्हटलं की काळ कोणता हा
इतिहास म्हटलं की काळ कोणता हा प्रश्न पडतोच. इ.सन १ ते ५००, ५०० -१५००, १५०० - २०००. हा स्वातंत्र्य पूर्व काळातला.
पेरियार यांच्याबद्दल त्रोटक
पेरियार यांच्याबद्दल त्रोटक माहिती होती. बर्याच नवीन बाबी समजल्या.
( अर्थात प्रविण झा यांच्या दृष्टिकोनातून)
>>त्यानंतर डेव्हिड-गोलियाथप्रमाणे ते राष्ट्रीय पटलावर दोन ध्रुव बनले.>>हे समजले नाही. दोघांत टोकाचं वैमनस्य निर्माण झाले का ? यामध्ये एक पूर्ण बरोबर आणि दुसरा पूर्णतः चूक असे काही म्हणायचे आहे का? जाणून घ्यायला आवडेल.
लेखमालिका आवडली. प्रतिसाद आणि संयत चर्चाही आवडली.
पुढील लेखमालिकेच्या प्रतिक्षेत...
तमिळ इतिहास आणि तिथले
तमिळ इतिहास आणि तिथले समाजकारण हा माझ्या आवडीचा विषय आहे, त्यावर थोडेफार वाचन गाठीशी आहे. त्यामुळे ही लेखमाला लक्षपूर्वक वाचली. प्रवीण झा यांनी लिहिलेले तुम्ही फक्त भाषांतरित केलेय असे समजतो. भाषांतर फार पुस्तकी, शब्दशः झालेय, a lot is lost in translation असे खरेच वाटले.
मी फार कमी प्रतिसाद लिहितो. अवमान करणे किंवा चूक काढणे स्वभावात नाही, त्यामुळे जरा भीत भीतच हे लिहिले आहे. कृपया राग मानू नका.
पुढील भाषांतरास / स्वलेखनास शुभेच्छा.
एकदा का गांधीजींना 'पितामह',
एकदा का गांधीजींना 'पितामह', राष्ट्रपिता, महात्मा ठरवले , चलनावर चित्र आले की विरोधात काही लिहून उपयोग नसतो. पेरियार, आंबेडकर तसेच अनेक समकालीन लोकांनी विरोध केलेला.
आंबेडकरांना इतर राज्यांत पाठिंबा मिळाला, तसं इतरांना मान मिळाला नाही.
हे समजले नाही. दोघांत टोकाचं
हे समजले नाही. दोघांत टोकाचं वैमनस्य निर्माण झाले का ? >>>>
तुम्ही ह्या आधीचे भाग वाचलेत असं वाटत नाही. त्यामध्ये दिलंय की दोघांत मतभेद का निर्माण झाले ते.
यामध्ये एक पूर्ण बरोबर आणि दुसरा पूर्णतः चूक असे काही म्हणायचे आहे का? जाणून घ्यायला आवडेल.>>>>> ते आपल्या मतावर.
प्रवीण झा यांनी लिहिलेले
प्रवीण झा यांनी लिहिलेले तुम्ही फक्त भाषांतरित केलेय असे समजतो. भाषांतर फार पुस्तकी, शब्दशः झालेय, a lot is lost in translation असे खरेच वाटले.>>>>
खरं तर पेरियार आणी त्यांची ब्राम्हणांवरील मते हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे जसंच्या तसं लिहीतोय. जमेल तसं मराठीकरन ही करतोय.
मी फार कमी प्रतिसाद लिहितो. अवमान करणे किंवा चूक काढणे स्वभावात नाही, त्यामुळे जरा भीत भीतच हे लिहिले आहे. कृपया राग मानू नका.>>>>
आजिबात नाही. प्रतिसादाबद्दल आभार. कृपया देत रहा.
एकदा का गांधीजींना 'पितामह',
एकदा का गांधीजींना 'पितामह', राष्ट्रपिता, महात्मा ठरवले , चलनावर चित्र आले की विरोधात काही लिहून उपयोग नसतो.>>>>
मूळात गांधी महान होते हे वादातीत आहे. असंख्य जात, पात, टोकाचा जातीय द्वेष, शेकडो संस्थानं, हजारो भाषा, शेकड्याने असलेल्या वेगवेगळ्या संस्कृती अश्या सर्वांना गांधींनी एकत्र जोडून इंग्रजांविरूध्द ऊभे केले.
लेखमाला वाचत होते
लेखमाला वाचत होते
चांगली झाली. अजून लिहा
लेखमाला वाचत होते
लेखमाला वाचत होते
चांगली झाली. अजून लिहा >>>>
धन्यवाद जाई ताई
तमिळ nadu मधील पेरियार ची
तमिळ nadu मधील पेरियार ची पद्धत वेगळी असेल पण जाती व्यवस्था विरुद्ध असलेला हा लढा आहे.
पेरियार ह्याचे जाती व्यवस्था नष्ट करणे हा एकच हेतू नव्हता .
ते त्याचे साधन होते.
त्याला वेगळे तमिळ nadu पाहिजे होते.
मुळ उद्देश तोच होता
गांधी जी चा हेतू विशाल होता .ते देशाचा विचार करत होते.
खरं सांगायचं म्हणजे गांधी
खरं सांगायचं म्हणजे गांधी विचार आणि नेतृत्व ही सुनामी लाट होती. त्यावर आरूढ होऊन सरसर जाणे किंवा बुचकळून बुडणे हे दोनच पर्याय समकालीनांपुढे होते.
खरं सांगायचं म्हणजे गांधी
खरं सांगायचं म्हणजे गांधी विचार आणि नेतृत्व ही सुनामी लाट होती. त्यावर आरूढ होऊन सरसर जाणे किंवा बुचकळून बुडणे हे दोनच पर्याय समकालीनांपुढे होते.>>>>>
सहमत. गांधींवर टिका करण्याची आजकाल फॅशन आहे. पण मद्रास ते कश्मीर, ढाका ते क्वेट्टा. भारत जोडला तो ह्या माणसाने.
लेखमाला आवडली. आता दुसरी माला
लेखमाला आवडली. आता दुसरी माला लवकर सुरू होऊ दे.
दोन गोष्टी तरी साफ आहेत.
दोन गोष्टी तरी साफ आहेत.
१) राज्यकर्ते हे बहुजन समाजातील च होते.
लढणारे तेच होते ..तरी ब्राह्मणांचा वर चष्मा
कसा निर्माण निर्माण झाला त्याची उत्तर च पेरियार ह्यांनी दिली आहेत.
२)हिंदू चे सर्वात जास्त नुकसान ह्या जाती व्यवस्था मुळे झाले.
ते कधीच एक होवू शकले नाहीत.
कारण त्यांच्या वर अत्याचार करणारे हे हिंदू च होते.