सालाबाद प्रमाणे स्पर्धा आणि उपक्रमांची मुदत वाढ झाल्याने हे आमचे (ऐन वेळी खरडलेले) पुष्प तुम्हाला अर्पण करत आहोत.
बाकी सगळ्या स्पर्धा आणि उपक्रम ठिक आहेत पण "कॉलेजचे मोरपिशी दिवस" हा विषय गणेशोत्सवात लिखाणा साठी देण्यासारखा आहे? या विषयावर जेवढ्या एंट्री आल्या त्यांनी एक तर लोकलज्जेस्तव किंवा मग कदाचित माबोच्या आणि त्यात पण गणेशोत्सवाच्या सात्विक वातावरणाचा परिणामामुळे, कॉलेज मधल्या मोरपिशीपणावर फार काही लिहिले नाही असे वाटत आहे. एखाद्या बिनधास्त आयडींनी लिहिले असते तर जरा वाचायला मजा आली असती. पण आता आहे असे सगळे असताना, मी माझ्या कॉलेजच्या आठवणी त्यात पण मोरपिशी की काय म्हणतात त्या लिहाव्या की नाही यावर बराच विचार केला. मग म्हणलं " जाऊ दे, Who Cares?"
तर कॉलेज जिथे सुरु होते त्या अकरावी पासूनच सुरुवात करु या. आमचे कॉलेज घरा पासून ७-८ किमी होते आणि कॉलेजपासून आमची बस मिळायला एक किमी चालावे लागे. तर रोजच्या त्या कॉलेज पासून एक किमी चालणे, बसस्टॉप वर बसची वाट पाहणे, मग अर्धा पाउण तास बस मधे लटकणे यात एक दिवशी हिरवळ आली, आमच्याच भागातली एक ललना आम्हाला बसस्टॉप वर दिसली. स्मितहास्य, हाय हॅलो झाल्यावर कळले की तीपण जवळच्याच कॉलेजला आहे. आज चुकून या बसस्टॉपवर आणि योगायोगाने आली. त्यादिवशी योगायोगने लागोपाठ दोन बशी एका मागोमाग आल्या आणि योगायोगाने आम्हाला एकाच सिटवर बसायला जागा पण मिळाली. मग हे योगयोग सारखेच घडू लागले. कधी कधी ते योगायोग घडून यावे म्हणून दोन-तीन बस सोडून पण द्याव्या लागल्या..... वाट बघताना बोअर होऊ नये मित्रांना शिव्या घालून सोबत थांबवणे आणि योगायोग घडल्यावर त्यांना "चल रे निघ, आली आता." म्हणुन कटवणे ओघानेच आले. नंतर मग पुढे एकमेकांच्या कॉलेजला जाणे तिथे गप्पा मरत बसणे वगैरे पण ओघानेच आलेच.
एकदा एका ठिकाणी आम्ही गप्पा मारत ( जर्रा जवळ जवळ) बसलो होतो तेवढ्यात तिथे एक जण स्कूटर वर आला आणि म्हणाला " काय ईथे काय पिक्चरचे शूटींग चालू आहे का?" मी आपला सहज पणे "माहित नाही. पुढे विचारता का?" असे म्हणून रिकामा झालो. त्या प्रतिक्रियेवर त्याचा संतप्त झालेला चेहरा बघून मग मात्र मी वर पासून खाली पर्यंत पाहिले, खाकी पँट, त्याचे बुट आणि स्कूटर ला लावलेली पोलिसी काठी पाहिल्यावर आम्ही झटकन लोहचुंबकाच्या नॉर्थ आणि साऊथ पोल सारखे विरुद्ध बाजूला सरकलो. विषय वाढायच्या आतच पटकन सॉरी म्हणून कल्टी मारली. दुसरा किस्सा प्ले ग्राउंडशेजारी एका झाडाखाली बसलो होतो तेव्हा झाला. गप्पा मारता मारता अर्थातच वेळेचे भान राहिले नाही. शेवटी तिथे फिल्डींग करणारा एक जण म्हणाला "अरे बास आता, ऊठा, तीन तास झाले."
असेच बरेच महिने गेले आणि एके दिवशी संध्याकाळी माझा क्लास सुटल्यावर तिथे आमचे आमच्या पेक्षा वयाने मोठे असलेले तीन चार मित्र माझी वाट पहात थांबले होते. तर झाले असे की, आमच्या या निवांत गप्पा मारण्याची कुणकुण तिच्या भावाला लागली होती आणि तो भरपुर सारे मित्र घेऊन क्लास सुटल्यावर आमची पिटाई करण्यासाठी आमच्या क्लासपाशी आला होता. हे आमच्या मित्रांना कळल्यावर त्यांनी परस्पर हस्तक्षेप करुन त्यांना पिटाळून लावले होते. ते झाले नसते तर त्या दिवशी आमची चांगलीच धुलाई झाली असती. काही काळाने हे गप्पा मारणे आपसूकच बंद झाले. पहिली मोरपिशी की काय म्हणता येईल अशी आठवण कप्प्यात बंद झाली.
तर कसे काय माहित पण हे गप्पा मारणे बंद झाले. यथावकाश आम्ही बारावीला गेलो, सगळे मित्र जायचे म्हणून एका क्लासला जायला लागलो. तिथे पण एक छान सुंदर मुलगी होती. गणिता मधे मला भारी कॉम्पिटिशन द्यायची आणि पर्सनल लेव्हलला मिक्सड ईशारे द्यायची. क्लास मधे सगळे चिडवायला लागले होते. एके दिवशी काय मला झाले देव जाणे, मी एक राखी विकत घेतली आणि क्लास सुटल्यावर तिला म्हणालो की सगळे तुला चिडवतात हे बरे दिसत नाही, हे घे मला राखी बांध. हा किस्सा मी माझ्या आयुष्यात अनेकदा विसरायचा प्रयत्न केला पण मित्रांनी प्रत्येक गेट-टुगेदरला त्या मुर्खपणाच्या जखमेवरची खपली काढून ती अजून भळभळत ठेवली आहे. दुसरी (भळभळती) मोरपिशी आठवण.
नंतर अभियांत्रिकी शाखेत गेल्यावर मग मुलींशी संपर्क कमीच झाला. तिथून पुढे एकही मोरपिशी आठवण नाही. आख्ख्या शाखेत एकही मुलगी नव्हती, कॉलेजला येताना शर्ट भिजला की ऑफ पिरियडला मुले शर्ट काढून फॅन खाली वाळवायची! ती सगळी वर्षे तुफ्फान मजा केली. त्या कालावधी मधील सगळ्या आठवणी अपेयपान, मित्रांसोबत रात्री अपरात्री निरर्थक भटकणे, त्यातून झालेले किस्से याच्याच आहेत. सिनिअर कॉलेजला गेल्यावर सुरुवातीला दुचाकी नव्हती त्यामुळे बसनेच जायचो यायचो. नंतर दुचाकी मिळाली मग रोज त्यावर भटकणे चालू झाले. मधे सुट्ट्यांमधे मी एल. आय. सी. चे एजंटचे ट्रेनिंग घेऊन परिक्षा दिली. जो दिसेल त्याला पॉलिसी काढायची आहे का विचारायचो. ओळखीतून आणि नातेवाईकांमधून भरपुर पॉलिसी मिळाल्या. पोरगं शिकता शिकता पैसे कमवयाचा प्रयत्न करत आहे या विचाराने अनेक जण पॉलिसी काढत. त्यामुळे माझ्या अकाउंटला कायम पैसे असत. शिवाय कॉलेज वरुन आलो की दुकानावर जाऊन वडिलांना मदत करत असे. तिथे न लाजता झाडून काढणे, मटेरियल वर खाली करणे या पासून गल्ला संभाळण्यापर्यंत सगळी कामे करत असे. त्यामुळे वडील हातखर्चाला पैसे देतच असत.
दुकान बंद झाले की मग घरी जाणे किंवा मग मित्रांना भेटायला. कधी कधी सगळे जमले की मग प्यायचे प्लॅन बनत. कोणाकडे ५०, कोणाकडे १००, कोणाकडे अजून थोडे असे काँट्री काढून त्यात जितकी जमेल तितकी आणून दोन चार पेग होत. मग त्या नंतर खरी मजा. बर्याच वेळा अजून एक क्वार्टर हवी होती असे सगळ्यांचे मत पडत असे. मग परत खिसे रिकामे करणे, काँट्री काढणे यात आसपासचे सगळे वाईन शॉप बंद होत मग माझ्या कॉलेजचा एक मित्र जो आमच्यापासून ९ किमी लांब रहात असे त्याच्याकडे जायचो, त्याला एक स्पॉट माहित होता. तिथे रात्री दोन तीन वाजता पण सगळे मिळत असे. मग तिथे ऑन परत सगळ्यांनी घसे ओले करणे. या सगळ्या मधे ईतके किस्से झाले की त्यावर लिहायचे झाले तर एक मालिकाच लिहावी लागेल.
एकदा असेच गेलो आणि रात्री एक वाजता गाडी पंक्चर झाली. रात्री अडीच वाजता मी आणि मित्रांनी चार किमी गाडी ढकलत आणली. यात अजून एक मजा म्हणजे मला घरी आल्यावर लक्षात आले की ऊद्या एका विषयाचे जर्नल सबमिट करायची शेवटची तारीख आहे. मग मी रात्री अडीच की तीन वाजे पर्यंत ते जर्नल पुर्ण केले, सकाळी ७ ला ऊठून आवरुन कॉलेजला गेलो आणि जर्नल सबमिट केले.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी आम्ही नाटक बसवले होते त्यात एका मुलीचा रोल पण होता. सगळ्यांना ऊत्सुकता होती की यांच्या वर्गामधे हा रोल करणार तरी कोण? आम्ही सगळे नाटक बसवले होते. नाटकाच्या ऐन अर्धातास आधी मी कॉलेज मधेच दाढी केली, मिशी ऊडवली. एका मित्राला त्याच्या बहिनीचा पंजाबी ड्रेस आणायला सांगितला होता. तो त्याने आणला. पण तो मला बसेल की नाही याचा आम्ही आधी विचारच केला नाही. मग ऐन वेळी तो ड्रेस कसा बसा बसवावा लागला. त्यात तो घालताना एके ठिकाणी ऊसवला मग तिथे सेफ्टी पिना लावणे वगैरे सगळे ऊद्योग झाले. या सगळ्या धावपळी मधे आम्ही तयार नसल्याने आमचा प्रयोग पुढे ढकलून दुसरा एक आधी घेतला. मग स्टेज वर एंट्री घ्यायच्या आधी मला जरा टेन्शन आले. मुलीच्या ड्रेस मधे पाहून बाकी मुले हसतील का? चिडवतील का? कार्यक्रमाचे फोटो निघणार, प्रत्येक जण त्याच्या कॉपीज घेणार, माझा स्त्रीवेषातला फोटो कायमचा सगळ्यांकडे राहणार..... या सगळ्याचा परिणाम म्हणजे जोरदार एक नंबर आली. पटकन वॉशरुम मधे घुसलो. हलका होतच होतो. तेवढ्यात शेजारी दुसरा एक मुलगा हलका व्हायला आला. एक मुलगी मुलांच्या वॉशरुम मधे उभ्याने सगळे करताना पाहून ईतका डेंजर दचकला की ज्याचे नाव ते..... त्याचा चेहरा मला आत्ता या क्षणी सुद्धा लक्षात आहे......
नाटक तुफ्फान झाले. आम्ही दिलेला सरप्राईज एलेमेंट ईतका जबरदस्त होता की आम्ही त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट नाटक आणि मी सर्वोत्कृष्ट अभिनेता/अभिनेत्रीची ट्रॉफी पटकावली.
कॉलेजचे दिवस म्हणल्यावर जितक्या आठवणी येतात त्यात मोर पिशी आठवणी कमी आणि अतरंगी आठवणीच जास्त आहेत. असो. वेळ काळ मिळाला तर बाकीच्या आठ्वणी परत कधीतरी......
मस्तच लिहिलंय.
मस्तच लिहिलंय.
आठवणी भारीयेत.
आठवणी भारीयेत.
शेवटचा किस्सा
शेवटचा किस्सा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान आठवणी आहेत अतरंगी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाई दवे, मलाही लहानपणी आमच्या ईथे नवरात्रीत स्त्री वेशभुषेचे फॅन्सी ड्रेस प्राईज होते
भारी लिहिलंय! शेवटचा
भारी लिहिलंय!
शेवटचा किस्सा कहर आहे! ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त लिहिलंय! शेवटचा किस्सा
मस्त लिहिलंय! शेवटचा किस्सा जबरी आहे.
मस्त लिहिलंय! शेवटचा किस्सा
मस्त लिहिलंय! शेवटचा किस्सा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वा,वा, मस्त मस्त.
वा,वा, मस्त मस्त.
लोल मस्तच आठवणी..
लोल मस्तच आठवणी..
मस्त आठवणी.
मस्त आठवणी.
जबरदस्त. अजून अतरंगी आठवणी
जबरदस्त. अजून अतरंगी आठवणी येऊ देत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त!
मस्त वॉशरूमचा किस्सा धमाल
मस्त
वॉशरूमचा किस्सा धमाल आहे.
भारीच रे
भारीच रे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
अतरंगी नावाला साजेसा
अतरंगी नावाला साजेसा
अतरंगी भन्नाट किस्से ! मजा
अतरंगी भन्नाट किस्से ! मजा आली वाचताना. आमच्या कॉलेजच्या धमाल आठवणी आठवल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतरंगी भन्नाट किस्से ! मजा
अतरंगी भन्नाट किस्से ! मजा आली वाचताना. आमच्या कॉलेजच्या धमाल आठवणी आठवल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)