हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट- लंपन

Submitted by लंपन on 6 September, 2022 - 08:38

IMG_20220906_175429958~2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अक्षर आहे लंपन!
हे गाणंही खूप जवळचं वाटतं. प्राथमिक शाळेत असताना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला प्रभातफेरी असायची गावातून. तेव्हा, किंवा त्याआधी ध्वजारोहण झाल्यावर राष्ट्रगीतानंतर हे गाणं आम्ही नेहमी म्हणायचो. 'हातात हात घालून..' प्रभातफेरीच्या वेळी ही ओळ त्या अर्थाने खरी वाटायची. (आणि मग घरी जाताना लिमलेटची गोळी मिळायची Proud ) हे गाणं मनातल्या मनात जरी म्हटलं तरी हे सगळे संदर्भ जागे होतात. लिमलेटच्या चवीसकट.

सुंदर अक्षर..
@ वावे- अगदी ह्याच आठवणी जाग्या झाल्या मनात..!!

लोक्स खूप धन्यवाद. वावे हे गाणं नसायचं पण प्रभातफेरी असायची शाळेची चिंचवड गावातून Happy आणि आम्हाला पण एक(च) गोळी देत ऑरेंजची, त्याला एकदम पातळ प्लास्टिक चा कागद असे. आणि ती सर्वात शेवटी मिळे, सगळ्यांची भाषणबाजी झाल्यावर Happy

उत्तम ठसठशीत अक्षर
अन
का कोणास ठाऊक ? हि स्पर्धा जाहीर झाली तेव्हापासून हे गीत डोक्यात घोळत राहीलं होतं .

सुंदर आहे अक्षर...
फोटोतील त्या निळ्या शेडने कार्बन पेपर ठेवून लिहायचे तो फील आलाय Happy