उत्तर भारतीय अनेक कारणांनी तमिळनाडूत जातात. तीर्थयात्रेला, चेन्नईतील एखाद्या संगणक कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी. कोणत्याही सरकारी पदावर. शिवकाशीच्या फटाका उद्योगात नोकरीला, कोईम्बतूर येथील गुजराती आणि मारवाड्यांच्या कारखान्यात. सालेमच्या कारखान्यात.
तिरुपूरमध्ये मी बिहारच्या एका माणसाला विचारलं, “तू इथे कसा आलास?”, गावातील एका भावाने त्याला नोकरी लावल्याचे त्यांनी सांगितले.
मी विचारले, "तुला इंग्रजी येते का?
तो म्हणाला, “इंग्रजी अवघड आहे. त्यामुळे मी तमिळ शिकलो.”
'ब्लू कॉलर जॉब' मध्ये गुंतलेली एक कमी शिकलेली व्यक्ती तमिळ शिकली. पण, चेन्नईत दहा वर्षांपासून 'व्हाइट कॉलर जॉब' करत असलेल्या एका उत्तर भारतीयाने सांगितले की तो एकच ओळ शिकला आहे- 'तमिळ तेरियातु' (तमिळ येत नाही). तमिळ भाषा येत नसेल तर तमिळ प्रदेश समजू शकत नाही. तसेच त्या विषयावर विश्वासार्हपणे लिहिता येत नाही. उत्तर भारतीयांसाठी हे आणखी कठीण आहे कारण पूर्वग्रह. तमिळांना हिंदी विरोधी असल्याबद्दल श्रेष्ठत्वाची भावना आणि चीड देखील असू शकते. तमिळांवर लिहिणे मला रशिया, युरोप, अमेरिका किंवा पाकिस्तानवर लिहिण्याइतके सोपे वाटले नाही.
मी तामिळनाडू वेगवेगळ्या वेळी झटपट पाहिले. प्रथम मद्रास, आणि 1996 पासून चेन्नईला.तमिळनाडू त्याच्या आकारापेक्षा मोठा दिसत होता. जणू कोणीतरी संपूर्ण संस्कृती 'झूम' केली आहे. कोणाचे सरकार आहे हे विचारण्याची गरज नव्हती. सरकार त्या नेत्याचे आहे, ज्याचे पोस्टर शहरभर लावलेले दिसतील. दोन दशके काळ्या चष्म्यातील हसतमूख दोन करुणानिधी आणी हिरव्या साडीतल्या जयललिता यांचे चित्र एकमेकांत बदलत राहिले. या दोन चित्रांवरून या राज्याचा संपूर्ण राजकीय इतिहास समोर येतो. केवळ या प्रदेशाचाच नाही, तर संपूर्ण भारताचा. वंश, जात, धर्म, भाषा आणि संस्कृती यापैकी एक स्वत:ला हिंदू ब्राह्मण म्हणवून घेत होती आणि दुसरा हिंदू' आणि 'ब्राह्मण' ह्या दोन विचारधारेंवर प्रश्नचिन्ह लावत होता. एक मूर्तिपूजक, दुसरा मूर्तिभंजक विचारधारेचा. सवर्ण-दलित राजकारण उत्तर भारतातही चांगले चालले, पण दक्षिणेत ते त्यांच्या सर्व मोठ्या पोस्टर्सप्रमाणे 'झूम मोड'मध्ये होते.
ही कथा फिल्मी नाही, यातील सर्व पात्रं फिल्मी आहेत. जसे नायक-नायिका त्या पोस्टर्समधून बाहेर आल्या आहेत. रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शन करताहेत. तिथे उभा असलेला एक उत्तर भारतीय त्यांना टोमणा मारत होता, "द्रविडांनो! तुम्ही लोक श्रीलंकेत वेगळा देश मागता. तुम्ही भारतात वेगळा देश का मागत नाहीत?
तो उत्तरला, “आर्यांनो, हा देश तर सदैव आमचाच आहे. आमच्या मूळावर काहीही शंका नाही, शंकातर तुमच्या मूळावर आहे की तुम्ही केव्हा नी कुठून आलात?
तमीळ राजकीय ईतिहास ह्या आणी यासारख्या अनेक प्रश्नांवरून पुढे जातो ज्यावर प्रत्युत्तर करायची तीव्र ईच्छा होईल, काहींचं रक्त खवळेल आणी काही माझ्यावर संतापूही शकतात. जेव्हा आपण चेन्नई मध्ये लागलेल्या एम के स्टॅलीनच्या ताज्या पोस्टरवरून ईतिहासात मागे फिरू, जेव्हा आपण परतू त्या अन्नाकडे ज्याच्या मृत्युनंतर जमलेल्या गर्दीने गिनीज रेकोर्ड रचला किंवा त्या ई. वी रामास्वामी कडे ज्याला लोक पेरीयार (महान माणूस) म्हणून ओळखतात.
(क्रमशः)
मूळ लेखक- प्रकाश झा.
वणक्कम सामी.
वणक्कम सामी.
वाचायला आवडेल हा लेख. तुम्हालाही तमिळ बोलता येते का?
सुरुवात तर छान झालीय. आता
सुरुवात तर छान झालीय. आता मध्येच थांबवू नका ही मालिका
फक्त अनुवाद जरा अधिक ' मराठी ' वाटावा.
वणक्कम सामी. >> कालै वणक्कम
वणक्कम सामी. >> कालै वणक्कम
वाचायला आवडेल हा लेख. तुम्हालाही तमिळ बोलता येते का? >> ईल्ले.
सुरुवात तर छान झालीय. आता मध्येच थांबवू नका ही मालिका
फक्त अनुवाद जरा अधिक ' मराठी ' वाटावा.>>> प्रयत्न करतो.
आवडलं वाचायला. भारतातल्या
आवडलं वाचायला. भारतातल्या प्रांतांची आपल्याला किती कमी ओळख आहे, हे लक्षात आल्यावर वाईट वाटलं.
आवडलं वाचायला. भारतातल्या
आवडलं वाचायला. भारतातल्या प्रांतांची आपल्याला किती कमी ओळख आहे, हे लक्षात आल्यावर वाईट वाटलं. > खरचं