कथाशंभरी - गोष्ट-शंभर शब्दांची, अगणित अर्थाची

Submitted by संयोजक on 27 August, 2022 - 03:00

shshka-1.gif

नमस्कार मंडळी,
गेल्यावर्षी शशकला मिळालेला प्रचंड प्रतिसाद सगळ्यांनीच बघितला असेल.
गेल्या वर्षी भाग घेतलेल्यांना नवकल्पना सुचण्यासाठी आणि ज्यांना काही कारणाने भाग घेता आला नाही त्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून देता यावी म्हणून यावर्षीही आम्ही घेऊन येत आहोत 'कथाशंभरी' हा शशक पूर्ण करा उपक्रम.

आम्ही तुम्हाला शशकची सुरुवात करून देत आहोत. ती पुढे खुलवून आणि शेवट करून तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि कथेला साजेसे असे शीर्षक द्यायचे आहे. एक आयडी कितीही प्रकारे कथा पूर्ण करू शकतो.
धाग्याचे शीर्षक कथाशंभरी - कथेचे शीर्षक - मायबोली आयडीचे नाव असे असावे. हा उपक्रम आहे , स्पर्धा नाही. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी.
तर मग घ्या तर कथा पूर्ण करायला. आपल्यामधील लेखकरुपी पक्ष्याला, घेऊ द्या साहित्यगगनामध्ये भरारी.

कथेची सुरुवात -

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

(यापुढे हि शशक तुम्हाला पूर्ण करायची आहे)

नियम :
१) हा मायबोलीकरांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) मायबोली गणेशोत्सव २०२२ या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात तुमची कथा लिहा. धाग्याचे शीर्षक : कथाशंभरी - कथेचे नाव - तुमचा मायबोली आयडी असे द्या.
३) कथा गणेश चतुर्थीपासून, ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
४) एक आयडी कितीही प्रवेशिका पाठवू शकतो.
५) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्यामधील लेखकरुपी पक्ष्याला, घेऊ द्या साहित्यगगनामध्ये भरारी. >>>>>>>>>> mad0235.gif बस्स मी अल्लारखां ओरडायचीच बाकी.... आता तो ससाणा येईल तेव्हा व्हायचं पुढचं सगळं...... Happy
(प्लीज टेल मी सामो रोट धिस! Wink Light 1 )

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय ....... >> हे धरून १०० कि वगळून शंभर ते नमूद करावे.

पुलाखालून वाहून गेलेले पाणी

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
अचानक पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढायला सुरुवात झाली. ढगफुटी झाली की काय? की पाऊस जास्त झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले? कारण काहीही असेल पण प्रवाहाचा आवेग वाढू लागला.
एकीने पुलाच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे- दुसरीकडे पाहिले. दुसरीसुद्धा हताशपणे पहिलीकडेच पाहत होती. आता काही क्षणांमध्ये पूल पुन्हा पाण्याखाली जाणार. पहिली आणि दुसरीची भेट पुन्हा लांबणार.
निराश होऊन पहिली आणि दुसरी - दोघीही- पुन्हा कधी पुलावरून आणि पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल याची वाट पाहू लागल्या.

#मायबोली गणेशोत्सव २०२२

@बोबो निलेश >> मायबोली गणेशोत्सव २०२२ या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात तुमची कथा लिहा. धाग्याचे शीर्षक : कथाशंभरी - कथेचे नाव - तुमचा मायबोली आयडी असे द्या.

संयोजक, ही आताची सूचना प्रत्येक स्पर्धा आणि उपक्रमाच्या घोषणेत समाविष्ट कराल का? तसंच प्रवेशिका देण्याची अंतिम तारीख, वेळ हेही नमूद करा.
वाटल्यास आधीच्या गणेशोत्सवातील स्पर्धा- उपक्रमांचे धागे पहा.