आमितव ने 'Y' या चित्रपटाबद्दल चित्रपट धाग्यावर लिहिले होते तिथून विषय सुरु झाला. चित्रपट स्त्रीभ्रूण हत्या (?) या विषयावर आहे.
तिथली चर्चा अगदीच अवांतर असल्यामुळे हा धागा उघडण्याचे काम करतेय.
त्यावरुन मोरोबा या आयडी चे पोस्ट :
गर्भपात हे procedure आहे, हत्या नाही असं एकदा मान्य केल्यावर स्त्री भ्रूण removal ला तरी हत्या का म्हणायचं, असा प्रश्न पडला होता.
एकदा जर हे तत्व मान्य केलं की स्त्रीला कोणत्याही कारणामुळे गर्भपात करण्याची परवानगी असावी- निदान पहिले 20 ते 24 आठवडे तरी- तिथे सरकारने नाक खुपसू नये- तर मग स्त्रीभ्रूणहत्येला वेगळी ट्रीटमेंट का द्यावी हा प्रश्नच आहे.
समजा एखाद्या स्त्रीला भारतीय स्त्री म्हणून आयुष्यभर असुरक्षिता, abuse, दुय्यम वागणूक यांचा सामना करावा लागला असेल तर तिला वाटू शकतं की आपण आता परत female child ला जन्म देऊ नये आणि आयुष्यभरासाठी अतिरिक्त टेन्शन, जबाबदारी डोक्यावर घेऊ नये. तो चॉईस तिला असायला हवा. आणि तो चॉईस तिने घेऊ नये यासाठी तिला कायद्याचा धाक दाखवणं हा सोपा मार्ग झाला. याउलट स्त्रियांची स्थिती सुधारली तर कायद्याचा धाक नसला तरी ती तो चॉईस नाही निवडणार.
पुढच्या पिढीतील पुरुषांना स्त्रिया उपलब्ध असाव्यात यासाठी काही जोडप्याना नको असताना कायद्याचा धाक दाखवून मुली जन्माला घालायला लावणे हे हॅन्डमेड टेल टाईप वाटतं. Quick fix solution without addressing the root cause.
Submitted by WHITEHAT
प्रश्न हा आहे कि तो डिसिजन दोघांचा असावा...
Submitted by च्रप्स
मोरोबा,
मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं आणि मूल नको म्हणून गर्भपात करणं, तसंच मुलगी नको हा सासरच्या/माहेरच्या लोकांचं प्रेशर असणं आणि मूल नको हा स्त्रीचा किंवा जोडप्याचा 'चॉईस' असणं यात फरक नाही का?
Submitted by अंजली
मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.
Whitehat thanks. मला एवढं नेमक्या शब्दांत सांगता आलं नसतं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?
Submitted by मोरोबा
आयसोलेशन मध्ये विचार केला तर मुलगी नको असणे हा चॉईस असू शकतो, मुलगाच हवा असणे हा ही नक्कीच चॉईस असू शकतो. गर्भपात करायला फक्त तेवढ्याच मुद्द्याचा विचार केला तर विरोध असायचं कारणच नाही.
पण विचार करा, हा लिंगसापेक्ष फक्त स्त्री गर्भाचा अंत हा मुळात गर्भपाताचा मुद्दाच नाही आहे. खोलात जाऊन विचार केला तर हा समाजात स्त्रीला, मुलींना दिला जाणारा... रादर दिला 'न जाणार्या' आदराचा मुद्दा आहे. आणि याचं शाश्वत उत्तर हे समाजाचं शिक्षण, प्रगती, स्त्री सबलीकरण यात आहे, ना की स्त्री भ्रूण हत्या कायद्याचा धाक दाखवून थांबणण्यात! दीर्घकालिन उत्तर हे समाजात त्यांच्या विचारात बदल हेच असणार आहे. कायद्याचा धाक-दपटशा दाखवुन काय साध्य होतंय हे बघतोच आहोत.
पण तरीही आजची भारताची परिस्थिती बघता कायदा असावाच याच मताचा मी आहे.
कॅनडात अठरापगड ठिकाणचे लोक रहातात, त्यांच्या मूळ ठिकाणच्या चालिरीती, समज गैरसमज इ. चे प्रतिबिंब गर्भपाताच्या निर्णयांत अर्थात पडते. दरकाही वर्षांनी लिंगसापेक्ष गर्भपाताची आकडेवारी तपासली जाते आणि अजुन तरी लिंग गुणोत्तरात फार फरक झालेला नाही. कॅनडात कुठल्याही कारणाशिवाय संपूर्ण प्रेगन्सीभर (अगदी फुल टर्म पर्यंत) गर्भपात विनामूल्य आणि सहज शक्य आहे. म्हणून मुद्दाम कॅनडाचं उदाहरण दिलं.
विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.
Submitted by अमितव
मुलगी नको असणे हा चॉईस असू शकत नाही का?>>> याला तुम्ही चॉईस म्हणू शकता पण तो नसायला हवा कारण तो चॉईस लिंगभेद करतोय. 'मूल' हवं का नको (लिंगभेद न करता) हे 'मुलगी नको' यापेक्षा वेगळं नाही का?
आणि स्त्री भ्रूण removal हे सासर माहेर च्या प्रेशर मुळेच होतं, असं जनरलिझेशन का? बऱ्याच वेळा स्त्रियांनाच/सुद्धा मुलग्याचा सोस असतो.>> हे ही चुकिचेच आहे आणि ते थांबायला हवं.
आपल्या पर्सनल कन्व्हिक्शन्स प्रमाणे आपण चॉईस आणि हत्या शब्द आलटून पालटून वापरत आहोत का?>>> जेंडर नुसार गर्भपात करणे हे चुकीचे आहे. मूल हवं का नको - मुलगा असो वा मुलगी - हा चॉईस आहे. मला मूल हवं आहे पण ते मुलगाच हवा त्यानुसार घेतलेला निर्णय यालाही तुम्ही 'चॉईस' म्हणू शकता, फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेलच.
या धाग्याचा हा विषय नाही त्यामुळे इथे आता जास्त लिहीत नाही.
Submitted by अंजली
विचार करा, एक ४०० लोकं घेऊन मल्टिजनरेशन यान दूरच्या गॅलेक्सीच्या प्रवासाला निघालं आहे. तिकडे अबॉर्शनला परवानगी असेल का? अजिबात नसेल. जगात अॅब्स्युल्युट असं काही नसतं. सगळं रिलेटिव्ह, परिस्थिती प्रमाणे बदलतं.//
तो 400 जणांचा ग्रुप जर स्त्रियांना माणूस म्हणून किमान चांगली वागणूक देण्याच्याही capable नसेल तर मरू दे की तो ग्रुप. असला अभद्र समाज आणखी दुसऱ्या गॅलेक्सीत वाढवायला कशाला न्यायचा! Wink
फक्त या चॉईसचे परीणाम समाजावर किती दूरगामी, वाईट होऊ शकतात हे तुम्हाला माहित असेल////
होऊ देत की वाईट परिणाम. जोपर्यंत संपूर्ण समाजाला झळ पोचत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही. इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल तर त्यांना भक्कम आर्थिक मोबदला, मुलीच्या उत्तम खाजगी शिक्षणाला पुरेल इतका खर्च वगैरे तरी द्यायला हवं. जेलमध्ये टाकायच्या धमक्या देण्याऐवजी.
Submitted by WHITEHAT
इच्छा नसताना एखादं जोडपं केवळ संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी मुलगी जन्माला घालण्याचा त्याग करत असेल >>>> ???? मुलगी जन्माला घालणे हा 'त्याग' आहे? बरं.
आणि हो मुलींचं शिक्षण भारतात (काही वर्षांपर्यंततरी) मोफत आहे ना?
Submitted by अंजली
तो चॉईस लिंगभेद करतोय.>>कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? पुरुषांसाठी वाईट परिणाम होत असेल तर व्हायलाच पाहिजे. (बाकी ते स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात येईल, बलात्कार होतील वगैरे म्हणजे नुसता बागुलबुवा आहे. स्त्रियांना सिस्टिमिकली कंट्रोल करायला असे बागुलबुवे बरे पडतात)
Submitted by मोरोबा
कॉज आणि इफेक्ट ची गल्लत होतेय इथे. चॉईस लिंगभेद करत नाहीये तर समाजात लिंगभेद ऑलरेडी आहे म्हणून चॉईस केला जातोय. जिथे लिंगभेद तुलनेने कमी आहे त्या देशांत का नाही हा प्रॉब्लेम?>>> अहो, एक शब्द अलिकडे टाकला म्हणून फॅक्ट बदलतीये का? मूल नको असणे आणि मुलगी नको असणे यात निदान भारतात तरी फरक आहे ना? यातच तुमच्या पुढच्या प्रश्नाचेही उत्तर आहे.
सप्लाय ॲंड डिमांड च्या तत्वानुसार स्त्रिया कमी झाल्या तर उलट त्यांचा समाजात दर्जा वाढायला हवा ना? हा वाईट परिणाम कसा? >>> तो वाढत नाहीये, उलट दिवसेंदिवस कमी होत आहे हे वाईट फॅक्ट आहे.
तुम्ही तुमच्या कन्व्हिक्शन्स पायी इतरांचा चॉईस हिरावून घेत आहात, तर अमेरिकेतल्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स ना बोलण्याचं मोरल ग्राउंड तुमच्याकडे उरतं का?>>> हो, उरतं. कारण मूल हवं आहे, पण मुलगाच हवा आहे याचे भारतात तरी मोठे दूरगामी परीणाम होत आहेत. उद्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स देखिल मुलगाच हवा हा हट्ट धरू लागले तर त्यालाही तेव्हढाच विरोध होईल.
बाकी तेव्हढं ते 'कन्व्हिक्शन' म्हणजे काय ते समजले नाही
Submitted by अंजली
व्हाईटहॅट यांचे पटते आहे.
व्हाईटहॅट यांचे पटते आहे. भ्रूण जर मुलगी असेल तर लगेच स्त्रीच्या पर्यायस्वातंत्र्याचा संकोच करुन तिला गर्भपात नाही करुन द्यायचा का? असे का? तिचा म्हणजे स्त्रीचा हक्क आहे ना 'स्व_तः_च्या' शरीरावरती! मग तो हक्क का म्हणुन डावलायचा?
म्हणजे, गर्भलिंगनिदान
म्हणजे, गर्भलिंगनिदान कायदेशीर करायचं, जर मुलगी असेल तर गर्भपात करणं कायदेशीर करायचं. हे कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे पहिलीच खेप असेल तरी, किंवा आधी एक मुलगा वंशाचा दिवा म्हणून जन्मलेला आहे, पण अजून एक दिवा हवाय मग तो दिवा लागेपर्यंत कितीही गर्भपात करायला परवानगी द्यायची, हे असं म्हणायचंय तुम्हाला?
आणि हे त्या (गरोदर) स्त्रीच्या इच्छेनुसार, तिचं स्वातंत्र्य जपून करायचं? हे दोन्ही (स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्री-गर्भाचा पात) एकाच वेळी शक्य आहे असं मला तरी वाटत नाही!
मुलगा होईपर्यंत गर्भपात हे समाजात बेकायदेशीरपणे आधीच घडतंय हे मला माहिती आहे. पण त्यातून स्त्री स्वतंत्र कशी होते हे मला समजलेलं नाही.
'मुलगा हवा असं नाही, पण मुलगी नको' याचा अर्थही शेवटी तोच आहे, तसं ते नसेल तर मूलच होऊ द्यायचं नाही हा पर्याय निवडावा.
वावे,
वावे,
तुम्ही प्रो लाईफ असाल तर तो वेगळाच विषय आहे. कोणाला कसली "परवानगी" द्यायची ते प्रो-लाईफवाले ठरवतातच. अमेरिकेत ठरवलंच आहे.
फक्त एकाच वेळी पहिल्या तिमाहीत केलेल्या स्त्री भ्रुण गर्भपाताला हत्या म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःला roe v wade सपोर्टर म्हणायचं हा दुटप्पीपणा नको. Either be pro life or pro choice. आणि प्रो चॉईस असाल तर परवानगी ची भाषाच नको. तुम्ही कोण परवानगी देणारे? किंवा कोणती अबोर्शनची कारणं valid आहेत ते ठरवणारे?
हरचंद पालव,
हरचंद पालव,
चांगला आढावा.
फक्त एक addition -विषम लिंगगुणोत्तरामुळे होणारे परिणाम टाळण्यासाठी आम्हाला बायकांचा सप्लाय ensure करायचा आहे- आणि बायकांची स्थिती सुधारणे , भारतीय पुरुषांची मानसिकता बदलणे हे तर अशक्यप्राय असल्याने आम्हाला जोडप्याना नको असताना सक्तीने मुली जन्माला घालायला लावणं हाच सोप्पा उपाय दिसतो- हे कारण असेल तर तसं स्पष्टपणे सांगावं.
त्यात मग इतर कांगावा कशाला- पहिल्या तिमाहीत केलेल्या प्रोसिजरला भ्रुण'हत्या' म्हणणं, नरड्याला नख लावतात म्हणणं, संबंधित जोडप्याला खुनी, गुन्हेगार ठरवणं, कोणी डॉक्टर , तंत्रज्ञ असेल- त्याला तर नरराक्षस काय, हैवान काय- वाट्टेल ते नाव देणं, या विषयावर भडक मुव्हीज बनवणं- हा सगळा काय लेव्हलचा एकांगी propaganda चालू आहे? कशा पद्धतीने स्त्रियांना यातून judge आणि shame केलं जातंय? यातून काय मेसेज जातोय? की अगदी अर्ली स्टेजमधील प्रोसिजरदेखील हत्या आहे, खून आहे. अमेरिकेतील प्रो लाईफवाल्यांनी येऊन क्लास लावावा इतका प्रॉपगंडा भारतात चाललेला दिसतो.
या लोकांनी मग आपण roe wade चे आणि महिला स्वातंत्र्याचे समर्थक असल्याचा दावा तरी करू नये मग.
व्हाईटहॅट, मी रो वि. वेड
व्हाईटहॅट, मी रो वि. वेड याबद्दल एक अक्षरही लिहिलेलं नाही. मी 'प्रो लाईफ' (म्हणजे गर्भपाताला विरोध करणारे ना?) आहे असंही मी म्हटलेलं नाही.
माझा (भारतात) गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या या दोन्ही गोष्टींना विरोध आहे! अमेरिकेतल्या परिस्थितीबद्दल मला काहीही बोलायचं नाही.
तुम्ही जेव्हा स्त्रीभ्रूण
तुम्ही जेव्हा स्त्रीभ्रूण'हत्या' असा शब्द वापरता that means you are pro-life.
लिंगपरिक्षण न करता केलेला गर्भपात acceptable आणि परीक्षण करून केलेला गर्भपात मात्र 'हत्या' हा दुटप्पीपणा होतो. जेंडर हा एक निकष झाला. बाप कोण आहे, गर्भात काही दोष आहेत का, अनौरस आहे का- असे अनेक निकष लावले जातात. फक्त एकच निकष का बॅन करायचा?
परदेशात जेंडर कळतं तरीही मोठ्या प्रमाणात तसे अबोर्शन होत नाहीत. भारतातील जोडपी नाईलाजाने तसा विचार करतात कारण भारतात परिस्थिती भयानक आहे. सो तसा विचार करणाऱ्या स्त्रियाही victim आहेत. त्यांचा सहानुभूतीने विचार व्हावा. गुन्हेगार ठरवलं जाऊ नये. त्यांचं त्यांना ठरवू द्यावं.
तुम्ही जेव्हा स्त्रीभ्रूण
तुम्ही जेव्हा स्त्रीभ्रूण'हत्या' असा शब्द वापरता that means you are pro-life.
मल वाटते वावेंचा आक्षेप गर्भलिंगनिदान करुन त्यानंतर स्त्रीभ्रूण आहे म्हणून करु घातलेल्या गर्भपातावर आहे. म्हणून स्त्रीभ्रूण'हत्या हा शब्दं! ह्यात मुलगी नको हा सरळ हेतू असतो. म्हणजे लगेच कोणी प्रो-लाईफ होत नाही. सरसकट गर्भपाताला विरोध म्हणजे प्रो-लाईफ होईल, पण फक्तं स्त्रीभ्रूण आहे म्हणून केलेल्या गर्भपाताला प्रो-लाईफ कसे म्हणता येईल?
"त्यांचं त्यांना ठरवू द्यावं" हे कितीही लिबरल किंवा व्यक्तीस्वातंत्र्य सपोर्टिव वाटत असलं तरी भारतासारख्या देशात स्त्रियांना (एकवेळ शिक्षित आणि फायनाशिअली इनडिपेंडंट स्त्रीयांना सोडुन देऊ) घरच्यांच्या मर्जीला बळी पडावं लागतं. "प्रो चॉईस" आहात तर मग गर्भलिंगनिदान कशाला पहिजे? उगाच माझं शरीर माझी मर्जी असा विचार करताना ती स्त्री जेंडर डिस्क्रीमिनेशन का आणि कशी करु शकते?
>>भारतातील जोडपी नाईलाजाने
>>भारतातील जोडपी नाईलाजाने तसा विचार करतात कारण भारतात परिस्थिती भयानक आहे>> भारतात गर्भपात हा असा नाईलाज म्हणून करतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? काही संदर्भ असेल तर द्या. ते तसं अजिबात नसून मुलगा श्रेष्ठ इ. अत्यंत भ्मपक कारणामुळे गर्भपात होतात. (याला संदर्भ हवा असेल तर विचारा. ढिगाने पेपर्स आहेत.) ते रोखण्यासाठी कायदा आहे.
उगा रो ला विरोध आणि प्रो लाईफ लेबलं लावून काही फायदा नाही. भारत आणि अमेरिका तुलना अस्थानी आहे. दुसऱ्या बाजूला कायम शत्रू आहे. धोपटा! अशी बोंब ठोकण्यात काय हशील?
तुम्ही जेव्हा स्त्रीभ्रूण
तुम्ही जेव्हा स्त्रीभ्रूण'हत्या' असा शब्द वापरता that means you are pro-life. अरेच्चा!
मी प्रो लाईफ आहे की नाही हा माझा चॉईस नाही का? हत्या म्हटलं की प्रो लाईफ?
परदेशात जेंडर कळतं तरीही मोठ्या प्रमाणात तसे अबोर्शन होत नाहीत. भारतातील जोडपी नाईलाजाने तसा विचार करतात कारण भारतात परिस्थिती भयानक आहे. हे कशावरून?
खूप चांगली चर्चा. वाचत आहे.
खूप चांगली चर्चा. वाचत आहे.
भारत आणि अमेरिका तुलना
भारत आणि अमेरिका तुलना अस्थानी आहे. दुसऱ्या बाजूला कायम शत्रू आहे. धोपटा! अशी बोंब ठोकण्यात काय हशील?>>>>
+१११ खरं आहे. भारत आणि अमेरिका हे सांकृतीक, आर्थीक, सामाजीकदृष्ट्या खूप वेगळे आहेत आणि तुलना अस्थानी आहे.
प्रो लाईफ आहे की नाही हा माझा
प्रो लाईफ आहे की नाही हा माझा चॉईस नाही का >> नाही असं दिसतंय!
अमितव आणि वावेच्या लेटेस्ट
अमितव आणि वावेच्या लेटेस्ट पोस्ट्स मला झेपल्या नाहीत.
मी २० आठवड्याच्या आत केलेल्या गर्भपाताला विरोध करणार, हत्या म्हणणार आणि तरीही मला प्रोलाईफ म्हणायचं नाही हा हट्ट माझ्या आकलनाच्या बाहेर आहे.
भारतात परिस्थिती भयानक आहे हे लिहिलं त्यावर "हे कशावरून?' आणि 'पुरावे द्या' असं अर्ग्युमेंट आलेलं बघून हसावं का रडावं कळत नाही.
I totally give up. अजून मी दहा पोस्ट्स लिहूनही शून्य फरक पडेल.
मी २० आठवड्याच्या आत केलेल्या
मी २० आठवड्याच्या आत केलेल्या गर्भपाताला विरोध करणार, हत्या म्हणणार आणि तरीही मला प्रोलाईफ म्हणायचं नाही हा हट्ट माझ्या आकलनाच्या बाहेर आहे.>>>
२० आठवड्याच्या आत केलेल्या गर्भपातातचं कारण फक्तं गर्भाचं लिंग स्त्री आहे हे असेल तर त्याला हत्या का म्हणू नये?
सरसकट गर्भपाताला विरोध म्हणजे प्रो-लाईफ होईल, पण फक्तं स्त्रीभ्रूण आहे म्हणून विरोध केलेल्या गर्भपाताला प्रो-लाईफ कसे म्हणता येईल?
Statistical पुरावे असतील तर
Statistical पुरावे असतील तर द्या.
कशाचे कळलं नसेल तर .. >> भारतातील जोडपी नाईलाजाने तसा विचार करतात कारण भारतात परिस्थिती भयानक आहे. >> या कॉजॅलिटीचे.
मला वाटतं त्यांचा मुद्दा
मला वाटतं त्यांचा (वावे/अमित) वरचा मुद्दा बरोबर आहे. एका जुळणार्या मतामुळे एखाद्या व्यक्तीला अमुक एक समूहात (इथे प्रो लाईफ की काय ते - मला त्याचा अर्थ माहीत नाही) गणले जाणे आणि त्या समूहाची इतरही सर्वच मते त्या व्यक्तीचीही असतील असा समज करून घेणे - हा प्रकार त्या व्यक्तीला पटणार नाहीच. अमेरिकेतले प्रो लाईफवाले गर्भपाताला का विरोध करतात याची सर्व कारणं भारतातल्या स्त्रीभ्रुणहत्याविरोधी लोकांच्या मतांशी जुळणारी असतील असं नाही. त्यामुळे कॅतेगरायझेशन सोडून मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यास उत्तम हे मा वै म.
२० आठवड्याच्या आत केलेल्या
२० आठवड्याच्या आत केलेल्या गर्भपातातचं कारण फक्तं गर्भाचं लिंग स्त्री आहे हे असेल तर त्याला हत्या का म्हणू नये? >> ह्याचं उत्तर त्यांनी आधी दिलं आहे बहुतेक. त्यांच्या मते 'स्त्री गर्भ नको असणं' हा मातेचा चॉइस आहे. ज्याप्रमाणे इतर गोष्टी 'नको असणं' आणि त्यासाठी गर्भपात - हा चॉईस आहे, त्याचप्रमाणे अमुक एक लिंग नको असणं हा चॉइस आहे असा त्यांचा मुद्दा होता.
ह.पा., धन्यवाद. हेच म्हणायचे
ह.पा., धन्यवाद. हेच म्हणायचे आहे.
व्हाईटहॅट, जमल्यास पहिल्या पानावरचा माझा प्रतिसाद वाचून बघा. माझा गर्भपाताला विरोध नाही, गर्भ स्त्रीलिंगी आहे या कारणामुळे केलेल्या गर्भपाताला विरोध आहे.
आणि अमितने लिहिलंय त्याप्रमाणे, भारतातील जोडपी नाईलाजाने तसा विचार करतात कारण भारतात परिस्थिती भयानक आहे. >> हे कशावरून? असा प्रश्न आहे.
त्याचप्रमाणे अमुक एक लिंग नको
त्याचप्रमाणे अमुक एक लिंग नको असणं हा चॉइस आहे असा त्यांचा मुद्दा होता.>>
अच्छा! चॉइस नक्कीच आहे, दुमत नाहीच. अमेरिकेसारख्या देशात कोणी "मुलगी नको" असा विचार करत असेल तर त्या मागची पार्श्वभुमी ही भारतातल्या मुलगी नकोच्या पार्श्वभुमीशी सहसा जुळत नाही. भारतातल्या "मुलगी नको" मागचा विचार "फक्तं मुलगाच हवा" असा बव्हांशी असतो त्यामुळे खरंच "प्रो-चॉईस" मुळे असा निर्णय घेण्यात येत आहे ह्या बद्दल शंका असते.
गर्भपाताला विरोध नाही, पण गर्भ स्त्री आहे म्हणून केलेल्या गर्भपाताला विरोध आहे.
Ivf उपचार किंवा टेस्ट ट्यूब
Ivf उपचार किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे जर सामान्यांसाठी परवडण्यासारखे झाले आणि त्यात बाळाचे लिंग निवडण्याची सोय असली तर भारत सरकार ते बेकायदेशीर जाहीर करेल का ? बहुधा .. ही सोय हवी होती पण ... सध्या हे खर्चिक आहे पण कोणी कमी दरात उपचारांचा शोध लावला तर भारतातल्या प्रचंड मार्केट मुळे प्रॉफिटचा बिझनेस होईल .
भारत सरकार ते बेकायदेशीर
भारत सरकार ते बेकायदेशीर जाहीर करेल का ? >> कदाचित हो. 'मुलगा व्हावा' म्हणून सुचवले जाणारे उपाय असलेल्या पुस्तकांवर आणि संबंधित लेखकांवर कारवाई झाल्याची उदाहरणे आहेत.
चर्चा फक्त एकाच पॉइंट भोवती
चर्चा फक्त एकाच पॉइंट भोवती फिरणारं.
भारतात गर्भपात फक्त गर्भ स्त्रीलिंगी आहे म्हणूनच होतात.
असे आता काही होत नाही.
गर्भपात ची खूप अनेक कारणं आहेत.पण ती चर्चेत येणार च नाहीत.
Hemant 33..
Hemant 33..
कृपया लक्षात घ्या की गर्भपात हे अनेक कारणाने होतात हे इथे सर्वांनाच माहित आहे.
गर्भाचे लिंग स्त्री आहे या कारणाने गर्भपात करणे या आणि केवळ याच कारणाविषयी किंवा याच मुद्द्याला धरून ही चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे हे धाग्याच्या नावावरून स्पष्ट आहे.
त्यामुळे इथे केवळ गर्भलिंगचिकित्सा आणि गर्भलिंग स्त्री आहे म्हणून केलेला गर्भपात हा योग्य / अयोग्य / नैतिक / अनैतिक / कायदेशीर / बेकायदेशीर ही चर्चा होईल. तसेच आपण इतर कारणांचा वारंवार उल्लेख करणे हे येथे अवांतर होते आहे हे कृपया लक्षात घ्यावे ही नम्र विनंती ___/\___
भारतातील जोडपी नाईलाजाने तसा
भारतातील जोडपी नाईलाजाने तसा विचार करतात कारण भारतात परिस्थिती भयानक आहे. >> हे कशावरून? असा प्रश्न आहे.//
मला प्रश्न कळला नाही खरंच. भारतात परिस्थिती भयानक नाही, सर्व उत्तम आहे तरी उगाचच जोडप्याना मुलगी नको असते असं म्हणणं आहे का?
तुम्ही जनरल गुगल करून बघाल का- why Indians don't want female child.
भारतात गर्भपात फक्त गर्भ
भारतात गर्भपात फक्त गर्भ स्त्रीलिंगी आहे म्हणूनच होतात.
असे आता काही होत नाही. >>
असे म्हणने म्हणजे मांजराने डोळे मिटून दूध पिण्या सारखे आहेत. गर्भपात विविध कारणाकमुळे होतात, ते कोणीच नाकारत नाही. भारतात गर्भपाताला मान्यताही आहेच. पण त्यामुळे गर्भलिंगनिदान करुन गर्भ स्त्रीलिंगी आहे म्हणूनही मोठ्या प्रमाणात गर्भपात होत आले आहेत / होतात हे तुम्ही का नाकारताय?
प्रो चॉईस किंवा reproductive
प्रो चॉईस किंवा reproductive autonomy = letting the pregnant person decide whether to continue or terminate a pregnancy for any reason(s)- at least till the point of viability.
प्रो लाईफ वाले एकतर सर्व प्रकारच्या गर्भपाताचा विरोध करतात किंवा मग ते कारणं approve/reject करतात- त्यांना मान्य असलेल्या कारणांमुळे अबोर्शन केलेलं चालेल- त्यांना मान्य नसलेली कारणं असतील तर अबोर्शन करायचं नाही.
तिसऱ्या व्यक्तीने गर्भपात करायला तसा माझा विरोध नाही पण त्याचं अमुक कारण असेल तर मात्र मी विरोध करणार - याचा अर्थ त्या व्यक्तीची autonomy मला मान्य नाही. मी त्या स्त्रीची आणि तिच्या होणाऱ्या अपत्याची जबाबदारी काहीच घेणार नाही but still I will decide about her pregnancy.
मला वाटतं अनिर्बंध
मला वाटतं अनिर्बंध स्वातंत्र्य कुठेच शक्य नाही. देश-कालपरत्वे त्यावर बंधनं ही असणारच. ज्याप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य असले तरी कायद्याच्या चौकटीत बसणे बंधनकारक आहे, तसेच हे आहे. त्या चौकटीच्या बाहेरची कृत्ये संबंधित समाजाला हानिकारक आहेत या अभ्यासातूनच ते निर्बंध आले आहेत. परिस्थितीत बदल झाल्यास काळानुसार त्या बंधनांचा पुनर्विचार व्हावा व आता लागू न होणारी बंधनं झुगारून द्यावीत - हे योग्य आहेच. पण स्त्रीभ्रुणाच्या बाबतीत ते बंधन झुगारून सरसकट मातेचं स्वातंत्र्य अनिर्बंध असावं अशी वेळ भारतात यायला अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल. अमेरिकेत माहिती नाही.
'अमुक एक कारण असेल तर मी विरोध करणार' - या विचारामागची पूर्वपिठिका ही आहे. आता 'हे निर्बंध नसतील तर समाजाला हानिकारक होईल' हा निष्कर्ष काढणारे तुम्ही-आम्ही कोण - हा प्रश्न आहेच. तर तो अभ्यास संबंधित जाणकारांनी केला आहे आणि त्यातून कायदे निर्माण झाले. त्याला देशातील पुरुष आणि स्त्रिया - दोघांचा पाठिंबा आहे, केवळ पुरुषांचा नाही - हे लक्षात घ्यावे.
१. भारतात स्त्रियांची स्थिती
१. भारतात स्त्रियांची स्थिती भयंकर वाईट आहे.
२. याला कारण अर्थातच भारतीय पुरुष आणि पुरुषप्रधान संस्कृती आहे.
३. मी एक स्त्री आहे . १ मुळे मला मुलीला जन्म द्यायचा नाही.
४. पण मला मुलग्याला मात्र जन्म द्यायचा आहे.
५. हा मुलगा एका किंवा काही मुलींना त्या वाईट स्थितीचा अनुभव यायला कारण ठरणार आहे. तरी मला त्याच्याशी देणंघेणं नाही.
ओघतक्ता बरोबर आहे ना?
१) गर्भलिंग चिकित्सा करणे
१) गर्भलिंग चिकित्सा करणे भारतात बेकायदेशीर आहे.( पळवाट लोक काढत असतील तर तो वेगळा भाग)
२) आता सरासरी एक किंवा दोन च मुल असतात .त्या मध्ये पाहिले अपत्य स्त्री असू की पुरुष स्वीकारले जाते.
स्त्रीलिंगी आहे म्हणून कोणी गर्भपात करणार नाही.
३) ज्याला तीन चार मुलीचं आहेत आणि
एक तरी मुलगा हवा आहे म्हणून गर्भलिंग माहीत करून भारतात गर्भपात होत असतील.
तर अशा स्थिती मध्ये त्याला परवानगी असावी असे मला वाटतं
@हरचंद पालव - खूप सुंदर
@हरचंद पालव - खूप सुंदर प्रतिसाद! वाक्यावाक्याशी सहमत.
Pages