घरमालक सदनिकेत स्वतः रहात नाही. तो स्टाफला रहायला जागा देतो.

Submitted by मेधावि on 14 July, 2022 - 02:56

आमचा पण फ्लॅट आहे अशा एका बिल्डींगमधे एका बड्या हाॅटेलमालकाने एक फ्लॅट विकत घेऊन त्यात त्याच्या हाॅटेलचा पाच सहाजणांचा स्टाफ भरून ठेवलाय. कोणीही कधीही येजा करतात. सुरक्षितता, पाणी पुरवठा सगळ्यावर ताण येतोय. ह्याबाबत सोसायटीला काय अधिकार असतात?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा पण फ्लॅट आहे अशा एका बिल्डींगमधे>> असे किती फ्लॅट आहेत.
एका बड्या हाॅटेलमालकाने एक फ्लॅट विकत घेऊन त्यात त्याच्या हाॅटेलचा पाच सहाजणांचा स्टाफ भरून ठेवलाय.>> रेसिडेन्शिअल सोसायटी आहे ना. मग इशू काय आहे?

कोणीही कधीही येजा करतात. सुरक्षितता, पाणी पुरवठा सगळ्यावर ताण येतोय>> ते हॉटेलच्या शिफ्ट प्रमाणॅ जाये करणार पोलिस नर्स एअर होस्टेस हॉटेल स्टाफ हे शिफ्ट वर काम करत असतात ते ९ ते ५ टाइ म टेबल पेक्षा वेगळे असते. दारु पिउन येतात का? सुरक्षिततेवर काय ताण येतो?

. ह्याबाबत सोसायटीला काय अधिकार असतात?>> सोसाय टीचे चेअर्मन काका काय म्हटले. ते लिहा म्हणजे चर्चा करता येइल.

मेंढर भरती हे अपमानास्पद आहे. ती पण माणसेच आहेत की.

मेंढर भरती हे अपमानास्पद आहे. ती पण माणसेच आहेत की. >> हो हे अपमानास्पद आहे

काही कुटूम्बात ८-१० माणसे राहतात, ते पण कोणीही कधीही येजा करतात, त्यांचाही ताण सारखाच येत असेल, दारू पण पित असतिल...
तुम्ही उगाचच त्रास देताय का फ्लॅट मालकांना?

1. मालक स्वतः तिथे रहात नाही.
2. तो तिथे कोणालाही ठेवतो ज्यांची माहीती सभासदांना नाही.
3. उद्या रहाणा-यांपैकी कोणी काही उद्योग करून नोकरी सोडून पसार झाला तर?
4. तीन खोल्यांत गरजेला दहाजण पण राहू शकतात. हाॅटेलमालक तर दहा जणांनाही एका खोलीत कोंबू शकतो. हे सर्व इतरांना अनोळखी, पोटापाण्यासाठी कुठून कुठून आलेले.

नियम असतात का काही ह्यासाठी प्रश्न विचारलाय. माहीतगारांनी उत्तरं दिली तर आनंद वाटेल.

असे किती फ्लॅट आहेत>> असतील दहाबारा Happy

तो तिथे कोणालाही ठेवतो ज्यांची माहीती सभासदांना नाही. >> भाडेकरू ठेवताना त्यांच पोलिस verification करणं घर मालकांवर बंधनकारक आहे, हा नियम इथेही लागू होइल

बाइलॉच्या पुस्तकात 'कुटुंब' याची व्याख्या दिली आहे. राहणारी मुले 'माझी family membersच आहेत" असं म्हणाला तर केस फारच गुंतागुंतीची होईल.
तो माणूस मेंबर म्हणून सोसायटीत आला असेल तर तो कुटुंबासह राहू शकतो.
पण त्याने तो flat एक corporate body म्हणून घेतला आहे का पाहा.
तर अलोटमेंट लेटरमध्ये उल्लेख असेल.

ते पाहून कमिटी मिटिंग मध्ये ठराव पास करावा "अमुक मेंबर त्यास रहिवासासाठी दिलेल्या सदनिकेचा गैरवापर करत आहे त्यास तसे अटीभंग कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी."

मग सेक्रेटरीने एका पत्राद्वारे " अमुक तारखेच्या कमिटी मिटिंगच्या अमुक ठरावाप्रमाणे ही नोटीस पाठवत आहे" करावे. सोबत त्या दिवशीच्या कमिटी मिटींगच्या मिनिट्सची ( कमिटी मेंबरांच्या सह्या असलेली) फोटोकॉपी जोडावी. या कॉपींवर राउंड सील शिक्का आणि चेअरमन सेक्रेटरीची सही असावी. एक प्रत 'मेंबराशी पत्रव्यवहार' फाइलीत लावावी.
पुढच्या मिटींगमध्ये अशी नोटीस देण्यात आल्याचा उल्लेख करावा.
बऱ्याच बेकायदेशीर बाबी प्राथमिक नोटिशिंतच सुटतात.

वकीलांच्या नोटीसा देण्याची सुरवातीला गरज नसते.

आमच्या सोसायटीने पहिल्याच वर्षी मालकांकडून घरात कोण राहतं याची माहिती फॉर्म भरून घेतली होती. सर्वांचे आधार / पॅन / ड्रायव्हिंग लायसेन्स / इलेक्शन कार्ड यापैकी एक घेतले होते. एका फ्लॅटमधे चार भाऊ, बायका मुलं असे १९ जण राहतात. त्यांच्या बद्दल हीच तक्रार होती.
आता उलट हे १९ जण अधिकृत झाले आहेत आणि माझ्या आई वडलांना इथे आणण्यासाठी मला सोसायटीची परवानगी लागणार आहे. Lol
पाणीवाटप समसमान हवे असेल तर पाण्याला मीटर बसवणे हा उपाय आहे.

प्रत्येक सोसायटीचे आपापले नियम असतात. व ते बंधन कारक असतात. जिथे हा फ्लॅट आहे त्या सोसाय टीत अशी काही नियम पत्रिका असेल ना. त्यात बघितले पाहिजे. पोलिस व्हेरिफिकेशन मुंबईत बंधन कारक आहे.

नाहीतर हे बघा. सोसायटी चेअरमन काकाला द्या हे प्रिंटाउन्ट
https://mahapanan.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/MCS%20Bare%20Act%20a...

सोसायटीचे आपापले नियम असतात . . .
नाही. एकच बाइलॉ असतो. तीच नियम पत्रिका .
दोनच पर्याय आहेत - या लोकांना त्याने flat भाड्याने दिला आहे हे लीव लायसन अग्रीमेंट आणून देणे. किंवा हे माझे कुटुंबातील लोक आहेत हे सांगणे.

Srd,
म्हणजेच मालक बिनभाड्याचे आणि न-नातेवाईक घरात ठेऊ शकत नाही हे बरोबर?

हा माणूस म्हणतो की मी मालक...मी कोणालाही ठेवेन.

न नातेवाईक म्हणजे काय ?

एम्प्लॉयी इम्पोयर हेही कायद्याने नाते आहे

It is called Vicarious relation ship , a relationship developed due to some legal responsibility

घरात कुत्री मांजरं गाई म्हशी ठेवतात, ते रेशन कार्डावर नातेवाईक म्हणून नोंदवतात काय ?

म्हणजेच मालक बिनभाड्याचे आणि न-नातेवाईक घरात ठेऊ शकत नाही हे बरोबर? >>> पोलिस व्हेरिफि केशन बन्धन्कारक आहे इमिडिएट फैमिली नसेल तर . बिनभाड्याचे आणि न-नातेवाईक घरात ठेऊ शकतो पोलिस व्हेरिफि केशन असेल तर !
बिनभाड्याचे का नाहि हा इन्कम्टैक्स चा प्रश्न आहे पोलिसांचा नाहि !
सोसायटीला त्रास होत असेल (दारु पिउन गोंधळ घालणे वगैरे प्रकारातले) तर तक्रार करा

आमच्याकडून पॉर्म भरून घेतला त्यात प्रत्येक मेंब्राचे मालकाशी असलेले नाते पण लिहायचे होते. डिपेंडंट किंवा रक्ताचा नातेवाईक नसेल तर सोसायटी मेन्टेनन्स चार्जेस १०% जास्तीचा घेणार. तशी सोसायटी फ्लेक्झिबल आहे. पण हा नियम कितपत कायदेशीर आहे याची शंका आहे.

आधीचं घर जिथे आहे त्या सोसायटीत एकाने रस्त्याला भला मोठा मॉल सुरू केला आणि आमच्या सोसायटीतला एक तीन मजली बंगला विकत घेतला. दोन मजल्यावर पोती भरलीत आणि वरच्या मजल्यावर नोकर राहतात. सोसायटीने खूप नोटीसा दिल्या. शेवटी प्रत्येकाची चौकशी केली तर सगळे नोकर गावावरून (राजस्थान) आणलेले. ते नात्यातलेच होते. वकील पण आला होता त्याचा. काही नाही करता आलं.

अजून एका सोसायटीत नियम वाचला , फक्त कपल अलाउड
एकटा असेल तर नाही.

मी असतो तर सरळ देशाचे पंतप्रधान आणि सौ पंतप्रधान एकेकटे वेगळ्या सोसायटीत रहातात म्हणून अर्ग्यु केले असते.

आणि मग जे आज कपल आहे, त्यातला एक गचकला तर दुसरा घर सोडून जाणार का ?

कोर्टात नाही गेलं कुणी. वकीलाने सोसायटीला अ‍ॅक्शन घेऊ दिली नाही इतकेच. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांकडे कायदेशीर लढाया खेळायला वेळ नाही. मी सध्या तिथे राहत नसल्याने जास्त डिटेल मधे माहिती देऊ शकत नाही. जेव्हढे ऐकले तितकेच इथे लिहीले.

बाइलॉजप्रमाणेच सोसायटी चालते. काही बेकायदा नियम सभेत संमत करतात तरीही अंतिम अधिकार उपनिबंधक - सहकारी गृह संस्था यांचेकडेच असतात. बाईलॉजमध्ये बदल ( amendments) सभेत केल्यावर उपनिबंधकाला कळवून होकार घेतल्यावरच अधिकृत होतो . पण कुणी तक्रार केली तरच त्यांना कळते आणि रद्द का करू नये ही नोटीस येते.

वरच्या केसमध्ये त्या सभासदाने अगदी नियमावरण बोट ठेवल्याने काही करता आले नाही. ती माणसे त्याची नातेवाईक हे अफिडेविटच केले असेल. तर ते challenge कोण आणि कसे करणार.

शिवाय नियमाप्रमाणे नातेवाईक ठेवले तरी त्यांना वाटेल तशी दंगामस्ती करून इतर सभासदांना त्रास देण्याचे हक्क नसतात. म्हणजे action घेता येतेच.

शिवाय नियमाप्रमाणे नातेवाईक ठेवले तरी त्यांना वाटेल तशी दंगामस्ती करून इतर सभासदांना त्रास देण्याचे हक्क नसतात. म्हणजे action घेता येतेच. >>> ती पोलिस केस झाली !

<< हा माणूस म्हणतो की मी मालक...मी कोणालाही ठेवेन. >>
बरोबर आहे त्याचे म्हणणे. घरात कुणी राहायचे, ते सोसायटीने ठरवू नये.

पोलिस केस!!

काही बायकांना खलबत्त्यात मसाले कुटण्याची भारी हौस. खालच्या ब्लॉकवाल्यांना त्रास होतो. यावर पोलीस कंम्प्लेंट करायला गेल्यावर पोलीसांनी हाकलले. या गोष्टी "सोसायटीतल्या लोकांनीच सोडवायच्या" आम्ही खून,दंगे,फसवणुकीचे तपास करायचे का हे करायचे?

मी असतो तर सरळ देशाचे पंतप्रधान आणि सौ पंतप्रधान एकेकटे वेगळ्या सोसायटीत रहातात म्हणून अर्ग्यु केले असते.>> Lol यांना कोणताही विषय द्या. सोयीस्कर वळण देतात. सर मानलं तुम्हाला.

काही बेकायदा नियम सभेत संमत करतात तरीही अंतिम अधिकार उपनिबंधक - सहकारी गृह संस्था यांचेकडेच असतात. >>> +१

काही बेकायदा नियम सभेत संमत करतात तरीही अंतिम अधिकार उपनिबंधक - सहकारी गृह संस्था यांचेकडेच असतात. >>> +१

आमच्याही मुंबईच्या बिल्डींगमध्ये हीस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर राहायच्या. बिल्डींमधील लोकं त्यांना नर्स म्हणायचे. दोन फ्लॅटमध्ये प्रत्येकी ४-४ अश्या ८ जणी होत्या. तेव्हा भाडे साधारण २८ हजार होते. म्हणजे हॉस्पिटल प्रत्येकी ७-७ हजार खर्च करून त्यांना जागा द्यायचे. फ्लॅट हॉस्पिटलचे नव्हते. घरमालक दुसराच होता..आम्हाला पर्सनली त्या नर्सेसचा सॉरी लेडी डीक्टर्सचा त्रास झाला नाही. कारण त्या शांतपणे यायच्या शांतपणे जायच्या. बिल्डींगमध्ये पाणी चोवीस तास होते आणि मुंबई असल्याने मुबलक होते. पण तरीही कधी काही कारणाने तासाभरासाठीही पाणी गेले तरी बिल्डींगमधील काही बायका त्या मुलींनाच दोष द्यायच्या. त्या नर्सेस दिवसातून चार चार वेळा शॉवरखाली आंघोळ करतात त्यामुळे पाणी संपते म्हणे.

पण येस्स, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बाप्या पोरांचा त्रास होऊ शकतो. ते अनसेफ वाटू शकतेच. जर सर्वच सोसायटी एकमताची असेल आणि खरेच तिथे राहणारे तसेच त्रासदायक ठरण्याची शक्यता असेल तर सारे मिळून त्या घरमालकावर दबाव आणू शकतात. एकटा माणूस नाही फार काळ टिकू शकत जर सारेच विरोधात असतील तर.

NOC ( 10% of basic maintenance)घेऊ शकता आणि aadhar. त्याने थोडा दाब राहील.

पोलिस व्हेरिफिकेशन साठी दबाव आणता येतोय का पा हा. म्हणजे रहानार्यांवर दबाव ये ओ शकतो नीट वागण्याचा.
लहान मूल वगैरे असतील तर अशा केस मध्ये टेन्शन येणे स्वाभाविक वाटते

आमचे एक नातेवाइक ह्यांनी पूर्वी एकदा रिलायन्स धाबा चालवायला घेतला होता. तेव्हा ओरिसातील लोकांची एक टोळीच अशी हॉटेलातील कामाला घेतली होती. ह्यांची मँनेजमेंट फार अवघड काम आहे. एकतर हे फार गरीबीतुन येतात व अगदी थोड्यास्या पगार वाढीवर एकदम सर्व गँग सोडून जाउ शकते व ही ही तशीच गेली. परत राहणी काही धुवट मध्यमवर्गीय स्वच्छतेची आजि बात नसते. असे झुंडीने राहाय्चे मग कसे. दयनीयच परिस्थिती असते. स्किन व इतर इन्फेक्षनस असतात. व ते बरे करायला योग्य वैद्यकीय सुविधा मालक उपलब्ध करीलच असे नाही. बरे काम लांब शिफ्ट व जोखमीचे( किचन मध्ये बारा तास पोळ्या लाटणे. घामाघूम होईल असे काम. कमी जागेत. डोके फिरेलच असे वातावरण असते. इतर इच्छांचेही दमन होतच असते.

ह्या नातेवाइकांनी पूर्वी आर्मीतील जवान हँडल केलेले. जवानां ची शिस्त व अ‍ॅबिल्टी त्यांना उपलब्ध असलेली राहणी व हेल्थ केअर बॉसचे ऐकायचेच ही मानसिकता ह्याचा व वरील परिस्थितीचा काहीही संबंध नाही त्यामुळे त्यांना ही वरील टीम मॅनेज करायला अवघ्ड जाउ लागले.

होटेलचा स्टाफ साधारन हॉटेलच्या वॉकिन्ग डिस्टन्स मध्ये जवळ ठेवावा लागतो.

मुख्य म्हणजे हे लोक कधीही प्रचंड रागावु शकतात अगदी छोट्या कार्णाने. व हातात सुर्‍या कात्र्या असतातच. त्यामुळे त्यांना अ‍ॅप्रो च करताना
काळजी घ्या. सोसायटी चेअरमन काकांना ही सूचना नक्की द्या.

त्या नातेवाइकांनी प्रचंड उत्साहाने सुरू केलेला धाबा वर्श दीड वर्शात बंद पडला आर्थिक नुकसान आजारपण पदरी पडले. सर्व पदरचे नोकर लगेच सोडून दुसरी क्डे लागले पण.

रिलायन्स धाबा >> सातारा रोडचा पहिला रिलायन्स पेट्रोल पंप. तिथे काही काळ ढाबा सुरू होता. तो पंप आम्ही बांधला आहे.