ओट्स-नट्स लाडू

Submitted by mrunali.samad on 12 July, 2022 - 06:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि शाळेतून आल्यावर काहीतरी नवीन खायला दे हि मागणी सुरू झाली
नेहमीचे रवा-नारळ-गुळ लाडू, शेंगदाणे-गुळ लाडू करून झाले.नवीन काय बनवावे म्हणून युट्युबवर पाहताना दोन तीन ओट्स-ड्रायफ्रुट्स रेसिपीज सापडल्या. त्यातलं घरात जे उपलब्ध होतं त्यातून हे लाडू बनवले.

● अडिच वाटी रोल्ड ओट्स, कोरडे भाजून.
● अक्रोड, बदाम,पिस्ता पाऊण वाटी, कोरडे भाजून.
● तीळ पाव वाटी भाजून
● गुळ एक-सव्वा वाटी
● इलायची पावडर-अर्धा छोटा चमचा
● पळीभर तुप

क्रमवार पाककृती: 

● ओट्स मिक्सरमध्ये फिरवून घेणे
● ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये अर्धवट फिरवून घेणे
● गुळ मिक्सरमध्ये फिरवून घेणे
● वरील सर्व साहित्य आणि इलाईची पावडर हाताने मिक्स करून घेणे.
● लागेल तसं तुप घालून लाडू वळले कि झाले, खायला लाडू तयार.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके
माहितीचा स्रोत: 
मी आणि युट्यूब.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

आज ज्वारीचे पीठ भाजून केले होते , सेम असेच झाले होते

समजा ज्वारी बाजरी गहू तांदूळ डाळ अशी पीठे भाजून ठेवली आणि सकाळी फक्त तव्यात पीठ आणि तूप/ तेल ,गुळ घालून गरम केले की लाडू तयार , असे करता येईल का ?

अशी भाजकी पीठे किती दिवस टिकतील

दुपारी लंचला 4,5 खायचे

मस्तच.
कालच ओटस् च्या काही जुन्या पाकृ चाळत होते. आता हीपण try करेन.
ओटस् भाजून नाही का घ्यायचे ????

छान , सुटसुटीत रेसिपी मृ.
ओटस् भाजून नाही का घ्यायचे ????>> कोरडे भाजून घ्यायचे, साहित्यातच लिहीलंय. Happy
मी ओटस् चं काहीच ट्राय नाही केलं कधी, बघते करून.

Screenshot_20220712-212747_Gallery.jpg
मी लगेच बनवले thank यू मृ..
छान झाले ..

धन्यवाद Blackcat, शांप्रा, अमुपरी,स्वस्ति,धनुडी, मनीमोहोरतै.
अमुपरी मस्त दिसताहेत लाडू.

मस्त आहेत लाडू मृणाली. अमुपरी लगेच ट्राय पण केले, सहीच.

एकदम न्यूट्रिशिअस आहेत लाडू, मृणाली ! चवीला साधारण ग्रनोला बार्ससारखे ( का तीळ आहेत म्हणजे aussie bites ?) लागतात का ?
फोटू आवडला. Happy

काय सुंदर दिसतयात लाडू. एकूणच कुठलेही लाडू मला खूप आवडतात. पण माझ्या ओट्सच्या सगळ्या पाककृती फेल होतात. एकदा ओट्स इडली केलेली ती तर एकदम फ्लॅट झालेली. पण हे लाडू नक्क्की करून पाहीन.

थँक्यु लंपन, ऋन्मेष, प्रज्ञा,राधिका,अमा,आ_रती!

@राधिका
ग्रनोला बार्स, aussie bites कसे लागतात? खाल्ले नाहीत कधी...
हे लाडू चवीला म्हणाल तर शेंगदाणे लाडू किंवा नारळाच्या लाडूसारखे मस्त लागत नाहीत.. ओट्स आणि अक्रोडामुळे जरा बोअरच लागतात पण इतर नट्स गुळ,तीळ,तुप तरून नेतात...युट्यूब विडिओजमधे लोकांनी शेंगदाणे,सुके खोबरे, जवस पण भाजून बारीक करून वापरले.. गुळाऐवजी खजूर वापरलेत..पुढच्या वेळी वेरिएशन्स करून बघता येतील.

उपवासाच्या जेवणाच्या गडबडीत बनवलेच शेवटी.
दीड कप ओटस् घेतले , छोटे छोटे बारा लाडू झाले.
चार बाजूला काढलेत . Happy
मी आज चव घेतली नाही , उद्या ज्यु. मेंबराला देण्यात येईल.
IMG_20220716_210035.jpg

स्वस्ति, लाडू छान दिसताहेत !
@मृणाली
ही बघ ग्रनोला बार्सची रेसिपी !
मी aussie bites साठी ही रेसिपी फॉलो करते. थंडीच्या दिवसांत सनफ्लॉवर सीड्सऐवजी भाजलेले तीळ वापरते.
मुलांच्या after school activities, कारमध्ये पटकन काही खायला, trail / hikingसाठी हे एकदम सुपर फूड आहे. Happy

मस्त.