
दहा बारा छोटे ( लिंबा एवढे ) बटाटे. ( तसे नसल्यास तेवढ्या आकाराच्या फ़ोडी किंवा एक सेमी जाडीच्या चकत्या, चार मोठ्या बटाट्यांच्या ), एक पालकाची जुडी ( पाने बारिक चिरुन घ्या ) (फ़्रोझन वा टिनमधला पालक चालेल). एक मोठा कांदा, चार पाच लाल मिरच्या. मीठ, हिंग, धणा जिरा पावडर दोन चहाचे चमचे. अर्धा ते पाउण कप साय ( किंवा क्रीमचा टिन, किंवा पाउण कप डबल क्रीम ), तूप वा बटर.
बटाट्याची साले काढून घ्या. कांदा बारिक चिरुन घ्या. तूप वा बटर तापवून त्यात थोडा हिंग घाला व चिरलेला पालक घाला. ( फ़्रोझन वा टिनमधला पालक वापरत असाल, तर हे केले नाही तरी चालेल ) झाकण न ठेवता परता. रंग बदलला कि काढून घ्या. लाल मिरच्यांची फ़ोडणी करुन मग त्यात कांदा घाला. तो गुलाबी झाला कि बटाटे घाला. मंद आचेवर परतून बटाटे सोनेरी करुन घ्या. मग त्यात फ़ोडी बुडतील एवढे पाणी घाला. एक उकळी आली कि पालक घाला. उकळू द्या. फ़ोडी नरम शिजल्या कि मीठ घाला. मग गॆस अगदी मंद करुन क्रीम घाला. क्रीम घातल्यावर उकळायचे नाही. (नाहीतर तूप वेगळे होते ) नुसतेच गरम करा. मग खाली उतरुन वरुन धणा जिरा पावडर घाला.
सौम्य चवीची हि भाजी दिसतेहि छान आणि लागतेही छान. पराठ्यांबरोबर छान लागते. हवे तर यात थोडे आल्याचे बारिक तुकडे वा लसुण घालता येईल. पण बाकि मसाले शक्यतो नकोच.
मस्त
मस्त वाटतेय. करुन बघेन पालक असेल तेव्हा.
दिनेश, काल
दिनेश, काल केली होती भाजी. आवडली. मला खूप माईल्ड खायचा मूड नव्हता म्हणून कांदा परतून त्यावर लाल तिखट, थोडा गरम मसाला आणि धणे-जिरं पावडर घालून जरा तिखट केली भाजी. तुपाची फोडणी आणि क्रिमचं कॉम्बिनेशन चांगलं लागलं.
मला पण
मला पण आवडली रेसिपी, माझी एक मैत्रिण अशीच बनवते फक्त रसभाजी नाही तर सुक्की करते.
चांगली लागते.
आज ही भाजी केली. क्रिमऐवजी
आज ही भाजी केली. क्रिमऐवजी दूध घातलं आणि लाल मिरच्यांऐवजी लाल तिखट. मस्त झाली आहे भाजी.

पाककृती छान आहे. वरच्या
पाककृती छान आहे. वरच्या फोटोतसुध्दा मस्त दिसतेय.
मी ह्याच्या अगदी उलट
मी ह्याच्या अगदी उलट करते.ब्लाँच पालक + आल्+लसुन +मिरची पेस्ट परतुन वरुन तळलेले बटाटे+ मसाले+शेवटी क्रीम.हिरव्या गेव्ही ची भाजी होते.
मंजुडी >>> ह्या भाजीचा रंग मस्त आला आहे.एकदा नक्की करुन पाहीन.
छान
छान