टैरो गूढ़ विद्या भाग १

Submitted by Keetaki Bapat on 28 June, 2022 - 03:42

नमस्कार मी केतकी बापट

आज मी तुमच्या साठी एक नविन माहिती घेऊन आले आहे. नविन अशासाठी म्हंटले कारण मला एका दिवसात ४ लोकांनी हा प्रश्न विचारला की टैरो म्हणजे काय? कदाचित काही मैत्रिणींना याबद्दल माहितही असेल. तर जास्त प्रस्तावना न करता मी विषयला सुरुवात करते.

टैरो भाग -१
तर वाचकहो टैरो या विषया वर मी लिहिणार आहे. टैरो ही एक गूढ़ अशी ज्योतिष सांगणारी विद्या आहे. गूढ़ म्हणजे याचा सम्बन्ध तंत्र मंत्र किंवा वाईट गोष्टी असा नाही. जसे आपले ज्योतिष शास्त्र आहे तसेच. परन्तु हे शास्त्र जास्तीत जास्त ३ ते १२ महिन्या पर्यन्त चे भविष्य सांगू शकते.
टैरो ची सुरुवात कशी झाली याची कुठेही नोंद नाही आहे. परन्तु भारता मध्ये व पूर्वेकडील देशात प्राचीन काळात ही टैरो पद्धत अस्तित्वात होती.
शेकडो वर्षापासून जवळ १७०० ते १८०० काळापासून भविष्य सांगण्यासाठी, स्वविकासासाठी, टैरो चा वपर होतो आहे. टैरो चा मनोचिकित्सा, भविष्य, अंकज्योतिष, ख्रिश्चानांची गूढ़ आध्यात्मिक उपासना, तत्त्वज्ञान व इतर प्रथाशी सम्बन्ध आहे. प्राचीन काळात इजीप्त मधील लोक या कार्ड्स चा मनोरंजन चे खेळ म्हणून करत असत.
टैरो मधे एकूण ७८ कार्ड्स असतात त्यात २२ कार्ड्स मेजर अर्काना म्हणून ओळखले जातात काही लोक सांगतात ही कार्ड्स जी फार महत्वाची आहेत ती भगवान विष्णु नी दिलेली आहेत. ( याची कुठेही नोंद नाही) आणि बाकी ५६ कार्ड्समाधे प्रत्येकी १४ कार्ड्स ऐसे ४ संच असतात. एका अर्थी चार विविध अंगानी आपल्याला बंदिस्त करणाऱ्या ह्या तत्वांचा ह्यामधे सर्वांगीण विचार आहे. अर्थ - धर्म - काम - मोक्ष आशा चतुर्भुजांचा विचार केला जातो. अणि या चार तत्वाना वांड्स - अग्नितत्व, स्वोर्ड्स - वायुतत्व, कोइन्स - पृथ्वीतत्त्व अणि कप्स- जलतत्व.
क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्त्यासारखे कार्डस आपणच काढायचे आणि त्यावरून आपले भविष्य ठरते हे लॉजिक पटत नाही.
पण त्या कार्डात नक्की काय असते याबद्दल उस्तुकता आहे.

शांप्रा प्रश्नाचे उत्तर पहा
______________________________

टैरो विषयी खुप साऱ्या मुव्ही मध्येच फक्त पाहिले तितपतच माहितेय पण प्रत्यक्ष अनुभव नाही. अचूकता आणि विश्वासार्हता बद्दल खखोदेजा. पण टैरो आणि प्लांचेट विषयी विरंगुळा म्हणून वाचायला आवडेल.

भाग १ असे शिर्षकात लिहिले तर एकंदर मालिकेतील मागीलपुढील लेख शोधायला सोपे जाईल.

रोचक विषय. माझा ह्या आणि तत्सम प्रकारांवर विश्वास नसला तरी हे नक्की आहे काय हे वाचायला आवडेल. हा भाग फारच छोटा वाटला, आणखी सविस्तर लिहिले असते तरी चालले असते. टॅरोचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल.

तळटीप - तो उच्चार मी 'टॅरो' असाच ऐकला आहे. तुम्ही अ‍ॅ लिहिता आला नाही म्हणून हिंदी लोक लिहितात तसं टैरो लिहिलं आहे की त्याचा मूळ उच्चारच टै (कैलास मधल्या कै सारखा) आहे?

जेम्स बॉन्डच्या एका सिनेमात आहे. जेम्सने काढलेले कार्ड पाहून टारो सांगणारी बाईच घाबरते असे दाखवले आहे. पुढे तसेच होते.
------------
काही घटना या टारो कार्डाप्रमाणेच पूर्वसूचना देतात. सावधान,मार्ग बदला किंवा प्लान १०० टक्के होणार नाही याची झलक.

तूफान, इन्ट्युशन टॅप करतात ही कार्डस असा अनुभव आहे. मात्र जर तुम्हीच जर संभ्रमित असाल तर काहीच उपयोग होत नाही. अर्थात बहुधा स्वतःचं अति सेन्सिटिव्ह रीडींग स्वतःला करता येत नाही.

मुहूर्तासारखं टॅरो नाही.
एखादं काम केल्यानंतर, अँटिसिपेशनमध्ये मनाची जी भिरभिर अवस्था होते त्यामध्ये हे कार्ड मार्गदर्शन करतं असा माझा अनुभव आहे.
म्हणजे काय करा/ करु नका/ केव्हा करा सांगत नाही.
पण केल्यानंतर काय फल निष्पत्ती होणारे ते मात्र अचूक येते.

के डी पाठकच्या एका केस मधे होती एक टॅरो कार्ड रीडर.
के डी पण काही कमी नव्हता. विदाउट कार्ड त्याला सगळं कळायचं.

के डी पाठकच्या एका केस मधे होती एक टॅरो कार्ड रीडर.
के डी पण काही कमी नव्हता. विदाउट कार्ड त्याला सगळं कळायचं.

<< परन्तु हे शास्त्र जास्तीत जास्त ३ ते १२ महिन्या पर्यन्त चे भविष्य सांगू शकते. >>
बाकी काही म्हणा, पण या सूडोसायन्सला शास्त्र म्हणू नका ओ.

टॅरॉट ही गूढविद्या एक्स्प्लोअर करुन खरे तर एकच वर्ष झालेले आहे पण नक्की आठवत नाही की मी कशी ओढले गेले. हां क्वचित हा प्रकार हाताळावासा वाटत असे पण नॅह!! काही अर्थ नसेल त्यात म्हणुन मी टाळत होते. हां आत्ता आठवलं न्यू जर्सीच्या एका, मी न्यू एज शॉपमध्ये दगड, खडे, उदबत्ती, कवड्या, धूप आणि function at() { [native code] }तरे, साबण निरनिराळी पोशन्स, पुस्तके पहात होते. आणि माझी नजर 'Deviant Moon' डेकवरती पडली. त्या संचावरचे चित्रच इतके लक्षवेधी होते की मी तो संच विकत घेतला. त्यावर सराव करु लागले. आणि खरच टॅरॉटचे प्रेडिक्शन, पटू लागले. अचूक उत्तरांमुळे, अक्षरक्षः व्यसन लागले. कार्डस आपल्याशी बोलतात हे खरे आहे. उदा -
एकदा मी विचारले की माझा दिवस कसा जाईल आणि हे ७ स्वोर्डस कार्ड आले.
https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczM-RxAIiOFXGswTMbHp28gLK4XTv5EqP7jEevyz6JqVIK7P62ukR2Gf8mpcQjqpqhxHBUJzbYOijEHLNaut4BS26-XQKXodSDsfo6YIrwQykMxsxB8wPmD1sr7XvHKy6mus6oUG0Mw_WB7X_BJsV92J3XV38nMa66Wa_tAwTi6_qrD90RxjTsIQEbzgrK2lTQGcCsSlUdSvXjpQ_PISTx7nn9K2ntAm79Fk7hK7weKRqodQWO5XVuFsu9tQo-ylYGbbvKOyGimMV9EHDGhQ_o4SFzFgMp70fDJz14DtIYdwQtqwqPibpdERsXeEavQrn-5e0stu9ZIR83cvccOxNBNbpiyNL76lYD5R-aF2zMoyiC5kfuql_UrQs4o3Vwn7gaG1WpcdIpn5lRP8raEknJ5n8WtKnb3mZWI1syH9VlUPvaTlZ-tKV8TdiwIbPXQpyfz_ACo7uuoKGH3wbWGnV7TZ6wuCluQNyJRBWCbZ_Cf8vO-RGQt5BAGmrU76JdKqfPlGhjictgtds6cLYq4o0zQaC4etsbjGXrsyrW7VowiKljdJM6fRvEXmDFRVrccX3ps-_SqzxXJLQyXdLYPX7ryn5o1--LwnMIlMQHddSBeA9zb1lH2KDJnJPSH2M_R7tElQoobV998KBIHLdw3g9jNU3pP87bWDSWo96e7325jDuhsEY7n-NZyiPBmDC5JMqlC_DCmj_iaPdu4Y3SSO4YCZFxZJJnXhk_6wUETnk0oRnmlDVOtbFIeNlg6hneBSVqBctyM_-biZTL1egiBujwO3euNZjWnUt1aeMOgB30anrfTuIgIifrYQEILgaHOdSpA49pCIG439vYXQlHI5QSE1_lF1toB_g2vt8TYJyH3dGEQf-AuplywkjO7OmMgLOMvmi3N5jWqgRQi-FySPf_ZOdA=w442-h617-s-no-gm?authuser=0

सर्व काही आलबेल होते. मला वाटले हे चूकीचे निघणार. टॅरॉट वरचा विश्वास उडणार. पण त्या दिवशी ईमेलमध्ये, इन्टर्व्ह्यु चे आमंत्रण आले. मला तर हाफ डे पीटीओ लागणार होता. मी नव्या कंपनीत विचारले असता खूप उलटतपासणी झाली - अर्ध्या दिवसाची रजा का हवी आहे ? नाही मिळणार. मग डॉक्टरांचे कारण सांगावे लागले आणि इतका फडतूसपणा झाला की कळले की या कंपनीत डॉक्टरांकरताही वर्षाकाठी फक्त ५ रजा राखीव आहेत. आणि नवीन लागलेले असल्यामुळे, माझी तेवढी रजा अ‍ॅक्युम्युलेट झालेली नव्हती. तो दिवस विनवण्यांचा व स्ट्रेस्फुल गेला. तापलेल्या तव्यावरती टाकलेल्या मुंगीसारखा अगदी तस्साच.
पण खरच क्वचितच टॅरॉट चूकीचे निघाले. जसे आज कार्ड आलेले आहे हर्मिट. म्हणजे एकलकोंड दिवस जाइल. पण तसे काही अजुन तरी नाही. व व्हायची शक्यताही नाही.
असो.
हा प्रकार एकंदर मजेशीर तर आहेच पण टॅरॉटला सेन्स ऑफ ह्युमरही आहे असे लक्षात आलेले आहे. म्हणजे एकदा दोनदा नाही बरेचदा. खूप मजा येते. इन्ट्युशन शार्प होते, एकाग्रता वाढते, मनोरंजन होते तसेच चित्त शांत होते. म्हणजे एके मेडिटेटिव्ह स्टेट अनुभवास येते.
अर्थात हे फक्त स्वतःपुरता. मी काही कोणाचे कार्ड वाचावयास जाणार नाही. तशी इच्छाही नाही.

>>>>>>जसे आज कार्ड आलेले आहे हर्मिट. म्हणजे एकलकोंड दिवस जाइल.
मुलगी व नवरा सिनेमा पहायला गेलेत. मला सिनेमा आवडत नाही म्हणुन मी काही गेले नाही. बराच एकांत मिळाला. किती तरी महीन्यानंतर.
हर्मिट कार्ड बरोबर निघालेले.