
बटरनट स्क्वाश - अर्धा
तेल
मोहरी- १ चमचा
जिरे- १ चमचा
मेथादाणे- १ चमचा
हिरवी मिर्ची
लसूण
कडीपत्ता
हळद
हिंग
मीठ
कोथिंबीर
बटरनट स्क्वाश कापून, साल काढून इंचभर मापाचे तुकडे करून घेतले. २-३ चमचे तेल लावून एअर फ्रायर मधे ३५० फॅ.ला १० मि. भाजून घ्यावे. नाहीतर पॅनमधे थोडे शिजेपर्यंत परतून घेता येतील.
कढईत फोडणीसाठी तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी.
मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घालावे.
जिरे फुलल्यावर त्यात मेथीदाणे घालावे.
मेथीने रंग बदलायला सुरू केल्यावर त्यात बारिक चिरलेली मिर्ची, लसूण आणि कडीपत्ता घालावा.
ते नीट भाजल्यावर त्यात हळद, हिंग घालावे. मग त्यात बटरनट स्क्वाश घालून चवीनुसार मीठ घालावे. सगळे नीट मिसळल्यावर झाकून दणदणीत वाफ काढावी. वरून कोथिंबीर घालून सजवावी. भाजी तयार!
बटरनट स्क्वाश आधीच शिजल्यामुळे भाजी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही. ही भाजी चुकून जास्त तिखट झाली तर जेवताना भाजीत थोडे दही घालूनही खाता येते.
लाल भोपळ्यासारखीच दिसणारी ही भाजी भोपळ्यापेक्षा जास्त पौष्टीक आहे आणि रूचकर लागते. लालभोपळ्याची भाजी मी अशीच करते फक्त भोपळा आधी भाजून घेत नाही. भोपळा शिजताना त्याला भरपूर पाणी सुटते. ते पाणी आटवताना भोपळ्याच्या फोडींचा लगदा होतो. तर बटरनट स्क्वाशची भाजी बटाट्याच्या भाजीसारखी होते.
मस्त. मी अशीच करते फक्त आधी
मस्त. मी अशीच करते फक्त आधी एअर फ्रायरला टाकत नाही. आता टाकून करुन बघेन.
ह्याची चव कमी गोडसर असते. सुप
ह्याची चव कमी गोडसर असते. सुप मस्त लागतं ह्याचं.
एयर फ्रायर नाहिये, शॅलो फ्राय करून घालता येतील.. छान कॄती.
छान
छान
जास्त शिजतात , हाच प्रॉब्लेम असतो,
पण नुसते शिजवून मग दही फोडणी मिसळले की भरीत होते
भाजी,भरीत,आणि घारगे तिन्ही
भाजी,भरीत,आणि घारगे तिन्ही आवडतात.
वड्या मात्र आंब्याच्या वड्यासारख्या लागतात.
एअर फ्रायर मध्ये करायची
एअर फ्रायर मध्ये करायची आयडीया छान आहे.
कॉस्टको मध्ये कापलेल्या फोडीचा बॉक्स मिळतो. एकदम चविष्ट स्क्वाश असतो. तो आला कि ही भाजी, पराठा, सुप वगैरे नक्की होतेच घरी.
मी ही भाजी कास्ट आयर्नच्या पॅन मध्ये करते. तेलावर फोडी भाजून घेते. लसून, तिखट,मीठ आणि कोथिंबीर टाकली की झाली भाजी तयार. भाजून घेतल्यामुळ अज्जिब्बात लगदा होत नाही. फोडी बटाट्याच्या काचर्या कशा लागतात्/दिसतात तशा खरपुस होतात.
अरे वा! बघतो करुन.
अरे वा! बघतो करुन.
अशी साध्या भोपळ्याची होईल का
अशी साध्या भोपळ्याची होईल का
काशिफळ यालाच म्हणतात का ?
तयार भाजीचा फोटू मस्त आहे.
तयार भाजीचा फोटू मस्त आहे.
मीही अशीच भाजी करते ... फक्त थोडी बडीशेप आणि खसखस वाटून लावते या भाजीला.
Whole Foods मध्ये ऑरगॅनिक फ्रोझन बटरनट स्क्वाश मिळतो. मी सांबार, थालीपीठ, घावन यांतही ही भाजी वापरते.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
अशी साध्या भोपळ्याची होईल का>> होते ना. पण भोपळ्याला पाणी सुटते. ते पाणी आटवताना भोपळ्याच्या फोडींचा लगदा होतो.
मी सांबार, थालीपीठ, घावन यांतही ही भाजी वापरते>>हो सांबार छान होते. पहिल्यांदा मला मैत्रिणीने स्क्वाश दिला होता. भाजी केली, मग सूप केले तरीही संपला नव्हता. मग फोडी करून फ्रिझर मधे ठेवला. सांबारमधे घातला. छान लागले.
छान रेसिपी. ही भाजी भारतात
छान रेसिपी. ही भाजी भारतात मिळते का सगळीकडे? दिसला असला अर्धा कापून ठेवलेला तरी मला लाल भोपळा च वाटला असेल. वेगळ्या जातीचा. असो. नाव छान आहे भाजीचे.
लाल भोपळा पण सांबारात मस्त लागतो.