Submitted by मोक्षू on 16 April, 2022 - 03:44
मला चांगला वॉटर फिल्टर घ्यायचा आहे. आरो नको आहे. साधा uv water filter कोणता घ्यावा?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/40095
https://www.maayboli.com/node/25597
धन्यावाद अवल..खरंतर मी आधी
धन्यावाद अवल..खरंतर मी आधी यावर काही धागा आहे का ते शोधले पण मला सापडले नाही. Links बद्दल थँक्स.
दीड वर्षांपूर्वी pureit
दीड वर्षांपूर्वी pureit marvella uv हा फिल्टर घेतला आहे. याला मेंटेनन्स नाही. कार्ट्रिज दोन तीन वर्षांनी बदलायला लागेल बहुदा (ते वापरावर असतं. आमच्याकडे तीन जण राहतात). चार लिटरचे स्टोरेज आहे. जर दिवे गेलेच तर अगदी धावपळ होत नाही.
या आधी खूप वर्षे प्युअर इट चाच साधा फिल्टर होता, पण तो आता बंद झालाय. बाकी आधी टीडीएस तपासून घ्यालच.
हो वरदा
हो वरदा
प्युरीट मार्व्हेला बेस्ट आहे.
आम्ही खूप अभ्यास करून तो घेतला आणि अजून खुश आहे.
आर ओ अजिबात घ्यायचा नव्हता.त्यात खूप पाणी डिसकार्ड केले जाते.
आरओ घ्यावा यासाठी दुकानदार
आरओ घ्यावा यासाठी दुकानदार फार अॅग्रेसिवली प्रसिद्धी करतात. आम्हाला सांगितलं सगळ्यांनी की आमच्या इथला टीडीएस पाचशेच्या आसपास आहे म्हणून (चाळीसेक वर्षांपूर्वी होता). आम्ही आरओ घ्यायचा नाही यावर ठाम होतो, एक तर पाणी वाया जातं आणि दुसरं म्हणजे ज्युनियर मेंबरची प्रतिकारशक्ती खलास होईल. सगळीकडे आम्ही बाहेर हिंडतो तर समोर येईल ते स्वच्छ पाणी पिता आले पाहिजे यावर आम्ही आग्रही आहोत. घरी टीडीएस मोजून बघितला तर ११४ होता फक्त. एक इंडस्ट्रियल लेवलचे पाणी शुद्धीकरण करून देणार्या कंपनीचे गृहस्थ भेटले होते, तेही म्हणत होते की आम्ही लोकांना कळकळीने सांगतो की काही गरज नाहीये आरओ घ्यायची, केवळ पाईप्सच्या स्वच्छतेची खात्री नसते म्हणून यूव्ही फिल्टर घ्यावा, बाकी पाणी तसेच पिण्याएवढे शुद्ध असते.. पण तरीही लोक ऐकत नाहीत म्हणे. दुकानदारांना जास्त कमिशन मिळते असे त्यांचे म्हणणे होते. खखोदेजा.
बोरवेल चे पाणी असेल तर टीडीएस
बोरवेल चे पाणी असेल तर टीडीएस चेक करून आर ओ घ्यावा. नदीच्या पाण्याला सहसा आर ओ ची गरज नाही. यु व्ही मात्र घ्या. प्रतिकार शक्ती कमी होते असा नाही. बाकी अनेक मार्गाने जंतू संसर्ग होतच असतो.
यावरून परत आर ओ मार्केटिंग
आर ओ च्या विषयावरून परत आर ओ मार्केटिंग बद्दल इथेच कुठेतरी वाचलेलं परत आठवलं
)
"नागाचं विष जरी आर ओ ईनलेट मध्ये ओतलं तरी खालून पिण्यायोग्य पाणी मिळालं पाहिजे"
(आता इतकं नागाचं विष कसं मिळवणार, ते बाजूना लागू न देता इनलेट मध्ये आतपर्यंत जाईल असं कसं ओतणार, बरं ओतून हे फिल्टर झालेलं पाणी पहिला ग्लास प्यायला पुढे कोण येणार असे प्रश्न मनातून बुडबुड्याप्रमाणे वर आलेच
आम्ही खूप रिसर्च करून आर ओ
आम्ही खूप रिसर्च करून आर ओ घेतले... इट्स सेफ... बाकी एनव्हरॉन्मेंट वगैरे आय डोन्ट केयर...
चिडकू शी सहमत
त्यातल्या त्यात आर ओ वापरताना
त्यातल्या त्यात आर ओ वापरताना त्यातलं डिसकार्ड होणारं पाणी बाजूला बादलीत जमा करून झाडांना किंवा इतर स्वच्छता करायला वापरता येईल.बरेच जण करतात असं.(अर्थात हे मनातले विचार मोठ्याने.जिथे जशी परिस्थिती तसं करावं.)