आज एक धक्कादायक बातमी ऐकली.
त्याचं झालं असं की आज ट्रीपचं नियोजन करत होतो. तेव्हांच ऑफीसमधून फोन आला. ट्रीपबद्दलच होता. त्यात खाण्याचा विषय निघाला. सगळं घरून बनवून न्यायचं की भटारखाना सोबत घ्यायचा आणि रेशन बसमधे केबीन मधे टाकून जंगलात चूल पेटवून जेवण बनवायचं हा प्रश्न होता. त्यामुळे फोनवर चांगल्याच गप्पा रंगल्या.
पलिकडून कल्लीगने विचारलं की आपण एक सीट सोडून म्हटले तरी ३० जण होतोय. रस्त्यात पोलीस आडवा येईलच. त्याला द्यायला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. खरे म्हणजे मी या गोष्टींच्या सक्त विरोधात आहे. पण पाच जणांसाठी वेगळी बस पटण्यासारखे नव्हते. छोटी गाडी केली तरी बस आणि छोट्या गाडीचा स्पीड मॅच होणार नाही. मग रस्त्यात शोधाशोध सुरू होते. येस्स ! मी हा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे. त्यामुळं म्हटलं नकोच ते. शाहरूख खान आणि काजोल ला बस सोडून जाते तसे गर्लफ्रेण्डला आणि मला सोडून गेले तर तसाही प्रॉब्लेम नव्हताच. पण एक तर ती येणार नाही म्हणाली. दुसरे म्हणजे नेमके आम्ही दोघेच खाली राहू , दोघातला एक राहणार नाही याची ग्यारण्टी देता येत नाही. रिस्क कशाला घ्यायची ?
तर फोनवरचा कल्लीग म्हणाला कि जेवणाचा अंदाज बरोबर यायला पाहीजे. शिल्लक राहीले तर चालेल, पण कुणाला कमी पडता कामा नये. मग आम्ही कॅल्क्युलेशन करायला लागलो. ३० जण गुणिले प्रत्येकी चार चपात्या आणि प्रत्येकी पाव किलो मटण म्हटले तर १२० चपात्या किंवा भाकर्या, आणि ७ ते ८ किलो मटण लागेल. तर सहकारी उडालाच. म्हणाला पाव किलो मटण एकाला ? त्याला म्हटलं थांब जरा. सांगतो.
मग तो म्हणाला अंडी नेली तर ?
मी हिशेब काढला. कमी पडायला नकोत ना ? तर ९०० अंडी लागतील. आता सहकारी ओरडायला लागला.
मी त्याला शांतपणे म्हणालो " एक तर जंगलातली मोकळी हवा. त्यात जर पैज लागली तर बघ मग. मी आमच्या एमएनसीच्या कॅण्टीनला एका वेळी २७ ऑम्लेट्स आणि पाव खाल्ले आहेत. "
व्हिडीओकॉल असल्याने त्याच्या चेहर्यावरचे आश्चर्याचे भाव सहज दिसत होते.
" किती सत्तावीस ????????? " तो किंचाळलाच.
मी हसून त्याला म्हणालो , " विचार कर, मोकळ्या हवेत ३० सहज जातील कि नाही ? जर प्रत्येकाने ३० / ३० ऑम्प्लेट्स खाल्ली तर किती लागतील ? "
तो म्हणाला " माझा तर विश्वासच बसत नाही ......!!!!!! "
मी म्हणालो " हे तर काहीच नाही. एकदा मी केळीचा संपूर्ण घड फस्त केला होता "
आता मात्र त्याला चक्कर येईल असे मला दिसत होते. फोनवरून मी त्याला सावरू पण शकत नव्हतो.
त्याचा या वेळी खरंच विश्वास बसला नव्हता. पण मी नेहमी खरं बोलतो हे माहीत असल्याने मी म्हणतो तर आख्खा घड फस्त केला असेल हे त्याला पटले होते.
"पण एका घडात किती केळी असतात ?"
" असतील हजारभर "
" हSSSजार केळी ? अबे तू मेला नाहीस का ???????????"
मी शारूकसारखा खळी पाडून ठेवणीतलं हसलो. (गालाला उभा चिमटा घेऊन घेऊन ही खळी पडायला लागली आहे. त्यामुळे समोरचा गारच होतो हा अनुभव आहे).
मी त्याला सांगितले की कशी आमची पैज लागली आणि मग मी आख्खा केळीचा घड फस्त केला. पण त्यानंतर मी काय केले हे कुणालाच सांगितले नव्हते.
झाले असे की कोकणात आम्ही मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथे विहीरीवरच्या पाण्यावर केळीची काही झाडं होती. आंबे, सुपारी, पोफळी, नारळ जास्त होते. सोनेरी केळी बघून आमची पैज लागली कि कोण जास्त खाईल ? आमचा मित्र म्हणाला कि घड उतरवताना झाड काढावे लागते. त्यामुळे आख्खा घड संपवावा लागेल. मग तशीच पैज लागली.
मी ते चॅलेंज घेतलं. घड पूजा करून दारात आणला होता. विहीर मागच्या बाजूला होती. मी नीट बघून ठेवलं होतं. तिला एक रहाट होता. पाणी काढायला मोठ्या घागरीसारखं भांडं होतं. बास म्हटलं ! आणि काय मग, चणे फुटाणे खावेत तशी केळी खायला सुरूवात केली. म्हातारे कोतारे घाबरले. बाया म्हणू लागल्या कि या पोराला थांबवा. पण मी बिनधास्त होतो. आख्खा घड संपवला आणि ताबडतोब पळत मागच्या अंगणात गेलो. सर्वात पहिल्यांदा तर घागर पाण्यात टाकली आणि पाणी वर शेंदायला लागलो. ते वर काढलं अंगावर घेतलं. मग रात्रभर मी पाणी शेंदत राहिलो. त्या रात्री संपूर्ण वाडीला मी पाणी दिलं. सकाळी मग व्यवस्थित सगळं पार पडलं.
सगळ्यांना माझीच काळजी होती. सकाळी झोपेतून उठून बघतात तो काय !
मी मस्तपैकी श्रीखंड पुरी खात होतो !!
दोनशे पुर्या खाल्ल्या महाराजा !!
तेव्हांपासून माझ्याबरोबर खाण्यापिण्याच्या कुणी पैजा लावत नाही. मला टक्कर कुणी देईल असे वाटत नाही. आई मीन म्हणजे मला असे वाटत होते.
पण फोन चालू असताना सहकारी म्हणाला कि "येस्स, माझा विश्वास बसला "
मला कळलं नाही. मला वाटलं हा टिंगल करतोय म्हणून जरासा चिडूनच म्हणालो
" कीप युवर मम शट अॅण्ड टेल मी व्हॉट द व्हेल यू मेक मी विलीव्ह दिस इन हेवन ?"
त्यावर तो कलीग म्हणाला
" अरे आत्ताच बातमी चालू आहे टीव्हीवर, मामी म्हणताहेत की माझ्या हातच्या ३५/४० पुपो मामा एका वेळी तेल लावून खायचे. म्हणजे पोळीला तेल लावून. हे तर काहीच नाही "
मला काही कळलंच नाही.
"कुणाचे मामा ? माझे मामा टीव्हीवर यायचा काही चान्स नाही. तुझे मामा का ?"
तर मित्र म्हणाला " टीव्ही लाव आणि बघ "
मी टीव्ही लावला पण मला बातमी सापडली नाही.
कुणाला काही माहिती आहे का ?
प्लीज मलाही कळवा.
जब्रि
जब्रि
उत्तर प्रदेशात हवेत उडणार्या
उत्तर प्रदेशात हवेत उडणार्या बसमधे प्रवाशांना किमान ३५ पुरणपोळ्या खाणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर जितके दूर जायचेय त्या प्रमाणात कंडक्टर पुरणपोळ्या खायला घालणार.
(No subject)
उभे चिमटे घेऊन खळी पडणे!!
उभे चिमटे घेऊन खळी पडणे!!
------
Flagship killer phone म्हणजे काय ते समजले.
---------
न टुटेगा बाँस न बजेगी बाँसुरी म्हण समजली.
-------
काय हाणलंय!
एक आड एक ३० सिटा आणि तीस खादाडी हँपर.
पैजेखातर आचरट खाणं हा धागा
पैजेखातर आचरट खाणं हा धागा आणि याच धाग्यावरच्या दुसर्या का तिसर्या पानावर लिंक असलेला पूर्णब्रह्म हा लेख वाचा बरं...
अजिंक्यराव पाटील धन्यवाद
अजिंक्यराव पाटील धन्यवाद
शान्त माणूस , उत्तर
शान्त माणूस , उत्तर प्रदेशच्या बसचा संदर्भ काही समजला नाही. तरी पण धन्यवाद वाचल्याबद्दल आणि प्रतिसाद दिल्याबद्दल.
रश्मीताई
रश्मीताई
मधेच फोन आला म्हणून तुम्हाला प्रतिसाद देता देता राहून गेला. मला तुमची ही स्मायली खूप आवडते. हसायलाच येतं.
पण इथे तुम्हाला का हसायला आलं ? कुणाला हसायला आलं तरी मला आनंदच होईल. पण या सत्य घटना आहेत हो
Srd >>> तुमचा काहीतरी गैस
Srd >>> तुमचा काहीतरी गैस होतोय. एका आड एक तीस सीटा असं नाही ते. एक सीट सोडून एक जण असा नियम आहे.
५० सीटरच्या बसमधे २५ जण व्यवस्थित बसतात. पण पाच जण शिल्लक राहतात.
योकु >>> लिंकांबद्दल आभार.
योकु >>> लिंकांबद्दल आभार. मस्त किस्से आहेत दोन्ही धाग्यावर. आताच वाचले. एका धाग्यावर प्रतिसाद पण देऊन आलो. खाण्याच्या पैजा प्रत्येकाने लावलेल्या असतात. फक्त सांगायला लाजतात.
उत्तर प्रदेशच्या बसचा संदर्भ
उत्तर प्रदेशच्या बसचा संदर्भ काही समजला नाही >>> चालतंय की
उत्तर प्रदेशात उडणार्या बसेस
उत्तर प्रदेशात उडणार्या बसेस येणार आहेत
भन्नाट (भास्कर नव्हे) लिहिलं
भन्नाट (भास्कर नव्हे) लिहिलं आहे
एकदमच हहपुवा