Submitted by मामी on 3 February, 2022 - 15:36
वरील लांबलचक नावाची नेफ्लि सिरीज आताच जस्ट संपवली.
स्पॉईलर अॅलर्ट ** स्पॉईलर अॅलर्ट ** स्पॉईलर अॅलर्ट ** स्पॉईलर अॅलर्ट
मालिका बघून झाली असेल तरच धागा वाचा. आधी वाचलात तर तुमच्या जबाबदारीवर वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकतर सुरवातीलाच सस्पेन्स
एकतर सुरवातीलाच सस्पेन्स क्रुकेड हाऊस चा असणार असं वाटलं होतंच. त्याप्रमाणे झालं.
पण तो सस्पेन्स किती ओढून ताणून आणलाय आणि किती प्रश्न आणि मुद्दे निर्माण करतो...
१. इतकी लहान पोरगी उंच कार वर मेसेज काय लिहिते (दुपारी शाळेत जाण्याऐवजी अॅनाच्या मागे पोलिस स्टेशनात का गेली असेल? हा एक उपप्रश्न )
२. लिसाला मारल्यावर तिच्या रक्ताचं काय करते (या घटनेमुळे नीलला मुलीच्या टेन्डन्सीबद्दल कल्पना आहे आणि तो तिला पाठीशी घालतोय असं वाटत होतं ते शेवटी निकालात निघालं. खरंतर असं असतं तर जरा तरी कन्विसिंग झालं असतं.
३. लिसाची बॉडी बारीक तुकडे करून वॅगनमध्ये भरून (रक्ताचा एकही थेंब न सांडता ) शेजारणीकडे चॉकलेट विकण्याच्या निमित्ताने जाऊन तिची पॅलेट नाईफ चोरणे आणि नंतर जंगलात जाऊन तिथे बॉडी टाकून त्याशेजारी ती पॅलेट नाईफ ठेवणे हे ९ वर्षाची मुलगी कशी साधते? ते ही वडिल घरी असताना?
४. टुंबस्टोनवर वेगवेगळे मेसेजेस का दिसतात? त्याचा अर्थ काय?
५. वडिलांना आधीच का मारत नाही?
६. टीचरला उचलून लाईटहाऊसवरून खाली टाकणं इतक्या लहान आणि उंचीनं कमी असलेल्या मुलीला कसं शक्य होतं?
आणि हो, मेलबॉक्स रिपेअर करायला किती महिने लागतात?
मामी वेब सीरीज बाफ वाचलास का?
मामी वेब सीरीज बाफ वाचलास का?
अतिच अ आणि अ वाटली.
अतिच अ आणि अ वाटली.
मी सायको थ्रिलर म्हणून
मी सायको थ्रिलर म्हणून सिरियसलीच बघितली पण मला शेवटच्या २ भागांमधे वाटायला लागलं की ही सीरीज एक मीम किंवा पॅरडी म्हणून बनवली असावी. शेवट आणि त्या लहान मुलीसोबत मारामारी वगैरे बघून खात्रीच वाटली. नंतर मग इतर काही ऑनलाइन रेव्ह्यू अन आर्टिकल्स दिसली तीही तेच म्हणत आहेत. पण मग तसे असेल तर ती लक्षात येत नाही म्हणाजे एक प्रकारे फसलेलीच आहे Happy
Submitted by maitreyee on 1 February, 2022 - 06:51
स्पॉयलर
.
हो. मलाही नंतर वाचल्यावर समजलं की ही भयंकर विनोदी (हीलेरियस) सिरीज म्हणून बघायला हवी होती. मी आपला सायको थ्रिलर कपडे घालून बसलेलो. खरतर एलिझाबेथ चा अंत ज्याप्रकारे चणे फुटाणे खावे तसा झाला , तिच्या टूंब स्टोन वरचे सुविचार (!) जसे बदलत गेले, स्ट्रिपर बरोबर लव मेकिंग ज्या प्रकारे झाले, मेल बॉक्स दुरुस्ती जशी चालू होती, मेलमन चं काटा रुते कुणाला जसं झालं, कॅसरोल जसे फुटत गेले, पोलीस कॅसरोल मागू लागले... तेव्हा माफक हसू ते आयरोल झालं होतं. पण ते काय सत्य आणि काय दारूचा अंमल यातला गोंधळ दाखवायला केलं आहे अशी मनाची समजूत घालत बघत राहिलो. तेव्हा हसायचंच होतं तर!
ते नीट कनवे झालं नाही हे खरं.
स्पेसिफिक कशाची प्यारडी असेल तर समजलं नाही, जनरल धक्का द्यायला काय वाट्टेल ते ची असेल तर आत्ता समजली पण तेव्हा सस्पेन्स ने बघत राहिलेलो असच म्हणेन.
Submitted by अमितव on 1 February, 2022 - 08:28
नाही वाचला. वाचते. तिथे काही
नाही वाचला. वाचते. तिथे काही आहे का? पण तिथे हे डिस्कशन होऊ शकत नाही ना? म्हणून वेगळा धागा काढलाय. तसंही जर लोकांनी दिलेल्या शिव्या मनावर नाही घेतल्या तर पुढचा सीजन कदाचित येऊ शकतो.
The Woman in the House Across
The Woman in the House Across the Street from the Girl in the Window>> Desperate Housewives म्हणायचंय का? नावापासूनच चीरफाड सुरू
सो अपेरेन्टली द वुमन इन द
सो अपेरेन्टली द वुमन इन द विन्डो या सिनेमावरून हे स्पूफ बनवलेले असावे. तो सिनेमा आहे नेफ्लि वर.
पॅरडी तर वाटत नाही. पण त्या
पॅरडी तर वाटत नाही. वरचे अमितव चे मुद्दे अगदी परफेक्ट आहेत.
वरचे सहा आणि आणखी कितीही
वरचे सहा आणि आणखी कितीही मुद्दे काढले तरी एकदा पॅरडी/ स्पूफ म्हटलं की तळ नसलेली बादली होते. काहीही मुद्दा काढा, हसण्यावारीच न्यायचा तर नेता येतो.
पॅरडी असेल तर फसलेला प्रयोग
पॅरडी असेल तर फसलेला प्रयोग आहे. पॅरडी नसेल तर अगदीच अ आणि अ. म्हणजे वाघ म्हणावं तरी शेळपट, वाघोबा म्हणावं तरी शेळपट.
स्पूफच आहे, लॉजिक लावायला जाल
स्पूफच आहे, लॉजिक लावायला जाल तर फसाल.
तिची 'मुलगी' एलिझाबेथ ज्या पद्धतीने मेली असं सांगितलं जातं त्यावरूनच त्याच्या नॉनसेन्सिकल पॅटर्नचा अंदाज येतो.
एक मेन्टल पेशन्ट आहे, जिला मर्डर मिस्टरीजचा नाद आहे/होता, जिला आता वास्तव आणि आभासी जगातला किंवा वर्तमान-भूत-भविष्यकाळातला फरक सांगता येत नाही, जी कधीकधी तिच्या सायकिअॅट्रिस्टलाच नवरा, नर्सला पोलीस इत्यादी समजते, तिच्या डोक्यातला गोंधळ पडद्यावर मांडला आहे असं समजून पाहा.
('शटर आयलंड' सिनेमा पाहिला आहे का? तो खूपच डार्क आहे, पण मला त्या प्लॉटची आठवण येत होती पाहताना.)
किंवा एक वॉन्नाबी मर्डर मिस्टरी रायटर आहे, ती चारपाच कॅरेक्टर्स घेऊन यांचं काय काय कॉम्बिनेशन करता येईल, याला खुनी दाखवू का तिला दाखवू असा खेळ खेळत बसली आहे असं समजून पाहा.
शटर आयलंड पाहिलाय. तो एकदम
शटर आयलंड पाहिलाय. तो एकदम भारी आहे.
क्रिस्टन बेल 'द गुड प्लेस' मध्ये प्रचंड आवडली होती. इथेही छानच काम केलंय. गुणी अभिनेत्री आहे. आधी मला वाटलं तो चिडीच इथेही तिचा नवरा आहे की काय.
चारपाच कॅरेक्टर्स घेऊन यांचं
चारपाच कॅरेक्टर्स घेऊन यांचं काय काय कॉम्बिनेशन करता येईल, याला खुनी दाखवू का तिला दाखवू असा खेळ खेळत बसली आहे असं समजून पाहा. >> किंवा absurdal सोडवतोय समजून पहा.
(No subject)
इतकी assumptions आणि इतका
इतकी assumptions आणि इतका समजुतदारपणा तर पुणे ५२ करता पण दाखवावा लागला नव्हता.
पण नावापासूनच हिंट्स आहेत ना.
पण नावापासूनच हिंट्स आहेत ना.
(पुणे ५२मध्ये होत्या का?! )
पुणे ५२ हे नाव ही सगळ्यात
पुणे ५२ हे नाव ही सगळ्यात मोठी मिस्ट्री होती. केवळ इतकंच त्या लिफाफ्यावर का लिहिलं असेल या विचारानं कित्येक रात्री तळमळून काढल्यात.
पण नावापासूनच हिंट्स आहेत ना.
पण नावापासूनच हिंट्स आहेत ना. >>> हा बरोबर. पण ती गर्ल त्या विंडोत येत नाहीच. बाकीचे मात्र अर्थात आख्खं घर सोडून तिथेच येऊन कपडे बदलतात, व्यायाम करतात आणि खून पण करून घेतात.
अशानेच मराठी स्त्रिया मागे
आँ? गर्लचा खून मानेत नाइफ खुपसून खिडकीतच होतो ना?
क्रिस्टन बेल पण पॅरडी असेच
क्रिस्टन बेल पण पॅरडी असेच म्हणते आहे :
https://www.businessinsider.in/entertainment/news/kristen-bell-reveals-w...
अरे, गर्ल म्हणजे ती लहान
अरे, गर्ल म्हणजे ती लहान मुलगी. खुन होणारी गर्ल नसते चांगली मोठी बाई असते.
क्रिस्टन बेल पण पॅरडी असेच
क्रिस्टन बेल पण पॅरडी असेच म्हणते आहे : >> ठीक आहे ठीक आहे. पॅरडी आहे अशी समजूत घालून घेते.
केवळ इतकंच त्या लिफाफ्यावर का
केवळ इतकंच त्या लिफाफ्यावर का लिहिलं असेल या विचारानं कित्येक रात्री तळमळून काढल्यात. >>>
(पुणे ५२मध्ये होत्या का?! Proud ) >>> मला तर वाटले फक्त हिंट्सच होत्या. बाकी काहीच नव्हते. पक्ष्याचे घरटे, ते कोणा चॅण्डलरचे पुस्तक, गुप्तहेर म्हणे समाजाचा आरसा का काहीतरी असणे, पिक्चर मधे कधीही गचकले असते तरी चालले असते टाइप एक आजोबा मधेच गजकणे, कधी वीज जाणे, कधी ती येणे, अर्धा अंधार असलेल्या खोल्या, "तुम्ही अंधाराचे राजे" वगैरे संवाद. शेवटी उजेडाकडे चालत जाणे व चला शेवट गोड झाला. आपल्याला नाही कळला तरी चालेल असा आपण निश्वास टाकेटाकेपर्यंत "तो नक्की उजेडच असतो का?" असे लिहून पुलंच्या भाषेत "आवाज आला तो बॉल बॅटवर लागल्याचा नसून स्टंपवर लागल्याचा होता" असे वाटायला लावणारे रिव्यूज. यामधे दोनदा पाहून कथा सापडली नाही.
* चॅण्डलरचे काही घ्यायचेच होते तर मी योग्य चॅण्डलर सुचवला असता.
फा
फा
गुप्तहेर म्हणे समाजाचा आरसा का काहीतरी असणे.
ते चेपलेलं नाणं आणि इकडून तिकडे जाणारी स्कूटर विसरू नकोस.
>>> अरे, गर्ल म्हणजे ती लहान
>>> अरे, गर्ल म्हणजे ती लहान मुलगी. खुन होणारी गर्ल नसते चांगली मोठी बाई असते.
ट्च् ट्च्! ममव कुठली! नीलची ‘गर्ल’फ्रेन्ड ना ती? बाई काय!
फा
धमाल आहे हा बाफ!
धमाल आहे हा बाफ!
सगळे प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाहित. स्ट्रिपर सुटल्या वर ढंकुन ही हिरवीणी कडे बघत नाहि, इतकी "केमिस्ट्री" जुळलेली असुन
किंचित ऑर्फन ची आठवण येते पण त्यात लूप होल्स सोडलेले नाहित.
द वुमन मधे बरंचसं हास्यास्पद आणि काआआआहीही आहे!
अॅना फोनवर Therapist शी बोलत
अॅना फोनवर Therapist शी बोलत असते. तीला माहीत असत का की Therapist नवरा आहे ते. Ex नवरा. त्याचा पार्ट टाईम जॅाब असतो का थेरी करायचा. हे काही मला समजलं नाही कुणी सांगेल का. तो हिचा therapist कसा????
नवरा क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट
नवरा क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट असतो ना?
ते एका डेंजरस कैद्याला
ते एका डेंजरस कैद्याला भेटायला जाताना मुलीला बरोबर नेणं अतर्क्य वाटलं.
घटस्फोट झाला असला तरी
घटस्फोट झाला असला तरी नवऱ्याचा आवाज (फोन वर, बदलून आवाज काढला तरी समजतेच ना..बोलण्याची ढब,विशिष्ट शब्द वापरण्याची सवय इत्यादी ) ओळखू येऊ नये? पूर्ण सिरीज पाहताना गंडलेली आहे असं वाटत होतं..
पण पॅरडी असेल असं चुकूनही वाटलं नाही..पॅरद्दी झालीये अगदी..
Pages