भारत देश हा विविधतेतून बनला आहे. प्रत्येक प्रांताची, धर्माची , भाषेची आपली एक खासियत आहे.
मा़झ्या बाजूच्या डेस्कवरची माझी एक साऊथ इंडीयन कुलीग आहे. तिला रस्सम आवडते. ती रस्सम पाऊडर आणून ऑफीसमधे रस्सम बनवते. त्याचा फायदा म्हणजे मला हमखास रस्सम मिळते. पण ती माझी आमटी भातची डिश खात नाही. तोंड वाकडं करते. मी तिला म्हणालो की रस्सम तुमच्यासाठी खूप ग्रेट आहे आणि मलाही तुझ्या या आवडीबद्दल फुल्ल रिस्पेक्ट आहे तरी आमची आमसुलाची आमटी आणि नारळभात आम्हाला प्रिय आहे.
दुसरी बंगाली आहे. तिचं आणि माझं मासेखाऊ असल्याने चांगलं जमतं. पण काही जणं मासे पाहून तोंड वेडंवाकडं करतात. एकदा आमची ट्रीप गोव्याला गेली होती. फिरता फिरता आम्ही वास्को द गामा या टाऊन मधे आलो. इथे घराघरातून कोळंबी आणि फेणी मिळते. तर आमच्या महाराष्ट्रीयन शाकाहारी मॅडम म्हणाल्या "चला आपण सगळे गरमा गरम मूगाची खिचडी खाऊयात". तर सर्वांची तोंडं हिरमुसली. मला नंतर समजलं की मॅडम जेव्हां जेव्हां ट्रीप काढतात तेव्हां तेव्हां सक्तीने सर्वांना मुगाची गरमा गरम खिचडी खावी लागते. आता त्यांची आवड असेल ग्रेट ! पण गोव्यात येऊन खिचडी खाल्ली हे सांगण्याआधी तू जीव का नाही दिलास असे मित्रांनी विचारले असते. विशेष म्हणजे गर्लफ्रेण्डला पण माझ्याबद्दल डाऊट निर्माण झाला असता आणि तिने त्याच क्षणी तलाक तलाक तलाक म्हटले असते.
हा सीन डोळ्यासमोर येताच मी बाणेदारपणे उभा राहून म्हणालो "मी खिचडी खात नाही, मे तुमच्या सोबत येणार नाही".
मग मॅडम माझ्यावर चिडल्या. पण मी म्हणालो , " ज्यांना खिचडी खायची ते तुमच्यासोबत जातील, ज्यांना मासे खायचेत ते माझ्यासोबत येतील" आणि बघता बघता ती साऊथ इंडीयन सोडून सगळ्या मुली माझ्याबरोबर यायला तयार झाल्या. ज्यांना फेणी प्यायची होती त्यांनी माझ्याकडे पाहीले. मी पीत नाही म्हणून मी त्यांना अडवणार नव्हतोच.
सांगायचा मुद्दा हा की प्रत्येकाची आवड वेगळी. ज्याला जे आवडते तेच त्याच्यासाठी दर्जेदार असते. पण याचा अर्थ दुसर्याला जे आवडते ते दर्जेदार नाही असे समजणे त्याला तुच्छ समजणे याचा अधिकार आपल्याला कुणी दिला ?
मायबोलीवरील धागाकर्त्यांवर एक आरोप मी कित्येक काळापासून बघत आलो आहे तो म्हणजे माझी आवड कमी दर्जाची आहे. मला शाहरूख खान आवडतो. याचा अर्थ त्याचा प्रत्येक पिक्चर मला आवडतो असे मी कधीच म्हटले नाही. कधी कधी मीच त्याच्या पिक्चरवर टीका करतो. कारण तेव्हां तो मला आवडलेला नसतो. पण याचा अर्थ असा नाही की मला शाहरूख आवडतो म्हणजे तो कमी दर्जाचा आणि ज्यांना आवडत नाही त्यांची आवड उच्च असे काही नसते. जसा अमिताभ बच्चन तसाच शाहरूख खान आहे. कुणा कुणाला आमीर खान खूप ग्रेट वाटतो. त्याला स्वतःला सुद्धा असेच वाटते. पण याचा अर्थ बाकीचे छाटछुट होत नाहीत.
दिलीपकुमारला अभिनयाचा शहाणपणा म्हणतात. पण मला तसे कधी वाटले नाही. त्याच्या पेक्षा शाहरूख कित्येक बाबतीत उजवा आहे. पण हे माझे मत आहे. याचा अर्थ ज्यांना दिलीपकुमार आवडतो त्यांना मी तुच्छ लेखत नाही. किंवा दिलीपकुमार यांना मी कमी दर्जाचे मानतो असे नाही. जर ते आज असते तर शाहरूखखानकडून दोन गोष्टी शिकले असते.
तीच गोष्ट टीव्ही मालिकांची. वृद्ध आणि बायका मालिका बघतात म्हणून त्यांना कमी लेखण्याचे काहीच कारण नाही. त्यांना त्या आनंद देतात.
शाहरूख खानचे पिक्चर्स १२७ कोटी जनतेला आवडतात. फक्त ३ कोटी जनतेपैकी काहींना ते आवडत नाहीत तर त्यातले काही पिक्चरच बघत नाहीत. म्हणून त्या ३ कोटीमधले काही शेकडा लोक उच्च अभिरूचीचे ठरत नाहीत. शाहरूख खानने असा कधीच दावा केला नाही कि तो लॉजिकसाठी किंवा समाजप्रबोधनासाठी पिक्चर्स काढतो. उगीच त्याच्या पिक्चर मधे लॉजिक शोधणारे उच्च अभिरूचीपूर्ण म्हणायचे की विक्रम वेताळमधल्या मेलेल्या सिंहाला जिवंत करणार्या तीन विद्वानांसारखे समजायचे ?
दुसर्याच्या आवडीला कमी लेखणे हा हुमायुन नेचर आहे. पण याच लॉजिकने मुगल ए आझम आणि शोले हे अतिसामान्य पिचर ठरतात. सतत सर्दी झाल्यासारखा बोलणारा बादशहा औरंगजेब आणि नाटकी बोलणारी त्याची बायको अनारकली हे आताच्या पिढीला बघून हसायलाच येते. पण त्या काळच्या पिढीला आवडते तर आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहीजे एव्हढे माझे सिंपल लॉजिक आहे. गिव्ह रिस्पेक्ट अॅण्ड टेक रिस्पेक्ट. नवून गोलमाल सिरीजच्या पिक्चरांना नावे ठेवणार्या पिढीला एकच प्रश्न विचारावासा वाटतो.
मिशी वर कुणाला जज्ज करणारा कुणी उद्योगपती असू शकतो का ? तो सक्सेफुल असेल का ? जो सक्सेसफुल असतो तो मिशा कशाला बघेल ? की काम बघेल ? आमच्या मॅडम तर स्वतःच शॉर्ट्सवर येतात. त्यांना ते दिसतेही छान. आत्मविश्वासाने कॅरी करतात. त्यामुळे माझ्या हाताखालच्या सुंदर मुलींचा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. त्या ही बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल अवतारातच ऑफीसला येतात. माझी गर्लफ्रेण्ड त्यामुळे नेहमी मला फोन करत असते.
गर्लफ्रेण्डवरून एक किस्सा आठवला.
ती म्हणाली माझ्या दोन मैत्रिणींना तू अजिबात आवडत नाहीस. मी अगदी बेफिकीरपणे खांदे उडवून म्हणालो " व्हॉट्स बॉट यू ? नाही तर नाही. तुला तर आवडतो ना ?" मग ती हसली. मी म्हणालो " आज फिरायला जाऊ, तुला घ्यायला येतो तुमच्या कॉलनीत"
तर ती म्हणाली कि "अजिबात नको. कारण तू आलास की तुझ्या मोटरसायकलच्या फायरिंगमुळे सगळ्या कॉलनीला समजते. मग सगळ्या मुली बाल्कनीत पळत येतात. धक्काबुक्कीत मग त्या वरून खाली टपाटप पडतात. म्हणून तू अजिबात येऊ नकोस "
हे काय कारण असू शकतं का येऊ नको म्हणायचं ? पण सुंदर मुलीं वरून पडून जखमी होऊ नयेत या उच्च विचाराने मी जाणे कॅन्सल केले.
यावरून आपण म्हणू शकतो कि इतक्या मुलींना मी आवडतो आणि दोन मैत्रिणींना आवडत नाही म्हणजे त्यांची आवड उच्च दर्जाची आणि बाकी सर्व मुली काय कमी प्रतीच्या आवड बाळगतात का ? मी तर ऐकले आहे की राजेश खन्नाच्या गाडीपुढे मुली पडायच्या. तरी काहींना तो आवडत नव्हता.
काही काही लोकांना आपल्याला जे लेखक आवडतात तेच उच्च दर्जाचे वाटतात. ग्रेस मला समजत नाहीत. मी त्यांची एकही कविता, कादंबरी वाचली नाही. पण मला बेफिकीर यांच्या कादंबर्या आवडतात. काहींना पुल देशपांडेंचं विनोदी लिखाण आवडते. मला दमा मिरासदार आणि नेमाडेंचे विनोदी लिखाण आवडते. म्हणून काय ते कमी दर्जाचे ठरतात का ? उलट मला असे समजले आहे की यांच्या कथाकथनाला संपूर्ण महाराष्ट्रात गर्दी व्हायची.
मग प्रॉब्लेम कुणाच्यात आहे ?
लोकशाहीत तर जिकडे बहुमत तेच खरे मत असते. म्हणजे बहुमताप्रमाणे पाहिले तर
शाहरूख खान आजवरचा सर्वात महान नट आहे.
झिम्मा हा सध्याचा सर्वात चांगला पिक्चर आहे.
जान्हवी कपूर ही एक नंबर अभिनेत्री आहे.
नेमाडे सर्वोत्कृष्ट विनोदी लेखक आहेत.
आता कुणाला हे पटत नसेल तर त्यांच्या मताचा आदर आहे. पण याचा अर्थ बहुमत दर्जेदार नाही किंवा आपण एकटे शहाणे आणि बाकीचे सगळे मूर्ख असे समजणे चुकीचे आहे. शक्य असेल तर या अॅटीट्युड साठी उपचार घेतले तर त्यात सुधारणा होऊ शकते.
बरे यातून मायबोली प्रशासनाला काही फायदा तोटा होतो का याची कल्पना नाही, पण एखाद्याने मी अल्पसंख्य असून माझीच आवड ग्रेट असे म्हटल्याने जग बदलत नाही. कारण मायबोली म्हणजे जग नाही. बाहेरच्या जगातले लोक मायबोलीवर लिहायला येत नाहीत. आणि जे आहेत ते मायबोलीच्या फॉरेनला घाबरतात. थोडेच लोक आपल्याला काय आवडते हे डंके के चोट वर सांगत राहतात. मग त्यांना बहुमत मिळते. असे झाले की मग जुन्या मेंबरांची चिडचिड होते. हा हुमायुन नेचरच आहे.
मग हा अॅटीट्युड का दाखवला जातो नेहमी ? पण मला त्यांच्याबद्दल कुठलाच द्वेष नाही. अपार प्रेमच आहे. ऐन तारूण्यातच सर्वांवर प्रेम करायला मी शिकलो. याला कारण आमचे पूज्य बापूजी. म्हणजे शाहरूख खान सर.
शाहरूख सरांनी जे लॉजिक शिकवले ते सिंपल आहे.
पसंद अपनी अपनी.
उंचे लोग उंची पसंद, माणिकचंद एकदम झूठ आहे. उंचे लोग वगैरे काही नसते. उलट त्याने तोंडाचा कॅन्सर होतो. उंचे लोग मधे सामील होण्याच्या रॅट रेसचे दुष्परिणाम आहेत हे.
आजच नुकताच एका धाग्यावर हा आरोप तेविसशे पंचवीस वेळा झेलल्यावर अखेर हा धागा काढायचा ठरवले. उगाच याचे उत्तर तिथेच देत बसणे म्हणजे पुन्हा प्रतिसाद वाढवण्याचा तोच आरोप झेला. यापेक्षा एक स्वतंत्र धागा काढूया म्हटले. मायबोलीवर वेगळे पण माबोबाहेरच्या गजातले बहुमत मांडणारा मी एकटाच नाही. हा धागा सर्व धागाकर्त्यांसाठी ज्यांना वरीलपैकी कुठलेही आरोप झेलावे लागतात...
किती त्या चुका लिखाणात
किती त्या चुका लिखाणात
आणि " ज्याला जे आवडते त्याने ते करावे, दुसऱ्याला तुच्छ लेखू नये" इतक्या साध्या गोष्टीसाठी इतका मोठा लेख पाडलाय.....
आणि दिलीप कुमार अभिनयाचा शहाणपणा????? हे तर lol होतं
धन्य जाहलो
धन्य जाहलो
मायबोली आता दिन दुगनी, रात चौगुनी प्रगती करणार
एक सोडून दोन दोन सर गावलेत मायबोलीला
टडोपा!
टडोपा!
<<<आमसुलाची आमटी आणि नारळभार
<<<आमसुलाची आमटी आणि नारळभार आम्हाला प्रिय आहे.>>> म्हणजे डोक्यावर नारळाचं पोतं घेऊन आमसुलाची आमटी पिता का?
त्यात काहीच वावगे नाही, एकेकाची पसंद असते.
मानव
मानव![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मानव
मानव
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाल्कनीतल्या धक्काबुक्कीला हे
बाल्कनीतल्या धक्काबुक्कीला हे गाणे अर्पण
https://www.youtube.com/watch?v=OYudxNne5aw
हे गाणे त्या वेळच्या ८८ कोटी लोकसंख्येपैकी ८७.९ कोटी लोकांना आवडले होते. म्हणजेच हे गाणे आजवरचे सर्वोत्कृष्ट आहे. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, पं जितेंद्र अभिषेकी या गाण्याचे अध्ययन करण्यासाठी भाप्पी लाहिरींकडे गेले होते. पण त्यामुळे खालील गाण्याला कुणी तुच्छ समजू नये.
हे साऊथमधे प्रचंड लोकप्रिय आहे.
https://www.youtube.com/watch?v=9wUsa32xVxY
मानव
मानव
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किती त्या चुका लिखाणात >>>
किती त्या चुका लिखाणात >>> घाईत लिहील्याने चुका झाल्या आहेत. दुरूस्त करतो. लक्षात आणून दिल्याबद्दल आपले मनापास्स्सून कौतुक !
आणि " ज्याला जे आवडते त्याने ते करावे, दुसऱ्याला तुच्छ लेखू नये" इतक्या साध्या गोष्टीसाठी इतका मोठा लेख पाडलाय.... >>> हीच तर महत्वाची गोष्ट आहे ना ! तुम्ही चित्रपट हा धागा आणि झिम्मा हा धागा वाचला नाही का ?
<<<आमसुलाची आमटी आणि नारळभार
<<<आमसुलाची आमटी आणि नारळभार आम्हाला प्रिय आहे.>>> म्हणजे डोक्यावर नारळाचं पोतं घेऊन आमसुलाची आमटी पिता का? >>>> बास्स का मामा ? तुम्हीच खेचायला लागलात तर कसं होणार ? घाईत टायपो झाला. एडीट करतो.
जे लिहीलंय ते फार फार आवडलं..
जे लिहीलंय ते फार फार आवडलं.. पण जे तुम्ही ‘तुमचा अबराम’ आयडीने लिहायचात त्याच्या तोडीचं नाही. पुन्हा लिहीते व्हा.
- अजून एक शारूक फॅन
जान्हवी कपूर ही एक नंबर
जान्हवी कपूर ही एक नंबर अभिनेत्री आहे.
>>> + 1
या धाग्याची गरज होतीच...
पसंद अपनी अपनी-
1. मला अतरंगी रे आणि संदीप और पिंकी फरार दोन्ही चित्रपट प्रचंड आवडले होता...
2. मुक्ता बर्वे पुणे मुंबई पुणे मध्ये आणि इतर सिमिलर चित्रपटात सेमच वाटली... बोरिंग...
3. कपिल शर्मा प्रचंड आवडतो... फुल हसवतो तो शो...
4. सचिन पिळगावकर ला जितकं हेट करतात इथे. पटत नाही...
5. सलमान आवडतो... Acting नाही.. पण swag भारी आहे...
6. ऋन्मेष चे धागे आवडतात...
7. हिंदी मिश्रित मराठी जास्त आवडते.. शुद्ध मराठी बिग नो...
मला चर्प्स आवडतात
मला चर्प्स आवडतात
हायला.. धागा विषय फोडायची
हायला.. धागा विषय फोडायची सोय राहिली नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद च्रप्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी अगदी बेफिकीरपणे खांदे
मी अगदी बेफिकीरपणे खांदे उडवून म्हणालो " व्हॉट्स बॉट यू ? नाही तर नाही. तुला तर आवडतो ना ?" मग ती हसली.
अरे देवा. व्हॉट्स बॉट यू ? ?????????????????????????????? खरच कां
.. धागा विषय फोडायची सोय
.. धागा विषय फोडायची सोय राहिली नाही >>> या विषयावर स्वतंत्र धागा काढू शकतो
ही धमकीअसे म्हणता येणार नाही असे वाटते.बाकी काही म्हणायचे नाहीय मला-
बाकी काही म्हणायचे नाहीय मला- पण बादशहा औरंगजेबाची बायको अनारकली????
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विक्रम वेताळमधल्या मेलेल्या
विक्रम वेताळमधल्या मेलेल्या सिंहाला जिवंत करणार्या तीन विद्वानांसारखे समजायचे ?>>>हे पंचतंत्रात होते नं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
औरंगजेबाची बायको अनारकली???? >>>?
लेख मात्र सही जमला आहे, हुबेहूब शैली
लेख मात्र सही जमला आहे,
लेख मात्र सही जमला आहे, हुबेहूब शैली
>>>
+1
पण प्रतिसाद जमत नाही आहेत. लेखक चुका लगेच मान्य करत आहेत. असं असतं का कुठे?
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही >> आशू म्हण बदलायची वेळ आहे. टाकीला 'सर'पण येणार रे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण जे तुम्ही ‘तुमचा अबराम’
पण जे तुम्ही ‘तुमचा अबराम’ आयडीने लिहायचात त्याच्या तोडीचं नाही. पुन्हा लिहीते व्हा. >>> गैस झाला बहुतेक. ते ऋ सरांचे मोठे भाऊ आहेत. मी नाही तो. तरीही त्यांचे लिखाण आवडते याबद्दल मनापासून कौतुक !
च्रप्स , संपूर्ण पोस्टला
च्रप्स , संपूर्ण पोस्टला जोरदार अनुमोदन !
टाळ्या झाल्या पाहीजेत.
बाकी काही म्हणायचे नाहीय मला-
बाकी काही म्हणायचे नाहीय मला- पण बादशहा औरंगजेबाची बायको अनारकली???? >>> मग कोण होती ? मला काही इतका इतिहास पाठ नाही. पण त्याचं लग्न झालंच असणार आणि तो बायकोला लाडाने अनारकली म्हणत असेल पण. कोण बघायला गेलंय ?
विक्रम वेताळमधल्या मेलेल्या
विक्रम वेताळमधल्या मेलेल्या सिंहाला जिवंत करणार्या तीन विद्वानांसारखे समजायचे ?>>>हे पंचतंत्रात होते नं. >>>>> असेल. त्याने काय फरक पडतो ? त्या वेळी आजच्या सारखे कॉपीराईट नव्हते. पंचतंत्र कॉमिक्स वाल्यांनी ते ढापलंही असू शकेल.
लेख मात्र सही जमला आहे,
लेख मात्र सही जमला आहे, हुबेहूब शैली >> असं म्हणून लाजवू नका. गुरूजींइतकं जमायला सात जन्म कमीच पडतील. पण माझी शैली गुरूजींसारखी वाटत असेल तर मी हा माझा सन्मान समजतो.
पण प्रतिसाद जमत नाही आहेत.
पण प्रतिसाद जमत नाही आहेत. लेखक चुका लगेच मान्य करत आहेत. असं असतं का कुठे? >> हा ही एक मोठ्ठा गैरसमज आहे. अशी किती उदाहरणे देऊ ज्यात मी एखाद्याला चुका दाखवल्या आहेत आणि त्याने मान्य केल्या नाहीत ?