सोनी मराठी - तुमची मुलगी काय करते?

Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.

या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.

images (1).jpeg

या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! Bw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटलंच होत. मनवाची खास मैत्रीण आहे ती.
आता क्रांती रेडकर यायची तेवढी बाकी राहील मग.

एक प्रोमो बघितला. क्षिति जोग नवीन सी बी आय इन्स्पेक्टर म्हणून येतेय......
हो.काल शेरेकरने छान ट्रँप रचून भोसलेकडून ही केस जाईल याची सोय केली.खरतर ही केस शेरेकरकडे जायला हवी होती.पण चौधरीने ती भोसलेकडे आणली,वेंगसरकरकडे वशिला लावून.आता एवढी आमदाराची हाय प्रोफाईल केस सीबीआय कडे गेली.म्हणून क्षिती जोग.
बहुतेक नाईक मँडम काम नसलेल्यांना काम मिळवून देत असाव्यात.
दरम्यान बोशुदराला काल कळल राजेशबद्दल,जोरजोरात ओरडत दरवाजा उघडा असताना बोलल्यावर काय होणार.नशीब अजून शेरेकरला नाही कळल.
भोसले निरपराध माणसांना टार्गेट करून संशयित म्हणून टॉर्चर का करतो?.कसा आला हा पोलिसमध्ये.

सॉरी, जरा उशिरा बघीतली त्यामुळे अंध असलेला राजेश ( भोसले चे पप्पा ना? ) महाडीकच्या बंगल्यावर कसा जातो? त्याचाच खून करतो की चूकुन होतो? राजेश ला भोसले डिटेल्स का नाही विचारत?

तो सेक्रेटरी पोचवतो त्याला, आमदार बोलावतात. तो वॉशरूम ला जातो आणि खून होतो. तो शस्त्र स्वतःच उचलतो. तो लेकाला सांगतो मी निर्दोष आहे, लेक त्याला सोडवतो तिथून.

स्वतः चा बाबा निर्दोष तसा दुसरा पोरगाही असू शकतो, पण त्याला थर्ड डिग्री द्यायला हा पुढे.

तो भोसले पण जाणार आहे का.

काल एक एपिसोड बघितला त्यात भोसले किती वेळा म्हणतो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा तुम्हाला काही होऊ देणार नाही, हेच वाक्य व्यंकटसमोरही बोलतो.

म्हटलं हा वर गेलेला दाखवून bb त येतोय काय, हाहाहा.

तसंही bb सुरू झाल्यावर, यांना किती प्रेक्षक मिळणार.

ती कन्याकुमारी तऱ्हेवाईक आहे पण मस्त भोसलेला पुरावे नष्ट करताना पकडणार आहे.

किलवर मध्ये आता कोणाला इंटरेस्ट उरला असेल असं वाटत नाही.

भोसले सतत मातीच खातो.

सध्या चक्क सिरीयल मधे कथेने बर्‍यापैकी पेस पकडलाय, कन्याकुमारी कॅरॅक्टर मनीहाइस्ट मधल्या प्रेग्नन्ट आणि व्हिम्जिकल पोलिस ऑफिसरवरून घेतलय /कॉपी केलय पण चांगलं काम करतेय क्षिती जोग , तिचे डॉयलॉग्ज भारी आहेत !

आता वेग येईल असं वाटलं, क्षिती जोग चांगलं काम करतेय. ती पटकन समोरच्याचा एका शब्दात इन्स्लंट करते, ते फार आवडतं, इतकी पट्कन बोलते की समोरच्याला कळेपर्यंत ती बोलण्यात अजून पुढे गेलेली असते.

नवरा पण म्हणाला आता रंगत येतेय सिरियलमध्ये. ह्या महिन्यात संपली तर बरं होईल. दोन तारखेनंतर हिला फार trp मिळणार नाही.

हरीश दुधाडे बिग बॉस मध्ये येतोय अशी न्यूज आहे .. >>> मला ते वाटतेच आहे, म्हणून मी वर लिहिलं. मागच्यावर्षी पण त्याची चर्चा होती. त्याची भूमिका संपवायची म्हणून क्षिति जोगला आणलं असावं असं वाटलं.

त्याने कलर्सवर पूर्वी खूप काम केलंय त्यामुळे आज ना उदया तो bb त नक्की येणार.

कदाचित हरीश दुधाडे बिग बॉस ४ ला येत असावा, कारण Youtube वर कलर्स मराठीच्या अधिकृत पानावर त्याच्या चेहऱ्याशी मिळत्याजुळत्या चेहऱ्याची सावली दिली होती आणि ओळख पाहू म्हणून विचारले होते.

मी दुसरीकडे बघितलं, पण नाक छोटं वाटलं मला. त्याचं नाक जरा लांब धारदार आहे.

मला तो येत असावा असा संशय दुसऱ्या गोष्टीमुळे आला, त्याला तुमची मुलगी मध्ये उगाच डोक्यावर चढवून ठेवलेलं आणि अतिमहत्व दिलेलं आणि एकदम स्टोरी बदलल्यासारखं करून क्षितिला आणलं त्यामुळे तो bb त येत असावा असं वाटलं, त्याला दिलेले काही डायलॉगज पण त्याचा रोल संपवणार की काय संशय येण्यासारखे वाटले.

कारण Youtube वर कलर्स मराठीच्या अधिकृत पानावर त्याच्या चेहऱ्याशी मिळत्याजुळत्या चेहऱ्याची सावली दिली होती आणि ओळख पाहू म्हणून विचारले होते.>> ती सावली बघून सुव्रत जोशी किंवा भूषण प्रधान वाटतं होत मला.. पण बरेच जण हरीश म्हणत आहेत ..असो .गेला तिकडे तर जरा बारीक होईल . किती sharp features aahet हरीश चे.. जाड झालंय सो सगळं लपतय..नाक डोळे मस्त आहेत ..

पण बरेच जण हरीश म्हणत आहेत . >>> सेम वाचलं मी . मलाही नाकावरून तो वाटत नाहीये.

नाक डोळे मस्त आहेत .. >>> अगदी अगदी. मी पूर्वी त्याच्या फॅन पेजला लाइक केलेलं, तेव्हा हे कळवले होतं त्याला. डोळे एकदम तेजस्वी आहेत, रंगही छान. पण mmtz मध्ये जेवढा आवडला तेवढा आता आवडत नाही. तेव्हाचा अभिनय अति जबरदस्त होता. त्या सिरियलच्या आधी आणि नंतर काही वर्ष तो ई टीव्ही आणि कलर्सने दत्तक घेतल्याप्रमाणे असायचा बऱ्याच सिरियल मध्ये, आदेश बांदेकर करतात तसल्या शोचा anchor ही होता.

यावेळी डायरेक्ट कलर्सचा कुठला चेहेरा असेल. कोणी समीर परांजपे म्हणत आहेत पण तो स्मृती गेलेल्या रोल मध्ये असेल सिरियलमध्ये असं वाचलं, कोणी राजा राणी मधली राजाची व्हिलन वहिनी येणार आहे म्हणतायेत.

हरीश दुधाडे नसावा बिबॉसच्या घरात कारण असच त्यांनी अम्रुता खानविलकरचा फोटो टाकला आहे आणि बाजूला एक फोटो आहे आणि ओळखायला सांगितल आहे की ही न्रुत्यांगना अम्रुता आहे का.पण ती नक्की नाही कारण ती झलक दिखला जा मध्ये आहे.
असो.पण आज भोसले होता.
क्षिती जोग काम चांगलीच करते.पण तिला काय किंवा कुणाला आणून काही उपयोग नाही .कारण शेवटी खर्या कील्वर पर्यंत भोसले आणि श्रध्दा मिरजकरच पोचणार हे तर शंभर टक्के.सीबीआय येऊ देत किंवा सीआयडी येऊ देत.
मेन फोकस भोसले आणि मिरजकर कुटुंब आहे.
मला तर आता अभयलाच कील्वर दाखवतील अस वाटत आहे.
यांनी काही ऑप्शनच ठेवलेला नाही.
प्रसाद गेला,महाडीक गेला,चारू कील्वर नाही.आता कोणी राहिलच नाही.
अजूनपर्यंत सिरियलच्या लोगोमध्ये कील्वरमध्ये श्रध्दा,सावनी आणि भोसलेच दाखवत आहेत.
म्हणजे कदाचित अभयच असेल.

ती आमदार फ्लॅटचा जिना उतरणारी युवती तायशेटे होती का, तशीच स्लिम स्लिम वाटली.

के के ने मस्त तायशेटे आणि शेरेकरची उतरवली.

उद्याच्या प्रोमोवरून अभयच किलवर दाखवतील वाटतं, केके साठी दरवाजा उघडतो अभय तेव्हा दोघांच्या चेहेर्यावरचे भाव भारी होते, अभय टरकलेला.

त्या केकेला किलवर, सावनी मिरजकर केस याबद्दल काहीच कसं माहिती नाही, मागेही सी बी आय कडून एक हिंदी माणूस आलेला ना, भोसलेने कळवलं होतं तेव्हा, भोसलेचे कौतुक करत होता.

अभय नसेल किलवर तर केकेचा नवरा दाखवतील, काही सांगता येत नाही, हाहाहा.

दोन तारखेपासून bb आहे, नंतर कोण बघणार ही सिरीयल, किलवर, किलवर खेळत बसुदे सोनी चॅनेल.

Big boss Marathi season ४ चा धागा काढा आता कोणीतरी Happy ( मला ऑप्शन दिसत नाही )

उपग्रह वाहिनी - मराठी या ग्रूपचे सदस्यत्व घ्या. मग दिसेल.

वर दिसतोय ग्रूप.

फोनवरून प्रतिसाद चौकटीच्या खाली नवीन लेखनाची सोय दिसते

धन्यवाद भरत... Happy काढला Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ चा धागा.एकाच्या ऐवजी दोन झालेत . डिलिट करायचा ऑप्शन दिसत नाहीये

ही निलांजना श्रध्दाला पूर्ण माहिती का देत नाही.त्या श्रध्दाच्या शेजारणीबद्दल का सांगत नाही
पण सावनीला जिवंत ठेवण्याच कारण कळल.कील्वरला पैसे नकोच होते.म्हणे इंटरनँशनल क्राईम ऑर्गनायझेशन ला एसएसडी ड्राईव्हच्या चिपमध्ये असलेली व्हायटल माहिती हवी आहे,जी नताशाने ज्या बँगमध्ये पैसे ठेवले होते त्यात आहे.म्हणून हा सगळा खटाटोप.
महाडिकच प्रकरण सीबीआय कडे आणि अशा एवढ्या इंटरनँशनल ड्रग्ज रँकेटच प्रकरण भोसलेकडे.कहर आहे.

ती निलांजना त्या बाईबद्दल का सांगत नाही हा प्रश्न मलाही पडलाय आणि जी माहिती सावनी देते, ती स्वतः ची म्हणून का सांगते.

भोसले झाबुआला एकटा गेला त्या पोरीला शोधायला, किती माती खातो, तरी सिरियलवाल्यांना त्यालाच हिरो करायचं, आजही के के च्या एका डायलॉग मध्ये भोसले मरण उल्लेख होता.

आजचा एपिसोड स्त्रीशक्तिचा विजय असो वगैरे होता.

भोसलेला हीरो केल्याशिवाय ही सिरियल संपत नाही. ती क्लिप के के ला दाखवू नको, असं जमदाडेला सांगून पळून गेला, त्या मुलीला शोधायला एम पी त . नंतर जमदाडेला काही कोणी विचारणार नाही असं वाटलं का त्याला .

आजचा एपिसोड स्त्रीशक्तिचा विजय असो वगैरे होता.......
अगदी अगदी.तिकडे स्टारप्रवाह वर अख्खा आठवडा नवरात्र विशेष आहे.म्हणून सोनीने सुध्दा संधी साधली.ः
पण मला आवडल त्या बायका मस्त गेल्या आणि छान ऑपरेशन मायकल लोबो एकदाच पार पडल.बर झाल भोसले नव्हता.
शेरेकर वैतागल्याच मस्त वाटल.
मला आवडत हे कँरँक्टर आणि त्याने मस्त केल आहे.
भोसले आता त्या बाईला शोधेल आणि परत काहीतरी माती खाईल.
अर्थात बिबॉसमध्ये यायच असेल तर संपवतील .पण शक्यता कमी वाटत आहे.

भोसले हिरोसारखा एकटा गेला, शेवटी केके mam आणि टीम गेलीच मदतीला, कसला पचका झाला.

सिरीयल सुरू झाली तेव्हा दुधाडे एवढा जाडा नव्हता, त्याला मुद्दाम वजन वाढवायला सांगितलं आहे की काय, मग जोक करता येतात त्याच्यावर.

शेरेकर विचित्र दाखवला आहे म्हणून नाहीतर एसीपी म्हणून तो शोभतो, हाईट पर्सनॅलिटी भारी. एसीपी लेवलचा माणूस असल्या सिली मिस्टेक्स करत असेल का, पत्रकाराच्या पाठीमागे धावत असेल का, अतिरंजीत दाखवतात. शेरेकर मला राजा राणी सिरियलमधल्या हीरोचा भाऊ आहे की काय वाटतं, तशीच हाईट पर्सनॅलिटी.

चौधरी mam पण एसीपी म्हणून शोभतात.

बिबॉस मुळे आता नाही बघत.पण तरीही काल थोडा पाहिला भाग.
फायनली केकेमुळे महाडिक केस सॉल्वह झाली.भोसलेकडे असती तर झालीच नसती.त्यात केकेला छान मुलगी पण झाली.काल छोटा पण छान निरोप समारंभ झाला पोलिस स्टेशनमध्येच फेरेकरविना.
जाताजाता केके चौधरीला महत्वाची टीप देऊन गेली की किल्वरबरोबर पोलिस डिपार्टमेंटमधल कोणीतरी सामील आहे.तलाला शोधा म्हणजे कील्वर बाहेर येईल.
त्यासाठीच शेरेकरला इतके दिवस ठेवले आहे का की वेंगसरकर आहे कील्वरला सामील?
वंदनाचा पत्ता बहुधा कट केला असावा.मिरजकरांच्या दारात जळलेली असावी बहुतेक अशी डेडबॉडी प्रोमोत दाखवली.
आता केके गेल्यावर परत भोसलेच माती खाण सुरू होईल.पण केकेमुळे सिरियलने घेतलेला वेग न मंदावता आता त्या करप्ट पोलिसाला शोधा,कील्वरपर्यंत पोचा आणि संपवा एकदाची सिरियल.

Pages