नवीन घरात राहायला जाणार असाल तर कोणती भांडी असायला हवीत?
Basic यादी देते आहे.
जुन्या घरातून नवीन घरात जाताना किंवा नवीन संसार थाटणाऱ्यांना उपयोग होईल.
.
देवपूजेचे साहित्य
ताम्हण, पळी, कलश इत्यादी
पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी हंडे, कळशी
स्टील च्या बादल्या इत्यादी
..
फराळाचे चमचे, स्वयंपाकाचे मोठे चमचे (पळी, उलथणं इत्यादी)
विळी
चाकू
सालकाढणी
स्टीलची कढई
परात
पोळपाट लाटणे
पातेली 4
चहासाठी कप बशा, गाळणी
कडची
किसणी
Lighter
तिखटमीठाचा डब्बा
तेलाचा कावळा
मीठाची बरणी
कढई
पातेली
.
Cooker, डब्बे
मिक्सर
Induction / गॅस स्टोव्ह, सिलिंडर
Induction वर चालणारे cookware
कात्री
.
पाण्याची रिफील, dispensar
.
ताटे 6
वाट्या 6 (लहान, मोठ्या )
पेले 6
तांबे 6
तवा
फराळाच्या प्लेट्स (खड्डे असणाऱ्या )
(Dinner set असेलतर )
.
सरबताचे पेले
चहा/ कॉफी /दूध पिण्यासाठी कप/मग
ट्रे
.
अजून काही आठवलं तर भर घालूया
स्वयंपाकघरात काम करता करता यु
स्वयंपाकघरात काम करता करता यु ट्यूब व्हिडियो पाहता येतील यासाठी काय करता येईल? >> फोन स्टॅंड घ्यावा किंवा आता सॅमसंगचा फॅमिल हब रेफ्रिजरेटर ज्याच्या एका दारावर स्क्रिन येते तो घ्यावा
मी बत्ताच वापरते नारळ फोडायला
मी बत्ताच वापरते नारळ फोडायला. (वाढवायला असं नेहमीच म्हणतात की शुभकार्यासाठी नारळ फोडतात तेव्हा म्हणतात?)
नारळ सोलायला जाड जुनी, धार गेलेली सुरी. सुरीने थोडी सैल केली शेंडी की हाताने सोलता येतं. मी शेंडीही पूर्ण काढून टाकते, म्हणजे मग एकदम स्वच्छ होतो.
Actually जास्त भांडीकुंडी आधी घेऊच नयेत. लागतील तसतशी घ्यावीत. उगाच पडून राहतात.
फोन स्टँड +१. टॅबलेट असेल तर
फोन स्टँड +१. टॅबलेट असेल तर टॅबलेट कव्हर मिळते, जे स्टँड सारखे वापरता येते.
नवीन घरात जाताना 'शेजार्
नवीन घरात जाताना 'शेजार्यांनी' कुठली भांडी घ्यावी, ह्यावर एक धागा काढावा.
नारळाच्या शेंड्या काढायला
नारळाच्या शेंड्या काढायला कोयता नसल्यास चपट्या टोकाचा स्क्रू ड्रायव्हर सगळ्यात उत्तम. शेजाऱ्यांनी कृपया स्क्रू ड्रायव्हर सेट घ्यावा.
नारळ कसा फोडावा यात वेगळ्या
नारळ कसा फोडावा यात वेगळ्या धाग्याचे पोटेन्शल आहे.
कोयत्याने वा अन्य कशाने फोडण्यापेक्षा बरेच वेगवेगळे प्रकार केले जातात.
मला माझ्या एका मैत्रिणीने एक
मला माझ्या एका मैत्रिणीने एक गुळगुळीत दगड दिलेला आहे मी त्यानेच नारळ हातात धरून फोडते.दोन फटक्यात फुटतो.
आमच्या कडे पुर्ण सोलून नारळ मिळतात.
हपाला मम!
हपाला मम!
जिममध्ये जावं लागू नये, विजेची बचत व पैशाची बचत अशी फायद्याची पारंपारिक उपकरणे घे किल्ली.
पाटा वरवंटा, खलबत्ता, उखळ, जातं , रगडा व सूप पाखडायचं
माझं स्वप्न आहे एक छोटंसं शेतघर अश्या सगळ्या उपकरणंसहितच. तिथे चूलही व शेगडी असेल. शेगडी चूल शहरात वापरायला सोयीची नाही.
वेळेची बचत करायची गरज असेल
वेळेची बचत करायची गरज असेल तर ही उपकरणे उपयोगाची नाहीत. शिवाय नवीन घरांतली स्वयंपाकघरे इतकी मोठी असतात की एकावेळी दोन माणसं शिरली तर धक्काबुक्की होते. त्यात ही सगळी जड उपकरणे जमिनीवरच ठेवायची.
आता स्वयंपाक बनवता येणारे
आता स्वयंपाक बनवता येणारे कोणी हयात आहे का?
काही सामान आज च्या कमचोर पिढीला नको
फक्त swigy, सारखी अनंत ॲप वापरता आली पाहिजे त.
१. कांदा, लसुण किंवा कमी
१. कांदा, लसुण किंवा कमी प्रमाणात भाज्या चिरायला ते हाताने दोरी (स्ट्रिंग) ओढायचे यंत्र.
२. नारळ सोलुन झाल्यावर कोयत्याने फोडण्याआधी जर त्यावर तुस वाटत असतील तर दातेरी सुरीने नारळ खरवडल्यासारखा करुन घ्यायचा तुस निघुन जातात.
३. बर्यापैकी जाड आणी टोकाला जरा रुंद असे लाटणे. लैट गेली की कधी कधी भाजलेले शेंगदाणे किंवा मिरच्या कुटायला(स्टीलच्या ग्लासात :)) ) कामात येते.
४. अंड किंवा भज्यांचे पीठ ढवळायला व्हिस्क/एग बीटर इ.इ.
आता स्वयंपाक बनवता येणारे
आता स्वयंपाक बनवता येणारे कोणी हयात आहे का? <<<म्हणजे..
अमुपरी
अमुपरी
हे बघा हो भरत
हे बघा हो भरत
काम करता करता युट्यूब बघायला
https://www.amazon.in/BHAVANS%C2%AE-Rotating-Windshield-Dashboard-Motoro...
जिममध्ये जावं लागू नये,
जिममध्ये जावं लागू नये, विजेची बचत व पैशाची बचत अशी फायद्याची पारंपारिक उपकरणे घे किल्ली...
धन्यवाद
पण माझ्याकडे almost सगळं सामान आहे.
फक्त ते इकडून तिकडे न्यायचं आहे
काही महत्वाचं विसरायला नको आणि अनावश्यक न्यायला नको म्हणून यादी केली.
गावाला सगळी पारंपरिक उपकरणे आहेत.
नांदेड ला राहतं घर आहे मध्यम स्वरूपात आणि माझ्या पुण्याच्या संसारात बरीच नवीन साधने आहेत जी इथे गरज नाही म्हणून unpack केली नव्हती
नवीन घरात इतकं काही काही
नवीन घरात इतकं काही काही घ्यावं लागलं आहे, furniture इ मध्ये, की आता पैसे खर्च करायचे म्हटले की थंडी वाजते.. हूड हूड
जुनी कपाटे, bed सगळं नांदेड लाच ठेवून यावं लागणार आहे.
.
अनु तसं स्टॅन्ड होत माझ्याकडे... फार लवकर तुटलं ते
.
हपा ++१११
मी तेच करते
लागल्या हाती पुढील वस्तू पण
लागल्या हाती पुढील वस्तू पण घ्या:
पाण्याचा माठ
मातीचे भांड - भाजी वगैरे करायला
घरगुती आणि विकतचे मसाले पुड्या ठेवायला एक प्लास्टिक डबा
एक चांगला पेन, डायरी/लूज पाने (लिस्ट करायला)
स्टिकर्स (लेबल्) + पेन
चिकटपट्टी+despenser
खलबत्त्याला अनुमोदन,
खलबत्त्याला अनुमोदन,
पाव भाजी/पोटेटो मॅशर
झारा
कोलेंडर colander
लहान बाळाची वाट्या चमचे, सारखे खायला मागतात
भारतात असाल तर जास्त भांडी जमा करू नये, माळ्यावर जातात. कधीही अमेझॉन वरून मागवता येतात/ शेजारी झिंदाबाद!
गर्जा पण बदलतात, शिवाय जुगाड करता येतात, मी इडली साचा व स्टीम करण्यासाठी भांडे न घेऊन आल्यामुळे सध्या सिलिकॉन चे मफिन चे साचे वापरतेय
फ्लॅट आणि रुंद टोकाचा स्क्रू
फ्लॅट आणि रुंद टोकाचा स्क्रू ड्रायव्हर. नारळ फोडलं की खोबऱ्याचे मोठे तुकडे उपसून काढायला. काही डब्यांची घट्ट बसलेली झाकणं काढायला पण उपयोगी. (चमचे, उलथणे वगैरेचे मागचे टोक वापरतात आणि ते वाकडे होतात.)
बॉटल ओपनर कम सीलर. केचप वगैरेच्या बाटल्यांचे सील काढायला आणि त्याचं प्लास्टिक झाकण पोरांनी तोडलं/हरवलं तर ते ओपनर आडवे सरकवून सील करूनही ठेवता येते बाटली.
मोजणी कप आणि मोजणी चमच्यांचा संच.
घासलेली भांडी ठेवण्याचं जाळीचं टोपलं.
दूध उतू न जाण्याचं झाकण, (ऍमेझॉन वर मिळतं.)
जाळीची झाकणं (काही पण गार व्हायला ठेवलं असताना झाकायला).
Table mats, गरम भांडी ठेवायला
Table mats, गरम भांडी ठेवायला स्टॅंड्स. Trivets
या अशा packet sealing clips.
या अशा packet sealing clips.
डब्यात /कप्प्यात ओपन केलेले पॅकेट्स पटकन सील करून ठेवायला.
आयुष्य शक्य तेवढं सोपं करावं.
आयुष्य शक्य तेवढं सोपं करावं. नारळबिरळ फोडायच्या भानगडीत पडू नये. मी हल्ली सरळ बिगबास्केटवरून ओल्या खोबर्याचे तुकडे विकत आणते, मिक्सरमधून इंचरने बारीक केले की खोबरं तयार. थोडं महाग पडलं तरी वेळ, श्रम, खटपट, राडा आवरणे यापेक्षा फार सुटसुटीत होतं. बरं तसंही स्वैपाकात सकाळसंध्याकाळ भसाभसा खोबरं घालतच नाही.
सेम दाण्यांबद्दल. काहीकाही वेळा कच्चे दाणे आणून भाजून वगैरे ठेवते, पण बरेचदा भाजलेले दाणे आणून ठेवते, लागेल तसं कूट करून घेऊन वापरते.
बाकी फार पसारा वाढवू नका भांड्यांचा. नेहेमी लागतील ती आधी घ्या आणि मग लागतील तशी उरलेली. एकदम खर्च करायची गरज नाही.
डावांमध्ये भातवाढणी, उलथणे (एकाला दोन चालतील), वरण आमटीसाठी ओगराळे, भाज्यांसाठी तीनचार डाव (लहानमोठे), पोळ्यांचा चिमटा, सांडशी, रवी, एग व्हिस्कर, सालकाढणे, गाळणी (दोनतीन - चहा, दूध, तूप), मॅशर, लिंबूपिळ्या, किसण्या (लहान आणि मोठी/विविध भोकांची), दोरीवाला चॉपर, विळी सुर्या कात्री, बॉटल ओपनर. बाकी बहुतेक वरती आलंच आहे यादीत. हो, आणि पातेल्यांबरोबर वाडगे, कुंडे घ्या काही. चार पातेली लहान ते मध्यम आणि एखाद दोन मोठ्ठी, जास्त लोक आले तर लागतील अशी. कढईतही पळी, कढलं, तळणाला छोटी कढई, एक नेहेमी भाजीला लागेल ती आणि एखादी मोठ्ठी. यातली एखादी आवर्जून लोखंडी असू देत.
वरच्या प्लॅस्टिकच्या सीलिंग क्लिप्स घ्याच. सगळे डबेडुबे घेतले जात नाहीयेत तोवर तीनचार मोठे डबे घेऊन छोट्या पुड्या त्यात क्लिप्स लावून ठेवता येतात.
हॉकिन्सचा ५ लि.च्या आतल्या झाकणाच्या कुकरमध्ये बसेल असा इडलीचा स्टँड मिळतो. त्याने वेगळे इडलीपात्र घ्यावे लागत नाही.
तव्यांमध्ये मिनि उत्तपम पॅन मिळतो अंजली, निर्लेप इ कंपन्यांचा तो फार उपयोगी पडतो. धिरडी, ऑम्लेट्स, उत्तपे, थालिपिठे फटाफट घाणे होतात. अवश्य विचार करा.
मोठ्या कुकरबरोबरच एक लहान अडीचतीन लिटरचा पण कुकर घ्या, स्वैपाक चटकन होतो.
शक्य असेल तर मिक्सरऐवजी फूडप्रोसेसर घ्या, कणीक मळणे, भाज्या किसणे चिरणे वगैरे अनेक गोष्टी सोप्या होऊन जातात.
बाकी नव्या घराबद्दल शुभेच्छा
नारळबिरळ फोडायच्या भानगडीत
नारळबिरळ फोडायच्या भानगडीत पडू नये. >>
असं काय लिहीलं मध्येच... मुद्दा लक्षात आला नंतर पण आधी वाटलं ते गोभी मुस्सलम असतं तसं अख्खं नारळ वापरायला सांगते. नारळ मुद्दाम स्टोअर मधून मागवले नाही तरी महाराष्ट्रात रहात असेल तर नारळ अधून-मधून घरात आपसूक येतात. कुणी ओटी भरतं, कुणी सत्काराला देतात, कुणाच्या घरी पूजा होते ९-१० नारळ आणतात नि आपल्याला वाटतात. वाढवायची काहीतरी सोय हवी. आता करोनामुळे येत नसतील पण त्यापूर्वी असं होत होतं...
हो, खरंय सीमंतिनी. हे लक्षात
हो, खरंय सीमंतिनी. हे लक्षात आलं नाही. हल्ली मी आलाच चुकार नारळ घरात तर ज्यांच्याकडे खोवणी आहे अशांकडे देऊन टाकते. एकेकाळी करायचे सगळे उपद्व्याप पण आता विरक्ती आली.
तुकडे करून इंचरने खोबरं
तुकडे करून इंचरने खोबरं चांगलं निघतं का वरदा? म्हणजे वरून घालण्यासारखं? तसं होत असेल तर चांगलं आहे. कारण मला नारळ फोडायचा कंटाळा नसला तरी खरवडायचा ( खोवायचा) आहे.
>>आयुष्य शक्य तेवढं सोपं
>>आयुष्य शक्य तेवढं सोपं करावं >> म्हणून फक्त नारळ फोडून खवणे वर्ज केले, आणि शेंगदाणे कधीकधी भाजणे. बाकी पोस्ट फॉलो केली की सोपं क्रावं मध्ये 'शक्य तितके' वर फारच जास्त भर जाणवतोय .

>>बाकी फार पसारा वाढवू नका भांड्यांचा. >> वाचुन पुढे सहा परिच्छेद लिस्ट आहे म्हणजे हा मायबोलीचा जुना आयडी असणार
>>>>आयुष्य शक्य तेवढं सोपं
>>>>आयुष्य शक्य तेवढं सोपं करावं
क्या बात है!!! माझंही हेच तत्व आहे. एक हौस म्हणुन सठीसामाशी काहीतरी करावं अन्यथा नारळाचे दूध काढणे, शेंगदाणे भाजणे, मसाले घरी बनविणे हे सरळ आऊटसोर्स करावं.
वावे, मी सहसा वरून घालत नाही
वावे, मी सहसा वरून घालत नाही खोबरं, फक्त स्वैपाकात वापरते. पण मला फार फरक नाही वाटत दोन्हीत. एकदा करून बघ. हवं तेवढं बारीक करता येतं. बाकी चटणीही छान होते अशा खोबऱ्याची.
Kitchen :
ओके. करून बघते पुढच्या वेळी.
ओके. करून बघते पुढच्या वेळी.
Pages