ही शिरेल सत्य घटनेवर आधारित आहे. सातारा जिल्ह्यातील वाई मधे घडली आहे शिवाय सीझन१ चं शुटिंगही वाईजवळील कडेगाव येथे झालं आहे.
वेगवान कथा मांडणी अन सर्व नवोदित कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे सीझन१ गाजला. पहिला सीझन संपताना दुसर्या सीझनची चाहुल लागली होतीच म्हणा जी आता फलद्रुप होत आहे. देवमाणुस-२ चा पहिला टीझर झी-मराठीवर पाहिला होताच.. ज्यात डॉ. अजितकुमार देवच्या नावाची पाटी गावातल्या वाड्याबाहेर लटकलेली असते जी कोणीतरी काढुन खाली पाडतं हे दिसलं होतं.
काल झी-मराठीवर अजुन एक टीझर पाहिला जो जाम अपिलिंग होता..
देवमाणुस डॉ. अजितकुमार देवचं (किरण गायकवाड) मोठं पोस्टर रस्त्यावर लावलेलं असतं ज्यावर देवमाणुस यांचं प्रथम पुण्यस्मरण वगैरे मजकूर लिहिलेला असतो. त्या पोस्टरवर आपण नजर फिरवत असतो तेवढ्यात पोस्टरच्या मध्यभागातुन पोस्टर फाडत काळा चश्मा लावलेली सरु आज्जी काठी टेकत बाहेर पडते अन जोरजोरात करवादू लागते -
"हितं कुनी ठीवलंय रंss मदी काय वाटंssत..? त्याची किरडी ढासाळली त्याची.. त्याच्या किरडीचा मोडला बांबू लवकर.. त्याच्या पालकीचा निगाला धूर... त्याला घातला न्हिऊन डबर्यात..!!"
सरु आज्जीला टिव्हीवर अशा इरसाल शिव्या देताना बघताच पोराटोरांसहीत म्हातार्या-कोतार्यांपर्यंत सगळे भयंकर जोरात हसत "आली वाटतं म्हातारी परत..!" असं म्हणे पर्यंत अनाउंसमेंट होते की रविवार दिनांक १९ डिसेंबर रोजी देवमाणूस२ चा महा एपिसोड अन लगेच २० डिसेंबर पासुन सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठी वर ही मालिका सुरू होत आहे.
तर अशा या अस्सल सातारी मातीत घडणारी शिरेल बघण्यासाठी अन तिच्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..!
काय झाले पहिल्या दोन
काय झाले पहिल्या दोन भागांमध्ये? प्रोमो वरून काही अंदाज लावता येत नाही.
महाएपिसोड नाही पाहिला पण
महाएपिसोड नाही पाहिला पण कालचा भाग पहिला. देवमाणूसचा प्रथम पुण्यस्मरण आहे. बज्या, नाम्याची लगबग चालली आहे. गावजेवणाची तयारी सुरू आहे.
डॉक्टर राजस्थानी पेहरावात त्याच्या बायकोसोबत गावात आलेला आहे. भाषापण राजस्थानी बोलत आहे. डॉक्टरला मेमरी लॉस झाला आहे वाटतं कारण त्याला काही आठवत नाहीये. त्यांची आधीच डिंपल सोबत भेट झाली असावी कारण तिचे मनोगत सुरू होते ज्यात ती डॉक्टरच्या जिवंत असण्यावर अनुमान लावत होती.
इकडे डिंपल ची आई मंगल घरात रिकामे डब्बे धुंडाळत असते. हलाखीची परिस्थिती झाली आहे, स्वयंपाकाला धान्य नाहीये. बाप दारू पिवून फिरतोय. त्यातही म्हातारीला मटण खायचे आहे. मंगल गावजेवणाला मदत करायला जाते. तिथल्या भाज्या बघून तिला घरातील रिकाम्या डब्ब्यांची आठवण होते मग ती तेथून कांदे की काय चोरून लपवून घरी घेऊन जाते.
डॉक्टर बायकोसोबत फिरत आहे. त्याला देजावू फिलिंग येत आहे. एकेठिकाणी थांबून त्याने लपविलेले हातोडी बाहेर काढली(पहिल्या भागात त्याने हातोडी ने कुणाचा तरी खून केला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी खड्ड्यात पुरून ठेवली होती)
बज्या, नाम्या डॉक्टरसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्या बोली व पेहरावावरून ते इथले नाहीत हे उमजून ते निघून जातात तितक्यात डॉक्टर त्यांना बज्या, नाम्या अशी हाक मारतो.
पुढील भागात बज्या डॉक्टर परत आले म्हणून ओरडत आहे. डॉक्टर आणि त्याची बायको पुढे पळत आहेत तर गाववाले त्यांच्या मागे.
देवमाणूस राजस्थानी अवतारात
देवमाणूस राजस्थानी अवतारात छान वाटला.. त्याची बायको कोण आहे? जागो मोहन प्यारे मधली भूत तर नाही ना..?? देवमाणूस ला बघून डिंपल ची जाम टरकली
सरु म्हातारी अन् सरपंचाचे संभाषण कायतरी वाटलं..!
देव माणूस ही सत्य घटनेवर
देव माणूस ही सत्य घटनेवर आधारित नाही. मूळ घटना आणि सीरियल ची कथा ह्याचा काहीच संबंध नाही
मूळ घटनेतील डॉक्टर काही त्याच्या गावात देव माणूस वैगेरे प्रतिमेचा नव्हता.
आणि तो अजून पण तुरुंगात च आहे.
हम्म. सिरियलला प्रतिसाद
हम्म. सिरियलला प्रतिसाद मिळतोय बघून काढतात दूसरा भाग, काहीही दाखवतात.
इथले कथानक वाचून मला एक केस आठवली, महाराष्ट्रात किडनी रॅकेट चालवणारा डॉक्टर पकडला गेलेला ( बोगस डॉक्टर होता का खरा डॉक्टर होता आठवत नाही पण फार वाईट होता ). म टा ला बहुतेक रोज एक कहाणी यायची कसं कोणाला फसवले. काही वर्ष मध्ये गेली, तोच माणूस प्लॅस्टिक सर्जरी करून घेऊन उत्तरेत दिल्लीजवळ कुठेतरी हेच धंदे करताना पकडला गेला. तो इथून सुटून ते करू शकला म्हणजे काय म्हणायचं.
हा सुटू नये आणि फाशी व्हावी नाहीतर सिरियल मध्ये दाखवतात ते घडण्याची शक्यता आहे. अर्थात सिरियलमध्ये या कथानकाबाबत फॅक्ट दाखवावी आणि तो तुरुंगात आहे यावर मालिका संपायला हवी होती. दूसरा भाग वगैरे नको होता.
अंजूबरोबर सहमत.
अंजूबरोबर सहमत.
यात पहिल्याच सिझन मधे योग्य शिक्षा दाखवून संपवून टाकायला हवी होती.